अरे कृष्णा अरे कान्हा मनरंजना मोहना

Submitted by डॅफोडिल्स on 13 August, 2009 - 11:18

100_1152.jpg
गोविंदा आला रे !
100_1145.jpg

माझ्या राहूटीत शिरला मोर रे...
आला आला माखन चोर रे...

निळं निळं तनू भाळी मोर पिसारा
दुध, तुप, लोणी खाउन केला पोबारा
त्याला बांधावा तर मिळेना गं दोर रे...
आला आला माखन चोर रे...

भरलेला घडा होता टांगला वर
एका वर एक त्यांनी रचले गं थर
वर नंदाच कार्ट पोरं रे....
आला आला माखन चोर रे...

ऐकेना पोरं हाती घेतली मी काठी
एक एक रट्टा दिला एकेका पाठी
माझ्या जिवालाच लागला घोर रे...
आला आला माखन चोर रे...

मैया म्हणुन डोळ्यातले पुसतो गं अश्रू
माझ्या कुशीत गं शिरलं अवखळ वासरु
कसं लबाड हे यशोदेच पोरं रे...
आला आला माखन चोर रे....

-सत्यजित

गुलमोहर: 

कसला बाळसेदार गोंडस कृष्ण आहे.. चित्र अगदि बारकाव्यांसहित खुप छान.. त्यावर माखनचोराची कविता.. मस्तच Happy

Pages