Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुढीपाडव्याची रजनीची साडी,
गुढीपाडव्याची रजनीची साडी, नेकलेस आणि हेअरस्टाईल मला आवडली.
अदीतीच्या पोपटी ब्लाऊजचे ट्रान्स्परंट हात आवडले.>>> अनुमोदन
मला ती काळी-पांढरी साडी जास्त आवडली . अदितिचा गेट-अप जास्त आवडला . गळ्यातलं कित्ती गोड .
ती अदिती काय माठ आहे का ? >>>
ती अदिती काय माठ आहे का ? >>> अर्थात.
फटा फट बोलत का नाही ? >>> फटाफटा बोलली तर मालीका एवढे दिवस कशी चालणार???
फटाफटा बोलायच डिपार्टमेंट
फटाफटा बोलायच डिपार्टमेंट गट्टुकडे आहे ना? मग आदिती कशी बोलेल?
ते पण अतिच भोचक आहेत नको तेंव्हा नको त्याला नको ते बोलतात 
किती ती रडत होती ती.
काल बोलले अविनाश सर की अरविंदना काढत नाहिये फक्त दुसरा अकाउंटंट अपॉईंट करतोय. मग आउंची आणि त्याची तासभर चाललेली चर्चा काय उगाचच
नवरेंचा अतिशहाणपणा नडला आणि त्यासाठी त्यांनी मार पण खाल्ला
मला वाटलं काल नंदिनीच्या प्रेमाचा दि एंड होतोय का
शुभान्गी काही पण बोलु नको ह,
शुभान्गी काही पण बोलु नको ह, नाहीतर नन्दिनी रडुन रडुन बारीक होईल.:खोखो:
'जय आदिती कॉम्पुटर क्लास्सेस'
'जय आदिती कॉम्पुटर क्लास्सेस' सुरु होणार आहेत कदमांसाठी....
'जय आदिती कॉम्पुटर क्लास्सेस'
'जय आदिती कॉम्पुटर क्लास्सेस' ....>>

मी यातला 'जय' - 'जय अंबे' तल्या 'जय' सारखा वाचला.
" आदी माता कि जय " कॉम्पुटर
" आदी माता कि जय " कॉम्पुटर क्लास्सेस
"कदम कदम बढाये जा " कॉम्पुटर क्लास्सेस
" जय आदी शक्ती कि " कॉम्पुटर क्लास्सेस
काल मुळूमुळू जय अरविंद
काल मुळूमुळू जय अरविंद काकांसमोर ओरडला, बघून माणसातला जाणवला.कारण एवढ कोणी शांत,मुळूमुळू,रडूरडू कस राहू शकतो......
त्या कदम काका आणी जुई या
त्या कदम काका आणी जुई या ॲक्टर्सची खरी नावे काय आहेत?
कदम काका म्हणजे सुनील तावडे,
कदम काका म्हणजे सुनील तावडे, अनेक चित्रपटात असतो. नवरा माझा नवसाचा मधला बस ड्रायव्हर. जुई कोण आहे देव जाणे.
यातला हा आयटम हिरो काल मी
यातला हा आयटम हिरो काल मी कॉफी आणि बरेच काही मदे बघीतला.. च्यामारी कळायलाच तयार नै .. पूर्ण वेळ म्हणतेय याला कुठतरी पाहिलाय मी .. आल्यावर सर्च मारला तर कळल कि हा तर का रे धुरावा मदला
हो टीना. तो सुयश टिळक आहे
हो टीना. तो सुयश टिळक आहे कॉफीच्या मुविमध्ये.
एक जेन्युईन प्रश्न आहे. लग्न
एक जेन्युईन प्रश्न आहे.
लग्न झालेले लोक ऑफीसमध्ये चालत नाहीत, पण जर कोणी लिव्ह-इन मध्ये असलं तर चालेल का?
उद्या जय आणि रजनी लिव्ह इन मध्ये राहीले तर?
प्रेमात पडलेले पण चालत नाहीत
प्रेमात पडलेले पण चालत नाहीत का? चालत असतील तर या दोघांनी निदान इतरांना सरळ सांगावं ना आम्ही स्टेडी आहोत असं. इतके घोळ कशाला घालायचे?
