मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जय कायमच ग्लिसरीन घालुन असतो का डोळ्यात? जेव्हा पहावे तेव्हा चेहेर्‍यावर धोधो रडुन आल्याचे भाव, सुजलेला चेहेरा. आणी अदिती ओढुन ताणुन चेहेर्‍यावर हास्य आणीत असते.

तेराव्याचं सांगता येणार नाही पण दुराव्यात मात्र टिकवून ठेवलं आहे, केतकर काका व आण्णा हे प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरून. Proud

ते भेळ का पापू खायला जमले नाही तर एवढे काय Uhoh Week days मधे किती जोडप्यांना अशी एकत्र भेळ खाता येते?

असले प्लॅन रवीवारी करा ना. ते सोडून Week days ला प्लॅन करायचे आणि मग रडत बसायचे Angry

जयच्या डोळ्यातुन घळाघळा अश्रु टपकायला लागले तेव्हा मी निस्तब्ध झाले. इतक प्रेम कुणी करत का आपल्या बायकोवर या दिवसात? काय ते विरारला जाण, अन्धेरीला पापु, भेळ खाण, रजनीला ठसका लागुन जयचे कासावीस होण..

रामकृष्णहरी! देवा, पान्डुरन्गा, हेच दिवस बघायचे बाकी होते रे!

वीकेन्डला त्यांना विरारच्या घराची कामं असतात Proud आणि सतत हसतमुख दिसणं, सहनशील असणं, भूक मारूनही टवटवीत दिसणं यासाठी स्पेशल ग्रूमिंगही करत असतीलच ना. ते सगळं वीकान्तातच घडत असावं! हू नोज!

या सिरियलमध्ये अनेक गोष्टी खटकणासारख्या आहेत, त्यातलीच अजून एक. जय-अदितीला काही पोटभर खाऊ देत नाहीत. हॉटेलमध्ये गेले की कोणतरी येतं, की हे उठले, कॉफी प्यायला गेले की कोणतरी येतं, की हे उठले, भेळेचा प्लॅन करावा की काहीतरी होतं की हे उपाशी, एकेकटे तर ते हॉटेलमध्ये जाऊनही जेवत नाहीत, काकू डबा देतात तो इतका चपटा असतो की त्यात जेमतेम एखादी पोळी मावत असेल. मेले डबेही घसघशीत दाखवत नाहीत! रिकामेच तर असतात ना! एकूणात जय-अदिती कायम उपाशीच. काही सिरियल्समध्ये नवरा-बायकोचं 'मीलन' काही ना काही कारणाने कायम लांबत असतं. तसं या सिरियलमध्ये जय-अदितीचं पोटभरून खाणं कायम लांबणीवर पडत असतं!

Lol तरी दोघांना पैसे पुरत नाहीत! पोटाला चिमटा काढून जगायचे दिवस आहेत गं त्यांचे.
आदितीचे बाबा एवढे श्रीमंत असतील, ती एकुलती एक मुलगी त्यांच्या लाडाकोडात वाढलेली असेल तर तिचं हे आदर्श वागणं फारच खोटं वाटतं. मला सारखं धडकन सिनेमाचा पार्ट टू बघतोय असं वाटतं, म्हणजे शिल्पाचं लग्न सुनील शेट्टी बरोबर झालं असतं तर काय झालं असतं ती स्टोरी. त्यापेक्षा अक्षयच बरा ना! आई वडील नेहमी आपलं भलंच चिंततात. प्रेक्षकांचंही. Proud
रजनी जुईला उचकवत होती ते तर फारच बोर. कोण मुलगी अशी सगळ्यांदेखत रडवेली होईल? आणि मीटींग म्हणजे काय लग्न आहे का की जंगल सफारी? सगळ्यांनी अगदी गुंग होऊन चित्तरकथा ऐकायला? मीटींग सक्सेसफुल झाली म्हणजे काय लाखोंचं डील आणलं काय ह्यांनी?

