सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स डेच्या निमित्ताने लिहीत आहे. तुम्हा सर्वांना सांगावे असं वाटले. मदर्स डेच काय मला तर आयुष्यभराची गिफ्ट मिळाली!!
शीर्षकात लिहील्याप्रमाणे हो! he 'said' I Love you! हा ही म्हणजे अर्थातच माझा मुलगा. माझा, ऑटीझम असलेला, अजुन एकही शब्द न उच्चारणारा कसा काय म्हणाला आय लव्ह यू?
झाले असे.. बरेच दिवसांपासून हेरून ठेवलेले aacorn AAC हे अॅप मी शेवटी विकत घेतलेच. हे होते तब्बल ८०$चे.. तशी मी फुकट रोजच काहीतरी डाउनलोड करत असते. बर्याच अॅप्सकडे मुलगा ढुंकूनही पाहात नाही. हेच त्याने ह्याही अॅपबरोबर केले असते तर फारच महागात पडले असते. खूप विचार करता शेवटी आपल्या मुलाला होईल उपयोग ह्याचा असा मनाने कौल दिला व घेतले.
थोडी माहिती : aacorn हे एकप्रकारचे AAC अॅप आहे. AAC augmentative assistive communication. ज्यांना बोलता येत नाही / ऐकू येत नाही / इतर लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत - ज्यात ऑटीझम पण येतो, अशा मुलांना कम्युनिकेट करण्यासाठीची ही एक पद्धत. पूर्वीच्या लेखांमध्ये लिहीलेली पेक्स(पिक्चर एक्स्चेंज कम्युनिकेशन सिस्टीम)चेच हे थोडे प्रगत रूप. ह्यात जनरली ग्रुपनुसार शब्दांचे चौकोन असतात, ते दाबून वाक्यं तयार करायची व ते मशिन/ अॅप तुमचे वाक्य वाचून दाखवते. थोडक्यात तुमच्या मुलाचा आवाज! (आवाज नावाचेही एक अॅप आहेच! )
ऑटीझम जगतात http://www.assistiveware.com/product/proloquo2go प्रोलोकोटूगो हे अॅप फारच प्रसिद्ध आहे. परंतू एकतर ते महाग आहे ( जवळजवळ २५०$) व तिथली ती ग्रीड सिस्टीम काही मला आवडत नव्हती. शेवटी हे एकॉर्न पसंत पडले कारण त्यात ग्रीड व्ह्यू नसून ट्री व्ह्यू आहे. तुम्ही जसेजसे अॅप वापरत जाल तसे ते अॅप प्रेडीक्टही करू लागते. एकंदरीत उपयोगी पडेल असे वाटले.
व उपयोग झालाच. विकत घेतल्याच्या दुसर्याच दिवशी, मुलगा शाळेतून आला व आयपॅड मागू लागला. (पेक्सचे आयपॅडचे चित्र देऊन. ) मी त्याला दिला नाही. व हे अॅप इन्ट्रोड्युस केले. आय वाँट आयपॅड हे वाक्य कसे तयार करायचे शिकवले. व त्याने लगेचच तसे करून दाखवले. मग त्याला अर्थातच आयपॅड दिला मी. पण या नवीन संवादाच्या माध्यमामुळे मुलगा खुष झाला. क्युरिअस झाला. व एके दिवशी त्याने उगीचच ते अॅप चाळत असताना आय लव्ह यू हे वाक्य तयार केले.
खूष होऊन माझ्याकडे आयपॅड घेऊन आला व तेच सेम वाक्य ५-७ वेळेस तरी मला ऐकवले! आईकडून रोज सत्रांदा तरी ऐकलेले वाक्य परत आईला ऐकवू शकलो याचा त्याला इतका आनंद झाला !! त्याने तोंडातून ते शब्द नाही उच्चारले तरी एकाअर्थाने he 'said' I Love You !
मला तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी आठवण मिळाली!! ती तुमच्याशी शेअर केल्यावाचून कशी राहीन मी!?
Have a Happy Mother's Day !!
Aww we love you too mother
Aww we love you too mother warrior.. God bless
That's a wonderful news..see
That's a wonderful news..see he is hearing you.. congratulations and happy mothers day
That's an awesome news!!
