जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे काल हा झुल्फीकार काय म्हणत होता?? म्हणे आपल्यावर प्रेम करणारं माणुस मिळायला भाग्य लागतं आणि ते भाग्य मला मिळालं आहे. हे मला चित्रामु़ळे कळालय. आँ???
>>>>>>>>>>>>>>>>
असं म्हणाला तो?
की त्याला म्हणायच होतं की.. मला प्रेम मिळालय मेघनाच्या रूपात म्हणुन मी भाग्यवान?

मेघना किती हळू बोलते? एवढ्या वेळात दोन गोगलगायीन्मध्ये शर्यत होऊन त्या दोघी पहिल्या येतील >> Rofl

मालिकांच्या भागांच्या हेडलाईन्स फिरत असतात ना त्यावर "पुन्हा दिसणार मेघनाच्या मनाचा मोठेपणा! चित्राच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार!!" डोंबल!!

मालिकांच्या भागांच्या हेडलाईन्स फिरत असतात ना त्यावर
"पुन्हा दिसणार मेघनाच्या मनाचा मोठेपणा! चित्राच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार (झाडू घेऊन बडवायला)
खरतर असं हवं ना ते Lol

चित्राच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार (झाडू घेऊन बडवायला)>> Biggrin

अगदी मला पण वाटतं तिला झाडूने बडवावस. (जास्त करुन मेदेला)

निधी, हो, त्या महान मेदेला खरच बडवाव असं फार वाट्ट.. Happy

दबंग स्टाईल डायलॉग ओरडावा वाटतो...
थप्पडसे डर नही लगता साब, मेदे कि महानता से लगता है Proud

आजच्या भागाच सार या गाण्यात....
"शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा" या गाण्याचं विडंबन विचित्रामय देसाई मंडळीसाठी!

ढोंगी दांभिक देसायांची भरली होती सभा
बाष्कळ नाना होता सभापती, तोंडाची वाफ दौडत उभा

मित्रांनो, विचित्रा भूत, विचित्रा भूत
तुम्हा आम्हा सर्वांना ते एकच विशयाचं शेपूट
या विचित्रा म्हशीच्या शेपटाचं करुया काय?

अमित म्हणाला, विचित्रा म्हशीच्या शेपटाचा सोक्षमोक्ष हवा
नाना म्हणे विचित्रा म्हशीला लाडक्या कोकराच्या मदतीला लावा
माई म्हणाली हस वेन मी विचित्रा म्हशीला तुम्ही पण बघा
मेघना म्हणे मी तर तुमच्या पुढे त्या म्हशीच्या मदतीला

ढोंगी दांभिक देसायांची भरली होती सभा
बाष्कळ नाना होता सभापती, तोंडाची वाफ दौडत उभा

~~ITG

आयटीगर्ल Biggrin

ती विचित्रा कायम सर्दाळलेल्या आणि कॉन्स्टीपेशन झालेल्या म्हशीचं बेअरींग घेऊन का वावरत असते?

रच्याकने,

भयाणगाठी आणि छळणारी सून यांचा एक क्रॉसओव्हर एपिसोड घडवून विचित्रा आणि अनिल आपटे यांचं सूत जमवून टाका आता! हाय काय नाय काय! नानाच्या जोडीला आईअज्जीचे उपदेशाचे डोस!

मी चालीत म्हणून बघीतले.>> मी पण.
Proud

आयटी गर्ल... मस्तच. Lol

भयाणगाठी आणि छळणारी सून, लोल >> Biggrin नाव मस्तच दिलीयत देशमुख.