प्रेमात पडलेले पण चालत नाहीत
प्रेमात पडलेले पण चालत नाहीत का? चालत असतील तर या दोघांनी निदान इतरांना सरळ सांगावं ना आम्ही स्टेडी आहोत असं. >>
सिरियल कशी चालणार मग?
या एकाच गोष्टीवर चालू आहे ती सिरियल.
असं सांगितल्यावर लगेच नंदिनी
असं सांगितल्यावर लगेच नंदिनी म्हणेल अरविंद कडे तिरपा कटाक्ष भोळा टाकत, इशअ त्यात काय, आपण सगळेच स्टेडी आहोत, नाही का अर्विन?
अर्विन >> चायला! ती तर चक्क
अर्विन >>
चायला! ती तर चक्क त्या कदम काकांना 'हे' वगैरे म्हणते. ते चालतं.
भोंगळे आहेत सगळेच एकजात!
भोंगळे आहेत सगळेच एकजात!
कालच्या एपिसोडमधे कोण कुणास
कालच्या एपिसोडमधे कोण कुणास काय म्हणाले आणि कुणी काय ऐकले हे कुणीतरी कदमांना आणि आण्णांना समजाऊन सांगावे. फक्त माई, जय आणि आदिती यांनाच ते एकमेकांना काय म्ह्णताहेत हे कळत असाव बहुदा. बाकी सगळे अचंबित मोड मधे होते.
आशुडी. शुभान्गी हो ग. काल मला
आशुडी.:फिदी:
शुभान्गी हो ग. काल मला याला हाणु का त्याला/ तिला हाणु असे झाले. जय असो वा अदिती दोघेही काही लवकर तोन्ड उचकटत नाहीत. वरतुन ती बथ्थड शिरोमणी जुई आगन्तुकासारखी तिथे घुसते. ते कदम काका म्हणतात ते खरे आहे, की आता रोज ऑफिसमधले एकेक जण काकान्कडे हजेरी लावतील. काल आउ बाई म्हणाल्याच की एकदा यायला पाहीजे तुमच्या ट्युशनमध्ये. मग रजनी पण येईल. जुई जाते तर मग मी का नको? जुईचे लाडिक, श्वास भरभरुन उसासे घेणे भयानक वाटले. एकतर तिचे ड्रेस अनाकलनीय असतात. वरती बोन्गा आणी काल टाईट.:खोखो:
रश्मी >> कसली भन्नाट चिरेफाड
रश्मी >>
कसली भन्नाट चिरेफाड करतेस गं सिरियलींची.
पण वाचल्यावर अगदी अगदी होऊन जातं.
मस्तच!!!
आर्विन >> तुफ्फान हसले मी
आर्विन >>
तुफ्फान हसले मी आशु पडलेच खुर्चितून खाली
ती जुई त्या जय कडे कसले
ती जुई त्या जय कडे कसले कटाक्ष टाकतेय. आणि तो जय ला काय करू काय नको अस झालय. हह पु वा
या सिरीयलचा तिढा कसा सोडवायचा
या सिरीयलचा तिढा कसा सोडवायचा (किंवा वाढवायचा ?) ?
