Submitted by Adm on 28 April, 2015 - 08:41
देशी तसच परदेशी प्रवासात अनेक जण वेगळवेगळ्या थीम पार्क्सना भेटी देत असतात. बर्याचदा एकादिवसात भल्या मोठ्या पार्क मधलं नक्की काय काय बघायचं, कुठल्या अॅक्टीव्हिटीज करायच्या असे प्रश्न पडतात. त्यामुळे थोडा गृहपाठ करून गेलेलं असलं की पार्क मधल्या आपल्या वेळेचं नीट नियोजन करून आवडत्या गोष्टी बघता येतात. आधी जाऊन आलेल्यांचे अनुभव असा गृहपाठ करायला बर्या पडतात.
हा धागा थीम पार्क्स आणि त्यातल्या आवडत्या राईड्स, गोष्टी, इव्हेंट्स इत्यादींबद्दल चर्चा करण्यासाठी. तसच इतर बाबतीतले अनुभव जसे पार्क मधल्या खाण्यापिण्याच्या सोई, जवळपास रहाण्याच्या दृष्टीने ठिकाणं, थोडक्यात आपली थीम पार्क ट्रिपसंबंधी महत्त्वाचं असं काहीही लिहिण्यासाठी!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी जरा घाबरते, घाबरवणार्या
मी जरा घाबरते, घाबरवणार्या राईडस करुन सुखाचा जीव स्वतःचे पैसे घालून दु:खात का टाकायचा असा प्रश्न पडतो, पण पीअर प्रेशर मुळे बसते बर्याच राईड मध्ये. सरळ एक बंद केबिन ठेवून ती हलवा ना पहिजे तश्शे उलटी सुलटी, हवेत माणसं थेट खुर्च्यांवर बसवून उंच का नेता आणि त्यांना उलटे का करता असे विचारावेसे वाटते.
पण याच सर्व गोष्टींमध्ये ८०% वर्गाला खूप मस्त वाटत असल्याने असे विचारणारा भेकड आणि सुबोध समजला जातो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(जाउदे आता इथे मी सुबोध तर सुबोध)
इमॅजिका ला स्क्रिम मशिन मध्ये डोळे बंद करुन बसले होते. त्यावेळी ती उंचच्या उंच राईड चालू झालेली नव्हती. आता झालीय. मला लहान मुले बसतात त्या कपबश्या,आडवी फिरणारी सर्व खेळणी आणि आगगाड्या इ. आवडतात. इमॅजिका मध्ये माफक (बहुतेक १५ फूट)उंचीवरुन खाली जाणारी राजासोरस राईड होती ती आवडली होती.
डिस्नी - मॅजीक किंगडम मधली
डिस्नी - मॅजीक किंगडम मधली स्पेस माऊंटन. आणि ती पण सगळ्यात पहिल्या सीटवरूनच.
डिस्नी - मॅजीक किंगडम मधली
डिस्नी - मॅजीक किंगडम मधली स्पेस माऊंटन. आणि ती पण सगळ्यात पहिल्या सीटवरूनच. >>>+१
युनिवर्सल मधिम ममी सगळ्यात पहिल्या सीटवरून
एपकॉट मधील soaring
एपकॉट मधील सोरेन >> soaring
एपकॉट मधील सोरेन >>
soaring म्हणायचंय का तुम्हाला? जबरी राईड आहे ती!!
हो ,
हो ,
आम्ही एले आणि फ्लोरिडा अशी
आम्ही एले आणि फ्लोरिडा अशी दोन डिस्नी पार्क्स, दोन्ही ठिकाणची लेगो लँड्स आणि सी-वर्ल्ड बघून आलोत. जरा सवडीनं लिहिते.
सिक्स फ्लॅगच्या सर्व extreme
सिक्स फ्लॅगच्या सर्व extreme rides , लास वेगासची stratosphere ह्या राइड्स़ केल्यावर तुम्ही कोणतीही राईड करू शकता.
