चिंगी आणि मॅगी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 9 June, 2015 - 07:27

चिंगी आणि मॅगी.

चार दिवस झाले आमच्या शेजारच्या चिंगीला घरचा डाळभात गोड लागत नाहीये. डाळ आणि भात मुळी गोड नसतोच असे पांचट युक्तीवाद नको, चिंगीच्या भावना समजून घ्या. सारे काही जेवण साग्रसंगीत असावे पण कोणीतरी नेमके त्यातील मीठ काढून घ्यावे तसे कोणी तरी चिंगीच्या जेवणातील नेमके सार काढून घेतलेय.

आता या रविवारची गोष्टच घ्या ना. झाले काय, चिंगीचे बाबा नेहमी सारखे घरात प्यायला बसले. एका हातात मद्याचा ग्लास, दुसर्या हातात चैतन्यकांडी, आणि धूर् खिडकीच्या बाहेर. समोर कागदाच्या पुडक्यात शेवचकली चकण्याला, आणि सोबत पेप्सीकोल्याचा ग्लास हातात घेऊन त्या चकण्यावर ताव मारणारा तिचा दादा.

पण या सर्वात आज चिंगी कुठेच नव्हती. आजच्या मैफिलीत तिला स्थान नव्हते. कारण तिच्या मॅगी नूडल्सवर बॅन आला होता. बिचारी एका ताटलीत मॅगीचा टोमेटो सॉस घेऊन चाटत बसली होती. पण त्याने तिचे तोंड आंबटच होत होते. प्लीज, मॅगीचा सॉस आंबटच असतो असा पांचट युक्तीवाद नको, चिंगीच्या भावना समजून घ्या.

पेप्सीच्या बुडबुड्यात हरवलेला तिचा दादा आणि धुराच्या वलयात गुडूप झालेले तिचे बाबा यांच्या पासून नजर फिरवतानाचा तिची नजर जवळच पडलेल्या सिगारेटच्या पाकिटावर स्थिरावली..... आणि युरेका युरेका.. चिंगीला आपले राष्ट्रीय बालखाद्य परत मिळवायची आयडीया सुचली. चिंगी आनंदाने बेभान होत नाचू लागली, गिरक्या घेऊ लागली.. आजच ती राष्ट्रपतीकाकांना याबद्दल पत्र लिहिणार होती..

आयडिया पण किती किती सिंपल.. आता मॅगी बाजारात विकायला ठेवण्यास कोणाची काही हरकत नसणार होती.. फक्त मॅगीच्या पाकिटावर एक सूचना तेवढी लिहायची होती..
मॅगी खाणे आरोग्याला हानीकारक आहे!
Eating Maggy is injurious to Health.

- ऋन्म्या

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अत्यंत ब्रेनी धागा आहे.
आवडला.
मस्तच.

(माझ्या मुलांना पूर्वी मॅगी आवडायची, मागच्या दोन तीन महिन्यांपासून अचानक आवडेनाशी झाली. आता झालं हे बरंच झालं असं वाटतंय.)

रश्मी, छान माहिती आहे.
हल्ली प्रयत्न पूर्वक सैंधव मीठ, तूप, घरी बनवलेलेच लोणचे असे बदल स्वयंपाकात केले आहेत.

बर्‍याच प्रोटिन ड्रिंक्स्/चॉकलेटस ई. मध्ये मेलामाईन असते.
ती मात्रं मुलांच्या आहारातून कमी करायचा प्रयत्न चालू आहे:

@साती,
तुमच्या या बद्दलच्या अनुभवांवर एखादा लेख लिहाल का?
म्हणजे, बाजारातील कोणत्या तयार खाद्यपदार्थांमधे काय समस्या आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत ई.

स्पॉक,
अगदी हेच मनात होतं.
पूर्वी कुठल्या पॅकेज्ड आणि ब्रँडेड खाद्यपदार्थात मेलॅमीन आहे याच्या लिस्टस नेटवर उपल्ब्धं होत्या.
आता त्या मिळतच नाहीयेत.
त्यामुळे पुराव्याशिवाय काहिही बोलता येत नाही आहे.

साती-
काही हरकत नाही..पुरावा नसला तरी तुम्ही ते वाचले होते आणि त्याच्याशी निगडीत समस्या आणि उपाय यांचा स्वत: पुरता का असेना उहापोह केला असेलच. तर त्यावर आधारीत लेख लिहीला तरी खुपच महिती पुर्ण असेल.
काहीच माहीती नसणार्‍यांना (जसे की मी) नक्किच पथ दर्शक ठरेल अस लेख.
लेख लिहावा अशी विनंती.

छान लिहिले आहे. चपखल अगदी.

भारतात काय किंवा अमेरिकेतही मला अनेक उत्पादनांचा संशय येतो. बिस्कीटे, चिप्स, फळे, भाज्या काहिही सुटलेले नाही यातुन. शक्य तेव्हा, शक्य त्या गोष्टी organic घेते. भारतात Maggie हे लहान मुलांचे आवडते खाद्य आहे. काही दुसरा पर्यायही नसावा. Top Ramen मिळतात पण त्यातही असाच प्रकार असु शकतोच.

पारंपारिक शेवयांचा उपमा आवडु शकतो मुलांना.

धन्यवाद प्रतिसाद,

पारंपारीक शेवयांचा उपमा का नाही आवडणार मुलांना, पण वारंवार वरचेवर खावेसे वाटायला तुम्हाला परत त्यात चटक लावणारे रसायने घालावे लागतील. जसे की चायनीज. वडिलांनी रात्री स्वतासाठी चायनीज फ्राईड राईस मागवला, आणि मी त्याआधी पोटभर जेवलेलो असलो, तरीही भरल्या पोटीही ते खायला जीभ चाळवते आणि बरेपैकी खाल्लेही जाते.

मॅगी वाईट आहे असं कळल्या नंतर लगेच चिंग चे नूडल्स आणलेत. ते ही चांगलेच आहेत असावेत असा वाटतं.
मी नूड्ल्स नुस्त्या उकळ्त्या पाण्यातून काढतो मगच वापरतो. त्यावरचा फेस व ज्यादाचे तेल ही निघुन जाते.
मगच त्यावर मसाला भाज्या वगैरे घालतो.
ही पद्धत बरोबर आहे असं वाटतं, जाणकारांनी प्रकाश टाकावा.

हाहाहा!!!!

चाइनिज पदार्थांत चिंचेचा कोवळा पाला आणि फुले वाटून घालायचे परंतू इतक्या लोकसंख्येला झाडे पुरत नाहीत .मग आले ते मोनोसोडिअमग्लुटामेट वगैरे क्षार.

Pages