मुंबईकरांचे अच्छे दिन केव्हा येणार ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 June, 2015 - 16:35

पाऊस सुरू होऊन आठवडा झाला पण त्यात त्याने कोसळायचा मुहुर्त शनिवार रविवार विकांतालाच साधल्याने त्याच्याशी आमनेसामने असे दोन हात झालेच नाहीत,
पण आज पाऊसाने दिवसभर तुरळक संततधार काय लावली संध्याकाळी घरी पोहोचायचे वांधे झाले. नाही हो, छत्री बरोबर होती पण पटरीवरची ट्रेन रखडली होती. कुठून पकडली आणि कुठे पोहोचायचे होते, तेवढे विचारू नका. पण सुरूवातीचा ८० टक्के प्रवासाला जेवढा वेळ लागला तेवढाच वेळ शिल्लक २० टक्के कापायला लागला.

आता ज्यांना हे सवयीचे झालेय ते इथेच धागा सोडून पसार होतील. पण अरे थांबा. आता चालायचंच, म्हणत कधीपर्यंत हे चालवून घेणार. मध्यंतरी सरकारने लोकल ट्रेनच्या भाड्यात वाढ केली होती. थेट दुप्पट केले होते. तेव्हा सारे कसे पोटावर पाय पडल्यासारखे कळवळून उठले होते. मग तसे रोज गळा आवळला जाताना का नाही चवताळून उठत. रोज श्वास घुसमटला जाताना का नाही एखाद्या दिवशी धुमसून बाहेर पडत. स्साला काय लाईफ आहे आपली! वेळेला काही किंमत आहे की नाही आपल्या!.. आहे ना, ओवरटाईमचे तासाला तीनशे रुपये मिळतात! आज पाऊण तास एक्स्ट्राची ट्रेनमध्ये झक मारली. तीच जर ऑफिसच्या एसीमध्ये मारली असती तर सव्वादोनशे रुपये सुटले असते. थोडक्यात सव्वादोनशे रुपयांचे नुकसान झाले.. अन भरपाई शून्य!

तरी बरेय आपला फर्स्टक्लास आहे. उलट्या दिशेच्या ट्रेनला गर्दी कमी आहे. बसल्याजागी थोडे पाय ऐसपैस पसरता येताहेत. पण समोरच्या ट्रॅकवर रखडलेली ट्रेन. तिचा सेकंडक्लासचा डब्बा. आणि दारावर लटकलेले स्त्री-पुरुष!.. हो, पुरुष आणि स्त्री सुद्धा! काय बोलणार त्यांना. या ताई, तुम्ही बसा. मी उठतो. पण आमची ट्रेन तर उलट दिशेला चाललीय. मग तुम्ही तुमच्या घरी कश्या पोहचाल. आपले काय, घरी तासभर लेट पोहोचलो तरी फिकीर नॉट. आयुष्यातील फुकट जाणारा पाऊण तास, बसल्याजागी मोबाईलवर सत्कारणी लाऊ. स्टेशनला ऊतरून वडापाव खात घरी जाऊ. पण आपली चिल्लीपिल्ली वाट बघत असतील. आज आपला कूकर उशीरा लागला तर त्यांनाही जेवण लेट मिळेल. ऑफिसचा लेटमार्क जास्तीचे थांबून भरून काढाल, हा कसा भराल.

काही हरकत नाही. थोडे ऊशीरा पोहोचाल. पण जरा जपून जा. आपला जीव जास्त मोलाचा. थोडी रग लागली हाताला म्हणून दांडा सोडू नका.

बुलेट ट्रेन येतेय आता मुंबईत.. मुंबई ते गुजरात. १८ हजार कोटी! काल पेपरात वाचले. एवढा खर्चा करताहेत, तर कोणाचे तरी भले होणारच असेल. कोणाचे तरी अच्छे दिन येणारच असतील. पण त्यातून मिळणारा थोडा महसूल ईथेही वापरा. ज्या मुंबईतून ही बुलेट ट्रेन सुरू करत आहात त्या लोकल मुंबईकरांचा प्रवासही थोडा सुसह्य करा. अडकलेल्या ट्रेनमध्ये तळमळणार्‍या आत्म्याची ही ईच्छाच समजा. सुखकर नाही, बस्स सुसह्य.

