मालिका - का रे दुरावा

Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00

झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे या जय-आदितीला दोघांना मिळुन रु. ५० हजार पगार आहे ना???? मग इतर काऽऽऽही खर्च न करता एवढे पैसे त्यांना महिन्याला पुरत नाहीत. Uhoh

जय कधीपासुन ब्युटीपार्लरमध्ये जायला लागला?:अओ::फिदी:

आजच्या भागात गट्टुला कळेल वाटत काहीतरी या कपलबद्दल, कारण जय आणी केतकर काका दोघेही गट्टुला दिसले. गट्टुने अदितीला तिथे ड्रॉपल तर जाम लोचा होईल.

कालचा भाग पाहिल्यावर मी ठरवले की काही दिवस ही मालिका पहाणेच बन्द करायचे. स्वार्थीपणाची कमाल नीच पातळी काल अदितीच्या जावेने दाखवली.:राग: अण्णान्ची खोली अदितीकडुनच साफ करुन घेऊन तिच्यावर डाफरणे, मी अण्णाना इतके वर्श साम्भळतीय, तू काय आता आलीस असे टोमणे मारुन अदितीचेच ड्रेस हडप करणे. वर जयच्या अतीरिक्त कमाईवर नजर ठेवुन, मुर्ख जयने ती परत शोभडीला देणे असे हीन पातळीवरचे प्रयोग बघुन डोके सरकले. या जयचा भाऊ तर एकदम बाजारबुणगा, बुळ्याच वाटतो. बायको समोर काहीच कसे चालत नाही देव जाणे.:राग:

खरे तर अदिती आणी जय दोघान्च्या कानफटात हाणाव्या असे वाटत होते. अती चान्गुलपणा फार घातक असतो.

या जयचा भाऊ तर एकदम बाजारबुणगा, बुळ्याच वाटतो>>> जय आणि आदितीही आकी वेगळे नाहीत.

रश्मी.., अगदी अगदी! मला काल बळजबरीने थोडावेळ बघावा लागला कालचा भाग. ती शोभा कसली आहे ते माहिती आहे तरी तिच्याच देखत सुहासने जयला चेक द्यावा? अरे टॅक्सीतून एकत्र आले ना सगळे?
तो चेक अण्णांच्या सामानात मिळाला किंवा अदितीच्या पर्समध्ये शोभाला सापडला असं नसतं का दाखवता आलं? शोभाच्या भोचकपणाला शोभलंही असतं ते..
किती ओढूनताणून धागे जुळवायचे मालिकेचे? एखादी घटना सहज घडतेय हे दाखवता येतच नाही का लेखक-दिग्दर्शकांना? किती ते कल्पनादारीद्र्य!!

पैसे / चेक येताना टॅक्सीत, जाताना पोचवताना कधीही देता आला असता...सगळेच भोचक आहेत.

शोभा मस्त आहे.. आपल्याला कधी असे वागणे जमणार नाही. पण ती बिनधास्त वागते....

जयने आधी घरात पैसे दिले नव्हते तेव्हा फुकट्याच होते तो व त्याची बायको. तेव्हा कोण करत होते खर्च? केला आता वडीलांसाठी तर काय बिघडले?

बादवे....जय आदिती म्हातारे वाटतात...नकोसे.

रश्मी.. अनुमोदन.
जास्त राग जय आदिती चाच येतो सहन करतात म्हणुन.
मुळात या उपकथे ची गरजच काय? कौटुम्बीक ओळख सुरुवातीला झाली आहे बास झाली.
पात्रे कमी करावित सरळ. पैसे ही वाचतील निर्मात्याचे Happy

अगदी अगदी! मला काल बळजबरीने थोडावेळ बघावा लागला कालचा भाग. ती शोभा कसली आहे ते माहिती आहे तरी तिच्याच देखत सुहासने जयला चेक द्यावा? अरे टॅक्सीतून एकत्र आले ना सगळे? >> एक्झॅक्टली. कैच्यकै शेळपट्पणा चाल्लाय. उगाच जय अन अदिती 'स्वतःचं घर करत गळे काढतायत.. शोभाच घेईल काही एपिसोड्सनंतर दुसरा फ्लॅट...

