२ मोठ्या काकड्या. (पिकल क्यूकंबर्स असतील तर ६ चा एक अख्खा ट्रे)
मीठ
तिखट
हळद
चिमुटभर ओवा
चमचाभर तीळ
धणेपूड
बारीक चिरलेली कोथिंबीर
बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या
कणीक किंवा मिक्स्ड ग्रेन आटा (प्रमाण कृतीत)
तेल
-काकड्यांची सालं सोलून काकड्या (किसणीच्या मोठ्या छिद्रांमधून) किसून घ्यायच्या.
-साधारण ५ मिनिटं मोठ्या गाळणीवर ठेवून पाणी गळू द्यायचं. कीस पिळायचा नाही.
- किसात आता पीठ सोडून, बाकी सगळे घटक घालून, हलक्या हातानं मिसळून घ्यायचे.
- या मिश्रणात, व्यवस्थीत घट्टं गोळा होईल इतपत पीठ घालायचं.
- एकीकडे तवा तापत ठेवायचा.
- २-३ मिनिटांत थालिपिठं लावून, तेल घालून, खरपूस भाजायची.
-मिश्रणात चमचाभर तांदळाचं पीठ घातलं तर थालिपिठं कुरकुरीत होतात.
-फार बियाळ काकड्या नकोत.
-यात पीठ पडणार आहे हे लक्षात घेऊन त्यानुसार बर्यापैकी तिखट-मीठ घालायचं.
-थोडं गाजर किसून घातलं तर थालिपीठ देखणं होतं.
मस्त दिसतायत. मी मध्यंतरी
मस्त दिसतायत.
मी मध्यंतरी केप्रची भाजणी झणझणीत असते म्हणून कांद्याबरोबर् काकडीही घातलेली. कधीतरी कोबी, गाजरही घालते.
थालिपीठ कसलं जानलेवा दिसतंय.
थालिपीठ कसलं जानलेवा दिसतंय. करेन नक्कीच.
मस्तच .. माझी आज्जी करायची
मस्तच ..
माझी आज्जी करायची अशी सेम थालीपाठं .. एकदम चविष्ट .. मला वाटलं मी जुन्या मायबोलीत रेसिपी लिहीली होती पण आता काही सापडली नाही ..
मागच्या वेळेला काकड्यांत पाणी तरी फार होतं किंवा माझं काहितरी गडबडलं पण फार ओली, चिकट झाली आणि धड थापायलाही जमेना .. मग त्यानंतर परत केली गेली नाहीत ..
आता नव्या दमाने करून बघते परत ..
सशल,
सशल, http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/103679.html?1134058359
भारी होतात. अशीच कोबीची पण
भारी होतात. अशीच कोबीची पण आवडतात. ओवा भरपूर घालायचा.
असेच काकडीच्या किसात, गूळ आणि तांदळाचं पीठ घालून गोड घावन पण मस्त लागतात.
माझा झब्बु, बर्यापैकी अशीच
माझा झब्बु, बर्यापैकी अशीच रेसिपी पण साबा थोडं लुज भिजवतात पीठ, भज्यां सारखं .
भज्यांच्या पीठासारखं भिजवून
भज्यांच्या पीठासारखं भिजवून थापता कशी येणार थालिपीठं?
बर्यापैकी ओतीव , धिरडी पेक्षा
बर्यापैकी ओतीव , धिरडी पेक्षा घट्ट आणि थालीपीठापेक्षा मऊ.
शँकी सही .. थँक्यू ..
शँकी सही .. थँक्यू ..
थँक्यू! डीजेचं थालिपीठ बघून
थँक्यू!
डीजेचं थालिपीठ बघून मला मी केलेलंच गिळवत नाहीये. खरोखर खमंग दिसतंय.
>>धिरडी पेक्षा घट्ट आणि थालीपीठापेक्षा मऊ
परफेक्ट! काकडीचा कीस गच्चं पिळून घ्यायचा नाही. अश्या न पिळलेल्या किसात पीठ घालून घट्टं भिजवल्यावरही २-३ मिनिटांत गोळा बर्यापैकी मऊ पण थापण्याइतपत मॅनेजेबल होतो.
