जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....
तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे.
दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !
मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.
या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो
नक्की कसला धागा आहे हा?
नक्की कसला धागा आहे हा? वरच्या अनेक पोस्टी बघून शंका येतेय.
>>>>
फ्यानक्लब आहे.. फॅन जमले आणि हवापाण्याच्या गप्पा झाल्या तरी हरकत नाही.
अमेय हा उत्तम नट आहे. 'गेली एकवीस वर्ष' मधलं त्याचं काम मला प्रचंड आवडलं होतं.
>>>>
आपल्या या पोस्टीने आपले या फॅनक्लबात स्वागत झाले आहेच.
दिदोदु मालिकेचा एखादा एपिसोड कधी बघणे झाल्यास त्याने रंगवलेले कैवल्य कॅरेक्टर वर देखील नक्की मत व्यक्त करा.
अवांतर @ snale snail snake
अवांतर @ snale snail snake etc etc.. तर माझे ईंग्लिश विंग्लिश वगैरे वगैरे मुळातच पार गंडलेले आहे हे मी आधीही कुठे कुठे नमूद केलेले आहे, तर पुन्हा कबूल करण्यातही कसलाही कमीपणा नाही. मी तिला फक्त एक भाषा म्हणूनच बघतो. जर मला तेलगू, कन्नड, तामील वगैरे भारतीय भाषाच येत नाहीत तर एखादी विदेशी भाषा येत नाही याबाबत कश्याला लाज बाळगू.
>>अवांतर @ snale snail snake
>>अवांतर @ snale snail snake etc etc.. तर माझे ईंग्लिश विंग्लिश वगैरे वगैरे मुळातच पार गंडलेले आहे हे मी आधीही कुठे कुठे नमूद केलेले आहे, तर पुन्हा कबूल करण्यातही कसलाही कमीपणा नाही. मी तिला फक्त एक भाषा म्हणूनच बघतो. जर मला तेलगू, कन्नड, तामील वगैरे भारतीय भाषाच येत नाहीत तर एखादी विदेशी भाषा येत नाही याबाबत कश्याला लाज बाळगू.>> क्या बात है!!
बाय द वे ऋन्मेऽऽष, इंग्लिश तर तुला कामासाठी रोज वापरायला लागतं, ते येत असावं ही नोकरी देतानाची रिक्वायरमेंट (म्हणजे मराठीत अट बर का) असेल ना. पण ते मुळातच पार गंडलेले आहे म्हणतोस.
मराठी माध्यमात शिक्षण झाले नाही म्हणून मराठी चांगलं नाही म्हणाला होतास. आणि तसं अधुन मधुन दाखवतही असतोस (आठव ते तुझं "कोपरापासून धन्यवाद"!!). मराठीचा अभिमान आहे, जमेल तिथे मराठीच वापरतोस असं म्हणतोस आणि पटकन लिहिताना त्यात इंग्रजी घुसडतोस. म्हणजे बरेच लोक प्रयत्न करून मराठी प्रतिशब्द शोधतात आणि लिहितातही पण तेवढा वेळ तुझ्याकडे नसावा.
बाकी तेलगू, कन्नड, तामील वगैरे भारतीय तर तुला येतच नाहीत असही म्हणतो आहेस.
मित्रा, एकूणच भाषांच्या बाबतीत बरीच गडबड आहे रे तुझी
त्या "नाव मोठं आणि लक्षण खोटं" वगैरे लेखाबाबत जरा परत विचार कर जमल्यास. (इथे दिवे घे बर का)
एकूणच कैवल्य फॅन क्लब वर बर्याच गप्पा सुरु आहेत, त्यात माझेही "दोन पैसे"!!
मराठी माध्यमात शिक्षण झाले
मराठी माध्यमात शिक्षण झाले नाही म्हणून मराठी चांगलं नाही म्हणाला होतास.
>>>>>>
हे मी असे कुठे म्हणालेलो., खरेच..
आठवत नाही.. पण लिंक संदर्भ वगैरे नको .. कुठेतरी असेच गंमतीत किंवा वेगळ्या संदर्भाने सहज म्हटले असेल.. विनाकारण हे असले काही खोटे नाही बोलणार.. मराठी माध्यमातच शिक्षण झालेय माझे.