That's an awesome news!! Happy for you
वॉव!!! आता वाचते!
वॉव!!! आता वाचते!
अरे वा किती मस्त वाटले
अरे वा किती मस्त वाटले असेल...छान!
Happy Mother's Day !!
Happy Mother's Day !!
खूप छान वाटलं वाचून. तुमच्या
खूप छान वाटलं वाचून. तुमच्या आयुष्यात असे आणि याहून चांगले आनंदाचे क्षण वारंवार येवोत हीच शुभेच्छा!
मला वाचतानाच फार छान
मला वाचतानाच फार छान वाटलं.
तुम्हाला अनुभवताना काय वाटलं असेल समजू शकते.
तुम्हा दोघांनाही शुभेच्छा!
he 'said' I Love You ! >>>>>
he 'said' I Love You ! >>>>> अभिनंदन!
खरंच,खूप मस्त वाटलं.
अभिनंदन! तुम्हां दोघांनाही
अभिनंदन! तुम्हां दोघांनाही शुभेच्छा
आहा, किती छान ग याचा अर्थ तू
आहा, किती छान ग
याचा अर्थ तू बोललेलं तो एेकतोय, मनात साठवतोय आणि आता व्यक्तही करतोय, ग्रेट ग. तुला आणि तुझ्या सोनुला घट्ट मिठी ग
तुझ्या अथक प्रयत्नांना आणि प्रचंड मोठ्या सकारात्मक विचार आणि कृतीला एक कडक सलाम ___/
तंत्रज्ञानाची ही बाजु मला खूप सुखाऊन जाते.
अरे वा.. मस्त.. तुम्हाला आणि
अरे वा.. मस्त.. तुम्हाला आणि लेकाला खूप खूप शुभेच्छा.!!
खूप छान लिहीले आहे! Happy
खूप छान लिहीले आहे!
Happy Mother's Day!
आहा! दोघांनाही शुभेच्छा!
आहा! दोघांनाही शुभेच्छा!
फा +१ हॅपी मदर्स डे!
फा +१
हॅपी मदर्स डे!
आईग्गं! किती आनंद झालाय मलाच
आईग्गं! किती आनंद झालाय मलाच हे वाचून. संवाद वाढतच जाऊ दे.
गॉड ब्लेस यु बोथ!
Khup chaan liheela
Khup chaan liheela aahe!
Happy mother's day!
वॉव! अभिनंदन... A lifetime
वॉव! अभिनंदन... A lifetime memory for you!
ऑस्सम! किती मस्त! best
ऑस्सम! किती मस्त! best mother's day ever!
so sweet of him. A big hug to
so sweet of him.
A big hug to you.
Happy mother's day
Happy Mother's day!
Happy Mother's day!
अरे वा मस्तच मदर्स डेच्या
अरे वा मस्तच मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा.
हाऊ स्वीट! हॅपी मदर्स डे!
हाऊ स्वीट!
हॅपी मदर्स डे!
वरच्या सगळ्या प्रतिसादांना +
वरच्या सगळ्या प्रतिसादांना + ११११११११११११
वा! खूप छान लिहिल आहे आणि हय
वा! खूप छान लिहिल आहे आणि हय आनंदामधे आम्हालाही सामिल केल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप आनंद झाला. ग्रेट!!!
अरे वा सुपर्ब ........
अरे वा सुपर्ब ........
अभिनंदन
ग्रेट! Happy Mother's day. We
ग्रेट! Happy Mother's day. We love you both.
वाचतानाच मलाच इतकं छान वाटलय
वाचतानाच मलाच इतकं छान वाटलय म्हणून सांगू...
लढाऊ माते... तुला अभिनंदनाप्रित्यथं एक गच्चम मिठी...
आणि तुझ्या बच्चूचं अपार कौतुक
Just great.. We all love you
Just great.. We all love you !
आयशप्पत लई भारी! आईची खरंच
आयशप्पत लई भारी!
आईची खरंच शपथ. लईच भारी.
योध्ये आई, तुझी शपथ. जाम म्हणजे जामच भारी.
आ.न.,
-गा.पै.
Pages