"चिकना चिकना म्हावरा माझा..."

Submitted by जिप्सी on 12 May, 2015 - 12:40

हर्णे बंदर (दापोली) येथील मासळी बाजार. सकाळी १०-११ आणि संध्याकाळी ४:३०-५:०० नंतर दापोली येथुन अंदाजे १६ किमी अंतरावर असलेल्या हर्णे बंदरावर माशांचा बाजार भरतो. ताजी फडफडीत मासळींचा लिलाव व किरकोळ विक्री सुरू असते. Happy

प्रचि ०१
हर्णे समुद्रकिनारा

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
फत्तेहगड

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
लॉबस्टर

प्रचि ११
लॉबस्टर आणि टायगर प्रॉन्स

प्रचि १२
पापलेट

प्रचि १३
हलवा

प्रचि १४
कापरी पापलेट

प्रचि १५
कोलबी

प्रचि १६
पापलेट

प्रचि १७
पाकट

प्रचि १८
कोलबी

प्रचि १९
मांदेली Happy Happy

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
सुकट, करदी, बोंबिल

प्रचि २५
सुके बोंबिल

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे शेवंड, जे जिप्स्याच्या दोन्ही फोटोत आहे, ते मी एकदाच खाल्लेय. त्याचा बाजारभाग रु. ११००-१२०० प्रती किलो आहे आणि किलोत केवळ २-३ च शेवंडे येणार याची खात्री वाटते त्यांचा आकार पाहुन.

मी खाल्ले ते शेवंड साधारण पुढचा भाग खालुन खेकड्यासारखा आणि मागचा भाग कोलंबीसारखा असे होते. खेकड्याचे पाय जसे खालुन ओळीत जुळालेले असतात तसे त्याचे पाय ओळीत जुळलेले होते. हा भाग जरासा मोठा आणि जर्रासाच चौकोनसर होता. त्याच्या मागचा भाग कोलंबीसारखा आणि कोलंबीह्या पायासारखेच पाय.

आमच्या कोळणीने "गरिबावर अधुन मधुन दया करावी" असा विचार करत मला एकच शेवंड २०० का तिनशे रुपयाला दिलेला. मी रेस्पी पण तिलाच विचारुन घेतली आणि तो शिजवला (रेसिपी आता अजिबात आठवत नाही.)

चव घेतल्यावर मात्र थोडी निराशा झाली. ह्याचे मांस चवीला चक्क खेकड्यासारखे लागले. मला खेकड्याचे मांसही खुप आवडते, वादच नाही. पण ह्याला काहीतरी वेगळी चव असेल, थोडी कोलंबीच्या बाजुने झुकणारी असे वाटलेले. असो.

आमच्या कोळणीने "गरिबावर अधुन मधुन दया करावी" असा विचार करत मला एकच शेवंड २०० का तिनशे रुपयाला दिलेला. >>>>>:फिदी:

माझं आजोळ कुलाब्याला (जवळच ससुन डॉक, त्यामुळे ताजी मासळी नेहमीच असायची) आणि शेजारी कोळी असल्याने पहिल्यांदाच लॉब्स्टर (स्पायनी) बघितला तो तेथेच. एका मोठ्या बादलीत जेमतेम ४-५ लॉबस्टर होते. (त्यावेळेस) एव्हढ्या मोठ्या कोलंब्या बघुन फार आश्चर्य वाटलेलं (त्यावेळेस हे शेवंड/लॉबस्टर माहित नव्हते) . Happy

खूप छान ...कलर्फुल्ल!
आधी मला वाट्लं नुस्ते माशांचे फोटो असतील....पण म्हट्लं गुर्जींचे फोटो ते ...कशाचेही असले तरी मस्तच असणार!

Pages