विवाहाच्या निमित्ताने हा धागा वाचला आणि मग असाच एक अनुभव जो माझ्या चुलत भावाच्या लग्नाच्या वेळ चा इथे शेर करतो आहे . अश्या लग्नाला आमच्याकडे यादी पे शादी / झट मंगनी पट बिहा . असेही म्हणतात .
इतकी मोठी प्रतिक्रिया देण्या पेक्ष्या सरळ धागाच काढला.
तर घडले असे कि , एक दूरच्या नातेवाईकांनी , भावासाठी स्थळ काढले होते , आणि सोमवार चा चांगला दिवस बघून भाऊ आणि काका असे ४ ते ५ लोक मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमा साठी सकाळी १०.३० च्या दरम्यान मुलीच्या घरी गेले . (मी पुण्यात ऑफिस मध्ये होतो , मला फक्त फोन केला होता कि मुलगी पाहण्याचा कार्यक्रमाला चाललो आहे )
सुरवात नेहमी प्रमाणे चहा बिस्कीट आणि पोहे ने झाली , मुलगी पाहिली , बेसिक गोष्टींची चौकशी झाली , आणि बंधू राजांना मुलगी पसंद पडली , मध्यास्तानी दोन्ही परिवाराची बाजू ऐकून घेतली आणि दोन्ही बाजूनी समंती आहे तर मग किमान बोलणी करूनच जाऊ असा सल्ला माझ्या काकांना दिला आणि बघता बघता , दुपारी १२.३० च्या दरम्यान देवाण घेवाण , लग्नाचा खर्च , कपडे लत्ता या सर्व विषयावर एक मध्य निकष काढला आणि लागलीच याद्या लिहिल्या गेल्या , सुपारी फुटली , आणि साखरपुडा हि झाला (या वेळी भावाने फोन केला साखर पुडा उरकून टाकला आहे आणि लग्न कदाचित याच आठवड्यात ठरवतील तर तू सुट्टी काढून ठेव , तुला तारीख सांगेनच ,,, बाय बाय .)
साखर पुड्याची तयारी झाली , जवळच कोल्हापूर असल्याने लगेच कपडे , सोने , या गोष्टी खरेदी झाल्या , शिरा आणि भाताचे जेवण विथ शेक आमटी असा जेवणातला मेनू ठरला आणि दुपारी २ वाजेपर्यंत साखरपुडा पार पडला .
अगदी ३ वाजेपर्यंत जेवण वगेरे झाले आणि त्याच वेळी तितल्या एक दोन जुन्या वयस्कर लोकांनी काकांना सल्ला दिला कि , आता कशाला बाशिंग तानातोय पांडबा , जाऊदे दे आजचा लगीन लाऊन , नंतर तुझ्या घरी पूजा वगेरे करून बोलाव समद्यास्नी मग .
झाल ,,,,,,,,,,,, एवड्या एक दोन लोकांच्या मतावर अचानक या विषयावर चर्चा सत्र सुरु झाल , मुलीकाडल्या लोकांनी याला विरोध हि केला कारण काय तर संसार सट, बाकी मुलीची खरेदी , देवाण घेवानातील सोने नाणे , हे कशी काय लगेच जमणार , तर त्यावर हि तोडगा त्याच दोन वयस्कर आजोबांनी लावला , द्यायचं घ्यायचं काय द्या दोन तीन दिवसात घेऊन , अमी कुठ लगेच द्या म्हनतुय . आजच यादी पे शादी लाऊन देऊ , म्हजी तुमाला पण तरास नाही आणि आमाला पण .
झाल मग आणि ठरलं मग , आणि लगेच , लगीन लाऊन दिल मग , अश्या पद्धतीच एक वाक्य तयार झाले , भटजी तर आलेलेच होता त्याच्या कडून लग्नाचा काढीव (आपल्या सोयीनुसार काढलेला ) मुहूर्त ठरला आणि संध्याकाळी ५.३७ मिनिटांनी , अक्षदा पडल्या पण . अतिशय अचानक पणे भाऊ राजे लग्नाच्या बेडीत अडकले आणि सायकली ६.१० च्या दरम्यान मला फोन मारला , झालेली हकीकत सांगितली , आणि पुढे पुजेची तारिक सांगून गावी येण्याचे आमंत्रण दिले )
माझ्या सख्या चुलत भावाच्या लग्नाचा अनुभव
अशी एकदारीत यादी पे शादी ची पद्धत जी वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचण्यासाठी वापरली जाते .
