मूग १/४ कप, तूर डाळ १/४ कप ,अळू ६-७ पाने
गूळ एक ते दीड टेबलस्पून , चिंचेचा कोळ : दीड टेबलस्पून
मोहरी १/४ टीस्पून ,जिरे १ टीस्पून, हिंग १/४ टीस्पून, आले-मिरचीचे वाटण २ टीस्पून, कढीपत्ता ७-८ पाने, हळद १/४ टीस्पून,
आले अर्धा इंच
फोडणीसाठी : तेल , मोहरी, जिरे, मेथीदाणे, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता
१) मूग व तुरीची डाळ दीड-दोन तास एकत्र भिजत घाला.
२) अळूचे देठ सोलून, पाने व देठ बारीक चिरून घ्या.
३) कुकरमध्ये मूग, तुरीची डाळ, अळू, जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता घेऊन नीट ढवळून पाणी घालून मध्यम आचेवर तीन-चार शिट्या होतील इतका वेळ शिजवा.
४) डाळ शिजली की त्यात हळद, आले-मिरची पेस्ट, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ व किसलेले आले घालून मंद आचेवर शिजू द्या.
५) फोडणी तयार करून डाळीवर ओता . थोडावेळ उकळू द्या.
कशाशी खायचे,: चपाती की भात यावर आमटी किती घट्ट्/पातळ करायची ते ठरवावे.
गूळ, मिरच्यांचे प्रमाण आपापल्या आवडीवर
नावात खाटुं असलं तरी ही आमटी आंबट लागत नाही. भाताबरोबर ही आमटी आणि आंबट कढी (भातत एकदमच कालवून) जोडीला पापड असा बेत असतो.
अळुचे फतफते असेच असते
अळुचे फतफते असेच असते
ही तर आळुची पातळ भाजी
ही तर आळुची पातळ भाजी विदर्भातली ... मी करते...
आळुची भाजी म्हणजे जीव की
आळुची भाजी म्हणजे जीव की प्राण. अप्रतिम लागते. फोटो पण लयी भारी.
मस्त फोटो. अख्खे मूग की मूग
मस्त फोटो.
अख्खे मूग की मूग डाळ? अख्खे मूग असल्यास इतके कमी भिजून नीट शिजतील?
फोडणी नंतर ओतणे हे नवीन
फोडणी नंतर ओतणे हे नवीन आहे.
मी प्रत्येक वेळी आधी फोडणी करुन मग त्यात शिजवलेले मटेरियलघालतो. यात ओल्या खोबर्याचे अगदी पातळ काप घालावेत.
नरसोबावाडीला टेंबे स्वामी जयंती की पु तिथीला एका मोठ्या अती विशाल पात्रात ही भाजी करतात.
त्यात येणारा प्रत्येकजण काही ना काही भाजी भोपळा , इतर पाला , बटटा वांगी वगैरे टाकतो. मस्त लागते भाजी. लोक किटली भरुन घरीही नेऊ शकतात.
अख्खे मूग. छोट्या हंडी
अख्खे मूग. छोट्या हंडी कुकरमध्ये शिजवलेले तेव्हा मुगासकट सगळे मस्त शिजून आणि मिळून आले होते. आज भाताच्या जोडीला कुकरच्या डब्यात लावले तेव्हा नंतर गॅसवर जरा जास्त वेळ शिजवून घोटावे लागले.
मूग पटकन शिजतात. रात्री कडधान्य भिजत घालायला विसरलो तर मूगच मदतीला धावून येतो.
ही दक्षिण गुजराथ -सुरतेकडची पाककृती आहे.
अशी पालकाची केली जाते, पण आलं
अशी पालकाची केली जाते, पण आलं नाही, लसूण घालून.
अळवाची नाही करवणार माझ्याच्याने.
विदर्भात अशी भाजी पालकाचीही
विदर्भात अशी भाजी पालकाचीही करतात. बरेचदा महाप्रसादात असते. अळवापेक्षा मला पालकाची जास्त आवडते.
(No subject)
Aalu chya patal bhaji shi
Aalu chya patal bhaji shi multi julti pa kru..
Mug ghalun Karin pahin.
ALU ani gujrathi paddhatini nakkich chaan lagat asnar. .
) कुकरमध्ये मूग, तुरीची डाळ,
) कुकरमध्ये मूग, तुरीची डाळ, अळू, जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता घेऊन नीट ढवळून पाणी घालून मध्यम आचेवर तीन-चार शिट्या होतील इतका वेळ शिजवा.>>>>>>>>> जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता हे कच्चेच घालायचे ?
मी थोडे भरड करुन कच्चेच घातले
मी थोडे भरड करुन कच्चेच घातले होते.
मी फक्त मूगडाल घातली होती.
मी फक्त मूगडाल घातली होती. चमचाभर तांदूळही घातले होते.
याला मुगाळूची भाजी अse नाव देउया
खुपच छान पाकृ.गरम मसाल्याचा
खुपच छान पाकृ.गरम मसाल्याचा वापर नाही त्यामुळे आले,मेथीदाण्याची छान चव येईल.लगेच करण्यात येईल.
जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग,
जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता हे कच्चेच घालायचे ?>>>मला पण हाच ?विचारायचा आहे.
हे तर फतफते कालच केले
हे तर फतफते कालच केले होते.
फक्त फोडणीत मेथी घालत नाही. आलंही नाही. थोडे शेंगदाणे व थोडी चणाडाळ भिजवून घालते.
aaj hi bhaaji keli hoti ..
aaj hi bhaaji keli hoti .. Apratim zali hoti... Dhanyawad
सायली, जिरे,मोहरी, मेथीदाणे,
सायली,
जिरे,मोहरी, मेथीदाणे, हिंग, कढीपत्ता हे कच्चेच घातलेस का?
हो. मी सगळे भरडुन घातले होते
हो. मी सगळे भरडुन घातले होते
Devki aala mirchee pest ani
Devki aala mirchee pest ani kadhi patta kachha ghatal hoto ani mohari methi dane ani lasun yachi pali phodni dili hoti
(No subject)
(No subject)
Mala vadi aavadate pan ashi
Mala vadi aavadate pan ashi karun pahin pan mala ghaaspus aavadat nahi.