खरंय..लास वेगासची
खरंय..लास वेगासची stratosphere केल्यावर जगातल्या कोणत्याही राईड्स सोप्या वाटू लागतील
stratosphere वरच्या तिन्ही राईड्स जो करू शकेल तो नक्कीच सिंहहृदयी असला पाहिजे..आम्हाला तर नुसतं दुरून बघूनच घाम फुटला ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता जरा घाबरवू का
आता जरा घाबरवू का रोलरकोस्टरधाडसी मंडळींना? पग्या, हे विषयांतर होईल असा मी विचार करून पाहिला पण नंतर म्हटलं की इथे योग्य ऑडियन्स ला माहिती पोहोचेल.
एक्सट्रीम रोलरकोस्टर्स वर जाणे फार रिस्की असते. कौतुक वाटत असेल आपण अवघड राइड केली म्हणून पण नॉट वर्थ इट! रोलर कोस्टर्स मधे मेंदूचा ऑक्सिजन पुरवठा बंद होणे, कन्कशन, इतर मेंदूच्या किंवा मानेच्या इजा होणे इ. अनकॉमन नाही अजिबात.
माझ्या बॉस ची टीन एजर मुलगी अशाच एका रोलर कोस्टर वर ३ महिन्यापूर्वी जाऊन आली अन अजूनपर्यन्त ते एक नाइटमेअर ठरलेय ते तिच्यासाठी.
त्या राइड नंतर तिला उलट्या होणे, चक्कर येणे , बेशुद्ध होणे असे काही काही केव्हाही रँडमली होऊ लागले. कमी न होता वाढतच गेले. आधी निदान नीट होत नव्हते. बर्याच टेस्टस नंतर कळले की मेंदू खूप जास्त हलल्याने अन तो कवटीच्या आतील कठीण भागावर अनेकदा घासला गेल्याने/ आपटल्याने मेंदूला बाहेरून इजा झाल्यात. त्या भरून येतील पण खूप वेळ लागेल. सध्या तिची शाळा गेले २ महिने बुडत आहे कारण अर्ध्या तासाच्या वर ती वाचणे/ लिहिणे असे काही करू शकत नाही. मधे मधे शॉर्ट टर्म मेमरी लॉस पण होतोय !! फार स्केअरी आहे हे.
विश्वास बसत नसेल तर हे पहा :
http://en.wikipedia.org/wiki/Euthanasia_Coaster
आणि मग सिक्स फ्लॅग्स मधल्या किंग द का रोलर कोस्टर चा फोटो पहा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयायाया!! भयंकर!
आयायाया!! भयंकर!
उंचीचा आणि बंद जागेचा फोफिया
उंचीचा आणि बंद जागेचा फोफिया असल्याने राईड्स्ला लांबून सलाम. बॅगा व फोन सांभाळायचे काम करते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आपून भी! कुणी घाबरट म्हटल तरी
आपून भी! कुणी घाबरट म्हटल तरी चालेल पण ह्या रोलर कोस्टर राइड मला फार आवडत नाही, असॉ
एपकॉट म्हधे एक एलिव्हेटर राइड आहे ती पण टेरीफाईन्ग वाटली होती मला..
आयुष्यात एकदाच रोलर कोस्टर
आयुष्यात एकदाच रोलर कोस्टर राईड घेतली. फारच भयंकर अनुभव होता. त्यानंतर आठवडाभर नाईट मेयर्स चा त्रास झाला. तेंव्हापासून पण केलाय. कोणी १० लाख दिले तरीही परत हा अनुभव घेणार नाही..
मैत्रेयीने सांगितलेला अनुभव फारच वाईट आहे. असंही होऊ शकतं, याची कल्पना नव्हती!!
मैत्रेयीनं दिलेली माहिती
मैत्रेयीनं दिलेली माहिती नव्यानंच समजली. स्केअरी आहे.
stratosphere गुगल वर पाहिले.
stratosphere गुगल वर पाहिले. बसल्या बसल्या श्वास अडकून घाबरण्याचा अनुभव आला. यात बसणार्यांना आणि फोटोत न घाबरता हसणार्यांना माझा दंडवत.
