थरथरणारे हात लिहिती,...

Submitted by vishal maske on 7 April, 2015 - 10:28

थरथरणारे हात लिहिती,...

थरथरणारे हात लिहिती,उपेक्षितांचे दु:ख
ओले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||धृ||
माणसांच्या सुखालाही,माणसांचे कर्म
नडले
माणसांच्या जाती मध्ये,जाती आणि धर्म
वाढले
माणसाची जात मात्र,माणूसच विसरला आहे
माणसांचा शत्रु आज,माणूसच ठरला आहे
माणसांशी वागतानाही,जणू माणसं झालेत
खुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||१||
वेग-वेगळ्या जातीचा,वेग-वेगळा झेंडा आहे
वेग-वेगळ्या धर्माचा,वेग-वेगळा अजेंडा
आहे
प्रत्येक जाती-धर्मानं,आपला झेंडा ठरवलाय
मानवतेचा अजेंडा मात्र, माणसांतुनच
हरवलाय
नासमज म्हणण्या इतकेही,दिसत नाहित भोळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||२||
गतानुगतिकांचे स्रोत,आता जणू संपलेत
व्यवस्थेतील माणसं,बिनबोभाट झोपलेत
दिव्याचा प्रकाश जणू,दिव्याखालीच पडलाय
अन् सामाजिक तिमीरात,दिवा सुध्दा दडलाय
पण माणसांनीच विणले आहे,हे विषादाचे
जाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||३||
अमानवी कृत्य सुध्दा, मानवाकडून होऊ
लागलेत
अन् माणूसकी पासुन माणसं,दूर-दूर जाऊ
लागलेत
नात्यांच्या पावित्र्याचेही,आता नुसतेच
भास आहेत
माणसांच्या विश्वासावर,अविश्वासी
विश्वास आहेत
मना-मनात फोफावले आहेत,कपटीपणाचे मळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||४||
स्रीयांची सुरक्षितता इथे, अजुन असुरक्षित
आहे
स्री-पुरूषांतील भेद मात्र,इथे आरक्षित
आहे
अन्याय आणि अत्याचार, अजुनही टळले नाही
स्री-पुरूष समतेचे ब्रीद,त्यांना अजुन कळले
नाही
खोलवर समाजात रूतली आहेत, विषमतेची मुळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||५||
अनागोंदी या जगण्यामागे,विचारच संकूचित
आहेत
म्हणूनच तर आज वंचित,अजुनही वंचित आहेत
वेदनांचे काहूर इथले,अजुनही ना निर्गमले
आहे
ना उपेक्षितांचे दु:ख,जगण्यातुनही विरले
आहे
ना लागले आहेत अजुनही, अमानुषतेला टाळे
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||६||
क्षणो-क्षणाला अन पदो-पदावर
जणू उद्रेक होतोय रासवांचा
इथे माणसांचेही बाजार भरले
पण ना बाजार पाहिला आसवांचा
विकासाच्या आशेवरच,मंद झाली कित्तेक
पाऊले
गहिवरले का बिथरले,हे डबडबलेले डोळे,...||७||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

( कविता आवडली तर जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये,...)
( कवितेचा ऑडीओ मिळविण्यासाठी Whatsapp नंबर :- 9730573783 )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालची तळटिप आवडली खुप....उत्तम चालीत गायिली तर खुप भारी गाणे तयार होईल...आनंद शिंदे मिलिंद शिंदे न्याय नक्कीच देऊ शकतील....

धन्यवाद संतोष वाटपाडे साहेब,
तुमच्या इच्छेनुसार मी दादांशी ( आनंद शिंदे ) बोलतो या विषयावर,...

वाटपांडे

अन्नु मलिक योग्य वाटतो मला चाल लावण्यासाठी. आठवा - उंची है बिल्डींग.
जर त्याने स्वतःच गायलं तर सुभानल्लाह !!