Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतः निर्वस्त्र झालो तरी
स्वतः निर्वस्त्र झालो तरी चालेल, आपल्या जावेला आपले कपडे बसत नसतील तरी द्यायचे.
सासर्याला सतत औषधं खाऊ घालायची. बापाची चौकशी सुद्धा करायची नाही (अगदी तो बोलो न बोलो, एक फोन एक समस तरी करायला हरकत काय आहे? गेला बाजार आईला तरी एक फोन करताना अदिती कधीच दाखवली नाहिये.
नवर्यासाठी त्याग करायचा. ४ ला उठून बांद्र्याहून विरारला जाऊन पोभा करून, पुन्हा घाटकोपर चे हापिस गाठायचे, ते ही नवाच्या आत.
रजनीसारख्या बायांना मूग गिळून ऐकत रहायचं... हे पण अॅड करा...
पण आजूबाजूची माणसंही
पण आजूबाजूची माणसंही शहाण्यासारखं वागली तर अदिती बनण्याची वेळ कोणावर येणार नाही हे पेपरमध्ये लिहिणार्यांनी लक्षात घ्यायला हवे.>>>>>> पाहीजे तेवढे प्लस पॉईन्ट्स घे मन्जूडी.>> माझ्याकडून पण.
त्या आदितीप्रमाणे मुके बनून काय बोलतील ते ऐका आणि वर हसतमुखानं सगळ्यांची सेवा करा.
आदिती धडाधड खोटं बोलते,
आदिती धडाधड खोटं बोलते, नवर्याला अॉफिसातच काय जिकडे तिकडे लीड करते, अॉफिसातून येताना झाडाखाली नवर्याशी गप्पा मारत बसते, कधीच भाजी, फळं, किडूक मिडूक काही घेत नाही घरासाठी, घरी आल्यावर काकू कायम स्वयंपाक तय्यार ठेवतात, सकाळी जाताना हातात तय्यार डब्बा मिळतो, एका बेडरूमच्या घरात कधीही जयचे कपडे, कागद पसरलेले आवरायचे नसतात, पेस्ट कंट्रोलची कटकट नाही. करायचं काय तर फक्त लपाछपी खेळायची आणि आपल्या थापा लक्षात ठेवायच्या, अॉफिसात प्रेझेंटेशन बनवायची आणि जनकल्याण पतपेढी चालवायची. मज्जा. होऊया की आदितीसारखं. हाकानाका.
धमाल आहे अदितीची. पुढल्या
पुढल्या भागात नेहेमीप्रमाणे नन्दिनीने घोळ केलेला दाखवलाय. गट्टु ला ( अविनाश) म्हणते परत गाडी बन्द नाही पडणार. तो अदितीवर जाम भडकतो की या गोष्टीचा पण इश्यु का केला.:हहगलो:
मी सोडलं ही मालिका बघणं. आणि
मी सोडलं ही मालिका बघणं. आणि हे सगळं वाचून वाटतंय की बरंच केलं मी. किती दळतायत!
हो आणी क्षणात विरार, क्षणात
हो आणी क्षणात विरार, क्षणात हापिस. जादूच. ना बसचे धक्के ना ट्रेनची धावपळ
मुंबईचा नक्की अभ्यास केलाय ना
मुंबईचा नक्की अभ्यास केलाय ना शिरेलीवाल्यानी.
नाक्यावरच्या दुकानात गेल्यासारखं वांद्रे- विरार- घाटकोपर जाते ती आदिती
अंजूडे चिडचिड पोचली
अंजूडे चिडचिड पोचली
दक्षि
दक्षि
त्यान्च्या फेसबुकावर आपल्या
त्यान्च्या फेसबुकावर आपल्या धाग्याची लिन्क टाका.
मी ही तो ड्रेसवाला एपिसोड
मी ही तो ड्रेसवाला एपिसोड पाहिला. खरच कहर आहे . तो जय पण बावळट शिरोमणी आहे . रश्मी, अगदी योग्य पोस्ट
नाक्यावरच्या दुकानात
नाक्यावरच्या दुकानात गेल्यासारखं वांद्रे- विरार- घाटकोपर जाते ती आदिती >>> तेच ना! आणि रात्री घरी परतताना मेक-अप, केस सगळं इन्टॅक्ट!!
नाक्यावरच्या दुकानात
नाक्यावरच्या दुकानात गेल्यासारखं वांद्रे- विरार- घाटकोपर जाते ती आदिती >>> तेच ना! आणि रात्री घरी परतताना मेक-अप, केस सगळं इन्टॅक्ट +११११११११११
वांद्रे- विरार-
वांद्रे- विरार- घाटकोपर>>>>>>>>>>>> मला तर वाचुनच घाम फुटला.
आणि ती वहिनी म्हणते एक दिवस
आणि ती वहिनी म्हणते एक दिवस आड आण्णांना भेटायला येशिल ना गं अदिती..
आणि ह्ये येडं होय म्हणतंय... खुळचेट
खुळचटच आहे ती! ती रजनी काय
खुळचटच आहे ती!