मलाही रोलर कोस्टर राईड्स
मलाही रोलर कोस्टर राईड्स भयंकर म्हणजे भयंकर आवडतात. मलेशीयात गेन्टींग आयलंडला गेलो होतो तेंव्हा तिथल्या फ्लायींग कोस्टर मधे फक्त मी आणि माझा मुलगाच गेलो होतो. धम्माल अनुभव होता. आधी त्याच्या ब्रॅकेट मधे उभं रहायचं आणि मग तुम्हाला तसे बांधून टाकून, हळुहळू आडवं करतात. आणि मग जे सुस्साट सुटते ती राईड!!
युरो डिस्ने, पॅरिस ईथे रॉकेट लाँचर पण अशीच एक खतरनाक राईड आहे. ती बाहेरुन काही लक्षातच येत नाही, पुर्ण अंधारात आहे. नवराही होता, पण तो 'पैसेही द्यायचे आणि घाबरायच पण...' चा ठाम विरोधक. त्यामुळे मी त्याला म्ह्णाले की बघ बाहेरुन काहिही भितीदायक नाहीये, म्हणजे सोप्पा प्रकार असावा. तो फसला. (रॉकेट लाँचर या नावामुळे तरी त्याच्या लक्षात यायला हवं होतं...बिचारा..!!). आणि एकदा का राईड सुरु झाली की मग परतीचा मार्ग नसतोच..
सिंगापुर, युनिवर्सल स्टूडीयो मधली ट्रान्सफॉर्मर्स पण आवडते.
अबु धाबी चा फेरारी वर्ल्ड मधला फॉर्म्युला रोस्सा म्हणजे तुफानी वेगाचा थरार आहे!!
मैत्रेयी, फारच चांगली व
मैत्रेयी, फारच चांगली व योग्य माहिती दिलीस. अति-प्रचंड रोलर कोस्टर्स मला आवडत नाहीतच पण आता मुलांना पण बसू देणार नाही!
कॅलिफोर्निया अॅड्व्हेंचर मधील सोअरींग ओव्हर कॅलिफोर्निया राईड भयंकर आवडते!
मला हा प्रकार अजिबात आवडत
मला हा प्रकार अजिबात आवडत नाही . बोरिवलीत राहून अजून एस्सेल वर्ल्ड ला पाय लावले नाहीत आणि केवळ पैसे फूकट जातील म्हणून अजून इमॅजिकाचा प्लॅन बनवता येत नाही आहे .
गेन्टींग हायलॅण्ड्ला जाउन बर्याच राईड्स ट्राय केल्या फक्त स्पाउज प्रेशरमुळे .
फ्लायींग कोस्टर चा एक छोटा प्रकार होता , पूर्ण वेळ डोळे बंद करून होते .
छोट्याशा सायक्लॉनमध्ये ही जोर जोरात किंचाळत होते.
मैत्रेयीनं दिलेली माहिती नव्यानंच समजली. स्केअरी आहे.>> + १०००० .
रोलर कोस्टरप्रेमीना दाखवते आता ती माहिती.
थीम पार्क राईड्स केल्या खूप
थीम पार्क राईड्स केल्या खूप आहेत, खास आवडीची अशी एकही नाही.
त्यातल्या त्यात ममीची राईड आवडली होती ऑरलँडो मधली.
सर्वात जास्तं शार्क केज डाईव्ह आवडली होती, पण ती थिम पार्कमधली नसून खुल्या समुद्रातली आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॅलिफोर्निया अॅड्व्हेंचर
कॅलिफोर्निया अॅड्व्हेंचर मधील सोअरींग ओव्हर कॅलिफोर्निया राईड भयंकर आवडते!>>>>
मला पण !! फार आवडते ती राईड!!
