Submitted by देवीका on 2 June, 2015 - 04:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ दिवस
लागणारे जिन्नस:
४ वाटी बरका फणसाचा रस,
२ वाटी तांदूळाचा रवा( तांदूळ धूवून, वाळवून काढलेला),
लागेल तसे साजूक तूप,
काजू तुकडे,
ओलं खोबरं पाव वाटी,
वेलची पूड,
चवीला मीठ,
क्रमवार पाककृती:
रवा भाजून घ्यायचा तूपात आणि थंड करून रसाबरोबर एकत्र करून मीठ आणि खोवलेलं खोबरं घालून रात्री झाकून ठेवावे.
सकाळी काजू, वेलची पूड घालून इडली प्रमाणे वाफवावे.
हा जुना फोटो,
http://www.maayboli.com/node/50557?page=1
वाढणी/प्रमाण:
हा प्रश्ण चुकीचा आहे आमच्या घरी
माहितीचा स्रोत:
पारंपारीक कृती
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कशाला हा अत्याचार बरेच वर्षे
कशाला हा अत्याचार बरेच वर्षे झालीत खाऊन, अजूनही चव आहे जीभेवर
फोटो पाहीजे
कालच केलीत तेव्हा नक्की फोटो
कालच केलीत तेव्हा नक्की फोटो .
फणसाची सांदणं खाऊन कित्येक
फणसाची सांदणं खाऊन कित्येक वर्षं झाली. भयानक आवडतात मला. बरका फणस मिळत नसल्याने हल्ली घरी करणे होत नाही.
मी कधीच खाल्ल नाही. चांगले
मी कधीच खाल्ल नाही. चांगले लागत असावेत असे वाटते.
फणसाच्या रसाऐवजी दुसर काही चालेल का?
फणसाच्या रसाऐवजी दुसर काही
फणसाच्या रसाऐवजी दुसर काही चालेल का? >>> अजिबात नाही
आणि घरचे साजूक तूप हवेच
फणसाची सांदणं खाऊन कित्येक
फणसाची सांदणं खाऊन कित्येक वर्षं झाली>>>>>>>>>>>हो ना. आणि इथे वाचलं की वाईट वाटतं.
Ras kadhaycha mhnje gare
Ras kadhaycha mhnje gare mixermadhun kadhle tar chaltil ka?
Ashich ambyachi pan karta
Ashich ambyachi pan karta yetil ka?
छानच. माझ्याही आवडीचा प्रकार.
छानच. माझ्याही आवडीचा प्रकार.
>>>>Ras kadhaycha mhnje gare
>>>>Ras kadhaycha mhnje gare mixermadhun kadhle tar chaltil ka?<<<
सॉरी प्रतिसाद द्यायला उशीर झाला.
नाही, मिक्सर मध्ये उष्णता निर्माण होवून कडू होतील.
हँड ब्लेंडर ने पल्प करायचा.
आंब्याची होतात, नुसत्या गुळ- खोबर्याची( चुन) घालून सान्ना होतात.
रसाबरोबर एकत्र करून मीठ आणि
रसाबरोबर एकत्र करून मीठ आणि खोवलेलं खोबरं घालून रात्री झाकून ठेवावे.>>>>>>> आंबत नाही का? र्स आणि खोबर्याला एक आंबूस वास येत नाही क?
>>>>>आंबत नाही का? र्स आणि
>>>>>आंबत नाही का? र्स आणि खोबर्याला एक आंबूस वास येत नाही <<<<<
पारंपारीक पद्धतीत रात्रीच गर तांदूळाच्या रव्यात एकत्र करून ठेवतात ओलं खोबरं वगैरे घालून. रवा फुलतो व गर मस्त रव्यात मुरतो आणि सान्ना छान हलकी होतात. एक छान चव येते. कधीच बेकींग सोडा वगैरे घालत नाहित.
आम्ही पाणी वा दूध नाही घालत. अजीबात खराब आंबट वगैरे लागत नाही. घातलच तर नारळाच घट्ट दूध घालतो.
मूळात तांदूळाचा रवा छान तूपात परतला की मग लगेच त्यात ओलं खोबरं टाकून झाकतो. रवा खोबर्यातले पाणी शोषून घेतो.
मग गर टाकायचा.
धन्यवाद देवीका! फणस नाही तर
धन्यवाद देवीका! फणस नाही तर गूळचुनाची करेन सांदणं(सांन्नं).
जसा फणस मिळायला लागतो, तसे
जसा फणस मिळायला लागतो, तसे सांदणं बनायलाच हवीत , त्याशिवाय कोंकणी लोकांना जीवाला बर वाटत नाही.
म्हणून हा फोटो, पान वर काढायला,
मूळ पाककृती संपादित का करता
मूळ पाककृती संपादित का करता येत नाही आता?
काही ठराविक अवधी असतो का?
मस्तच दिसतायत .
मस्तच दिसतायत .
हल्ली एक महिनाच असते मुदत संपादनाची.
मानसिक छळ करू नका हो असे फोटो
मानसिक छळ करू नका हो असे फोटो टाकून...
यंदा सांजण, उकडगरे असे पदार्थ मिळणं अशक्यच. आणि ते मला आईकडे गेल्यावरच मिळतात, त्यामुळे तर ....
वॉव..छान दिसतायत.. एकदम हलकी!
वॉव..छान दिसतायत.. एकदम हलकी!
मस्त दिसताहेत.
मस्त दिसताहेत.
हा टाकला विडिओ,https://youtu
हा टाकला विडिओ,
https://youtu.be/s-HkfQB-xqA
फणस मिळाला ह्या वर्षी तर
फणस मिळाला ह्या वर्षी तर नक्के करून पहा.