कैवल्य कैवल्य फ्यान क्लब .. (बदाम बदाम बदाम)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 April, 2015 - 14:25

जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....

तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे. Happy

दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !

मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.

या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो Happy

kaiv 2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोस्टर बॉईज पाहिलाय, पण हा होता का ते आठवत नाही. सिनेम मस्त होता. पोपट नाही पाहिला. माहितीबद्दल धन्यवाद.

अय्यामधे पण होता. आणि अत्यंत वाईट, सिनेमात गरज नसलेल्या कॅरेक्टरमधे होता. त्यामुळे काहीही छाप पाडण्याची शक्यताच नव्हती.

कैवल्यची एकांकिका बघायला हवी. मी एकही नाही बघितली पण त्याला आत्ताच एक अवार्ड मिळालं, मोठ्या लोकांबरोबर. त्यासाठी त्याचं अभिनंदन.

आज माझ्यासाठी सोने पे सु हागा पर्वणी आहे ..

माझे दोन आवडते कलाकार कैवल्य आणि स्वजो आमने समाने..

अर्थात दिग्दर्शक त्यांना आमनासामना करतो का हे बघणे रोचक ठरणार आहे..

"ऋन्मेऽऽष | 1 June, 2015 - 21:52
आज माझ्यासाठी सोने पे सु हागा पर्वणी आहे ..

माझे दोन आवडते कलाकार कैवल्य आणि स्वजो आमने समाने..

अर्थात दिग्दर्शक त्यांना आमनासामना करतो का हे बघणे रोचक ठरणार आहे.."

गरम झाला असशील नाकी का? हा भाग तर अगदी उठून दिसेल !

गुड ! गुड!! वेरी गुड ! तिलगुड !

आज माझ्यासाठी सोने पे सु हागा पर्वणी आहे ..

>>>>.

सुहागा असा एक शब्द आहे ऋन्मेष.
सु हागा मुळे भलताच अर्थ होतोय Lol Lol Lol

मधुकर विनायक देशमुख >>

अशक्य धागा आहे हा .. फॅन क्लब म्हणून दुर्लक्ष करत होती पण खुपच मधे मधे करायला लागला म्हणून उघडून पाहिला .. पागलसारखी एकटीच हसत आहे मी .. Rofl

बाकी या अ‍ॅक्टर कम हिरो ला पोपटात बघीतल होतं .. त्यात तो शाळेतला अ‍ॅक्टर आणि अकु लाच जास्त नोटीस केल. याला नै .. बरा आहे पण कैवल्य ह्या कॅरेक्टरचा उदो उदो सोडून यालाच पकडलाय वाटतं सर्वांनी .. माझी एक मैत्रीण ओळखते याला .. लय मेहनत करतोय म्हणे .. असो ..

बाकी ऋन्मेष .. तु ग्रेट आहेस ..
प्रत्येकाने टाकलेल्या बॉल ला प्लेट करतो तू Lol .. आणि हो हि तुझी तारीफ नव्हती

हा धागा वाचून खुप हसलो.:हहगलो:

कालच सौच्या कृपेने "दिल दोस्ती दुनियादारी" ह्या शिरेलीचा एक भाग पाहण्यात आला. आणि मनोमन पटले जर ऋन्मेष ह्या कलाकारावर धागा काढू शकतो आणि त्यावरील प्रश्नांना उत्तरे देऊ शकतो. तर जगात कोणतीह्या गोष्टीवर धागा काढण्याची जबरदस्त प्रतिभा ऋन्मेषमध्ये आहे.

पुढील धाग्याच्या प्रतिक्षेत................ (मी ऋला नविन धागा उघडण्यासाठी प्रोस्ताहन दिल्यामुळे कृपया मला शिव्या देऊ नयेत.) Proud

मस्त धागा!

मी पण पंखा आहे अमेय वाघ (कैवल्य) ची. खरंच चांगला अभिनय करतो तो. आमच्या कॉलेजमध्ये पण क्रेझ आहे त्याची. जवळ जवळ आता ए.लं.दु.गो मधल्या 'घना' पात्राइतकंच फेमस होणारं ते पात्र! Happy

रच्याकने,
बाकीचे का इतके चिडून आहेत? तुम्हाला तो आवडत नाही ह्याचं खूप आश्चर्य वाटतंय मला.

अमेय वाघ आधी आवडला नाही कधी हे मात्र खर. पोपट चित्रपटात होता तो. आणि एक दोन नाटकांत पण आहे तो. 'दळण' आणि 'गेली २१ वर्षे'.
मी पोपट पाहिला. पण भंगार वाटला चित्रपट.
आता त्याचं लक पहा. त्याच्या 'दळण' नाटकाला सुमारे ८०० जण प्रेक्षक होते. हाउसफुल्ल! ३डी (दिल दोस्ती दुनियादारीची) च हि कमाल म्हणावी लागेल. Happy

--------

---------

आज रीपीट टेलिकास्टमध्ये पोलिस इनस्पेक्टरचा भाग बघण्यात आला.
कैवल्यचा कॅलिफोर्निया लिहिलेला टी-शर्ट खूप भारी होता. आपण फिदा त्या टीशर्टवर.. आणि तो त्याला सूटही करत होता.. त्याच्या फीमेल फॅन क्लबच्या विकेट पडल्या असणार..

काल की परवाच्या भागात, कैवल्य देखो आ गया है बॉडीगार्ड उर्फ सलमान बनला होता.
मागे शाहरूखची मिमिक्रीही झाली होती, आता बस्स एक आमीर कवर केला की सिलॅबस पुर्ण !

गायन कला पण चांगली आहे त्याची. राहुल देशपांडे (संगीत नाटक कट्यार काळ्जात घुसली मधील खान साहेब) यांच सुद्धा गायन अफाट आहे. मस्त होत नाटक! Happy

Ate fan clubatlya janate la kalale ka? Tya Sujay chya Bahinine kal vhya 3D chya episode madhe ticha Kaiwalya var motha crush aahe ase jahir kele aahe. Nantar mhanali sorry. Pan, bagha buwa, udya jaun propose pan karel...

कालच्या एपिसोडला मला सुद्धा या धाग्याची आठवण आली होती.. हॅट्स ऑफ टू कैवल्य.. त्यानंतर तो जे तिला बोलतो ते खरेच प्रेक्षणीय आणि श्रवणीय आहे.. एवढा मनाचा मोकळेढाकळेपणा मला एक पुरुष म्हणून खचितच जमला असता.. किंवा काय सांगावे जमलाही असता.. पण म्हणूनच मला कैवल्य आवडतो Happy

ओके! अगं लग्न झालय न त्याचं म्हणून मला वाटलं टीआरपी वैगेरे वाढवतायत कि काय असले उद्योग करुन. त्याची काही गरज नसताना. Happy

ऋ, जमला असता की नसता? Happy

मलाही आवडतो कैवल्य! पण मध्येच त्याच्यात अमेय जाणवतो तेव्हा तो स्वतः कॅरेक्टर बाबत कन्फ्युज झाल्यासारखा वाटतो.

निधी +१
अधे मधे ओव्हर अ‍ॅक्टिंग होतेय खरी पण कुठे थांबायचं ते परफेक्टली कळायला सगळेच काही फरहान अखतर
नसतात Happy Wink

Pages