मी वर उल्लेख केलेली रोलर
मी वर उल्लेख केलेली रोलर कोस्टर राईड
Holiday Park, Hassloch, जर्मनी
व्हिडिओ इथे पहा.
मला स्वतःला रोलर कोस्टर
मला स्वतःला रोलर कोस्टर राईडमुळे मानेला इंज्युरी झाली आहे. १० वर्षापूर्वी, सिक्स फ्लॅगच्या राईडमधे माझ्या उंचीमुळे किंवा काय, माझी मान नीट रेस्ट / लॉक झाली नाही... आणि माझ्या मानेला जबरदस्त हिसका बसला. तेव्हा जी इंज्युरी झाली ती कायमची. समहाऊ व्यायामाने मी त्याचा गंभीर अपाय आजवर टाळत आले आहे, मॅनेज करत आले आहे. पण गेल्या १० वर्षात हळुहळू आता माझ्या मानेची अवस्था वाईट वाईट होत गेली आहे.
माझ्या मानेमुळे मी स्पोर्ट्स, हायकिंग किंवा अॅडव्हेंचर अॅक्टीव्हीटी करताना मला नंतर त्रास होणार आहे, याची 'मानसिक' ( literally !! lol) तयारी ठेवूनच कराव्या लागतात. त्यामुळे जेट स्की, पॅरासेलिंग, स्काय डायव्हींग पासून सगळं मी केलंय/करते, पण त्यानंतर तास-दोन तास मला त्रास होतो/ सहन करावा लागतो.
२००८ मधे ग्रँड कॅनियन हायकिंग करताना पाठीवर २५ पाउंड वजन होतं, समहाऊ मॅनेज करून शकायचे... आता हायकिंग करताना मी 'कॅमलबॅक' सोडून काहीही जास्तीचं वजन घेऊ शकत नाही. मागच्या महिन्यात हाफ मॅरॉथॉन पळले तेव्हा पळताना त्रास झाला नाही, पाय दुखले नाहीत... पण थांबल्यावर मानेमुळे १० मिनीट टोटल झॉबी अवस्था !
जरा मानेला हिसका बसला की मान, मेंदूचा खालचा भाग सुजतो, त्यात माझी एक नर्व्ह पिंच होऊन उचक्या येतात सतत.
मसाज करून सूज कमी करणे , नर्व्ह मोकळी करणे हा एकमेव उपाय.
कधीतरी मेजर सर्जरी करायची वेळ येणार आहे, किंवा तितकीही संधी न मिळता सिस्टीम शट डाऊन होणार आहे.... बघू काय होतंय !!
बापरे !! सगळ्या भयानक
बापरे !! सगळ्या भयानक स्टोरींनंतर मी आपल्या आवडत्या राईड्स लिहितो.
युनिवर्सल मधिम ममी सगळ्यात पहिल्या सीटवरून >> +१ माझा पण
स्पेस माऊंटन दोन वेळेस हुकलीये! पुढच्या वेळेस नक्की बसणार.
लास वेगास मध्ये स्ट्रॅटोस्फिअर वर १०० व्या मजल्यावर बिग शॉट सगळ्यात मस्त वाटली होती.
मिनेआपोलिस मधल्या वॅली फेअर मधली स्टील वेनम ही राईड पण जबरी होती.
मी लास वेगास मधल्या सोडल्या
मी लास वेगास मधल्या सोडल्या तर सगळ्या डीस्ने, युनिव्हर्सल च्या राईडस किमान एकदा तरी केल्या आहेत... एक ही लाइफ है, एकदा तरी अनुभवायची प्रत्येक राईड म्हणून ! परत कदाचित नाही करणार / नाही करायला पाहिजे... पण माझं काही सांगता येत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक ही लाइफ है >> + १
एक ही लाइफ है >> + १
अॅडल्याब इम्याजिका कशी आहे ?
अॅडल्याब इम्याजिका कशी आहे ? तीन वर्षाच्या मुलीला काय आवडेल ?
