Submitted by स्मितागद्रे on 16 August, 2009 - 03:45
बाप्पा तुम्ही यंदा प्लीज लवकर याल का जरा ?
का म्हणून विचारताय ? खाली येऊन तर बघा
यंदा तुमच्या येण्याची काहीच तयारी नाही
मांडव नाही, देखावे नाही, कुठेच गर्दी नाही
सगळी कडे सामसुम, सगळी कडे शुकशुकाट
शाळा बंद, क्लास बंद, फक्त स्वाइन फ्ल्यु सुटलाय मोकाट
दही हंडी, झेंडावंदन, यंदा काहीच झालं नाही
फडकी बांधुन तोंडाला, धड श्वासही घेता येत नाही
घरात नुसत बसुन बसुन खुप आलाय कंटाळा
आठवडाभर आधी येऊन घालाल का ह्याला आळा ?
बघा आता तुमच्यावर सोपवते हे मोठ्ठ् अवघड टास्क
घाबरु नका, तुमच्यासाठीही आणलाय चांदीचा एक मास्क
मग बाप्पा प्लीज ,येताय ना आठवडाभर आधी ?
ताटभर उकडीचे मोदक ठेवेन फक्त तुमच्या साठी
गुलमोहर:
शेअर करा
श्री गणेशा झालातर !(गणेशाच्या
श्री गणेशा झालातर !(गणेशाच्या आगमनाचा )
....खुपच सुंदर ....
छान आहे बाप्पाला केलेली
छान आहे बाप्पाला केलेली विनवणी.
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया....
गणपती बाप्पा मोरया....:स्मित:
मस्तय ग! एकदमच जोरात
मस्तय ग! एकदमच जोरात :),
बाप्पासाठी चांदिचा मास्क
बघा आता तुमच्यावर सोपवते हे
बघा आता तुमच्यावर सोपवते हे मोठ्ठ् अवघड टास्क
घाबरु नका, तुमच्यासाठीही आणलाय चांदीचा एक मास्क
लय भारी
चांदिचा मास्क लई भारी
चांदिचा मास्क लई भारी
मस्त आहे.
मस्त आहे.
भारी आहे कल्पना, मस्त कविता
भारी आहे कल्पना, मस्त कविता
चांदीचा मास्क छान आहे कविता.
चांदीचा मास्क
छान आहे कविता. आवडली.
मस्तच गं स्मित ! बाप्पांसाठी
मस्तच गं स्मित !
बाप्पांसाठी चांदीचा मास्क... कल्पना आवडली !
धन्यवाद सगळ्यांना, गणपती
धन्यवाद सगळ्यांना,
गणपती बाप्पा मोरया!!!!!
लै भारी
लै भारी
अग काय भन्नाट कल्पना आहे.
अग काय भन्नाट कल्पना आहे. गणपतीला चांदीचा मास्क सॉलिड्च
(No subject)
चांदीचा मास्क ! स्मि, सहीच
चांदीचा मास्क ! स्मि, सहीच आहेस !
खुपच छान.गणपतिबरोबरच त्याच्या
खुपच छान.गणपतिबरोबरच त्याच्या वाहनालाहि मास्क दिला तर बर