पण त्याचबरोबर मराठीचाही लोचा आहे हे खरे.. त्याची मात्र हल्ली (माबोवर आल्यापासून) खंत वाटून ते सुधारायचा प्रयत्न असतो..
पण जास्त खंत याची वाटते की जवळपासच्या काही मित्रांना माझे मराठी फार भारी वाटते. थोडक्यात अशी परिस्थिती आहे आज, मराठीची.
माफ करा मी अमेयची फॅन वगैरे
माफ करा मी अमेयची फॅन वगैरे नाही हां.
त्याला बघून माझ्या डोळ्यात बदाम वगैरे येत नाहीत.
धन्यवाद.
मी अजूनही मिसो ते जॉर्ज क्लूनी या रेंजमधेच आहे. सर्व बदाम तिथेच अर्पण.
एक्झॅक्टली, मी सुद्धा अमेयचा
एक्झॅक्टली, मी सुद्धा अमेयचा फॅन नाही. अरे ये धागा निकालने से पहले मुझे तो उसका नाम भी पता नही था. मी कैवल्य या कॅरेक्टरचा फॅन आहे. ते अमेय वाघने साकारले असल्याने आता त्याचा इम्पॅक्ट पुसला जाऊ नये म्हणून मी त्याचे (अमेयचे) ईतर काहीही बघायचे नाही असे ठरवलेय.
मुंबईत पुरुष ज्यांना पुरुष
मुंबईत पुरुष ज्यांना पुरुष आवडतात त्यांना गुड म्हणतात . सर्वसामन्य ज्यांना होमो म्ह्नंतात.
तरी असले होमो धागे इथे चालतात का?
मी कैवल्य या कॅरेक्टरचा फॅन
मी कैवल्य या कॅरेक्टरचा फॅन आहे.
>>
याला प्रचंड अनुमोदन
हेमंत,
तुम्हाला शिवाजी महाराज, बाळा साहेब ठाकरे, भिमसेन जोशी इत्यादींपैकी कोणी आवडतं का ओ?
स्वप्नीलच्या पोटाला स्वेटरचा
स्वप्नीलच्या पोटाला स्वेटरचा आधार,>>:हहगलो:
घुबड
घुबड
ऋन्मेऽऽष, अमेय वाघ ला महेश
ऋन्मेऽऽष, अमेय वाघ ला महेश टिळेकरांकडून "उमेद पुरस्कार" मिळाला आहे. बाकि विजेत्यात शर्मिला टागोर, वर्षा उसगांवकर, रेखा भारद्वाज, सौरभ शुक्ला इ. मान्यवर आहेत..
ते अमेय वाघने साकारले
ते अमेय वाघने साकारले असल्याने आता त्याचा इम्पॅक्ट पुसला जाऊ नये म्हणून मी त्याचे (अमेयचे) ईतर काहीही बघायचे नाही असे ठरवलेय.>>>>आम्ही पण असेच ठरवलेय सई आणी स्वप्नील बद्दल.:खोखो:
आता त्याचा इम्पॅक्ट पुसला जाऊ
आता त्याचा इम्पॅक्ट पुसला जाऊ नये म्हणून मी त्याचे (अमेयचे) ईतर काहीही बघायचे नाही असे ठरवलेय <<
अरेरे... युअर लॉस.
हाच कैवू आता त्या प्रगल्भाचा
हाच कैवू आता त्या प्रगल्भाचा गाण्याचा क्लास घेऊन बोर करतोय आणि नवरा चॅनेल बदलत नाहीये.
हाच कैवू आता त्या प्रगल्भाचा
हाच कैवू आता त्या प्रगल्भाचा गाण्याचा क्लास घेऊन बोर करतोय आणि नवरा चॅनेल बदलत नाहीये.
रश्मी कैवू नाही बोर करत;
रश्मी
कैवू नाही बोर करत; प्रगल्भाने बोर केलं. रच्याकने, ती इतकी पण वाईट गात नसावी. तिला मुद्दाम वाईट गायला लावलंय असं जाणवत होतं.
ती इतकी पण वाईट गात नसावी.