डिस्नीला मुलांना घेउन जायचं
डिस्नीला मुलांना घेउन जायचं असल्यास पहिल्यांदा ती साधारण ४-५ वर्षाचं असताना जावं आणि मग दर २-३ वर्षांनी खेपा घालाव्यात.
कॅलिफोर्नियामध्ये दोन पार्क्स आहेत्/होती. एक कॅलिफोर्निया अॅडवेंचर आणि दुसरं डिस्नीलँड पार्क.
कॅलिअॅडपार्कमध्ये रेडिएटर स्प्रिंग्स वसवलं आहे. तिथे एकच मोठी राइड आहे जिथे मक्वीन, इ गाड्यांमधून रेस करता येते. सिनेमात दाखवलेला वॉटरफॉल आहे तिथे आणि आपल्या कार्स त्या फॉलपासून जातात. ४-५ वर्षांच्या टिल्ल्यांनी अजिबात चुकवू नये अशी ही राइड आहे. बाकी आणखी छोट्या राइड्स आहेत पण आता आठवत नाहीत. मक्वीन, मेटरसोबत फोटो काढणे, एकूण रेडिएटर स्प्रिंग्स गावात भटकंती आणि अधून-मधून रस्त्यांवरून चालणार्या मक्वीन, मेटर गाड्या अशी खूप धमाल असते.
पुढे एक गूफी'ज ड्रायविंग स्कूल राइड आहे, ती पण मस्त आहे. आणखी बर्याच राइड्स आहेत पण या दोन तेव्हा बार्क्याला फारच आवडल्या होत्या. सोअरींग ओव्हर कॅलिफोर्निया ही राइड खूप जणांनी घ्याच असं आग्रह करकरून सांगितलं होतं पण आम्ही गेलो तेव्हा बंद होती. याच पार्कमध्ये फाउंट्न्स आहेत. रात्री तिथे लाइट आणि म्युझिक शो (वर्ल्ड ऑफ कलर) असतो तो पण चुकवू नये.
या पार्कांमध्ये सतत कुठे ना कुठे त्यांच्या सिनेम्यांतली कॅरेक्टर्स लाइव शो करतात (त्याला नाटिका म्हणता येइल का?) ते पण अगदी थांबून आवर्जून बघावे असे असतात.
मी असल्या राईड्सच्या बाबतीत
मी असल्या राईड्सच्या बाबतीत टोटल फट्टू आहे. मला साध्या सोप्या छोट्या राईड्स ओके वाटतात. उदा: युनिव्हर्सलची जुरसिक वर्ल्ड वाली राईड/टूर. एसेलवर्ल्डमधेच अॅक्वा राईड करताना घाबरले होते. रोलरकोस्टर राईड्स ना बहुतेक बसल्या जागी जीव सोडेन मी!
मला सिम्युलेशन राईडस आवडतात.
मला सिम्युलेशन राईडस आवडतात.
स्ट्रेटोस्फीयर पाहूनच माझे हातपाय लटपटायला लागले होते. एकदाच जोहान्सबर्गमध्ये मी अन नवरा एका बर्यापैकी खतरा राईडमध्ये बसलो होतो. त्यानंतर दोघांनी शपथ घेतली की असल्या राईडस आपल्याकरता नाहीत.
नाही म्हणायला डिस्नीच्या, युनिव्हर्सलच्या काही काही मस्त आणि बेताच्या राईड्स एंजॉय केल्या आहेत. पण एक्स्ट्रीम राईड्स अगदी नो नो.
सिक्स फ्लॅग्ज च्या माईल्ड
सिक्स फ्लॅग्ज च्या माईल्ड राईड्स आवडतात. ज्या माझ्यासारख्या वीक हार्टेड लोकांना छान आहेत. ज्यांना अतिसाहस आवडते त्यांनी किंगडाका नावाची राईड कराच. बाकी सुपरमॅन बॅटमॅन पण छान राईड्स असं नवरा सांगतो. मी त्या फंदात कधी पडेन असं वाटत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages