नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?
८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ?
९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का ? आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का ?
१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा.
११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते ?

१२) अ‍ॅडमिनना विपू कशी करायची ?
१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ?

१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का ? का भेटलात ?

१५) मिपा वरचा आयडी कुठला ?

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ?

१७) कविता, गझला करता का ? का ?

१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का ? कशावरून ?

१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही ?

२०) दिवसातून किती तास देऊ शकता ? ( पडीक )

या आता !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच प्रश्नावली...

तुमचा आधीचा आय डी 'अड्डा, कट्टा, पहारा" असा कुठे पडीक असायचा?
तुम्ही काँग्रेस, आप की भाजपचे?
...हे ही लगे हाथ विचारता येईल का?

हे काय आहे पियु?

>> काल अ‍ॅडमीननी http://www.maayboli.com/node/54319 या धाग्यावर पोस्ट टाकणारे अनेक आयडी एकाचवेळी उडवले. जवळपास २० तरी. त्याला काही लोक 'पानिपत' असे संबोधतात.

अरे त्या पानिपत धाग्यावर नक्की कोण कोण खपले.. लिस्ट कुठे मिळेल.. २० लय मोठा आकडा आहे म्हणून विचारतोय.. धागाकर्ते चेतन गुगळे पण उडालेले दिसत आहेत..

बा द वे, विनोदी धागा होता ना तो ?

बा द वे, विनोदी धागा होता ना तो ?>>
मी पण विनोदी समजुनच वाचला होता पण भलतंच काहीतरी होतं.. कोणालातरी टार्गेट करून लिहिला होता बहुतेक. मला तरी काहीच समजलं नाही.

२४ काय असतं ते समजायला भरपूर वाचन कराव लागलं. Happy
धन्यवाद साती.

दा.. Happy

बाप रे . अ‍ॅडमिन फारच कठोर झालेले दिसताहेत. वाचलो बुवा. मीही तिथे काहीतरी खरडण्याच्या विचारात होतो::अओ:

अगदी इंद्राय स्वाहा :, तक्षकाय स्वाहा: झाले असते माझे...

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ? <<<<हा प्रश्न समजला नै मला...>>> मला पण अरेरे >>>> क्या???? ये २४ नहीं जानते! Proud
प्रश्न धम्माल!!

ते १८+ लोकांसाठी आहे. लिंबुटिंबु असाल तर कसं समजणार ? दिवा घ्या
>>>>>>>>>>>>>> Rofl खूप हसले

बा द वे.. तेरावे .. माबो एवढी जुनी आहे ... अवाकड् अ ओ, आता काय करायचं
>>>>>>>>>>>>>>

काहीही हां ऋ Proud >> Lol

दिनेशदा, मी उत्सुकतेने माझेही चेक केले आताच.. ४९ आठवडे ३ दिवस .. म्हणजे एक दोन अडीच.. आठवड्यांनी माझे वर्षश्राद्ध .. वा व्वा मला नवीन धाग्याला विषय मिळाला Proud

खालि उत्तरे दिलि आहेत

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ? = शाळेत
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ? - १ वर्शे ३३
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ? = कदिच नहि
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ? = नाहि
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ? = महित नाहि
५) कुठल्या कंपूत होता ? = कुठल्याच नाहि
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ? = नाहि
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ? = बरेच कहि
८) तूम्हाला पिकासावरून फोटो अपलोड करता येतात का ? कुठे शिकलात ? = नाहि
९) नवीन पाक़कृतीत फोटो थेट अपलोड करता येत नाहीत, हे तूम्हाला माहीत आहे का ? आणि तरी ते कसे करायचे हे तूम्हाला माहित आहे का ? =नाहि
१०) नवीन धागा आणि नवीन पान यातला फरक सांगा. = महित नाहि
११) चुकून दोनदा उघडलेला बीबी डिलीट करायला, काय करावे लागते ? = महित नाहि

१२) अ‍ॅडमिनना विपू कशी करायची ? = महित नाहि
१३) तूमच्या आयडीत जो नंबर आहे, त्याचा अर्थ काय ? = कुथला नम्बर

१४) मायबोलीवरच्या कुणाला प्रत्यक्ष भेटला आहात का ? का भेटलात ? = अजुन तरि नहि

१५) मिपा वरचा आयडी कुठला ? = मिपा वर आयडी नाहि

१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ? = महित नाहि

१७) कविता, गझला करता का ? का ? = नाहि

१८) प्रोफाईलमधला फोटो तूमचा आहे का ? कशावरून ? = मझ्या नावाने गुगळा कळेल

१९) प्रोफाईलमधे स्त्री का पुरुष, ते का लिहिले नाही ? = लिहिले आहे

२०) दिवसातून किती तास देऊ शकता ? ( पडीक ) = जस्तित जस्त १/२ तास

या आता !!!

Lol Lol

महेन्द्र ढवाण... मायबोलीवर स्वागत ! तूम्ही त्यांच्यापैकी नाहीत असा बेनेफिट ऑफ डौट तूम्हाला देण्यात येतोय.

Rofl
भारी प्रश्नावली!
१६) २४ हे काय असतं ? ते कसे करतात ?
हे नाहीच कळले. मामी यांचा लेख वाचुन ही नाही. Happy
माबो वर आल्या आल्या पहिला लेख ऋन्मेऽऽष यांचा वाचला होता आणि तीथे काही केल्या देवनागरीत लिहिता येईना. मग मावशी भाषेत प्रतिसाद लिहीला.
आणि गगो वरती सामिल झाले तर माझ्या वर डुआयडी आहे असा संशय घेण्यात आला. पण डु आयडी म्हणजे काय हेच कळेना. Happy
मदत पुस्तिकेत वाचल्यावर कळले. मग धागकर्त्याला इमेल केली ओळख देण्यासाठी पण काहिच उत्तर आले नाही. वाईट वाटले. मग ठरवले. गप्पाटप्पा नकोतच.
वाचन करायचे.. आवडले की प्रतीसाद द्यायचा. शंका आणि मुख्य कुशंका मनातच ठेवयच्या. या नाही कळल्याने काही बिघडणार नाही Happy

निरा, असे गप्प नाही बसायचे. कचाकचा भांडायचे त्याशिवाय ( इतरांना ) मजा येत नाही. जस्ट जोकिंग..
इथे प्रतिसाद देत रहा, अनेक मित्रमैत्रिणी जोडाल.

कंचन, नथिंग ऑफिशियल अबाउट धिस पश्नावली !!

Pages

Back to top