ती इतकी पण वाईट गात नसावी. तिला मुद्दाम वाईट गायला लावलंय असं जाणवत होतं>>> +१
असंच असतं. मुळातून काही वाईट
असंच असतं. मुळातून काही वाईट नसतंच. या मालिकाही मुळात वाईट नसतातच. त्यांना दिग्दर्शक, पटकथा लेखक, आणि टीआरपीचा खेळ हे सगळे मिळून वाईट बनवतात
अप्पाकाका तुम्ही ही सिरीअल
अप्पाकाका तुम्ही ही सिरीअल बघत नाही असं दिसतय. बाकीच्या मालिकांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम सिरीअल आहे .
का फक्त धागाकर्त्याकडे बघून टीका करताय
अहो मी जनरल सिरिअल बद्दल
अहो मी जनरल सिरिअल बद्दल बोललो सगळ्या. बाकी या मालिकेचे दोन भाग बघण्यात आले. फार बालीश प्रकरण वाटलं म्हणून पुढे नाही पाहिले. त वरुन ताकभात. असो.
ती इतकी पण वाईट गात नसावी.
ती इतकी पण वाईट गात नसावी. तिला मुद्दाम वाईट गायला लावलंय असं जाणवत होतं>>> +१
>>>>>
याचा अर्थ अभिनय नाही जमला.
बाकीच्या मालिकांपेक्षा
बाकीच्या मालिकांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम सिरीअल आहे .
>>>
कश्याला उत्तम म्हणायचे हे ज्याचे त्याने ठरवावे, आपण आपले मत असे ईतरांवर लादू शकत नाही, पण डिफरंट आहे याबाबत कोणाचेच दुमत नसावे
अरे मी तिकडच्या धाग्यावर
अरे मी तिकडच्या धाग्यावर लिहून आले गाण्याबाबत
हाच कैवू आता त्या प्रगल्भाचा
हाच कैवू आता त्या प्रगल्भाचा गाण्याचा क्लास घेऊन बोर करतोय आणि नवरा चॅनेल बदलत नाहीये.
मी प्राजक्ता....मला तुमच्याबद्द्ल सहानुभुती वाटते.
असं का नाही करत, नवरा इकडेतिकडे झाला की गुपचुप रिमोट्मधली एक बॅटरी काढुन ठेवायची.
नवरा इकडेतिकडे झाला >>> गेला
नवरा इकडेतिकडे झाला >>> गेला असे हवे ना
नवरा इकडेतिकडे झाला >>> गेला
नवरा इकडेतिकडे झाला >>> गेला असे हवे ना स्मित >>>>>>>>> ++++++१
नवरा इकडेतिकडे झाला >>>
नवरा इकडेतिकडे झाला >>> खोखो...
आम्हीपण (मी व कन्यारत्न) १७-१८ भाग पाहिले. सध्यातरी आवडली. सर्व पोरं व पोरी आवडल्या. कन्यारत्न 'शोले' पहायचा हट्ट करुन राहिलय. तिला बर्याच विनोदांवर हसु येते त्यामुळे तिचे मराठी सुधारत असल्याची पावती मिळाली आणि त्यामुळेच मालिका अजुन आवडली.
आणि हो, हा धागा ज्यावर आहे तो 'कैवल्य' भयंकर आवडला नसला तरी चांगलाय. हळुहळु जास्त आवडतोय. तो मराठी तसेच बोलतो की यातच तसे बोलत आहे? मस्त बोलतो.
आशु झालेल्याचे मराठी ऐकायला पण मजेशीर आहे, आवडले.
अॅना प्रकरण फार फार गोड आहे. खुप आवडली.
मीनल पण अर्थातच मस्त. ती टिकेकर अपत्य हे माहीत नव्हते.
कैवल्यचे काम नेटवर अजुन कुठे पहायला मिळेल का? कोणाला माहित असेल तर नक्की सांगा.
आय थिंक त्याने पोस्टर बॉईज
आय थिंक त्याने पोस्टर बॉईज नावाच्या मराठी पिक्चर मधे पण केलंय काम.
पोपट नावाच्या सिनेमातही होता
पोपट नावाच्या सिनेमातही होता तो, चांगलं काम केलं होतं त्यात.
पोपट मध्ये होता की
पोपट मध्ये होता की अमेय.
त्याच्या चेहर्यावर एक खोडकरपणा, आगाउपणा आहे.
तो कॅश करनार्या भुमिकेत तो अधिक खुलेल असं वाततय.
Pages