स्वाईन फ्ल्यू च्या निमित्ताने

Submitted by limbutimbu on 10 August, 2009 - 02:25

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज इट टू लेटर Sad

विषय: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

किंबहुना, मायबोली हे उच्च मराठी मध्यमवर्गाचेच प्रतिनिधित्व करते असं मानल्यास इथल्या किती लोकांनी सार्वजनिक इस्पितळात कधीतरी उपचार घेतलेले आहेत?? कितीजणांनी किमान अशा इस्पितळाना भेटी दिल्या आहेत?? हे मला जाणून घ्यायला आवडेल.>>>
मी किंवा माझ्या नातेवाईकांनी ट्रिटमेंट घेतली नाहिये. पण मी निगडीत असलेल्या संस्थेकडून मी जनरल हॉस्पिटल्सना स्वच्छता मोहिमेअंतर्गत सेवेला गेले आहे. जीने, पॅसेज, टॉयलेट्स साफ करताना अपेक्षीत घाण होतीच (कारण तुटपुंजा कर्मचारीवर्ग व येणारे जास्तकरुन अडाणि पेशंट्स आणि नातेवाईक), ती साफ करायला काही वाटले नाही. पण वाईट वाटलं ह्याचं की वॉर्डसच्या मोठ्या खिडक्या जळमटांनी भरुन असून नसल्यासारख्या होत्या. छतांना भलीमोठी लोंबणारी जळमटे, सुटून पेशंट्सच्या अंगावर पडणारे पोपडे, प्रचंड मळलेल्या चादरी/बेडशिट्स ह्या अवस्थेत ते पेशंट्स रहात होते. आम्हाला वॉर्डस साफ करायला घ्यायचा होता म्हणून पेशंट्सना तात्पुरते हलवले जाईल अशी अपेक्षा होती. पण आहे तसंच साफ करा असे सांगण्यात आले. आम्हाला संस्थेने ग्लोव्ह्स व मास्क्स दिले होते पण पेशंट्सचं काय? झाडताना प्रचंड धूळ उडत होती. काही volunteers मग पेशंट्सच्या भोवती जमेलतसे पडदे धरून त्यांना धुळीपासून सांभाळत होतो. खूप वाईट वाटत होतं. आम्ही मग चादरी तरी बदला कारण धूळ पडली आहे त्यावर अशी रिक्वेस्ट केल्यावर तिथल्या मेट्रनने ते मानले. आमची काहीच अपेक्षा नसल्याने आम्हाला नेहमीच चांगली वागणूक मिळते पण आजारी लोकांची अवस्था वाईट असते. मुंबईतल्या एका खूप जुन्या जनरल हॉस्पिटलमधे तर बायॉलॉजिकल वेस्ट्स किंवा रक्ताने भरलेली कापडं पॅसेजच्या किंवा जिन्याच्या कोपर्‍यात टाकून ठेवलेली मी स्वतः बघितली होती. त्यापासून थोड्याच अंतरावर किती तरी पेशंट्सना पॅसेजमधेच झोपवलेलं बघितलं आहे Sad आपण सो कॉलड उच्च मध्यमवर्गिय कधी मधी सेवेला गेलो तरी प्रचंड ढवळते ही अवस्था बघून. अर्थात जिथे गरज आहे तिथेच तर सेवा केली पाहिजे, मुळात स्वच्छ असलेल्या ठिकाणी सेवेची गरजच काय हे मनावर बिंबल्याने ते विचार झटकून द्यावे लागतात.

इतक्या बकाल ठिकाणी त्या हवेतून पसरणार्‍या स्वाईन फ्ल्युची मज्जाच आहे Sad

THE LIST OF HOSPITALS in PUNE:

Karve Road: Erandvana Hospital, Contact: Dr Sarita Ganala (9764000939)

Mhatre Bridge: Late Anandibai Narhar Gadgil Hospital, Contact: Dr Jyotsana Khole (9422987953)

Ganj Peth: Late Balaji Rakhmaji Gaikwad Hospital, Contact: Dr Sandhya Bahule

Narayan Peth: Late Kalavatibai Mavale Hospital, Contact: Dr Nila Limaye (9881385015)

Lakshmi Road: Late Mamasaheb Badade Hospital, Contact: Dr Swati Joshi

Raviwar Peth: Hutatma Babu Genu Hospital, Contact: Dr Dinesh Bende (9421018878)

Koregaon Park: Late Bapusaheb Ganuji Kavade Hospital, Contact: Dr Jaya Bhondave (9922504428)

Ganesh Peth: Late Rohidas Kirad Hospital, Contact: Dr Chandrashekhar Gujar

Kothrud: Late Jayabai Nanasaheb Sutar MaternityHospital, Contact: Dr Shyam Satpute (9823217047)

Alandi Road: Siddharth Hospital, Contact: Dr Bhagwant Gagare (9423004811)

Sahakarnagar: Late Shivshankar Pote Hospital, Contact: Dr Vidya Rajwade (9422520930)

Aundh Road: Late Baburao Genba Shavale Hospital, Contact: Dr Madhuri Gare (9823224789)

Yerwada: Late Damodar Ravji Galande Hospital, Contact: Dr Ujjwala Khristi (9730571404)

Shukrawar Peth: Dr Kotnis Health Centre, Contact: Dr Asmita Bhoi (9850992960)

Shivajinagar: Late Jangalrao Kondiba Amrale Hospital, Contact: Dr Aparna Gokhale (9823214103)

THE LIST OF HOSPITALS in Pimpri Chinchwad

Yashwantrao Chavan Memorial Hospital, Sant Tukaramnagar, Pimpri
Jijamata Hospital, Pimpri
Municipal Hospital, Bhosari
Municipal Hospital, Akurdi
Municipal Hospital, Sangvi
Municipal Hospital, Thergaon
Municipal Hospital, Yamunanagar, Nigdi
Talera Hospital, Chinchwad .

यात आता आणखी नविन इस्पितळे जाहीर झाली असली तर ती पण शोधुन इथे टाकतो.

पुण्याव्यतिरिक्तची संपर्क केंद्रे..

Important contact numbers:
Outbreak Monitoring Cell (Control Room, NICD): 011-23921401

Websites:
www.mohfw.nic.in and www.nicd.nic.in

You can also contact a toll free number 2392 1401 at the National Institute of Communicable Disease. Contact number for each cities:

Bangalore
BIAL Swine Flu Center - 91-80-22001490
SDS TUBERCULOSIS & RAJIV GANDHI INSTITUTE OF CHEST DISEASES(Govt. of Karnataka), Hosur Road, Bangalore – 560029
Helpline No: 91-80-26631923

Chennai
Communicable Disease Hospital, 87, T.H. Road, Tondiarpet, Chennai, Tamil Nadu

Hyderabad
Govt. General and Chest Diseases Hospital, Erragadda , Hyderabad
Hospital Helpline Number - 040-23814939

Kolkata
Beliaghata Infectious Diseases Hospital, 57, Beliaghata Main Road, Kolkata

Mumbai
Kasturba Hospital, Arthur Road, Sane Guruji Marg, Mumbai 400011
Ph: 022- 23083901 / 23092458 / 23000889

New Delhi
Yellow Fever Quarantine Centre, Near AAI Residential Colony, New Delhi
Ph: 91-11-25652129
Influenza Ward, Ward no 5, Second Floor, New Building, RML Hospital, Delhi-1
RML- 91-11-24525211,23404328,23365525- Ext 4328

(Source: Swine Flu India website )

आपण सो कॉलड उच्च मध्यमवर्गिय कधी मधी सेवेला गेलो तरी प्रचंड ढवळते ही अवस्था बघून. >>> अग्दी अगदी... अश्विनी

नंदिनी २००७ मधे मलेरीयामुळे कस्तुरबा मधे १६ दिवस घालवले आहेत... तेथील औषधोपचार उत्तम पण बाकीच्या अनुभवाने अजूनही अंगावर काटा येतो... Sad

लिंब्याने मांडलेल्या मुद्यांवर गांभिर्याने लक्ष देण्याची खरी गरज आहे...
>>>>
१. मिडीया ची बेजबाबदारपणे बातम्या देण्याची पद्धत ज्यामुळे भितीची लहर पसरून, भीक नको पण कुत्रे आवर अशी झालेली गत
२. सरकारी ढीसाळ कारभाराबरोबरच, पब्लिकची दुतोन्डी व तत्कालिक स्वार्थी वृत्ती
३. समुर्ण भारतीय समाजातील बेशिस्त, निरर्गल वृत्ती

हे एका इ-पत्रातून आलेले :

Dr Deepak Purohit wrote to President about Swine Flu

My dear President,

I agree with you that swine flu awareness is needed, but there is no need to be panicky and join the publicity propaganda carried out by media and others which acts as a vehicle to spread misconception than to spread scientific information.

These are few facts about swine flu when discussed with the leading epidemiologists.

1) Swine flu, that is H1N1 flu is not new, first detected in 1987
2) Infective stage of flue is 5 days, 1 day before and 4 days after onset of symptoms
3) The best way to prevent it spreading is asking patient having symptoms of flu like fever cough and running nose to take rest at home for 4 days so he does not transmit it
4) Masks are of limited value if any, in this disease, it can spread through droplets on your skin, through contact etc, and I have seen that the masks in Pune are worn as fashion statement, while walking on road today morning I saw people wearing masks coming out for a morning walk with their dogs!, many wearing masks around their necks, and so on, infact these masks shall act as the vehicles to carry the virus, instead, avoiding crowded places or cinema halls or malls where airconditioners are on, is advisable, because you get recirculated air, where the virus density multiplies
5)Death after H1N1 flu is not common, infact infections like measles is taking toll of thousands more every year, and we are oblivious of the facts. Swine flu is being blown out of proportion by media trying to create hysteria among lay people.
6) Fever accompanied by respiratory distress, should be immediately notified which is likely to be a complication of H1N1 flu
7)The mortality is less than .01 percent of those affected, that means may be one in 10,000 affected is likely to suffer the life loss.
8) If you remember, 2 years ago SARS was blown out of proportion, what happened? Humans develop immunity to the virus, the same is going to happen, we develop immunity in due course of time, the virus is in the air, you can not stop it, our body is already developing the immunity so nothing to panic.
We need to take care of children and elderly who have less immunity and do not let them go to crowded places that is all .

WE MUST START THIS CAMPAIGN OF NOT TO BE AFRAID OF THIS FLU AND LET YOUR DAILY WORK CONTINUE AS NORMAL, NO MASKS FOR ORDINARY CITIZENS, HEALTH CARE WORKERS OR SPECIFIC EXPOSED TO LOT OF CROWDED ENVIRONMENTS MAY BE BENEFITTED, NOT PROVEN.

I am amazed to hear that people are selling masks of RS 20 each which are available to less than Rupee 1 in the market.
See who is getting benefitted?

Please spread the scientific info, do not join the band wagon and stick to science, that should be the order of the day.

Rtn Dr Deepak Purohit
DG 09/10
Dist 3131
Purohit Clinic, Plot 78, MCCHS
Panvel, Maharashtra
India
PIN 410206
Cell no. 098209 77773

हा नुसता भारतीय समाजाचा अन यंत्रणेचा मुद्द नाहीये. तर आपल्या सारख्या तिसर्‍या जगात राहणार्या गरिब बिचार्‍या रुग्णांसाठी साथीच्य रोगांसारख्या (सार्स, फ्ल्यु, चिकण गुणिया ?, बर्ड फ्ल्यु! इ ) सारख्या क्षुल्लक (?) अन विशेषतः असे रोग ज्यांच्यावर ची ओषधे कमी किमतीत मिळतात वा विकावी लागतात, अश्या रोगांवर सध्या कुठे ही संशोधन चालु नाहीये. सरकारी संशोधकांना रोगा पेक्षा पगार अन सुविधांची पडलेली असते, अन खाजगी कंपन्यांना अश्या गरिब लोकांच्या आजारापेक्षा जास्त मार्जिन देणार्‍या मेडिसिन (पक्षी हार्ट, कॅन्सर, डायबेटिक्स, यासारख्या जब्बर अन गब्बर मार्जिन देणार्‍या मेडिसिन) च्या संशोधनावर पैसे खर्च करण्याची सवय जडलेली असते. डब्ल्यु एच ओ किती पण बोंबलले तरी ह्या सरकारी संस्था अन खाजगी कंपन्यांना काही घेणे देणे नाही.

मग अशी साथ आली कि, एखादी कंपनी पटकन लस बनवते अन चढ्या किमतीत विकते. भारत सरकार मग एक्सपायरी वा स्टोरेज कंडीशन न बघता करोडो रुपये, लोकक्षोभ शांत करण्या साठी अश्या कंपनीला दान देउन टाकते. मीन्टाइम, साथ आटोक्यात येते......अन पुन्हा माझ्या मागल्या सुरु होते.

