मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेडमी चांगला फोन आहे .मझ्या बजेटमध्ये बसत नव्हता म्हणून lenovo a6000 घेतला.पन त्याचा लोचा असा झाला आहे की तो डेटा बराच खातोय.साधं मायबोलीचं एक पेज ओपन केले तरी 200kb खर्च होत आहेत .बॅगराऊंड डेटा जरी बंद केला तरि त्याची बोंब चालुच आहे.यावर एक ऊपाय म्हनून onavo extend नावाचे app डालो केले आहे,त्याचा थोडा फायदा होतोय.

धीरज काटकर,
या फोनसंदर्भात मदत लागली तर एखादा धागा आहे का ?
नवे सेन्सर्स अ‍ॅड करता येईल का ? कोणते कोणते अ‍ॅप्लीकेशन्स असावेत ?
गाडी चालवत असताना व्हॉईस नेव्हीगेशन साठी कोणती अ‍ॅप्स चांगली आहेत.. अशा किरकोळ शंकांसाठी. इथे नाही विचारत..

गाडी चालवत असताना व्हॉईस नेव्हीगेशन साठी कोणती अ‍ॅप्स चांगली आहेत >> मॅप माय इंडियाचं 'नॅव्हीमॅप' अ‍ॅप आहे. पहिले ७ दिवस वॉईस नॅव फ्री आहे. त्यानंतर रु. ५००/- देऊन लाईफटाईम परचेस करता येतं.

भारताचे नकाशे डालो करून मग वापरावं लागतं. एकदा नकाशा डालो केला की डेटा जवळजवळ नाही लागत. आपल्याला जो रीजन हवा तो तो डालो करता येतो. उदा. पूर्व भारत्/उत्तर भारत वगैरे. थ्रीडी इमारती, घर क्रमांक वगैरेही डालो करता येतात. वनटाईम डालो २५० ते ३०० एमबी पर्यंत जाते.
यानंतर जो काही सेल्यूलर डेटा लागतो तो, रस्ता चुकल्यावर री-रूट करायला अन लाईव ट्रॅफिक करता जातो.

फोन डायरेक्ट म्युझिक सिस्टिम ला यूएसबीनी कनेक्ट केला तर फोनमधले गाणे प्ले करतानासुद्धा टर्न-बाय-टर्न माहीती देतं हे अ‍ॅप. इंस्ट्रक्शन पूर्ण झाल्यावर अ‍ॅटिन्यूट झालेला गाण्याचा आवाज पूर्ववत होतो. सोबतच फोनची बॅटरीही चार्ज होतच राहाते.

हेच सेम अ‍ॅप पूर्ण भारतीय बनावटीच्या महिन्द्रा एक्सयूव्ही फाएव्ह ओ ओ मध्ये आहे.

मी सिजिक (Sygic india असं गूगल केलंत तर हेच येईल एक नंबरवर) फुकट डालो केलं होतं, जेव्हा त्यांची इंट्रो ऑफर होती. हेच ते मॅप माय इंडिया अ‍ॅप.
ऑफलाईनसाठी अत्यंत छान आहे. अपडेट्सही होतात.

पण.

गूगल मॅप्स सगळ्यात अल्टिमेट आहे. लेटेस्ट मॅप, सॅटेलाईट व्ह्यू, अन ह्यूज ह्यूज डेटाबेस. वाट्टेल त्या गल्लीतला पत्ता शोधून देतं.

मी दोन्ही सिमल्टेनियसली वापरतो.

माझ्या मांझा मधे ब्लूटूथ कनेक्ट आहे मुझिक सिस्टीमशी, प्लस स्टिअरिंग व्हीलवर कंट्रोल्स. एकदा बीटी कनेक्ट केला, की फोन घेणे, करणे हे स्टिअरिंगवरचे कंट्रोल वापरून करता येतातच, प्लस नॅव्ह अ‍ॅप्सच्या व्हॉइस इन्पुट्स स्पीकरवर येतात. कधी खिडकी उघडून चालवावी वाटली, तरी नॅव्ह इन्स्ट्रक्शन्स ऐकू येतील इतपत आवाज वाढवता येतो. (सेम ब्लूटूथ टेक लिनिया पुंटोमधेही आहे)

सिजिकचे प्लस पॉईंट म्हणजे
१. मराठी वा इतरही रीजनल लँग्वेजेस आहेत. म्हणजे, २०० मीटर नंतर, डावीकडे, वळा. अशी सूचना शुद्ध मराठीत येते, जी आपल्या डायवरसायबांना समजते Wink
२. पिक्चर इन पिक्चर करून त्यात ६ लेन हायवेतली कोणती लेन पकडावी, हे व्हिजुअल दिसते.

