कैवल्य कैवल्य फ्यान क्लब .. (बदाम बदाम बदाम)

Submitted by ऋन्मेऽऽष on 27 April, 2015 - 14:25

जर आदित्य देसाई नामक मध्यमवर्गीयांच्या हृतिक रोशनचा फ्यानक्लब मायबोलीवर निघू शकतो.....

तर आजघडीचा मराठी मालिकासृष्टीचा आमीर खान, चॉकलेट बॉय, दिल दोस्ती दुनियादारी फेम कैवल्य (उर्फ जे काही त्याचे रीअल लाईफ नाव असेल, नावात काय आहे, आम्ही त्याला कैवल्य म्हणूनच ओळखतो) त्याचा फ्यान क्लब तर हक्काने बनलाच पाहिजे. Happy

दिल दोस्ती दुनियादारी या तरुणवर्गाला डोळ्यासमोर ठेवून बनवलेल्या मालिकेला नेमका कितपत टीआरपी मिळतोय याची अधिकृत आकडेवारी माझ्याकडे तुर्तास उपलब्ध नाही, पण जो काही मिळत असेल त्यात ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो छावा म्हणजे कैवल्य कैवल्य !

मालिकेच्या पोताला साजेशी त्याची बेफिकीर स्टाईल,
बटाट्यासारख्या मोठाल्या डोळ्यांतून खुलणारा त्याचा लूक, (असे डोळे आणखी एका मराठी अभिनेत्रीचे आहेत, पण तिचे नाव इथे नको)
आणि फायनली त्याची सुपर्ब टायमिंग संवादफेक, हा तर मालिकेचा यूएसपी ठरावा.
तर, अल्पावधीतच आपला कैवल्य लक्षवेधक आणि दिलखेचक ठरला यात रत्तीभरही नवल नसावे.

या चार शब्दांसह मी माझ्या कैवल्यपुराणाला ब्रेक देतो आणि इतर कैवल्यप्रेमींना इथे आमंत्रित करतो Happy

kaiv 2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिदोदुचे सुरुवातीचे काही भाग पाहिले होते. त्यात सगळ्यात न आवडलेलं कॅरॅक्टर म्हणजे हा कैवल्य. हा उगीच काहीतरी विचित्र पुणेरी टोनमध्ये डायलॉग टाकत रहातो, जे त्या कॅरॅक्टरला, सिरीयलमधल्या वातावरणाला फारसे शोभत नाहीत.
सुरूवातीच्या काही भागांमध्ये उगीच अ‍ॅटीट्युड दाखवला होता, तो पण आवडला नाही. शिवाय हा उगीच चॅंडलरची स्टाईल मारतो असंही वाटलं. (मी चँडलरचा फॅन नसलो तरी त्याची स्टाईल कोणी मारलेली मला आवडत नाही).

हल्लीचे भाग पाहिलेले नाहीत. त्यामुळे काही बदललं असेल तर माहित नाही.

हा अ‍ॅक्टर सुद्धा नाटकांमध्ये (जास्त करून प्रायोगिक) खूप अ‍ॅक्टीव्ह आहे असं ऐकलं आहे. त्याची नाटकं पहायला आवडतील, पण ह्या सिरीयलमध्ये फार नाही आवडला.

पराग, माझा तर या बीबी वर जन्मसिद्ध हक्क आहे पण या महान धाग्याकर्त्यामूळे मी लवकरच कैवल्य हेट क्लबात जायची शक्यता असल्याने मी सदम्यात आहे.....

या मनुष्यामुळे I started disliking SRK Sad

दिल दोस्ती दुनीयादारी अगदी फ्रेंडस वर बेतलेली वाटते आहे. पण कैवल्य च्या विनोदांना चँडलरच्या विनोदांचा उत्स्फुर्तपणा नाही. असो.. अ‍ॅक्टींग तशी चांगली करतोय पुढे बघु काय काय होतय Happy

अवांतर - पराग, तु चँडलरचा फॅन नाहीस? आश्चर्य आहे! फ्रेंड्स मधल्या ६ च्या ६ व्यक्तिरेखा भारी आहेत आणि मी सगळ्यांचा फॅन आहे.

