सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.
एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.
अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया
भावना इथे म्हणजे कुठे
भावना इथे म्हणजे कुठे मागवल्या होत्या वस्तू?
तिथे.
तिथे.
इब्लिस कठिण आहे तुमचं.
इब्लिस
कठिण आहे तुमचं.
बहुतेक युके मध्ये
बहुतेक युके मध्ये
मी ऑर्डर् केलेली पर्स काल
मी ऑर्डर् केलेली पर्स काल मिळाली..काहीही पोस्टेज द्यावे लागले नाही.१० दिवस लागले सिंगापुरंमधे मिळायला
माझा १ महिना पूर्ण झाला
माझा १ महिना पूर्ण झाला ऑर्डरचा काल.
३९ दिवसाची लिमिट दिलेली आहे. अजून माझा दिवा आलेला नाही. काय करायचे असते आता?
मी हे ऑर्डर केलय काल. बघू कधी
मी हे ऑर्डर केलय काल. बघू कधी येते आणि क्वालिटी कशी असेल ते?
http://www.aliexpress.com/snapshot/6631030512.html?orderId=66976682961659
भारतीय पोस्ट खात्याचे नियम
भारतीय पोस्ट खात्याचे नियम आपल्याला कुठे माहित आहेत?>>>>>>>
अहो दक्षिणा ताई - भारतीय पोस्ट खाते आधी पैसे भरले तरच वस्तू स्वीकारते. तुम्ही कुठलेही पार्सल काय साधे पाकीट सुद्धा तिकीट न लावता किंवा पैसे न भरता पोस्टाला देवुन बघा. ते घेणार नाहीत.
तुम्ही जशी पर्सची ऑर्डर कँसल केली तशी बर्याच लोकांनी केली असेल म्हणुन मी हे मुद्दाम लिहीले.
मला एक सांगा अलि एक्सप्रेसला
मला एक सांगा अलि एक्सप्रेसला पेमेंट केल्यावर तुमच्या खात्यातुन कन्वर्जन मार्कप फी वर त्यावर सर्विसटॅक्स गेलाय का??
FCY CONVERSION MARKUP FEE 21.69 Dr
25/04/2015 SERVICE TAX - MARKUP FEE 2.60 Dr
25/04/2015 EDU CESS - MARKUP FEE 0.07 Dr
24/04/2015 04/24/15 9.73 USD 0.00
24/04/2015 WWW.ALIEXPRESS.COM LONDON 619.67 Dr
शुभांगी, हो!
शुभांगी, हो!
ओके. धन्स. माझ्या वस्तू अजुन
ओके. धन्स.
माझ्या वस्तू अजुन आल्या नाहीत. त्यामुळे जादा पोस्टेजचे काही माहित नाही.
हेलो दक्षिणा.. तुला गॉगल साठी
हेलो दक्षिणा.. तुला गॉगल साठी पोस्टेज द्यावे लागले मला वाटत पोस्टमन ने काहीतरी चालुगीरी केली. मी 11 वस्तू मागवल्या होत्या अली वरुन त्यातील एक वस्तू सपलाइयर ला देणे शक्या नवते त्याने पैसे परत केले. बाकीच्या वस्तू मी मागवल्या त्या अश्या होत्या.
1. पर्स- प्राइस 11 युरो ..क्वालिटी किमतीच्या मानाने सोसो.. फार टिकेल असे वाटत नाही.
2. T शर्ट सेट- 3 t-शर्ट्स आहेत क्वालिटी छान आहे..आणि जसे फोटो मधे होते तसेच आहेत.
3.नेकलेस- 3 एक नेकलेस मागवले..क्वालिटी आणि किमत दोन्ही ठीक.
4. इयररिंग्स- सेम पैसे खुपच कमी होते . क्वालिटी छान.
5.शूस- क्वालिटी बरी आहे त्यामाने पैसे जास्त घेतले असे वाटते. स्पोर्ट्स शूस आहेत. EU साइज़ दिली होती ..एकदूम पर्फेक्ट zali ..मला भीती होती की होणार नाहीत शूस
[मला वरील पैकी कशा साठीच पोस्टेज द्यावे लागले नाही..]
सर्व च्या सर्व वस्तू हातात
सर्व च्या सर्व वस्तू हातात यायला महिना लागला. पैशंस ठेवणे म्हणजे काय ते कळते
अरे त्या दक्षीला आता कुठून
अरे त्या दक्षीला आता कुठून सांगितले त्या एक्स्ट्राच्या पैशाचे असे झाले असेल.
किती तो सोस दक्षी फसली हे सिद्ध करायचा...
अरे त्या दक्षीला आता कुठून
अरे त्या दक्षीला आता कुठून सांगितले त्या एक्स्ट्राच्या पैशाचे असे झाले असेल.>>>>>>>
ब्रँड अँबेसीटर होणे काही सोप्पी गोष्ट नाहीये. कुठलीच ब्रँडला हर्ट करेल अशी माहीती चुकुन सुद्धा येता कामा नाही तोंडुन.