बादवे.. मी ओळखते शोभासारख्या एका वल्ली ला. पैशाचा लोभ नाही माहित पण ओव्हरॉल अ‍ॅटिट्युड असाच आहे. मला पहा अन फुलं वहा

जयने आधी घरात पैसे दिले नव्हते तेव्हा फुकट्याच होते तो व त्याची बायको. तेव्हा कोण करत होते खर्च?>> हेल्लो! तो छोटीमोठी कामं करून पैसे मिळवत होताच की.. फक्त त्याला बिझनेस करायचा आहे आणि त्यात त्याला गती मिळत नाही म्हणून सर्वांच्या लेखी (एक अदिती सोडून) तो अपयशी ठरला आहे.
केला आता वडीलांसाठी तर काय बिघडले?>> ते करतच आहेत आणि त्याबद्दल त्यांची काहीच तक्रार नाहीये. मोठ्या भावालाच ब्लॉक वडिलांकडून फुकटात मिळालेला आहे, आणि तो बायकोच्या फुशीमुळे वडिलांची काहीएक जबाबदारी उचलायला तयार नाहीये.

धन्स मंजुडी Happy
असे लिहिले की मग जरा सिरियलचा उद्देश समजतो नि मग बघाविशी वाटते अन्यथा टीव्ही बंदच करावासा वाटतो.

शोभाच घेईल काही एपिसोड्सनंतर दुसरा फ्लॅट...>> Lol अदितीच्या आईकडून! Proud
लई स्मार्ट आहे ती... आणि हे दोघे चांगले शिकलेले - एमबीए असून असे मूर्ख!

मन्जुडी खरे आहे अगदी. रोजच्या रामरगाड्यातुन काहीतरी विरन्गुळा मिळेल या आशेने या मालिका आपण पहातो, तर हाती निराशाच लागते. म्हणून काही वेळेस पाचकळ विनोद असले तरी मी कॉमेडीची बुलेट ट्रेन वगैरे असले बघते, निदान त्यात हेवेदावे आणी मत्सराचे प्रदर्शन नसते.

विनीता, शोभा अण्णाना आपण सगळे एकत्र राहु अशी खोटी आशा दाखवुन त्यान्च्याकडुन पैसे उकळुन विरारला ब्लॉक घेते. अदिती जयला बाहेर जावे लागते. शोभा, अदितीच्या आईने अदितीला दिलेला नेकलेस आणी अजून बरेच काही हडप करते. प्रत्येक वेळेस ती नीचपणाचा कहर करते आणी जय व अदिती, अण्णा व जयचा भाऊ काहीच करत नाहीत.

रश्मी..... Sad सेम हिअर, मी तर शेवटी लिम्बीवरच चिडलो की असली भिक्कार मेषपात्रे अन कुजकट/स्वार्थी व्यक्तिंची चित्रणे बघणे थांबवा.... बन्द करा ती भिकार सेरियल ! माणसाने किती भोळसट असू नये, वा किती स्वार्थान्ध असू नये याचे उदाहरण म्हणुन ठीके, पण ते तसेच चालू राहिलेले पहाणे घातक.
सारखे सारखे ते बघुन त्याचे संस्कार आपल्या मनावर आपल्याच नकळत होत असतात.

>>>> अकलेचा, मेंदूचा का रे दुरावा? <<<<< अगदी अगदी ! बहुधा हेच दाखवायचे असेल दिग्दर्शक/लेखकाला... अन हे देखिल सिद्ध करायचे असेल की मालिका बघणार्‍यांचा देखिल अक्कलेशी दुरावा आहे! Proud

लिंब्या, खर्‍या आयुष्यात असले ब्लॅक व्हाईट शेड असलेली माणसं अगदी अभावाने असतात. बाकी सगळे ग्रे शेडेड. थोडी चांगली, थोडी भोळी, थोडी स्वार्थी. Wink

सारखे सारखे ते बघुन त्याचे संस्कार आपल्या मनावर आपल्याच नकळत होत असतात.>>>>>> अगदी अगदी
खास करुन घरातली वयस्कर मंडळी अकारण सिरियलमधली पात्र, त्यांचे प्रश्न-त्रास स्वतःशी, कुटुंबाशी रिलेट करतात. त्यातून उगाचच अति अपेक्षा, किंवा तिरस्कार वगैरे सुरु होतो

खास करुन घरातली वयस्कर मंडळी अकारण सिरियलमधली पात्र, त्यांचे प्रश्न-त्रास स्वतःशी, कुटुंबाशी रिलेट करतात. >>> अगदी! तसं बोलायलाही लागतात!

जुयेरेगातल्या माईंचं बघून आमच्या घरच्या दोन ज्ये.ना.बाया आपापल्या चाळीशी आणि पन्नाशीत पोचलेल्या पोरांना "बाळा" म्हणायला लागल्यायत Uhoh

बाळा काय बाळा, च्या मारी! Angry

अकलेचा, मेंदूचा का रे दुरावा Biggrin

हो तर. ती या सुखानो या ही सिरीयल चालू असताना माझ्या साबा, साबुना काहीतरी समजावयला गेल्या असताना ते थोडेशे रागवुन म्हणाले, हो हो तू आलीस मोठी त्या सरितासारखी चान्गुलपणाची देवता. मला एका बाजूला हसायला आले आणी दुसर्‍या बाजूला साबाना नावे ठेवली म्हणून राग आला. कारण साबा खरच काहीतरी चान्गले सान्गत होत्या.