>या मनुष्यामुळे I started disliking SRK > अरे बापरे! असं काय हो केलं ऋन्मेऽऽषनी?

मला पहिल्यापसुन शा खा आवडत नाही (नुसता आवडत नाही असं नाही तर प्रचंड डोक्यात जातो). आणि ऋन्मेऽऽष नी धागा काढल्यानंतर तर त्यावर शिक्का मोर्तब झालं Happy

कोणतीही तुलना नाही केली तर सध्याच्या मराठी मालिकांचा सासू-सून-एकत्र कुटुंब-आदर्श मूल्य वगैरे ट्रेंड बघता ही जरा वेगळी म्हणून तरी बरी वाटतेय. म्हणजे अगदी टिपीच करायला म्हणून छान आहे. बाकी फ्रेंड्स वगैरेच्या जवळपाससुद्धा जाणार नाही. त्या अपेक्षेने बघूच नका.

पराग, आपली आपली आवड.. कोणाला पुणेरी टोन डायलॉग आवडतात कोणाला नाही, पण त्याला जमतात एवढे मात्र नक्की.. एखादे कॅरेक्टर पकडून सारे इमोशन्स त्या अंगाने दाखवणे सोपी गोष्ट नाही..
बाकी फ्यानक्लब म्हणजे लूक एण्ड स्टाईल.. यात अभिनयाचा नंबर नंतर येतो.. किंबहुना तो असह्य नसावा इतकीच माफक अपेक्षा असते. Happy

रीया, या धाग्यावर नो शाहरूख प्लीज.
तो बंदा कैवल्यचा धागा हायजॅक करेन.. Sad

बाकी फ्यानक्लब म्हणजे लूक एण्ड स्टाईल.. यात अभिनयाचा नंबर नंतर येतो.. किंबहुना तो असह्य नसावा इतकीच माफक अपेक्षा असते.
>>>>
Muktafalana suruwat zali Sad

कोणी इकडे ३७ ते ४२ वयाचे असतील तर मला खालील लोकांचे फान क्लूब काढायला आवडेल . कसा प्रतिसाद मिळेल

१) किशन कुमार
२) गुलशन ग्रोवर
३) मिथून
४) शक्ती कपूर

आणखीन नावं अ‍ॅड करा हेमन्त!

५) सुमित सैगल
६) अविनाश वाधवान
७) चंकी पांडे
८) बॉब क्रिस्टो
७) माणेक ईराणी
८) रामी रेड्डी

आणि (दोन्ही कानाच्या पाळ्यांना हात लावून) - ग्यानेंद्र चौधरी!!

मधुकर विनायक देशमुख - रडवलेस मित्र !

एक वचनी उल्लेखाबद्दल आदरयुक्त क्षमस्व !!

ग्यानेंद्र चौधरी - ह कोण दादा ?

मी आहे या क्लबात. अगदीच बदाम नाही पण तसा गम्मत म्हणून आवडतो कैवल्य. आणी अदित्य देसाई ची ऋत्विकशी तुलना करुन ऋत्विकचा अपमान करु नकोस.:फिदी: कहा राजा भोज ( ऋत्विक ).....

कैवल्य थोडा थाम्बुन बोलतो असे वाटते. त्यामानाने सुजय नॉर्मल आहे. आता कैवल्य आला म्हणजे सुजय येणारच.:फिदी: कैवल्यचा धागा असला तरी बाकी लोकान्वर एखादे डॉयलॉग येतीलच काळाच्या ओघातुन.

पण फॅन क्लब काढायचा म्हणजे काय करायचे? नुसते फोटो टाकुन चर्चा करायची की त्याचे मन्दिर बान्धायचे? कुठे बान्धणार? एवढे पैसे नाहीत सध्या.:अरेरे:

रश्मी पॉईंट हाये, नुसते फोटो टाकत चर्चा करण्यात अर्थ नाही, काहीतरी नानाविध उपक्रम राबवायला हवेत, भले आचरट का असेनात, फ्यानक्लबाचे वेगळेपण जपायला हवे, विचार करतो, पण आधी जरा ऑफिसचे काम करतो, पगार सोडवतो.