ब्रँड अँबेसीटर... बर.
ब्रँड अँबेसीटर... बर.
टोचा, ती मायबोलीकरांचं
टोचा, ती मायबोलीकरांचं ब्रँडिंग करतेय, अलिचं नाही
माझ्या वस्तु यु.के मधे
माझ्या वस्तु यु.के मधे मागवल्या होत्या. फ्री पोस्टेज असेल तर जास्त पैसे द्यायला लागु नयेत.
<<ब्रँड अँबेसीटर... बर.>>
<<ब्रँड अँबेसीटर... बर.>>

दुसर्या धाग्यावर हलविले आहे.
दुसर्या धाग्यावर हलविले आहे.
अरे, गल्ली चुकली काय? ऑनलाईन
अरे, गल्ली चुकली काय?
ऑनलाईन शॉपिंग च्या धाग्यावर द्यायचे होते.
मी ऑर्डर केलेले कानातले ५ मे
मी ऑर्डर केलेले कानातले ५ मे ला भारतात पोचले असं दाखवत आहे, त्यापुढे किती दिवस लागतातं ? कोणाला काही आयडीया ? भारतात पोचलं की ट्रॅक करता येत नाही असं सेलरचं म्हणणं आहे.
हो प्राजक्ता... भारतात
हो प्राजक्ता... भारतात पोचल्यापासून १ दिवस ते ३० दिवस लागू शकतात.
पहिल्या लॉटमधलं शेवटचं पार्सल मला काल मिळालं. २६ की २८ मार्चला ऑर्डर दिली होती. जे सगळ्यात पहिलं शिप झालं होतं ते सगळ्यात शेवटी मला मिळालं
३ पैकी २ वस्तु आल्या. क्रॉस
३ पैकी २ वस्तु आल्या. क्रॉस बॉडी बॅग फोटोत दाखवल्याप्रमाणेच सुंदर आणी छान आहे.
माझा सायकल साठीचा लाईट आलाच
माझा सायकल साठीचा लाईट आलाच नाही.
त्यांनी डिस्प्युट उघडल्यावर बायर प्रोटेक्शन ३० दिवस वाढवून डिस्प्यूट क्लोज केली. अन नंतर मला पैसे परत केलेत असा ट्रँजॅक्शन मेसेज. बँकेचे ट्रँजॅक्शन तपासले नाहीत, पण आले असतील. ७० की ७२ रुपयांचा रिफंड होता
दरम्यानच्या काळात मला इथेच डीमार्टला छानसा सायकल लँप मिळाला. १२० रुपयांत पांढरा व लाल ची जोडी.
ऑर्डर केलेला दिवा आपल्या पोष्टात कुठेतरी गहाळ झाला असण्याची शक्यता दाट आहे.
http://www.aliexpress.com/sna
http://www.aliexpress.com/snapshot/6609201063.html?orderId=66800917982361
मि हा सेट मागवला आणि मला मिळाला सुद्धा. अतिशय सुंदर आहे सेट. फक्त चेन ची लॉकिंग सिस्टिम थोडी चॅलेंजिंग आहे.
आत्ता पर्यंत मिळालेल्या वस्तू
http://www.aliexpress.com/snapshot/6544299151.html?orderId=66295854492361
http://www.aliexpress.com/snapshot/6544299152.html?orderId=66295854502361
http://www.aliexpress.com/snapshot/6564709679.html?orderId=66413661012361
http://www.aliexpress.com/snapshot/6564709680.html?orderId=66413661022361
ओके, वाट बघते
ओके, वाट बघते
हाय ऑल... मी एकुन १० वस्तू
हाय ऑल...
मी एकुन १० वस्तू मागावल्या त्यात माझ्या लेकासाठी एक झक्कास वॉच आले...६ वीक लागले...पण किम्मत आणि क्वालीटी एकदम छान...
या धाग्याबद्द्ल धन्स्...आणि झकोबाला पण त्याने ही लिंक दिली होति आनि ईथे वाचल्यावर मी शॉपिंग केले...
अजुन ५ सेट, ३ कानातले जोड....२ TB पेनड्राईव्ह आणि एक पर्स यायची आहे.
@ विशाल : हे तु जे मागवले ते ओन्ली आयफोन साठी का? त्से लिंक बघतेच पण विचारले सहज
मी दोन कानातले मागवले. एका
मी दोन कानातले मागवले. एका कानातल्यासाठी सेलर ने सांगितले कि तो ते साध्या पोस्टाने पाठवायला तयार आहे. नाहीतर ऑर्डर कॅन्सल करून पैसे रीफंद करेल. पण किंमत कमी असल्याने मी साध्या पोस्टासाठी ओके म्ह्टले. ट्रॅकिंग नाही होणार या केसमध्ये.अशा ट्रॅकिंग शिवाय वस्तु मिळाल्या आहेत का कोणाला?
अमि मला मिळाल्या आहेत. मी तर
अमि मला मिळाल्या आहेत. मी तर कोणतीच गोष्ट ट्रॅक केली नाही.
Pages