Submitted by नवनाथ राऊळ on 11 June, 2015 - 01:47
भक्तीमार्ग कैंचा । नेणों आम्हां जाण ।
विठूचें स्मरण । अखंडित ॥१॥
हरीनामजप । आम्हांसी पैं ठावा ।
भक्तीचा पुरावा । नसें पाशीं ॥२॥
परमार्थामृत । वर्णियेलें श्रेष्ठ ।
तयाहूनी मिष्ट । हरीनाम ॥३॥
नाथ म्हणें भक्ती । उत्तुंग शिखर ।
आम्ही हो पामर । पायथ्यासि ॥४॥
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर.... भक्तिपूर्ण
खूप सुंदर.... भक्तिपूर्ण .....