अदितीचे वडिल इतका मोठा बिझनेस सांभाळतात आणि मुलिच्या संसारात इतकं अनप्रोफेशनली लक्ष घालतात? Uhoh ते पण बाहेरून काही नाही. आता अनायसे देव च्या हापिसात काम करतात, आयते जाळ्यात पकडले गेलेत म्हणून हात धून घेतायत. आधी कुठं होते म्हणायचे? चाळित राहण्याचे धा बारा एपिसोड झाले की तेव्हा दाभोळकर कुठं दडून बसलेले ? Uhoh

अगं पौर्णिमा, नाही मी पोस्ट सेव्ह केली आणि आयकॅप एरर का कायशी आली. म्हणून मी रिफ्रेश केलं पेज. तरि ती एरर जाईना. फायनली जेव्हा हे पान आलं तेव्हा एकच पोस्ट ३-४ वेळा दिसली. Uhoh बहुतेक जितक्या वेळा रिफ्रेश केलं तितक्या वेळा इथं पोस्ट झालं ते.

आयकॅप एरर >>> बरोबर आहे. ही मालिका बघताना आयकॅप घाला असं सुचवतेय ती एरर. मी म्हणेन झी मराठीवरच कॅप घाला.

एक बाई दुसर्‍या बाईला , आपल्या नवर्‍याचं तिसर्‍या बाईबरोबर लफडं नसेल असं सांगते. पण तुम्ही दोघी मूर्ख आहात असं सांगत नाही..

एक बाई दुसर्‍या बाईला , आपल्या नवर्‍याचं तिसर्‍या बाईबरोबर लफडं नसेल असं सांगते. पण तुम्ही दोघी मूर्ख आहात असं सांगत नाही..>>>>>>:हाहा: येईच मेरे डोकेमे आया था कल.:फिदी: कालचा भाग फारच हास्यास्पद होता.
रजनी, जयने कसे तिला आईस्क्रीम भरवले, रीक्षातुन जाताना कसा हात धरला असे सगळे रन्गवुन सान्गत होती आणी बथ्थड जुई मोठमोठ्याने स्फुन्दुन रडत होती. तान्गडेने मस्त खेचली तिची. वरतुन आदिती बाई तिची समजूत काढत होत्या. देवा! कदम काकानी मस्त काम केले.

आशुडी अगदी अगदी काय बोअर चाललाय . दोन्ही नवरा बायको मधला एखादा नोकरी का सोडत नाही. मग मालिका कशी चालेल ? Happy

तो बथ्थड जय त्या दोन्ही बायाना, ' मला तुमच्यात अजिबात इन्टरेस्ट नाही,' असं म्हणाला तरी अर्धे पेचप्रसंग कमी होतील.. .. त्या दोघी तर तो आपला 'नवरा' असल्यासारखं वागताहेत...

ती जुई कोण आहे कलाकार..... मस्त आहे. पेशवाईच्या एखाद्या सिरियलमध्ये तश्या पेहरावात घरंदाज दिसेल एकदम....

पेशवाईच्या एखाद्या सिरियलमध्ये तश्या पेहरावात घरंदाज दिसेल एकदम....>>
म्हणजे इकडुन तिकडुन बोलायला मोकळी. Proud

पेशवाईच्या एखाद्या सिरियलमध्ये तश्या पेहरावात घरंदाज दिसेल एकदम>> का रे भुंग्या... ती (जीन्सवर (अँकललेंथवर पण)) चंद्रकोर लावते म्हणून म्हणतोस का असं? Proud

तिचा वर्ण आणि त्वचा खरंच खूप सुंदर आहे.

रजनी आवडतेच आणि शनिवारच्या भागातही मस्त दाखवली. ती बरीच लॉजिकल वाटते. बिचारीला उगीचच ग्रे शेड दिली आहे.

ह्या माठ आणि माठीणीने त्यांचे लग्न लपवले ह्याची बिचार्या रजनीला काय कल्पना.

तिला जय आवडतो हीच तिची चूक

Pages