Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुभा प्रेमात तर पडलायं अजून
सुभा प्रेमात तर पडलायं अजून कबूल नाही करते
, आउ बिचार्या किती हिंट देणार 
आशूडी (विपू बघ, प्लीज)
आशूडी
(विपू बघ, प्लीज)
मन्जूडी पण मला यान्च्या
मन्जूडी
पण मला यान्च्या बथ्थडपणाचा खरच कन्टाळा आलाय. कधी सुधरायचे देव जाणे.:फिदी:
चांगली मालिका आहे व आता या
चांगली मालिका आहे व आता या मालिकेत इंटरेस्ट येऊ लागला आहे.पन् काही आयडी यामालिकेची खिल्ली ऊडवत आहेत ते बरोबर नाही.खास करुन दक्षीणा , रश्मी,मंजुडी या मालिकेला कंटाळल्या आहेत तरीही रोज न चुकता मालिका पाहतात व खिल्ली ऊडवतात ,अरे कंटाळा आला असेल तर नका पाहू ना मालिका कुणी सक्ती केलिए???..
ती इमारत म्हणजे ठाण्यातल्या
ती इमारत म्हणजे ठाण्यातल्या पूर्व दृतगती महामार्गावरच्या कॅडबरी जंक्शनपाशी असलेली 'देव कॉर्पोरा'ची इमारत आहे असा आम्ही निष्कर्ष काढलाय.
(कोरम मॉलला डाव्या हाताला ठेवलं तर ती इमारत चौकातच उजव्या हाताला आहे. मंत्रालयाच्या बसेसच्या स्टॉपवर उभं राहिलं की मागच्या बाजूला)
'देव कॉर्पोरा'ची इमारत आहे>>
'देव कॉर्पोरा'ची इमारत आहे>> तीच आहे बिल्डिंग.
आणि एक मोकळ्या मैदानातली एक बिल्डिंग दाखवतात तो शॉट शिपातला आहे.
अहो केन्जळे मालिकान्ची खिल्ली
अहो केन्जळे मालिकान्ची खिल्ली उडवणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, आणी तो आम्ही अजीबात कोणाला देणार नाही. आणी कन्टाळा आला तरी काय करणार, कधी तरी सुधरतील मालिकेतली पात्रे, दिग्दर्शक आणी कथा लेखक वगैरे अशा समजूतीने पहात रहातो. जाऊ दे, तुम्ही वरील लोकान्पैकी कोणी नाही ना? मग का काळजी करताय्?:फिदी:
तुमची होती खिल्ली आनी
तुमची होती खिल्ली आनी दिग्दर्शकाचा जातो जीव , चांगले लिहीता येत नसेल तर निदान वाईट तरी लिहू नये.
दिग्दर्शकाचा कसला जीव जातोय,
आणी तुम्ही फेसबुका वर असाल तर या मालिकेच्या फेसबुका वर इथली लिन्क द्या म्हणजे ते सुधरतील.
>>> तुमची होती खिल्ली आनी
>>> तुमची होती खिल्ली आनी दिग्दर्शकाचा जातो जीव <<<<
तुम्हाला "शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड" असले काही म्हणायचे होते का? असुद्यात.....
लेखक-दिग्दर्शकाचा कशाला जातोय जीव? - ते बाकिच्यान्ना नाचवित अस्तात त्यांच्या तालावर...! तोच त्याचा ताल जरा सुधरवण्याचे कार्य येथिल माताभगिनी करत आहेत, इतकेच. तुम्ही नका लोड घेऊ.
अदितीची जी चप्पल कालच्या
अदितीची जी चप्पल कालच्या भागात तुटलेली दाखवली आहे ती उजव्या पायाची. अॅक्सिडेंट होताना सुद्धा तीच चप्पल आणि उजव्या साईडचीच.
* जर तुटलेलीच चप्पल अदिती वापरत असेल तर अॅक्सिडेंट आधीच व्हायला हवा होता.
* जर चप्पल शिवून घेऊन वापरत असेल तर पुन्हा त्याच पायाची चप्पल तुटलेली दाखवणं हा निव्वळ विनोद.
* त्याही पेक्षा चप्पल तुटल्यावर भर रस्त्यात जिथे वाहनांची वर्दळ आहे तिथे ती स्वहस्ते जोड्त बसणं हे निव्वळ आणि निव्वळ भंपक आणि बिनडोकपणाचं लक्षण आहे.
रवी केंजळे तुम्ही जे कोणी आहात ते, यापुढे माझ्या कोणत्याही प्रतिसादावर टिप्पणी करू नये ही विनंती. शिवाय माझं नाव सुद्धा घेऊ नये. मी इथे नाहिच आहे अशा अविर्भावात आपण वावरावे ... धन्यवाद.
(No subject)
रवी केंजळे यांना तसाही सर्व
रवी केंजळे यांना तसाही सर्व चित्रपट / मालिकांमधील कलाकारांचा फारच पुळका आहे असं माझं निरीक्षण
इथे मालिकांचा धागा उघडला जातो ती सांगोपांग चर्चा करायला.. जे चांगल दिसतं त्याचं भरभरून कौतुक करतोच की आपण मग काही वाईट किंवा महापकाऊ किंवा अतिशय बिनडोक दाखवलं गेलं असेल तर का नाही करायची चिरफाड? या धाग्याचा उद्देशच तो आहे...