मध्ये कुणीतरी पेपरमध्ये ( सकाळ असावा) लिहीले होते की सगळ्या मुलीन्च्या आयानी त्या मुलीना का रे दुराव्यातल्या अदितीसारखे वागायला शिकवले पाहीजे, तसे सन्स्कार केले पाहीजेत. माझे साबु हे पेप्रातले वाचुन साबाना सान्गत होते. मनात मी म्हणले असे जर सगळ्या मुलीनी केले तर त्यान्चे कायमचे सन्सार मोडतील. एवढ्या बावळट्ट्पणामुळे आणखीन काय होणार.

त्यापेक्षा जान्हवीसारखे का नको? आई आजी वयाने, मानाने कितीही मोठ्या असल्या तरी नम्रपणे घरी यायला नकार दिला. स्वाभिमान जपला. श्रीचे, त्याच्या आयांचेही चुकलेले स्पष्ट सांगितले. स्वत:ची, घरच्यांची चूकही मान्य केली. वेळप्रसंगी चुकलेल्या आईला खडसावले. सासरी जाऊनही वडीलांची आर्थिक, भावाच्या मार्गदर्शनाची जबाबदारी कायम सांभाळली. श्रीमंत सासरीही माझ्या आनंदासाठी मी नोकरी करणार हे ठामपणे सांगितले व तसे केलेही. जान्हवी सून म्हणून कशी आहे माहीत नाही पण मुलगी म्हणून मला तिची व्यक्तिरेखा नेहमीच आवडली, जवळची वाटली.

मध्ये कुणीतरी पेपरमध्ये ( सकाळ असावा) लिहीले होते की सगळ्या मुलीन्च्या आयानी त्या मुलीना का रे दुराव्यातल्या अदितीसारखे वागायला शिकवले पाहीजे,>>>>>>>>> म्हणजे कसं? आपल्याला आवडलेल्या मुलाशी आई-बाबांच्या मनविरुद्ध पळुन जाउन लग्न करायचं का? कारण इतर तर ती काही विषेश करतेय असं नाहीय. मठ्ठ पणा शिवाय.

बरोबर आशुडी. पण ती सून ( जान्हवी) आहे ना. आपले साबा साबु कायम त्यान्च्याच भूमिकेतुन/ चष्म्यातुन बघणार. पण मलाही जान्हवीचे कॅरेक्टर पटले. तू छान विश्लेषण केलेस.

सस्मित, अदिती तिच्या सासर्‍यान्शी म्हणजे अण्णान्शी आणी केतकर काका काकुन्शी जसे प्रेमाने वागते तसे प्रत्येक सुनेने वागले पाहीजे अशी ज्येष्ठ नागरीकान्ची अपेक्षा असेल. बाकी ती काय मुर्खपणा करते ते आपल्याच वयाच्या लोकाना कळणार पण आवडणारही नाही.

मुळात सिरीयलमध्ये जे चान्गले आहे ते घ्यावे आणी वाईट ते सोडुन द्यावे, असे बरेच जण करत नाहीत. नेमके आपल्याच जवळचे असे कुणी निघाले की मग तुलना करत बसतात हे ज्ये ना.

आशुडी, एकदम बरोबर आणि म्हणूनच ती मालिका सुरवातीला एवढी हिट झाली. नायिका जरा वेगळी होती इतरांपेक्षा.

नंतर मालिकेची वाट लावली ते वेगळे Proud

म्हणजे कसं? आपल्याला आवडलेल्या मुलाशी आई-बाबांच्या मनविरुद्ध पळुन जाउन लग्न करायचं का?>>> कोणाला उलट उत्तरं द्यायची नाहीत, कोणाला दुखवायचं नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, अंगावर पडेल ते काम निमूटपणे करत राहायचं, प्रतिकार करायचा नाही, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं वगैरे वगैरे..
पण आजूबाजूची माणसंही शहाण्यासारखं वागली तर अदिती बनण्याची वेळ कोणावर येणार नाही हे पेपरमध्ये लिहिणार्‍यांनी लक्षात घ्यायला हवे.

पण आजूबाजूची माणसंही शहाण्यासारखं वागली तर अदिती बनण्याची वेळ कोणावर येणार नाही हे पेपरमध्ये लिहिणार्‍यांनी लक्षात घ्यायला हवे.>>>>>> पाहीजे तेवढे प्लस पॉईन्ट्स घे मन्जूडी.

एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपन्थ हा मन्त्र फार कमी लोक जपतात.

Pages