जय नावाच्या नायकाचं लव्ह करीअर फारसं उत्साहवर्धक नसतं असं फिल्मी इतिहास सांगतो. कदाचित वीरू नामक आणखी एका नायकाची एंट्री होण्याची शक्यता आहे. तिकडे शोलेत जया भागदौडी सारखी अभिनेत्री असून तिला पडद्यावरचं लव्ह लाईफ नाही, वरून जळवायला वीरू - बसंतीचा धसमुसळा रोमान्स. जय अगदीच कमी बोलणारा. म्हणजे या सीरीयलची पुढची वळणं समजू शकतात. त्या गावाचा मुखिया ठाकूर असतो (रामलालच्या भरवंशावर). इथे ऑफीसचा मुखिया सुबोध भावे. या काळात तर हात तोडणं बरं दिसत नाही. म्हणून या ठाकूर भावेचं आदिती वर प्रेम बसतं. इकडे जय आणि जुई चं प्रकरण सुरू होतं. म्हणजे जयला चॉईसच नसतो. त्याला जुई म्हणते इट्स माय चॉईस. तर जय आदितीला विचारतो की काय चाललंय काय तुझं ? तर ती म्हणते "इट्स माय चॉईस "
मग जय हवालदील होतो. इतक्यात तावडेकाका म्हणतात मी सगळं ठीक करतो. मग जयला कळतं की आदितीला भावेशी काही घेणंदेणं नाही, ती फक्त दीपिकाचा व्हिडीओ त्याला कळाला की नाही हे बघत होती. तिला मायबोलीवरचा जयचा आयडी चांगलाच ठाऊक असतो. पण त्याच्या पोष्टीतून या वेळी काहीही हाती न लागल्याने तिने ही आयड्या केलेली असते.
तर इकडे काय होतं की पुन्हा एकदा खोटं पकडलं गेल्याने जय आदितीला घराबाहेर काढलं जातं. मग नलावडेंचा रोल संपतो. त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला नारळ देण्यात आलेला आहे. मग ते संतापतात आणि म्हणतात होळी कधी आहे ? कधी आहे होळी ?
इकडे जय आदिती आपले रेल्वेच्या प्लॅटर्फॉर्मवर राहत असतात. जयने एसी वेटींग रूमच्या चौकीदाराला पटवलेले असते. त्याने आंघोळ आणि कपडे बदलण्यासाठी वेटींग रूमचा वापर करू देण्याची अर्थपूर्ण परवानगी दिलेली असते. तर ते असे प्लॅटफॉरमवर झोपलेले असताना जय पलिकडच्या फलाटावर टूथपेस्ट आणायला जातात तेव्हां नलावडेंचे गुंड लोकलमधून उतरून आदितीला उचलून नेऊ लागतात. आदिती एक हिसडा मारून निसटते आणि एका रिक्षावाल्याला धक्का मारून ती रिक्षा ताब्यात घेते..
इकडे नलावडेंमुळे ठाकूर उर्फ भावेला खरं काय ते कळतं. आधी तो पाच मिनिटे हक्काबक्का होतो. मग जाहीराती सुरू होतात. मग तो रडवेला होतो, अभिनय करून घेतो, इतक्यात त्याची आई येऊन खांद्यावर हात ठेवते. मग हळूहळू त्याला राग येऊ लागतो. तो पा-यासारखा पायाकडून डोक्याकडे चढू लागतो. जेव्हां डोक्यात जातो तेव्हां त्याचा स्फोट होतो आणि त्याचे हात लुळे पडतात......
क्रमश :
(No subject)
(No subject)
कालचा भाग बरा वाटला १) रजनी
कालचा भाग बरा वाटला
अदितीला बोलता येते की नाही ह्याबद्दल अजून संभ्रम आहे.
१) रजनी बर्याच दिवसांनी दिसली
२) जय जवळपास २०-२५ वाक्ये बोलला. त्यामुळे तो मुका नाही हे सिद्ध झाले
३) नंदेनीने अय्य, इश्श्य इत्यादी विभ्रम कमी केले
>>>> आदितीला भावेशी काही
>>>> आदितीला भावेशी काही घेणंदेणं नाही, ती फक्त दीपिकाचा व्हिडीओ त्याला कळाला की नाही हे बघत होती. तिला मायबोलीवरचा जयचा आयडी चांगलाच ठाऊक असतो. पण त्याच्या पोष्टीतून या वेळी काहीही हाती न लागल्याने तिने ही आयड्या केलेली असते. <<<<<
बाळकोबा, मी दचकलो ना हे वाक्य वाचल्यावर... लगेच जाऊन दीपिकाच्या व्हिडिओच्या धाग्यावर मी काय काय लिवलय ते परत वाचून काढले!
मलाच काही कळले नाही,आदितीला काय कळणार कप्पाळ? 
(No subject)
लिंबूटिंबू>>
लिंबूटिंबू>>
Pages