Submitted by जिप्सी on 12 May, 2015 - 12:40
हर्णे बंदर (दापोली) येथील मासळी बाजार. सकाळी १०-११ आणि संध्याकाळी ४:३०-५:०० नंतर दापोली येथुन अंदाजे १६ किमी अंतरावर असलेल्या हर्णे बंदरावर माशांचा बाजार भरतो. ताजी फडफडीत मासळींचा लिलाव व किरकोळ विक्री सुरू असते.
प्रचि ०१
हर्णे समुद्रकिनारा
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
फत्तेहगड
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
लॉबस्टर
प्रचि ११
लॉबस्टर आणि टायगर प्रॉन्स
प्रचि १२
पापलेट
प्रचि १३
हलवा
प्रचि १४
कापरी पापलेट
प्रचि १५
कोलबी
प्रचि १६
पापलेट
प्रचि १७
पाकट
प्रचि १८
कोलबी
प्रचि १९
मांदेली
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
सुकट, करदी, बोंबिल
प्रचि २५
सुके बोंबिल
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा मस्त फोटो.
वा मस्त फोटो.
मस्त! हर्णे ते केळशी प्रवास
मस्त! हर्णे ते केळशी प्रवास खूप आवडतो... ते फोटो ही मस्त!
जबरदस्त!
जबरदस्त!
अग्ग बाबौ!
अग्ग बाबौ!
जल्ला मेलां. कशाक जलवतात कोन
जल्ला मेलां. कशाक जलवतात कोन जानं.
जिप्सी, हर्ने बंदर आणि मछी
जिप्सी, हर्ने बंदर आणि मछी बझार मस्त टिपलाय... भारी!!!
प्रचि ०१ हर्णे समुद्रकिनारा
प्रचि ०१ हर्णे समुद्रकिनारा भन्नाटच ... खास तुझ्या फोटोशूटसाठी सारे असे जमून येतात का रे..
मस्त आलेत फोटो.. मी आधी ते
मस्त आलेत फोटो..
मी आधी ते "चिकना चिकना नवरा माझा..." असं वाचलं !! आणि विचारात पडलो की जिप्सीने असा बाफ का काढलाय..
मस्त! एवढी मोठी वागळी
मस्त!
एवढी मोठी वागळी पहिल्यांदा पाहिली.
पराग.
माशांची नावेही लिहा
माशांची नावेही लिहा प्लीज.
सतराव्या फोटोतला भला मोठा मासा कोनता?
सहीच फोटो , इतके मासे दाखवले
सहीच फोटो ,
इतके मासे दाखवले आहेत ,आता जागु कुठे आहे त्यांच्या रेसिप्या सांगायला ?
ह्याला बडवा रे कोणी तरी, ताजे
ह्याला बडवा रे कोणी तरी, ताजे फडफडीत मासे दाखवतोय.
विकु १७ वे माकुळ आहे. string ray सारखे असते.
९ बहुतेकोले बोंबिल आहेत बहुतेक.
२३,२४,२५ सुके बोंबिल, करंदी
बाकी पापलेट बरीच दिसली.
काय मासे आहेत यार !! मागच्या
काय मासे आहेत यार !!
मागच्या महिन्यात मुबईत होतो तेव्हा स्पेशली गोमांतक मध्ये जाउन मासे खाउन आलो होतो... आता परत त्याची आठवणं झाली.
प्रचि ०५ - अरे जिप्स्या ते
प्रचि ०५ - अरे जिप्स्या ते हर्णे गाव नाही...तो फत्तेदुर्ग किल्ला आहे. गावाच्या लोकांनी तो बळकाऊन पार धुळीस मिळवलाय...आता वरती गेल्यानंतर फक्त दोन चौथरे दिसतात. तेवढीच किल्ल्याची खूण....
लायकी नाहीये आपल्या लोकांची वारसा सांभाळायची.
मस्तच !!
मस्तच !!
व्वा कसले झक्कास फोटो !!
व्वा कसले झक्कास फोटो !!
मस्त फोटो!! पराग +१
मस्त फोटो!!
पराग +१
आत्यंतिक दूष्टंपणा... ताज्या
आत्यंतिक दूष्टंपणा... ताज्या फडफडित माशांचे फोटो.. कुठे फेडाल रे ही पापं...
जिप्सी... केवळ अप्रतिम आहेत फोटो... कश्शा रंगेबिरंगी आहेत होड्या... मासेमारही ..
फार फार सुरेख आलेत फोटो.
