Submitted by दिनेश. on 13 April, 2015 - 05:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
आमचं कोल्हापूर
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पण डाळ घालायची असेल तर अशी
मी पण डाळ घालायची असेल तर अशी भाजी(कोल्हापुरी ऐवाजी गरम मसाला) कुकरलाच करते. डाळ गाळ करायची नसते त्यामुळे मस्त होते.
बेब्या, कोब्या
कोबीची भाजी अजुन केली नाही पण
कोबीची भाजी अजुन केली नाही पण सकाळी कोबी वापरुन फोडणीचा भात केला. आता इथे आल्यावर इथले प्रतिसाद वाचले. आजची सकाळ एकुण कोबीकारणी लागली.. चांगला जाणारे दिवस आज.
मी केला आज हा प्रयोग. कांदा
मी केला आज हा प्रयोग. कांदा लसूण मसाला नव्हता पण वेगळा गरम मसाला होताच घरी. तो वापरला. १ पावशेरा पेक्षा थोडी कमी होती कोबी. थोडी चण्याची डाळ भिजवून वापरली. मलासुद्धा ते पत्ताकोबी + पाणी अजिबातच आवडत नाही.
कुकरमध्ये केली भाजी. डाळ घातल्यावर अगदी १ पळीच पाणी घातलं. वर कोबी घातली. मीठ घातल्यावर त्याला पाणी सुटलंच. लगेच झाकण लावून जेमतेम प्रेशर आल्यावर मिनिटभर ठेवलं अन गॅस बंद केला. कुकरही उतरवून ठेवला शेगडीवरून. प्रेशर गेल्यावर पाहिलं की भाजी शिजली तर होतीच, पण अजिबात गचका नव्हती, थोडं पाणीही होतंच पण अगदी कमी; ते आटवून टाकलं. भाजी नीट झाली आहे. ते पळीभर पाणीही नसतं टाकलं तर चाललं असतं.
सोप्पी असल्याने करण्यात येईल
सोप्पी असल्याने करण्यात येईल कोल्हापुरी मसाला तेवढा शोधायला हवा. डाळ मुगाचीच असेल .कोबीसारख्या उपेक्षितांचे अंतरंग असं तऱ्हेतऱ्हेने खुलवावं लागतं. धन्स दिनेश.
कोबीनेच प्रेशर येत असेल
कोबीनेच प्रेशर येत असेल कुकरला>>>>>>>
पाकृ करुन बघेन.
ही भाजी नक्कीच चांगली लागणार.
ही भाजी नक्कीच चांगली लागणार. कोपुचा कांदालसूण मसला जबरी आहे त्याने चव भन्नाट येते.
फक्त जरा गुळ हवा भाजीत.
मस्त वाटतेय पाकृ ! <<<<
मस्त वाटतेय पाकृ !
<<<< कोबीसारख्या उपेक्षितांचे अंतरंग असं तऱ्हेतऱ्हेने खुलवावं लागतं. >>
धन्यवाद.. कधी कधी काही
धन्यवाद..
कधी कधी काही ठिकाणी मला कोबीशिवाय दुसरी भाजीच मिळायची नाही.. त्यामूळे कोशिंबीर ते खीर असे सगळे प्रकार करून झालेत माझे कोबीचे ( हो खीर... छान लागते )
भारतात जे कोबी मिळतात ते जरा पातळ पापुद्र्याचे असतात, इथे थोडे जाड पापुद्र्याचे असतात. आपल्याकडचे कसे नुसते परतून शिजतात तसे शिजत नाहीत. थोडी वाफ द्यावीच लागते.
भाजी दिसतेय छान. कोबी थोडा
भाजी दिसतेय छान. कोबी थोडा पाणथळ ( पाणी घालुन शिजवलेला ) सुद्धा चालतो मला. कारण सासरी सुकी व माहेरी माझ्या बाबाना पाण्यातली लागते. मसाला मात्र वगळेन.:स्मित:
माझ्या साबानी एकदा चतुर्थीला उपास सोडण्यासाठी गोड म्हणून कोबीची खीर केली होती. नवरा आधीच गोड खात नाही, त्यातुन ही खीर कोबीची आहे कळल्यावर तोन्ड वेडेवाकडे करीत खाल्ली. ( आईला कसे काय दुखवायचे, बायकोने केली असती तर तिला नावे ठेवता आली असती.:फिदी:)
दिनेश आज मी तुमच्या पद्धतीने
दिनेश आज मी तुमच्या पद्धतीने भाजी केली. फक्त दोन्ही डाळी (तुर आणि मूग) भिजवून घातल्या आणि कुकर ला लावली नाही. शिवाय गुळ घातला. बरंच मॉडिफिकेशन केलंय पण करताना तुमची आठवण आली
आधी नेहमीप्रमाणे हिंग हळद घालून परतून घेतली.