जेंव्हा जगात स्वाइन फ्ल्यु आला, तेंव्हा च एह ए एल, हाफ्किन सारख्या संस्था कामाला लागल्या असत्या त आतापावेतो लस तयार झाली असती. अन सध्या पडेल त्या भावत लस खरेदीची तयारी दाखवणे आरोग्य मंत्र्या ला सांगावे लागले नसते! आता करोडो रुपये पुन्हा त्या परदेशी कंपनी च्या खिशात घातले जाणार अन मध्ये भरपुर बफर ठेवले जाणार.....! बर्ड फ्ल्यु च्या वेळी तर गरजेच्या कित्येक पट लस खरेदी करुण ठेवली.....अन वाया गेली, कारण स्टोरेज ची सोय च नव्हती!

एकुणात, मुलभुत संशोधनाकडे दुर्लक्ष, ग्लॅमर नसणारे संशोधन क्षेत्र, अन कमी पैसे मिळवुन देणार साथीचे रोग्.. ह्या चक्रव्युवात सामान्य माणुस अडकलेला आहे!

मला स्वाईन फ्लू बद्दल 'डुक्कर उडाला' एव्हढेच कळते, पण हॉस्पिटलबद्दल लिहीले आहे म्हणून माझेहि काही अनुभव. अर्थात त्याला हि आता आठ वर्षे झाली, म्हणजे परिस्थिती एकदम सुधारली असेल.

पार्ल्याचे नानावटी हॉस्पिटल कुठल्या प्रकारात मोडते माहित नाही, म्हणजे सरकारी खर्चाने चालवलेले की खाजगी संस्थेने, उच्च मध्यमवर्गिय, की दुसरे काही असे.

पण २००१ मधले माझे तेथील अनुभव पाहून आता मला गंमत वाटते. म्हणजे कायदा असा की पेशंटला भेटायला येणार्‍या लोकांनी चपला बूट बाहेर काढून ठेवायचे, कारण जंतू येऊ नयेत म्हणून. पण हॉस्पिटलचे कर्मचारी खुशाल बाहेरून चिखलातून चालत येऊन, बाथरूममधून बाहेर पडून हात न धुता तसेच वावरत होते सर्वत्र.

एक कुणी श्रीमंत म्हातारा माणूस पेशंट म्हणून आला, त्याच्या बरोबरच्या तरुणाने चक्क १०० रु. च्या बर्‍याच नोटा काढून नर्ससकट सगळ्या ऑर्डरलीज ना वाटल्या. झाले, त्या पेशंटला भेटायला केंव्हाहि दोन पेक्षा जास्त माणसे अलाउड, त्यांना चपला बूट बाहेर काढायची गरज नाही, त्यांनी नर्सेससाठी ठेवलेला फोन वापरला, मोठ्याने बोलले तरी चालेल असे इतरांपेक्षा वेगळे नियम.

त्यामुळे असे वाटते, की कुठल्याहि जंतूंशी सामना करायचा भारतात, तर १०० च्या नोटा उधळाव्यात, किंवा हॉस्पिटलमधे नोकरी धरावी. मग काय प्रॉब्लेम नाय.

माझ्या मागे एक चपराशी सतत लागला होता. बोलू नका, इथे बसू नका. वगैरे., वगैरे. शेवटी वैतागून त्याला म्हंटले "#$*&, ^%(@ , तू आता गप बसतोस की एक झापड लावू? चार वेळा चड्डी बदलावी लागेल तुला!!" पण तो कदाचित चड्डी न बदलता तसाच इकडे तिकडे फिरला असता म्हणून मी हात आवरला!!

एकंदरीत भारत म्हणजे मूर्तिमंत विरोधाभास. म्हणूनच तो प्रचंड वादविवादाचा विषय होतो. जसे पाच आंधळे हत्ती कसा असतो याचे वर्णन करतात त्या गोष्टीतल्या सारखे.