बापरे! भयंकर!
बापरे! भयंकर!
मुली चे आई वडिल अस कस करू
मुली चे आई वडिल अस कस करू शकतात..
सहि आहे आमच्या कदे पन असे
सहि आहे आमच्या कदे पन असे करतात
अशी पद्धत थोडी त्रास दायी आहे
अशी पद्धत थोडी त्रास दायी आहे पण वेळ आणि पैसा यांचा अपव्यय अजिबात होत नाही .
होतात अशी काही लग्नं. त्यात
होतात अशी काही लग्नं.
त्यात बरेच फॅक्तर आहेत.
वरच्या लेखातील सोडुन अजुन एक आहे तो म्हणजे लग्न जमलं आणि पुढची प्रोसेस जसे की सापु तारीख फिक्स करणे वै. त्याच्या आधीच कोणातरी आकसाने कागाळी करणे. ( गावाकडे असे प्रकार पाहिलेत. राजकारण, जमिनीचे वादविवाद, एकमेकावर धरलेला डुख ह्यातुन असा बदला घेण्याचा प्रयत्न केला जातो. )
हे असे अनुभव दोन्हीतील एखाद्या पक्षाला आले असतील तर ते ही असा आग्रह करतात.
फसवनुक होन्यचि शक्यता नाकर्ता
फसवनुक होन्यचि शक्यता नाकर्ता येत नहि
झकासराव पूर्ण पाने सहमत , हे
झकासराव पूर्ण पाने सहमत , हे कारण तर बरेचदा असते .
फसवनुक होन्यचि शक्यता नाकर्ता
फसवनुक होन्यचि शक्यता नाकर्ता येत नहि>>>>>>>>>फसवणूक करणारे ,,, तर कशी पण फसवणूक करू शकतात थांबून लग्न केलेत तरी किंवा लगेच केले तरी .
आणि हो मुलगी बघायला जातानाच
आणि हो मुलगी बघायला जातानाच सापुची तयारी करुन जातात काही जण.
सगळं पटल की तिथेच सापु. हे ही पाहिलय.
फसवनुक होन्यचि शक्यता नाकर्ता
फसवनुक होन्यचि शक्यता नाकर्ता येत नहि>> जनरली स्थळ कोणाकडुन सुचवल गेलय तो व्यक्ती विश्वासु आहे का? त्याच्यासोबतचे संबंध कसे आहेत? हे पाहिले जाते. जेणकरुन दिलेल्या माहितीवर किती विश्वास ठेवायचा ह्याचा अंदाज असतोच.
एकाच तालुक्यात लग्न जमवण्याचे जास्त प्रयत्न असतात, दोन गावात अगदीच शे दिडशे किमी अंतर नसते.
त्यामुळे बाकी अंदाज लावण्याचा प्रयत्न होतोच. जवळपासच्या गावातुन पाहुणेमन्डळी अथवा मित्रमन्डळी निघतातच. त्यातुन माहिती मिळवली जाते. हल्ल्ली मोबाइलने अजुन सोप्पे झाले आहे.
ज्या व्यक्ती कडून स्थळ सुचवले
ज्या व्यक्ती कडून स्थळ सुचवले गेले आहे तो व्यक्ती दोनी कुटुंबाच्या चांगल्या परिचयाचा असतो आणि त्याच्या शब्दावर पुढे लग्नाच्या वाटाघाटी( देवाण घेवाण ) पण थावल्या जातात .
हा एक मस्त प्रकार आहे लग्न
हा एक मस्त प्रकार आहे लग्न लावण्याचा.. बराच खर्च वाचतो.. बर्याचदा खुपश्या ओळखीतल्या किंवा मध्यस्थ दोन्ही घरचा खुपच खास असला की हा प्रकार होउ शकतो.. कधी कधी लग्न आधी ठरलेलं असतं, मग सुपारी फोडायला गेल्यावर किंवा सापु करायला गेल्यावर असं जाणवतं की दोन्हीकडचे अगदी जवळचे सर्वच आलेलेच आहेत आणि लग्न लावायला फक्त मंसु अन सप्तपदीची कमतरता आहे तर त्याचीही लगेच तयारी करुन लग्न लावतात..