वर उल्लेख केलेल्या व्यतिरीक्त
वर उल्लेख केलेल्या व्यतिरीक्त मला लाबस्टर, हलवा आणि मांदेली पण दिसतायत...
मंजूताई, जिप्सी - पुण्याहून
मंजूताई, जिप्सी - पुण्याहून कळशी ते हर्णे असा प्रवास करायचा असेल तर कसे जायचे?
सगळे फोटो छान आहेत. कोकंण म्हणजे सी फुड भाग दिसतो.
टु बी प्रामाणिक - मेलेले मास पाहूण खेद वाटला आणि त्याहून अधिक खेद लोकांना मेलेले मासे बघून तोपासु वाटले त्याचे. थोडे शाकाहारी पदार्थ सुद्धा टिपायचे असते हो.
फोटो मस्त. माशांची नाव लिहि
फोटो मस्त.
माशांची नाव लिहि रे फोटोंवर..
१७ वे माकुळ आहे. string ray
१७ वे माकुळ आहे. string ray सारखे असते.>>
ते string ray च आहे. माकूळ नाही.
पराग काही नावे अपडेट केली
पराग
काही नावे अपडेट केली आहेत. बाकीची नावे जागू सांगेलच
१७ वे माकुळ आहे. string ray सारखे असते.>>
ते string ray च आहे. माकूळ नाही.>>>>>पाकट आहे ना?
स्ट्रिंगरे नव्हे, स्टिंगरे.
स्ट्रिंगरे नव्हे, स्टिंगरे.
पहिला फोटो भन्नाट... बाकी
पहिला फोटो भन्नाट... बाकी होड्या, समुद्राचे फोटोही मस्त आलेत नेहमीप्रमाणेच.
मासळीचे फोटो मी नाक दाबून पाहिले.
आम्ही कड्यावरच्या गणपतीला जाताना रस्ता चुकलो आणि हर्णै गावात शिरलो. त्या अख्ख्या गावालाच मासळीचा वास येतो की काय कोण जाणे... रस्ता विचारत विचारत जायचं म्हणून गाडीच्या खिडक्या उघडाव्या लागल्या. आणि साबा आणि माझा चेहरा कसानुसा झाला, हात रूमालांसकट नाकावर गेले. तेव्हा माझी लेक म्हणते, 'बाबा, आपण चुकीच्या बायकांबरोबर इकडे आलोय'
मस्त फोटो!! हर्णे
मस्त फोटो!!
हर्णे आंब्यांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचेही फोटो टाका.
बाकी,
क्र. २६: सुकी सुरमई
क्र. २१-२२: पाकट्या
क्र. २३: सुक्या पाकट्या
केवळ अफाट !! बाबा, आपण
केवळ अफाट !!
बाबा, आपण चुकीच्या बायकांबरोबर इकडे आलोय
मस्त फोटो.. पण जिप्स्या एक
मस्त फोटो..
पण जिप्स्या एक शंका आहे रे.. हर्णे, दापोली की फत्तेदुर्ग किल्ला जे काय असेल ते, तिथल्या लोकांनी जर हे फोटो पाहिले तर त्यांना ओळखता येईल ना की हा आपलाच गाव आहे जो आपण रोज पाहतोय? की फोटो पाहुन तेही खुळावतील की एवढे सुंदर गाव कुठे आहे, आम्हालाही घेऊन चला तिथे म्हणुन...
तेव्हा माझी लेक म्हणते, 'बाबा, आपण चुकीच्या बायकांबरोबर इकडे आलोय'
म्हणजे तुम्ही दोघी नसता तर ते दोघे उतरले असते नक्कीच गाडीतुन..
जिप्सी.... एक किरकोळ शंका....
जिप्सी....
एक किरकोळ शंका.... "लॉबस्टर" पाहिला....दादाच दिसतोय माशांचा....पण स्थानिक भाषेत त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ? काहीतरी नाव वेगळेच ऐकल्याचे अंधुकसे आठवते.
जिप्सी तुमच्या फोटोज ना शब्दच
जिप्सी तुमच्या फोटोज ना शब्दच नाहीत दाद द्यायला .............. अतिशय नयनरम्य गाव ,अप्रतिम क्लिक ,,,,,,,, जिभेवर पाणी आणणारे मास्यांचे फोटोज ,,,, आणकी एक गोष्ट म्हणजे , अमी मित्र मित्र जेव्हा काशीद बीच ला ट्रीप साठी गेलो होतो त्यावेळी अमी पण हरणे च्या बंदरावर मासे खरेदीला गेलो होतो .........
अतिशय फ्रेश आणि वाजवी दरात मासे मिळाले होते आमाला.
Pages