मेदे ची डायलॉग म्हणायची स्टाईल जाम डोक्यात जाते. अन सारख सारखा काय ते प्रेमळ संवाद.. भाग्यवान काय.. अन अगदी हळूवार, गोड अन नाजूक बोलल्यासारखं. कोणी तरी असं बोलतं का खर्‍या आयुष्यात. आदे मेदे जे काही सो कॉल्ड रोमँटिक आचरटपणा करतात तसे तर टीनेजर्स पण करत नसतील

आपण खूप कैतरी शिक्रेट सान्गत आहोत, असा अविर्भाव असतो मेदेचा. मध्येच ती दम लागल्यासरखे करते. चेहेर्‍यावर दुनियेभरचा तणाव असतो. आणी आदित्य माथ्यावर सगळ्या झिपर्‍या आणुन, तोन्ड घट्ट मिटुन, श्री सारखी जास्त नाही पण थोडी दाढीची खुरटे वाढवुन उन्डारत असतो. नाना म्हातारे असुन चिकनी दाढी करतात. आणी आदित्य ऑफिसला जाताना पण अजागळासारखा जातो.:खोखो:

विचीत्राला एखाद्या दुष्काळी प्रदेशात पाठवायला पाहीजे. नोबितासारखी कायम धोधो रडत असते. >>> Biggrin

मेघना कायम उच्छ्वासात बोलत असते.
"आदित्यऽऽ" - यातल्या आ आणि त्य ला उच्छ्वास, उच्छ्वास
"हो, माई" - यातल्या हो आणि मा ला उच्छ्वास, उच्छ्वास
"विजयाताई" - यातल्या वि आणि ता ला उच्छ्वास, उच्छ्वास
Proud

ललिता.:हहगलो:

मेघनाचा उच्छःवास हा एक भयाण प्रकार आहे.
पण त्या मनोजचे काय झाले कळलेच नाही. विचीत्रा गायब होती ते कळुनही तो आला का नाही हे तो आणी निर्माता जाणे.

काल बाबाजीने केलेला ना मनोजला फोन. तेव्हा मनोज सांगत होता त्याना कि तुमच्या सांगण्यावरून मी चित्राला फोन केलेला पण ती नीट बोलली नाही वै वै ..

म्हणुन गेला नसेल तो...

उच्छ्वास की नि:श्वास?
नै म्हणजे एकदा का आदे विचित्राची जोडी जमवुन दिली की आयुष्यात (सेरियलीमधे) उरतेच काय करायला, म्हणून का नि:श्वास? सुस्कारा?

श्या:, किती अरसिक तुम्ही? त्यापेक्षा मेघना बोलताना चार हात लांब बासरी धरली तरी साडेतीन सूर उमटतील असं म्हणायचं ना!
(तिच्या पॉजेस मुळे पूर्ण सप्तक येऊ शकत नाही, क्षमस्व. ) Wink

आशूडी>> Lol

काल बाबाजीने केलेला ना मनोजला फोन. तेव्हा मनोज सांगत होता त्याना कि तुमच्या सांगण्यावरून मी चित्राला फोन केलेला पण ती नीट बोलली नाही वै वै ..>>
तेव्हा मनोज सांगतो बाबाजीला चिवित्राला घटस्फ़ोट हवाय म्हणून आणि त्यावर बाबाजी तोबा तोबा स्टाईल मध्ये बाबाजी बाबाजी करत सुटतो.

चिवित्रा त्यांच्याकडे राहायला आल्यापासून बाबाजीला ती आदे-मेदेच्या मध्ये येणार असा संशय आहे. आणि आता तीने परत जावे म्हणून बाबाजी प्रयत्न करतायत जेणेकरून मेदेच्या संसारात विघ्न येणार नाही.

बिच्चारे बाबाजी त्यांनी या विचित्राचे पाळण्यातले पाय ओळखलेले असतात की यांच्या विशाल हृदय असलेल्या छकुलीच्या छाताडावर ते पाय दणादणा आपटत ती दाताड काढणार आहे पण त्यांना कोणीच सिरीयसली घेत नाही ना... अगदी त्यांचे बाबाजीही नाही! मग काय भोआकफ!!

रश्मी, निधी, ड्रीमगर्ल धन्यवाद Happy

आज अखेर विचित्राचे अण्णा प्रकटले एकदाचे देसाईवेडीत Wink

पण महान मेदे तिला काही सोडणार नाही असं दिसत आहे. आदित्यशी मैत्री (?) परत झाल्याखेरिज..
तिच्या नावाचे ईनिशियल्स तिला अगदी सूट होतात MAD Proud

MAD Rofl

Pages