लले इतकी का हसतेयस? तुझं
लले इतकी का हसतेयस? तुझं हासणं बघून मला हसू येतंय
रवी केंजळे तुम्ही जे कोणी
रवी केंजळे तुम्ही जे कोणी आहात ते, यापुढे माझ्या
कोणत्याही प्रतिसादावर टिप्पणी करू नये ही विनंती.
शिवाय माझं नाव सुद्धा घेऊ नये. मी इथे नाहिच आहे अशा
अविर्भावात आपण वावरावे ... धन्यवाद.>>>>>>>>>>>हा ओपन फोरम आहे ,इथे कुणीही कुणाच्याही प्रतीसादावर टिप्पणी करु शकतो,नव्हे ओपन फोरमचा तोच अर्थ आहे.खाजगी चर्चा व मालिकेची खिल्ली उडवायची असेल तर् एकमेकींच्या विपुत तसे करायला मोकळ्या आहात.धन्यवाद.
मी या मालिकेचा चाहता आहे
मी या मालिकेचा चाहता आहे त्यामुळे या मालिकेची खिल्ली उडवलेली मला चालणार नाही,मी लगेच निषेध नोंदवणार.
नोंदवा.
नोंदवा.
जरूर नोंदवा... तुमच्या
जरूर नोंदवा... तुमच्या पोस्ट्सकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचे 'पेशन्स' वाढवायचा प्रयत्न करू..
मी या मालिकेचा चाहता आहे >>>
मी या मालिकेचा चाहता आहे >>> याची कारणं द्या की! आम्ही वाचू!
त्यामुळे या मालिकेची खिल्ली उडवलेली मला चालणार नाही >>>
आम्हाला ही मालिका अजिबात आवडत नाही. त्यामुळे या मालिकेचं कौतुक केलेलं आम्हाला चालणार नाही
रवि केंजळेंचे मंदार कुमठेकर
कसं काय??? काय कारण असू
कसं काय???
काय कारण असू शकत???
कुमठेकरपर्यंत आलेच आहेत तर
कुमठेकरपर्यंत आलेच आहेत तर लवकरच बाजीराव पण होतील.
झाला एकदाचा अॅक्सिडेंट.
झाला एकदाचा अॅक्सिडेंट. रस्त्याच्यामध्ये उभं राहून चप्पल नीट करताना कोणाचंही टकुरं फुटेल. अपघात जेन्यूईन वाटण्यासाठी कसं स्क्रिप्टींग करावं हे न कळण्याइतपत कल्पनादारीद्र्य आलं का लेखकांना?
भुंग्याला स्क्रिप्ट रायटींगचे शून्य मार्क.
सुभा कासावीस झाला अपघाताचं ऐकून.
'अदिती माझी मुलगी आहे' असं दाभोळकर म्हणताना रजनीने ऐकलं.
>>>> कुमठेकरपर्यंत आलेच आहेत
>>>> कुमठेकरपर्यंत आलेच आहेत तर लवकरच बाजीराव पण होतील <<<<
अग कुठ कुठ ठेऊ तुला आशुडे....... ! कस्ले भारी पंच मारतेस.... वाड्यावरचा फाकोकरंडक "स्पेकोकरंडक" असे नाव बदलून तुलाच बहाल....
सगळेच प्रतिसाद
सगळेच प्रतिसाद
रस्त्याच्यामध्ये उभं राहून
रस्त्याच्यामध्ये उभं राहून चप्पल नीट करताना कोणाचंही टकुरं फुटेल. अपघात जेन्यूईन वाटण्यासाठी कसं स्क्रिप्टींग करावं हे न कळण्याइतपत कल्पनादारीद्र्य आलं का लेखकांना?>>>> तेच म्हणल की आ बैल मुझे मार या पद्धतीने बाईसाहेब रस्त्याच्या मध्यभागी उभ्या राहुन चप्पल जोडत होत्या, मग आणखीन काय व्हायचय.:फिदी:
आशूडी
रजनीवर खरा बाँब पडेल जेव्हा
रजनीवर खरा बाँब पडेल जेव्हा जय-आदिती नवरा बायको आहेत ते कळेलं, अर्थात ह्या परीस्थितीतही लपवाछपवी चालूचं असेल तर धन्य....
किती लागलंय तिला? जयने
किती लागलंय तिला? जयने नोकरीला लाथ मारून हीच माझी बायको आहे हे क्लेम करण्याइतपत, का परत एकदा आवंढे गिळत गुळमुळीतपणे मैत्रिणीला मदत करायलाच हवी हे डिक्लेअर करावं इतपत?
जयने नोकरीला लाथ मारून हीच
जयने नोकरीला लाथ मारून हीच माझी बायको आहे हे क्लेम करण्याइतपत, का परत एकदा आवंढे गिळत गुळमुळीतपणे मैत्रिणीला मदत करायलाच हवी हे डिक्लेअर करावं इतपत? >> हे कधी झालं ?
दाभोळकर म्हणतात अदिती माझी
दाभोळकर म्हणतात अदिती माझी मुलगी आहे, तेव्हा रजनी मागुन हे ऐकते. दाभोळकर मागे वळुन पहातात, त्यान्च्या लक्षात येते. मला वाटत पुढे ते हे न कळु देण्यासाठी म्हणतील कदाचीत की अदिती त्याना मुलीसारखी आहे. ( म्हणजे आमटीत पाणी आणखीन वाढेल ) किन्वा खरे काय ते बाहेर येईलही.
Pages