सांजवेळ
हा शब्द अनुभवण्यासाठी मुंबईत आपल्याला तशी जागा आणि तशी वेळ मिळेलच, याची,खात्री आता उरलेली नाही. तरीपण काही हौशी मुंबईकर या धकाधकीच्या जीवनातून थोडावेळ हुडकून काढतात. मग भले ती जागा एखाद्या बीचवरील असेना किंवा एखाद्या सो कॉल्ड रिसॉर्ट ला जाऊन व्यथित केलेली का असेना.... ते आपापला आनंद शोधतात.
मी सुद्धा त्यापैकीच एक. फरक फक्त एवढाच की आम्ही आमचा आनंद आमच्या माहेरी म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत शोधतो. त्यात सगळ्या ट्रेकर्सचं माहेर असलेला "हरीश्चंद्रगड" म्हणजे पर्वणीच.
आता हरिश्चंद्रगड कुठे आला, तिथे कसं जायचं, हे सांगत बसत नाही, कारण ते सर्वशृत आहे.
गेला शनिवार - रविवार मी माझा आनंद तिथेच शोधला.
मस्त संध्याकाळ होत आली होती. सुर्य, जाताजाता आकाशाच्या त्याच्या कॅनव्हासवर मुक्तहस्ते रंगांची उधळण करत होता. ऑफिसमधला एसी झक मारेल, असा बोचरा वारा सुटला होता. मोबाईलवर मंद आवाजात गाणं सुरू होतं, मित्रांची संगत होती आणि सोबतीला होता एक कप चहा.... !!
अहो, अजून काय हवं आपल्याला? आपला स्ट्रेस घालविण्यासाठी..!!
सुंदर !!!
सुंदर !!!
मस्तय! पण बोचरा वारा आनंददायी
मस्तय!
पण बोचरा वारा आनंददायी नसतो की रे
क्लासिक!
क्लासिक!
सुंदर ................ खुप
सुंदर ................ खुप रंग आले आहेत आकाशात...
अप्रतिम !
अप्रतिम !
नाही रीया. कड्यावर एकदा जाऊन
नाही रीया. कड्यावर एकदा जाऊन बघंच. बोचरा वारा सुखद कसा भासतो, याचा अनुभव येइल...
आकाशात सान्जवेळच्या निळ्या,
आकाशात सान्जवेळच्या निळ्या, जाम्भळ्या आणी गुलाबी छ्टा काय सुरेख उतरल्यात.:स्मित: मस्त!