अवांतर -
@ चौकट राजा, मी शाहरूखवर अजूनपर्यंत एकही धागा काढलेला नाही, ऋन्मेष बस्स नाम से ही बदनाम है Happy

Rashmi +1

Apan apal 3D chya bb warach badam dolyat anun charcha karuyat....

Amey wagh kahi baghaneble material nahi. Pan adorable nakkich ahe
Mala 'kaivalya' avadato.
To amey ne n sakarata itar koni asachya asa sakarala asata tari mala ewadhach avadala asata.
Amey ne bhumikela daad dili.

Friends chi copy hi asu shakate hi malika pan kuthalich copy original itaki bhari banat nahi.
Agadi tya tikdchya lokani apalya ashihi banava banavi varun perit houn movie banavala tari banava banavi ch best asel tas kahis.

Tyamule tulana n karata vegali malika mhanun pahal tar nakkich avadel. Malika hi ani sagale characters hi Happy

Rahila prashn kaivalyacha tar tyachya timing war ani attitude war mi full time fida

Riya mi sahamat ahe..
Mala itar radkya malikan peksha vegli mhanun ani maitri he majhya manala sarvat anmol nate vatte mhanun faar avdli dil dosti duniyadari hi malika ani tyatle sarv patr hi.. Kunich 19 - 20 nahi sarv equal avdtat mala

ग्यानेंद्र चौधरी माहीत नाही? (अरे ये पीएसपीओ नहीं जानता!)

हे अफलातून नृत्य आणि त्यातला अभिनय बघा चौधरीजींचा (कानाच्या दोन्ही पाळ्यांना हात लावून)!

https://www.youtube.com/watch?v=bGAzvYZYzPU

त्यात सगळ्यात न आवडलेलं कॅरॅक्टर म्हणजे हा कैवल्य.
>>>
tyachya timing war ani attitude war mi full time fida
>>>

दोन टोकाच्या दोन प्रतिक्रिया...
कैवल्यचे स्टार बनायचे लक्षण पाळण्यात..

अमेय वाघ दिसायला हँडसम आहेच. कैवल्यचे कॅरे़क्टर त्याने छान उभे केले आहे. इतर छळवादी मालिकांपेक्षा ही सिरीयल अनेक पटीने उत्तम असल्याने कोणाची स्टाईल मारली तरी त्याला माफ.
बायदवे , या सिरीअलचे भाग नेटवर बघतांना सिरीयल रिलेटेड अजून काही टाईमपास विडीओ दिसले. सगळ्यांची मुलाखत, सिरीअलची इन्ट्रो, मुलांची/मुलींची मेकपरूम, त्यातली खाऊची पेटी ..
मुलाखत आणि हे सगळे विडीओ उत्स्फुर्त असावेत. बाकीच्यांचा नवखेपणा प्रचंड जाणवतो. पण अमेय छान बोलला आहे.

हा जेव्हा मोठमोठाल्या डोळ्यात काहीच एक्ष्प्रेशन न दाखवता थांबुन थांबुन डायलॉग डिलिवर करतो ना तेव्हा खरंच विश्वास बसत नाही की काही जणांनी म्हणल्याप्रमाण्ए हा नाट्कांतला गुणी अभिनेता आहे. तोंडी शब्द काहीही असोत डोळे तसेच न हलता.

Smite tyach character ch tas ahe.
Unad,befikir,kashachi parva nasalel...
Mi mhanje shahana ha attitude asalel
But at the sae time to halava ahe, swarthi nahi
To sahaja sahaji konachahi apaman karu shakato pan tyachya mitrancha itar baherachya koni apaman kelela tyala avadat nahi etc etc

Mala prachand avadalay he character

डोळे तसेच न हलता >>>> माझ्यामते हा अभिनय आहे, कॅरेक्टरची डिमान्ड आहे.. आतल्या हळव्या मनाचा थांगपत्ताही न लागू देणे.. तो बेफिकीर नाहीये खरे तर.. पण येस्स ते दर्शवायला धडपडतोय, एक नकली कवच ओढून घ्यायला बघतोय.. असे एक कॅरेक्टर आहे हे..

Pages