पण तो कदाचित चड्डी न बदलता तसाच इकडे तिकडे फिरला असता म्हणून मी हात आवरला!! Lol
>>>>>>>>>>>>>>
मान्यय हो झक्किकाका मला तुमचं. पण हे काय तुमच नेहमीचच टुमनं, भारतात अस न भारतात तस. हे काही पटत नाही मला. आम्ही सुधारतोय, वेग कमी असेल पण नक्किच.
आणि तुम्ही कधी समाधानी असता कि नाही? निदान अमेरिकेत तरी तुम्हाला समाधान???? मिळत असेल का नाही. मला शंकाच आहे.

असतो, असतो. भरपूर समाधानी असतो. भारतात जास्तच समाधानी असतो. कारण माझा भारत! माझे पुणे, माझे नागपूर!

आणि बर्‍याच लोकांनी काही काही लिहीले, तुम्हाला माझेच लिहिणे का खटकले? तुमची पण कमाल आहे!! मी वर शंभरच्या नोटा, हॉस्पिटलमधे नोकरी हे काय खरोखर लिहीले आहे असे वाटले काय तुम्हाला?
या गोष्टी मी केवळ गंमत म्हणून लिहीतो. कारण इथे भारताबद्दल लिहीणे चालू आहे.

असे कुणि अमेरिकेबद्दल लिहायला लागले तर मी याहूनहि वरचढ 'गंमती' मी लिहीन. पण सगळे आपले अमेरिका म्हणजे 'कित्ती कित्ती स्वच्छ, कित्ती चांगली' असेच म्हणतात! विशेषतः भारतात!

मी भारतात आलो असतां मला बर्‍याच जणांनी सांगितले, आमचे 'राजकारणी म्हणजे लाचखाऊ आहेत!' म्हंटले, तुमचे डोंबल! अमेरिकेत नि रशिया इ. देशातले राजकारणी तुमच्या पेक्षा इतके 'पुढारलेले' आहेत! भारतियांना निदान त्याची खंत तरी वाटते, इतरांना तेहि नाही!!

माझी मनापासून खात्री आहे की भारतीय संस्कृति जगात सर्वोत्कृष्ट आहे, नि त्याच पद्धतीने जीवन जगले तर भारत नक्कीच 'जगातले पहिल्या क्रमांकाचे राष्ट्र' असे होईल.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्यासारख्या काही लोकांच्या अपेक्षेपेक्षा जरा हळू हळू प्रगति आहे.

चंपकशेठ. पूर्ण अनुमोदन.
आपला प्रॉब्लेम नेहमीचाच म्हणजे प्रायॉरिटीचा आहे. हार्ट ट्रांसप्लांट,ऑर्थोपेडिक इ. अत्यंत गुंतागुंतीच्या कामात आपण मेडीकल टूरीझमचा दर्जा मिळवण्याइतका पल्ला गाठला आहे,तेवढे तंत्र,हुशारी आपल्याकडे आहे.पण त्याचबरोबर दररोज टीबीने १००० व्यक्ती मरतात आणि इंन्फट मॉर्टेलिटीत आपली अवस्था इथिओपिआपेक्षाही वाईट आहे.कारण सार्वजनिक आरोग्य सेवाक्षेत्रात कोणाला रसच नाही.
१२वी होऊन डॉक्टर व्हायला निघालेला किंवा एमबीबीएस होऊन एमडी होऊ इच्छीणार्‍या कुठल्याही विद्यार्थ्याला 'प्रिव्हेन्टीव्ह अँड सोशल मेडीसिन' हा विषय घेणार का? असे विचारल्यास तो वेड्यातच काढतो.त्यांचा चॉइस ठरलेला-कार्डीअ‍ॅक,पेडीअ‍ॅट्रिक्स नाहीतर किमान डर्मटॅलॉजी. पीएसएम करुन काय सरकारीमधे काम करायचेय? त्यामुळे एमडीत दुसरे काहीही न मिळणारा शेवटी हा कोर्स घेतो.अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा ठेवणार?

अमेरिकेत पब्लिक टॉयलेट मधे मेथ घेवू पड्लेल्या मुला मुलीन्चे अतिशय भयानक फोटो मी पाहिले आहेत नेट वर.
ते काही फार स्वच्छ दिसले नाहीत. तिथे मेक्षिकन मेड काम करीत नाहीत का?

मी म्हण्जे पुणे - कलमाडी

पुणेकरान्ना सुकर मार्गावर आणणारे - अजित दादा

कुथे उलथले ?

मेथ खूप डेंजरस असतं. डिस्कव्हरीवर माहीतीपट पाहीला होता त्यावर. काटे आले होते अंगावर
मिथची नशा खूप काळ टिकते, कधी कधी या सेवनात मृत्यू ही होतो.
(विषयांतराबद्दल क्षमस्व)

To needhapa:

These words are associated with these leaders. Mhanun vaparlet ithe.

अगदी अगदी. त्या मुली बघून यान्ची आइ नाही का असेच वाट्ले होते मलातर. त्यात आपण तर गरीब देशात आहोत. याना का बरे असे करावेसे वाटावे?
प्रत्येक बाबीत भारत वी. अमेरिका अशी का तुलना करायची.
तरी बरे स्वा. फ्लु चा जीवाणू तिथूनच इथे आला आहे भारतात.

>तरी बरे स्वा. फ्लु चा जीवाणू तिथूनच इथे आला आहे भारतात.
१००० वेळा ऐकलेला हा सध्ध्याचा युक्तीवाद्?(युक्ती कसली पळपुटा वाद!)..

hiv/aids आफ्रीकेतून आला पण सध्ध्या भारत यात जगात पहिल्या स्थानावर आहे.
tb हा कुठूनही आला नाही पण अजूनही आपल्याकडे tb चे पूर्ण उच्चाटन करता आलेले नाही.
बाकी अनेक उदाहरणे आहेत........
मलेरिया हा डासामूळे आला (डास अमेरीकेतूनच येत असावेत?), पण तो अजूनही आपल्याकडे तगून आहे. का? याचे उत्तर बहुदा तुम्हाला माहित असेलच.

तेव्हा कृपया, असली विधानं करून मूळ मुद्द्यांना (जे लिंबू ने व्यवस्थित लिहीले आहेत) बगल देवू नये.

त्यापेक्षा स्वाईन फ्लू चे निवारण, कारण अन भविष्यातील खबरदारी यावर जरा लिहीलेत तर वाचनीय ठरेल. अन्यथा आरोग्य मंत्री, वा ईतर मंत्री, संत्री यांची अक्कल काढण्याची फॅशन आहेच ती चालू ठेवा....

(असल्या शाब्दीक फवार्‍यांपेक्षा आपल्याकडे औषधांचे फवारे वेळेच उपलब्ध केले तर बर्‍याच गोष्टि टळतील नाही का?)

<<अगदी अगदी. त्या मुली बघून यान्ची आइ नाही का असेच वाट्ले होते मलातर. त्यात आपण तर गरीब देशात आहोत. याना का बरे असे करावेसे वाटावे?>>
बरेचदा आई नसतेच. त्यांना जन्म देऊन मग पळून गेलेली असते. वडील तर बहुधा नसतातच. नि ते गरीब नाहीत म्हणूनच त्यांना असले धंदे परवडतात. गरीब असते तरी काहीतरी चोर्‍यामार्‍या करून पैसे मिळवलेच असते. सगळीच तरूण मुले मुली असले करत नाहीत. त्याचा संबंध पैशाशी नसून मानसिक दुर्बळपणाशी आहे.

पैसे, नि सत्ता असलेला एक भारतीय तरुण, अत्यंत प्रसिद्ध अश्या आपल्या वडिलांच्या खुनानंतर पाचशे रुपयाच्या नोटा पेटवून स्वतःची सिगारेट पेटवत बसला होता म्हणे!

भारत वि. अमेरिका हे येणारच. अमेरिकेत अनेक लोक आलेले आहेत, बरेचसे जाऊन येऊन असतात. त्यांच्या नजरेत भरेल एव्हढा फरक आहे दोन देशात. मुख्य म्हणजे थोडीफार शिस्त असली की परिस्थिती झपाट्याने बदलते, हे माहित असूनसुद्धा सुशिक्षित लोक बेशिस्तीने वागतात हे पाहून जरा रागच येतो. त्यासाठी पुनः आपली संस्कृति ध्यानात घेऊन, ब्रह्म सत्यं, जगन्मिथ्या असे आठवले की मग राग पळून जातो, नि केवळ अपार कीव शिल्लक रहाते.
हो कीवच. आदर वाटण्याजोगी परिस्थिती यायची आहे अजून, पण माझ्या आयुष्यात येणार नाही.

Pages