ती रजनी काय वाट्टेल ते बोलते तिला... त्या मंद जयला पण ओरडण्याएवढा राग येतो तिची मुक्ताफळं ऐकून. आणि हे सॅम्पल तिच्याशी शांतपणे बोलून प्राॅब्लेम साॅल्व्ह करायला बघतयं. तिथेच एक ठेऊन द्यायची कानाखाली ते नाही.
ती आदिती कसली मद्दड आहे एकतर
ती आदिती कसली मद्दड आहे
एकतर भोचकपणा करुन बॉसल सांगायच की साडी घ्या. मग त्याच्याबरोबर भटकत बसायचं. तो बिचारा जय अगदी रडवेला झाला होता.
एवढ सगळ झाल्यावर परत हिला सुचत कसं की उद्या आऊंचा वाढदिवस साजरा करायची परवानगी घ्यायची आहे
मला तर कधी नवर्याकडे जाते असे झाले असते.
मला खरतर जय अजिबात आवडत नाही. फटाकडी रजनी आणि रडकी जुई त्याच्या कशा प्रेमात पडल्या आश्चर्य वाटत पण काल बिचर्याची खरच दया आली.
नताशा +१ प्रत्येक वेळेस यांचे
नताशा +१
प्रत्येक वेळेस यांचे प्लॅन कसे बारगळतात?
एकत्र बाहेर गेले की यांना ऑफिसमधलं कोणीतरी भेटतचं.
रोज ऑफिस नंतर बाकावर बसून गप्पा मारत असतात तेव्हा कोणी यांना बघत पण नाही आणि इतरवेळेला कोणी बघेल म्हणुन वाटणारी भीती पण तेव्हा वाटत नाही.
नताशा +१
नताशा +१
"आजच्या च दिवशी तु माझ्या
"आजच्या च दिवशी तु माझ्या आयुष्यात येण्याची कबुली दिली होती" हा डायलॉग आवडला.
आम्हीही ही सिरियल बंद केली
आम्हीही ही सिरियल बंद केली पहायची. चक्रवर्तिन सम्राट अशोक पाहतो ९ ला. त्यात राजकारण, चाणक्य, तीन पिढ्यांचे तीन राजे, अनेक राण्या, अनेक राजपुत्र, अंतर्गत शत्रुत्व वगैरे सॉलिड मसाला आहे. अजून कोण कोणाचा कोण हे कळलेलंच नाहीये
पण दुराव्याच्या बिनडोकपणापेक्षा काहीही चालेल अशी परिस्थिती आहे!
कालचा तो गिफ्ट देण्याचा
कालचा तो गिफ्ट देण्याचा प्रसंग पाहण्यात आला. (जेवणं लवकर उरकल्यामुळे :फिदी:)
दोघांच्याही चेहर्यांवर जराऽऽही, पैश्यालाही रोम्यांटिक भाव नव्हते.
जय आणि आदितीकडे पाहिले की
जय आणि आदितीकडे पाहिले की आपापल्या शाळेत कायम पहिल्या नंबरावर असलेले दोन विद्यार्थी यापलीकडे मला काहीही वाटत नाही.
याच वेळेला प्रवाह वर 'दुर्वा' असते . बरी आहे ती गोष्ट तरी. दुरावा / दुर्वा / (टीव्हीपासून) दूर व्हा
आपापल्या शाळेत कायम पहिल्या
आपापल्या शाळेत कायम पहिल्या नंबरावर असलेले दोन विद्यार्थी >>> पर्फेक्ट !!

दुरावा / दुर्वा /
दुरावा / दुर्वा / (टीव्हीपासून) दूर व्हा >>>
जयच्या चेहेर्यावर कायम एकच
जयच्या चेहेर्यावर कायम एकच भाव असतात. ती बथ्थड जुई तरी थोडेसे वेगळे वागते. अदितीचा पवित्रा कोणाहीबाबत आ बैल मुझे मार असा असतो.:फिदी:
विशाखा सुभेदार ने मात्र बावळट्ट नन्दिनी मस्त सादर केलीय. काल कदम काका जरा तरुण वाटले. मध्ये मी बन्द केली होती ही सिरीयल पहायचे. पण उत्सुकता असल्याने काल थोडी पाहिली. पण सिरीयल पुढे सरकत नाहीये. आज आउ माऊच्या बड्डेला केतकर काका आल्यावर मात्र गोन्धळ होईल बहुतेक. त्यान्ची बायको बरी सहन करते त्यान्चे कुमु कुमु करणे.
तो जय आणि अदिती मेड फॉर
तो जय आणि अदिती मेड फॉर बीइंग स्टुपिड आहेत
जय आणि आदिती कायम कोणाच्या
जय आणि आदिती कायम कोणाच्या तेराव्याला जेवायला जायचं असल्यासारखे किंवा नुकतेच तेराव्याचं जेवून आल्यासारखे भाव चेहर्यावर घेऊन का फिरतात?
जय आणि आदिती कायम कोणाच्या
जय आणि आदिती कायम कोणाच्या तेराव्याला जेवायला जायचं असल्यासारखे किंवा नुकतेच तेराव्याचं जेवून आल्यासारखे भाव चेहर्यावर घेऊन का फिरतात? +१११११११११११११११
आज काल तेराव्या पर्यंत दु:ख
आज काल तेराव्या पर्यंत दु:ख टिकतं?
Pages