मग तिखट गुळ आणि कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला घातला.
फायनल भाजी
बेफी .. ते तसच आहे . होसुमी
बेफी .. ते तसच आहे . होसुमी मधे कस बेबी ला बेब्या म्हणून सुद्धा लोक तिचा राग रागच करतात तसच इथ पन कोबी ला कोबी म्हणन काय अन कोब्या काय चव तिच राहणार .. आणि जस त्या शिरेलीतल पात्र बदलत नै तसच भाज्यांमधल हे पात्र पन नै बदलत म्हणून कोब्याच
दक्षिणाची भाजी मस्त दिसतेय...
दक्षिणाची भाजी मस्त दिसतेय... रंग भारी आला आहे.
ही भाजी मी खाऊ/ करू शकेन.
दक्षिणासारखीच भाजी आमच्याकडे
दक्षिणासारखीच भाजी आमच्याकडे नेहमी असते, कमी लाल. कोबीत बटाट्याचे काप घालावेत, कोबीची भाजी खाण्याचे पर्क्स म्हणून मधेमधे मन आनंदी होते.
कोबीची भजी मस्त होतात, कोबीच्या पुर्याही.
दिनेशदांनी दिलेला वरचा फोटो बघून सारखं त्याला कोबीचं पिठलं म्हणावंसं वाटतंय. पिठलं मला प्रचंड आवडतं आणि या नावाने केलं तर अपेक्षाही(?) सेट होतील खाणार्यांच्या
मंजू माझी भाजी सॉलिड तिखट
मंजू माझी भाजी सॉलिड तिखट झाली होती. पण कधीतरी खायला मजा येते. सोबत गुळ पण असतो त्यामुळे तिखट गोड मस्त लागते. तरी मी टोमॅटो नव्ह्ता घातला. अजून मज्जा आली असती. कोपु चा कांदालसूण मसाला अफलातून असतो. माझे बाबा नेहमी पाठवतात मला.
दक्षिणा, मी पण मागवून ठेवते
दक्षिणा, मी पण मागवून ठेवते नेहमी कोचा कांलमसाला. त्याशिवाय पिळणकर मिसळ मसाला आणि एक पांढरा रस्सा मसाला लिस्टवर असतो. पांढर्या रश्श्याचा ब्रँड आठवत नाहीये आत्ता.. पण त्या पाकिटाच्या आत पांढर्या रश्श्याच्या मसाल्याव्यतिरीक्त अजून एक बारकीशी मसाल्याची पुडी असते, त्या मसाल्यातली सोया चंक्सची भाजी अफलातून होते.
मी अजून प्रत्यक्षात एकदाही कोल्हापूरला गेले नाहीये
दक्षे, छान दिसतेय भाजी.. मला
दक्षे, छान दिसतेय भाजी.. मला गूळ आता वर्ज्य !
कोल्हापुरी घरगुति मसाला तेवढा तिखट नसतो, पण जास्त खमंग लागतो. अगदी थोडा घातला तरी पुरतो.
दिनेशदा, नेहमीप्रमाणेच फोटो
दिनेशदा, नेहमीप्रमाणेच फोटो एकदम खास.
कोबी, शेपू आमची ऑल टाईम फेव्हरेट, सो घरी वरच्या पद्धतीची डिमांड करण्यात येईल.
आमच्याघरी दक्षिणाने केलीय त्याप्रमाणेच कोबीची भाजी होते पण लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या आणि वरून ओल्या नारळाचा खवलेला किस
फोटो आणि रेसिपी दोन्ही
फोटो आणि रेसिपी दोन्ही मस्त... उद्याच करुन बघते...
खरं तर या भाजीत फोटो
खरं तर या भाजीत फोटो काढण्यासारखे काही नाही....?.... असे अजिबात वाटत नाही...
आज करुन पाहिली ही भाजी. मला
आज करुन पाहिली ही भाजी. मला डाळीबरोबर मिळून यायलाच हवी होती म्हणून थोडी चणा डाळ + थोडी मसूरडाळ घेतली. चव चांगली आहे पण ...... एक टेबलस्पून कांदालसूण मसाला घालून ही भाजी भयंकर तिखटजाळ झाली आहे. तुम्ही एरवी तिखट खात नाही असं वाचल्याचं लक्षात असल्याने मसाल्यात काही फेरफारच केला नाही. मसाला घरगुती नाही पण पावभाजी मसाला बर्याच प्रमाणात घालतो तसा हाही घालून चालेल असं वाटलं ( दक्षिणाच्या पोस्टीकडे दुर्लक्षच झालं )
इतकं तिखट खाणं शक्यच नसल्याने आजची भाजी वाया जाणार कांदालसूण मसाल्याची चव अर्थातच चांगली आहे. अगदी पाव-अर्धा चमचा घालून करेन पुढच्यावेळेला.
