Submitted by नवनाथ राऊळ on 9 June, 2015 - 00:12
श्रीधर श्रीरंग । हरी पांडुरंग ।
गातसे अभंग । नाथ वेडा ॥१॥
पांडुरंगी कळां । लागलासे लळा ।
जाहलासे खुळा । नाथ वेडा ॥२॥
गजर नामाचा । गगनीं भिडला ।
तल्लीन जाहला । नाथ वेडा ॥३॥
भजतो विठ्ठल । पुजतो विठ्ठल ।
चिंततो विठ्ठल । नाथ वेडा ॥४॥
अधीर गा चित्त । कंठ दाटलासे ।
वाट पहातसे । नाथ वेडा ॥५॥
तुजलागी हरी । विनवणी करी ।
हट्ट येक धरी । नाथ वेडा ॥६॥
नको विठूराया । नको अन्य काही ।
द्वारी उभा राही । नाथ वेडा ॥७॥
दर्शनाचे दान । हे कृपानिधान ।
मागतो अजाण । नाथ वेडा ॥८॥
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नको विठूराया । नको अन्य काही
नको विठूराया । नको अन्य काही ।
द्वारी उभा राही । नाथ वेडा ॥७॥ >>>> अतिशय भावले
अप्रतिम भावपूर्ण अभंग ....