आज ऑफिस मधून लवकरच निघाले … दुपारी एका आलेल्या फोनेने फार भावूक झाले मी . माझ्या एका मैत्रिणीचा फोन होता परत त्या आठवणी ने मन भिजून गेल … बर नाही वाटत असे सागून निघाले ऑफिस मधून , सरांनी जरा नाराजीने परवानगी दिली .
घर ऑफिस पासून लांब , ट्रेन ने स्टेशन ला उतरून नंतर रिक्षा करून कसेबसे घरी आले . मला लवकर आलेले बघून आई ने काळजीने विचारले … "काय झाल , बर नाही वाटत का ? आज लवकर आली … आणी चेहरा असा का केला आहेस ?
"काही नाही ग … असच जरा लवकर आले " मी म्हणाले … आणी लगेच बाथरूम मध्ये जाऊन चेहरा पाण्याने धुतला , आई ने जर डोळ्यातलं पाणी बघितलं असते तर .. आणखी प्रश्न विचारले असते . फ्रेश होऊन आतल्या खोलीत आले .. आई ने केलेला चहाचा कप समोर टेबला वर होता , चहा घेता घेता परत एकदा मोबाईल चेक केला प्रिया चा MASSAGE होता . तिने मला व माझ्या दुसरया मित्र मैत्रिणी ला तिच्या गावी बोलावलं होते ,
प्रिया आणी मी एकत्र कॉलेज ला होतो .. माझी सर्वात जवळची मैत्रीण , एकदम टोम बॉय ,बिन्दास्त , हसरी आणी हसवणारी, श्रीमंत घराण्यातली . आणि मी शांत , लाजाळू ,देवभोळी (चुकीच वागाल तर किवा वाईट बोललं तर आपली पुण्याई कमी होते , लोक नाव ठेवतील असा समज आई ने दिलेला ) , घरची आर्थिक परिस्थिती ठीक . विरुद्ध सभाव पण तरीही अगदी जिवलग मैत्रीण . कॉलेज संपवून पुढे ती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी U.S ला निघून गेली , तेव्हा दोघी गळ्यात पडून फार रडलो , हसलो .
तीन वर्ष तिथे राहून ती परत आली लग्नासाठी … आणी त्याचेच निम्त्रण तिने दयाला फोन केला .
" मी जाणारच नाही , असे मनाशी पक्के केले आणी मोबाईल ठेवला . परत राहून राहून त्याच आठवणी ने मन जखमी होत होते . ऑफिस मधून बाहेर पडल्यावर ते घरी पोहचे पर्यंत तीच मन दुखवणारी आठवणी …
आठवणी या अश्याच असतात ………
कधी हसवतात , तर कधी रडवतात ……….
आठवणी या अश्याच असतात ………
शरीर इथे … तर मन त्या तिथे झोके घेत असते …….
आठवणी या अश्याच असतात ………
मनाच्या कप्यात बंध झालेल्या …. हळूच बाहेर डोकावणारी ….
आठवणी या अश्याच असतात ………
त्या परत करता हि येत नसतात …
जेवण करून परत आतल्या खोलीत आले . आई स्वयंपाक घरातील काम आवरत होती . बाबा बाहेरगावी गेले होते म्हणून , मी दोघीच अंथरून घालून लगेच पाठ टेकवली . मला लवकर झोपलेली पाहून का कुणास ठावूक आई ने जवळ येऊन डोक्यावरून हलकेच हात फिरवला , काय नवत त्या स्पर्शयात … मन आतून दाटून येत होत … डोळे पानवाले तसे कुस बदलून अश्रुना मोकळे केले . अश्रुच न असच असत एकदा का वाट दिली का ते वाहतच जातात आणी परत त्या आठवणी ……
क्रमश …
पुर्ण कथा वाचायला आवडेल.
पुर्ण कथा वाचायला आवडेल.
इतका छोटा भाग पुलेशु
इतका छोटा भाग
पुलेशु
पुढील भाग केव्हा ??
पुढील भाग केव्हा ??
नवजात लेखिकेला पुढील
नवजात लेखिकेला पुढील साहित्यिक वाटचालीकरिता शुभेच्छा.
नवजात लेखिकेला पुढील
नवजात लेखिकेला पुढील साहित्यिक वाटचालीकरिता शुभेच्छा>>>>>> थॅक्स
फार काही चांगलं लिहिता येत नाही . बस पर्यन्त करते आहे ...
भाग थोडे मोठे टाकलेत तर बर
भाग थोडे मोठे टाकलेत तर बर होईल.....
भाग थोडे मोठे टाकलेत तर बर
भाग थोडे मोठे टाकलेत तर बर होईल.....>>>>>>> भाग टाकलेत तर बर होईल.....