काही दिवसांपूर्वी मुलीकडे गेले होते. तिच्या कडे देवपूजेसाठी फुलं मिळत नाहीत आपल्याकडे मिळतात तशी. बुके मधली फुल देवाना वहायला योग्य वाटत नाहीत आणि रोज तसे करणे परवडणारे ही नाही. फुलांशिवाय देव बघणे बरे वाटत नाही. काय करता येईल म्हणून मी विचार करत होते तर नेट वर बघुन ही सॅटीनच्या रिबीनीची फुलं केली आहेत. अगदी सोपी आहेत. देठाला सेल्फ अॅडहेसिव हिरवी टेप गुंडाळली आहे आणि पानं ही त्याच टेप पासून बनवली आहेत. आकाराने छोटी असल्याने देव्हार्यात ठीक्क बसतात आणि आकर्षक रंगांमुळे देव्हारा ही छान दिसतो. दर आठ पंधरा दिवसानी बदलुन बदलुन घालता येतात.
याशिवाय कुठे ही ऐन वेळेला सजावटी साठी उपयोगी पडतात जसे ताटाभोवती महिरप म्हणून केक च्या बाजुला सजावट म्हणून. फुलाला टुथ पिक चे देठ करुन छान बुके ही करता येतो. एखाद छोटसं फुल गिफ्ट द्यायच्या पाकिटाला लावून पाकीट सुंदर बनवता येतं.
हा त्याचा फोटो
From mayboli
ही फुलं कशी केली त्याची ही लिंक.
https://www.youtube.com/watch?v=7ZkXi0WtYc8
आता कृती ही लिहीते.
पाऊण इंच रुंद रिबीनीचा १५ इंच लांब तुकडा घ्यावा.
दोन इंचावर ती रिबीन ९० अंशावर दुमडावी आणि थोडी गोल गोल गुंडाळावी जेणे करुन गुलाबाच्या आतला भाग तयार होईल. तो झाला की रिबीन पाकळ्यांसाठी अर्धी फोल्ड करुन गुंडाळत जावे रिबीन संपेपर्यंत. फुल न सुटण्यासाठी खाली दोरा बांधावा. (लिहीलीय मी कृती पण नाही जमलय मला नीट लिहायला तेव्हा विडिओच पहा आणि करा. )
मध्यंतरी मी अशी खूप फुल केली कुणा कुणाला देण्यासाठी. शेवटी त्या दुकानदाराने विचारली की फुल बनवण्याचा तुमचा व्यवसाय आहे का ? ( स्मित)
हा आणखी एक फोटो
From mayboli
व्वा! फारच सुंदर!
व्वा! फारच सुंदर!
स्वाती, धन्यवाद
स्वाती, धन्यवाद प्रतिसादासाठी.
छानच
छानच
छान !
छान !
सुरेख !!!
सुरेख !!!
फार सुंदर!
फार सुंदर!
सुंदर.. अगदी सुबक !
सुंदर.. अगदी सुबक !
सुरेख. क्युट, लवली कलरफुल.
सुरेख. क्युट, लवली कलरफुल.
सुंदर !!
सुंदर !!
सुरेख दिसतायत, कुठली लिन्क
सुरेख दिसतायत, कुठली लिन्क वापरलीत? हरकत नसेल तर इथे देवु शकाल का?
खूप सुंदर!
खूप सुंदर!
वाह!!! किती सुर्रेख आयडिया..
वाह!!! किती सुर्रेख आयडिया.. आणी फुलं ही खूप सुबक झालीयेत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जमल्यास स्टेप बाय स्टेप शिकव बरं ऑन लाईन
किंवा लिंक टाक प्लीज!!!
छान!
छान!
क्युट न कलरफुल
क्युट न कलरफुल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
kitti god.. Agdi najuk aani
kitti god.. Agdi najuk aani subak..
सुंदर, कलात्मक .....
सुंदर, कलात्मक .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप सुंदर दिसताहेत ही फुले.
खुप सुंदर दिसताहेत ही फुले. आवडली. कशी बनवायची तेही लिहुन टाक लगे हाथ.
माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हा
माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हा सगळ्यांना आवडला खूप खूप धन्यवाद.
कशी केली ते लिहीते. आणि लिंक ही मिळतेय का ते बघते कारण खूप नेट सर्फिंग केलं होतं हे असं काही शोधण्यासाठी. .
खूप सुंदर आणि सुबक!
खूप सुंदर आणि सुबक!
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान. पण कॄती पण हवी होती.
खूप छान. पण कॄती पण हवी होती.
वा खुप सुंदर. तुम्ही खुप
वा खुप सुंदर. तुम्ही खुप चांगल्या कलाकार आहात हेमाताई.
फार सुंदर...
फार सुंदर...
काय सुरेख दिस्ताहेत फुलं!
काय सुरेख दिस्ताहेत फुलं! मस्तच !!
परत एकदा मनापासून धन्यवाद
परत एकदा मनापासून धन्यवाद सर्वांना.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेमाताई, खूप क्युट झाली आहेत
हेमाताई, खूप क्युट झाली आहेत फुले. कशी केलीत ते ही लिहा.
खुपच सुंदर दिसतायत फुलं!
खुपच सुंदर दिसतायत फुलं!
लिंक देण्यापेक्षा तुम्ही कशी केलीत ते सविस्तर लिहा.. प्लीज.
धन्यवाद सर्वांना परत एकदा
धन्यवाद सर्वांना परत एकदा पतिसादांसाठी.
फुलं कशी करायची ते लिहीलय हेडर मध्ये पण इतक छान नाही जमलय लिहायला याची जाणीव आहे. तेव्हा व्हिडीओच बघा.
.
.
Pages