सशलच्या आजीची पाककृती सही
सशलच्या आजीची पाककृती सही आहे. करून बघते.
मस्त, करुन बघेन.
मस्त, करुन बघेन.
मस्तच. पाकृ चुकीच्या वेळी
मस्तच. पाकृ चुकीच्या वेळी वाचली. आता भूक लागली
वॉव ! मृण्मयी , तुझ्या पाकृ
वॉव ! मृण्मयी , तुझ्या पाकृ मस्त असतात . सोप्या सहज आणि खमंग .
नक्कीच करुन पाहीन
हाय हाय.... कसला जबरदस्त फोटो
हाय हाय.... कसला जबरदस्त फोटो आला आहे. तोंपासु!! येत्या दोन-तीन दिवसात करायलाच हवं.
सा.बा.हे करतात. पण काकडीचा
सा.बा.हे करतात. पण काकडीचा कीस थोडा शिजवून घेतात म्ह्णजे पिठात मिळून येतो हा कीस. तसेच पीठ म्हणजे थालीपीठाची भाजणी घेऊन करतात.
असेच गोड थालीपीठही छान लागते, काकडीच्या कीसात गूळ घालून शिजवायचे आणि भाजणीच्या पीठात मिक्स करायचे.
मस्त रेसिपी. मी पण काल
मस्त रेसिपी. मी पण काल काकडीऐवजी कलिंगडाचा पांढरा गर किसून केली. चांगली झाली होती.
मस्त
मस्त
काकडीचं थालिपिठ मस्त. मी
काकडीचं थालिपिठ मस्त. मी सुद्धा करते हे भाजणी संपली असेल तर. मऊसरच भिजलं जातं याचं पिठ.
कणकेत लाल भोपळा किसूनही छान लागतं थालीपीठ.
Karun baghayala hav
Karun baghayala hav
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मस्त झालेत, मी तान्दळाच पीठ
मस्त झालेत, मी तान्दळाच पीठ आणी थोड भाजणिच पिठ घातल.
(फोटो काढताना कॅमेरा हलल्याने क्लिअर नाहि आलाय, )
धन्यवाद मंडळी. लाल भोपळ्याचं
धन्यवाद मंडळी.
लाल भोपळ्याचं थालिपीठ विसरूनच गेले होते. आणलेल्या भोपळ्याचं आता थालिपीठ. धन्यवाद शर्मिला!
>>कलिंगडाचा पांढरा गर किसून
कधी केली किंवा खाल्ली नाहीत. पांढरा गरही कधी खाल्ला नसल्यामुळे चवीची कल्पना आली नाही.
प्राजक्ता, थालिपिठाचीच भाजणी घातलीय का? इतकी मौल्यवान भाजणी काकड्यांमध्ये मिसळायचा धीर होत नाही.
थालिपिठाचीच भाजणी घातलीय
थालिपिठाचीच भाजणी घातलीय का?>> नाही नाही! चकलीची घातलीय, चमचाभरच घातलिये., ताद्ळाच्या पीठाने कुरकुरीत होतात मस्त.
गेल्या विकांताला दुर्वांकुर
गेल्या विकांताला दुर्वांकुर मध्ये साईड्-डिश म्हणून थालीपीठ होतं. उच्च लागत होतं लोणी लावलेलं थालीपीठ. छान पातळ थापलेलं, कडेनी कुरकुरीत झालेलं; गरमगरम!
सोबत थंडगार घरगुती पद्धतीची काकडीची दह्यातली कोशिंबीर. बाकी चटण्या/ लोणची होतीच.
दुधीभोपळ्याचीही छान होतात सेम
दुधीभोपळ्याचीही छान होतात सेम रेसिपीने.
आज काकडी थालीपीठ केले होते या
आज काकडी थालीपीठ केले होते या पद्धतीने.. फक्त कांदा ही घातलेला..कारण तो मस्ट आहे आमच्याकडे.. खूपच सही टेस्ट झालेली.
तांदूळ पीठीची आयडिया सही आहे. आणि ज्वारी च पीठ वापरले भाजाणी ऐवजी.