हा एक मस्त प्रकार आहे लग्न
हा एक मस्त प्रकार आहे लग्न लावण्याचा<<<<<<<<<<पण हा प्रकार फक्त कोल्हापूर आणि त्याबाजुच्या काही भागातच चालतो , मोठ्या शहरामध्ये अशी लग्न होतच नाहीत .
पण हा प्रकार फक्त कोल्हापूर
पण हा प्रकार फक्त कोल्हापूर आणि त्याबाजुच्या काही भागातच चालतो , मोठ्या शहरामध्ये अशी लग्न होतच नाहीत .>>>>> बारामती भागातही हा प्रकार बघितला आहे.. शहरात जरी राहत असले तरी बर्याचदा मुळ गावाला लग्नकार्यात जास्त महत्व असलेलंही बघितलं आहे. जे वयस्कर लोक टाका लग्न उरकुन हा सल्ला देतात ते मात्र बर्याचदा गावाकडलेच असतात..
जे वयस्कर लोक टाका लग्न उरकुन
जे वयस्कर लोक टाका लग्न उरकुन हा सल्ला देतात ते मात्र बर्याचदा गावाकडलेच असतात..>>>>>> सहमत १००+
मुलगा मुलगी एकमेकांशी बोलतही
मुलगा मुलगी एकमेकांशी बोलतही नाहीत्..आश्चर्य आहे.
इतकी काय घाई घरच्यांना लग्न लावून द्यायची. खर्च वाचवायचा असेल तर रजिस्टर्ड लग्न करा.
१२ तारखेला मित्राच्या सापु
१२ तारखेला मित्राच्या सापु साठी गेलो अन लग्नच लावुन आलो.
माझ्यासाठी मुलगी पाहायलो गेलो होतो अन दोन्हीकडुन पसंती आली अन तिथेच सुपारी फोडायच ठरलं.
त्याच्या आधीच कोणातरी आकसाने कागाळी करणे. ( गावाकडे असे प्रकार पाहिलेत. राजकारण, जमिनीचे वादविवाद, एकमेकावर धरलेला डुख ह्यातुन असा बदला घेण्याचा प्रयत्न केला जातो. )
हे असे अनुभव दोन्हीतील एखाद्या पक्षाला आले असतील तर ते ही असा आग्रह करतात.
>>>>>>>> अगदी सहमत. आमच्या गावी असं लग्न मोडणारी १-२ जुनी खोड आहेत.
मी अमि +१
मी अमि +१
मुलगा मुलगी एकमेकांशी बोलतही
मुलगा मुलगी एकमेकांशी बोलतही नाहीत्..आश्चर्य आहे.>>>>>> बोलत नाहीत असे काही नाही , जसे अरेंज म्यारेज असते सेम तसेच लग्न होते . मुलगा मुलगी दोघेही एकमेकांना पसंद करतात , थोडीशी विचारपूस हि होती आणि मग लग्न केले जाते .फक्त सेम दिवशीच सगळा कार्यक्रम उरकला जातो .
मुलगा मुलगी एकमेकांशी बोलतही
मुलगा मुलगी एकमेकांशी बोलतही नाहीत्..आश्चर्य आहे.>> अमि अशा प्रकारे अरेन्ज लग्न होताना असही मुला मुलींना फार वेळ बोलायला वै मिळत नाहीच. पाहण्याच्या कार्यक्रमात जे बोलणे होइल ते तितकेच. अगदीच विचाराने पुढारलेले (?) असतील तर मलगा आणि मुलीला वेगळ्या रुम मध्ये दहा पन्धरा मिनिटे बोलायला परवानगी देतात. इथे जे सांगतोय ते छोट्या गावातील गोष्टी आहेत. त्याच समर्थन करतोय असही नाही.
पण हा एक वेगळा सॅम्पल साइज आहे. इतकच सुचवायच आहे.