या वरच्या पॅराग्राफमध्ये राजकारण शोधायला जाऊ नका. लेखातही शुद्धलेखनाच्या चुका शोधायला जाऊ नका. त्या होतच राहतात. मोबाईलवर लिहीत असल्याने जरा जास्तच असतील. तरीही छोटी छोटी वाक्ये. सोपे सोपे शब्द. छोट्या छोट्याश्याच तुकड्यातील, साधे सोपे आयुष्य. पाऊण तास असा वसूल केला.. चार ओळी खरडून.. मन मोकळे करून.. मूड चांगला लागला असता तर पावसावरच्या चारोळ्याच खरडल्या असत्या.. पण काही हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाईम.. उद्या पुन्हा अडकली ट्रेन तर पुन्हा भेटूया.. तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. ऋन्मेष.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, असे केले तर?
केजरीवालांना/त्यांच्या आपला मुंबईत आणुन बशिवले तर? येतिल का तुम्हाला चांगले दिवस?

हीरा.... हिंजवडी चे हिन्जेवाडी होण्यात मात्र इन्ग्रजाळलेल्या परभाषिकांचा व त्यांना शरण गेलेल्या एतत्देशीयांचा सहभाग आहे.

>>>> खरेच असे होईल का?माझे तर हे खुप मोठे स्वप्न आहे. <<<<<
हिंदूधर्मशास्त्रानुसार पहाटे पाहिलेली स्वप्नेच फक्त खरी होतात......
भरदुपारी दिवसा ढवळ्या टळटळीत दुपारी भर उन्हात कामे सोडून रिकामटेकडेपणी ऑफिसच्या खुर्चीवर जागतेपणी उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्ने खरी होत नाहीत. Proud

सुभाष चंद्रानीं त्यांच्या कार्यक्र्म मध्ये एक किस्सा सांगितला होता. बाळ ठाकरेंना कोणा पत्रकाराने प्रश्न विचारला होता की बॉम्बे मध्ये तुमचे सरकार आले आहे तर बॉम्बेकरांचे बरेच रेंगाळलेले प्रश्न तुम्ही सोडवले असतिल त्या बद्दल काही सांगाल का? तेंव्हा बाळा साहेब उत्तरले ते सगळे प्रश्न तर बॉम्बेत होते.आता ती बॉम्बे थोडिच राहिली आहे आता ही मुंबई झाली आहे.

प्र्श्न तर सगळे बॉम्बेत होते.

हिंदूधर्मशास्त्रानुसार पहाटे पाहिलेली स्वप्नेच फक्त खरी होतात......>>>

पण मी हिंदूधर्मशास्त्र माणत नाही काही होप्स आहेत का?

स्वप्न पुर्ण होतात..... ते डिपेंड आहे मध्येच कोणी उठवले नाही तर पुर्ण होतील नाहीतर अर्ध्यातून जाग येईल.
खरी होतात का नाही ते स्वप्नावर पण डिपेंड असेल ना ? Happy
लोक काय काय स्वप्न बघतात कोण जाणे ?

मोदी रॉक्स ......... काही असलं तरी आदरच आहे, भारताचे पंतप्रधान आहेत याचे भान ठेवा.................

अहो किरण कुमार खुप साध स्वप्न पाहिल हो.
अके महाराष्ट्रचे मुख्यमंत्री झालेत

.खरे तर पंतप्रधान झालेत असे स्वप्न पडायला पाहिजे होते.

इथे जात कुठे आली बुआ.. मला वाटले प्रत्येक जातीत आणि धर्मात (त्यांचा त्यांचा) एक भट असतो ..असो

रच्याकने कुणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही.

>>>> सुभाष चंद्रानीं त्यांच्या कार्यक्र्म मध्ये एक किस्सा सांगितला होता. बाळ ठाकरेंना कोणा पत्रकाराने प्रश्न विचारला होता की बॉम्बे मध्ये तुमचे सरकार आले आहे तर बॉम्बेकरांचे <<<<<
हिंदू धर्मशास्त्र नै मानत तर नका मानु.... पण विज्ञानानुसार, झोपेत वा दिवसाढवळ्या स्वप्नात देखिल झोकली तर "सुभाषचंद्रांना बाळ ठाकरेंचा किस्सा सांगायला" आणता येते..... Proud

लिंबुभाउ

सुभाषचंद्र बोस नव्हे सुभाष चंद्रा (झी टिव्हीचे अध्यक्ष) माणसाने नीट वाचून समजुन प्रतिक्रिया द्यावी आपल्यासारख्या आयडींना हे शोभत नाही.
( ती मुलाखत बहुतेक युट्युब वर आहे )

धन्यवाद

>>केजरीवालांना/त्यांच्या आपला मुंबईत आणुन बशिवले तर? येतिल का तुम्हाला चांगले दिवस?<<

बहोत पिटेगा वो मुंबईमे आया तो; उसे सिर्फ दिल्लीवाले हि झेल सकते है... Wink

पावसाने मुंबईच्या तिन्ही लाईन ठप्प !

अच्छे दिन येतील तेव्हा येतील.. जीव जास्त मोलाचा.. कितीही महत्वचे काम असले तरी घराबाहेर पडू नका !

Pages