सॉरी अगो, मी घरगुती मसाला
सॉरी अगो, मी घरगुती मसाला वापरतो त्यात एवढे तिखट वापरत नाहीत. कांदा, लसूण असतो भरपूर. बाजारी मिळतो त्यात भरपूर तिखट असते.
तुम्ही सॉरी नका म्हणू, मीच
तुम्ही सॉरी नका म्हणू, मीच अंदाज लावायला चुकले तसा त्या मसाल्याला तिखटाचा वास येतोच पण पा भा मसाल्यासारखा जास्त घालता येईल असं वाटलं.
कुणी आमच्यासारखंच बिनतिखटाचं खाणारं असेल तर असं व्हायला नको म्हणून इथे लिहिलं.
अगो, अगं वाया कशाला, त्यात
अगो, अगं वाया कशाला, त्यात थोडं बेसन, ज्वारी वगैरे पीठं मिक्स करून धिरडी/थालिपीठं कर. मस्त खमंग लागतील आणि तिखटपणा पण कमी होईल. हवंतर भाजी त्या अगोदर मिक्सरमधुन काढ.
>>वाया कशाला, त्यात थोडं
>>वाया कशाला, त्यात थोडं बेसन, ज्वारी वगैरे पीठं मिक्स करून धिरडी/थालिपीठं कर. मस्त खमंग लागतील आणि तिखटपणा पण कमी होईल. हवंतर भाजी त्या अगोदर मिक्सरमधुन काढ.
दक्षिणाच्या ह्या पोस्टीला अनुमोदन! मी कणीक आणि तांदळाचं पीठ घालते. मिक्सरमधे वाटलेली भाजी, गोळा वळला जाण्याइतकी घट्ट असेल तर किंचित पाणी घालून मग त्यात मावतील इतकी पिठं मिसळून थालिपिठं किंवा पराठे करायचे. खुसखुशीत आणि चवदार होतात. फक्त पिठांच्या अंदाजानं मीठ घालावं लागेल.
भाजी बर्यापैकी पातळ होती आणि
भाजी बर्यापैकी पातळ होती आणि कुकरमध्ये घालतो ते गोल भांडं भरुन भाजी होती. त्यात भरऽपूर पीठ घालावं लागलं असतं. घरात माणसं अडीच त्यामुळे वाया जाईल असं वाटलं. जास्त भात, कमी भाजी आणि दही असं मिसळून खाल्लं.
उद्या बघते थालिपीठं लावायचं
अगो, मग सरळ भजी करून टाक,
अगो, मग सरळ भजी करून टाक, अडिच माणसात नक्की नक्की खपतील. (कमीच पडतील खरं)
यावरून कुठेतरी वाचलेला एक अवांतर किस्सा आठवला.
एकदा पु ल देशपांडे कोणत्या तरी लग्नाला गेले होते. तिथे गोड म्हणून गुलाबजाम होते. आणि नेमके पाकात टाकल्यावर ते फिसकटून त्याचा पाकात भूगा झाला. ३०० गुलाबजाम वाया जाणार अशी भिती वाटली म्हणून पु.ल. ना युक्ती विचारण्यात आली. तर त्यांनी त्यात आईस्क्रिमचं सामान मिक्स करून इसेन्स वगैरे मिसळून ते १० रुपयाला विका असा सल्ला दिला (तत्समच काहीतरी, नक्की तपशील विसरले आहे)
ते आईस्क्रिम हिट झालं. सगळं खपलं, आणि दुसर्या दिवशी पण ते आईस्क्रिम खरेदी करायला लाईन लागली होती म्हणे.
आज डब्यात आणली ही भाजी, सकाळी
आज डब्यात आणली ही भाजी, सकाळी फोटो काढायला वेळ मिळाला नाही. मस्त झाली आहें. मोड आलेले मूग घातले. डेस्क वरच डबा उघडून फोटो काढला.
सामी, मस्तच दिसतेय भाजी !
सामी, मस्तच दिसतेय भाजी !
मला आवडली ही कृती. कोबी+पाणी
मला आवडली ही कृती. कोबी+पाणी आम्हाला चालते, आवडते त्यामुळे आज करणेत येइल. तो कोल्हापुरी मसाला नाहिये तेव्हा काहीतरी वेगळे वापरावे लागेल.
कोल्हापुरी मसाला कोणत्या
कोल्हापुरी मसाला कोणत्या कंपनीचा चांगला मिळेल कोल्हापुरातच. तिथे नातेवाईक आहेत त्यांना पाठवायला सांगण्यात येईल.
Pages