*
>>
वनटाईम डालो २५० ते ३०० एमबी पर्यंत जाते.
<<
नाही हो सायबा. अख्खा इंडिया १.४ जीबी आहे Happy

हो इब्लिस. पूर्ण भारताचा मॅप केला तर जाईलच ते डालो १.४/१.५ जीबी पर्यंत. मीही गूगल मॅप्स अन नॅव्हीमॅप्स दोन्हीही वापरतो... Happy

ल्युमिया ६३० मस्तच आहे. अजून सगळ्या खाचाखोचा बघून झाल्या नाहीयेत, पण बर्‍यापैकी सेटिंग्ज करून झाली आहेत. साडेपाच हजारात एकदम मस्त डील मिळालंय. Happy

lumia 630 चांगला फोन आहे परन्तू त्याला फ्रंट कॅमेरा नाही.नवीन ॲड्रॉईड् फोन घेताना खालील बाबी पहाव्यात्.
1.रॅम कमीतकमी 1 जिबी असावी
2.डिस्प्ले आपल्या हातात मावनारा असावा,उगाच मोठ्या डिस्प्लेच्यामागे लागण्यात अर्थ नाही.
3.कंपनीची आफ्टर सर्विस कशी आहे ते पहावे
4.डिस्प्ले हाय रिझॉल्यूशनचा असावा
5.नवीन ओएस अपडेट मिळणार आहे का ते पहावे.
6.फ्रंट कॅमेरा असावा
7.बॅटरी कमीतकमी 2000mah च्या पुढे असावी,तरच ती दीवसभर पुरते,नाहीतर सतत चार्ज करावी लागते.
8.corning glass protected आहे का ते पहावे.

Lumia 630 ❓ साडेपाच ? फारच स्वस्थ आहे.१स्क्रीन शॅाट,येतात.२पिक्सआर्ट ,छान.३व्हिडिओ कॅाल माझं अगत्य नाही त्यामुळे पुढचा कॅम्रा गरज नाही.४)५१२रॅमवरही याचे एंजिन धावते५)फाइल्स अॅप टाकले की अॅल्बम करता येतात ६)पिडिएफसाठ अडोब टाकले ७)ओफलाइन सेविंगसाठी "ओफलाइन ब्राउजर" टाकला।.

Srd - अ‍ॅमेझॉन वर ऑफर होती सिंगल-सिम ल्युमियाची.
फाईल्स अ‍ॅप टाकलंय. मलाही फ्रन्ट कॅमेर्‍याची काही गरज नाही. अडोबी रीडर इन्स्टॉल केले. पण ऑफलाईन ब्राउजर कुठला टाकू?

हा मोबाईल चांगला चालला तर दुसरा रिप्लेस करतानाही ल्युमियाचाच विचार प्राधान्याने करणार

ओके, योकु. खरंतर ऑफलाईन कन्टेन्ट स्टोअर करायची गरज फार क्वचितच भासते पण तरी माहित असलेलं बरं Happy

स्वस्त मिळतात म्हणून नव्या आलेल्या बाजारबुणग्या व केवळ कमीकिन्मतीवर लोकप्रिय झालेल्या तसेच प्रख्यात पण सर्विस नेटवर्क नसलेल्या कंपन्यांचे फोन घेऊ नयेत . कार्बन्,लावा, मायक्रोमॅक्स इ. कंपन्या क्वालिटीवऱ़ कॉम्प्रोमिज करून कॉम्पिटिटीव्ह किमती ठेवतात. त्यांच्या असेसरीज मिळत नाहीत . पार्ट्स मिळत नाहीत. आसुस, मोटोरोलो, अशा कंपन्यांचे सर्विस सेन्ट्रस नाहीत . आसूसाचा टॅब त्याचा चार्जिन्ग अडाप्टर - जो प्रोप्रायटरी आहे - जळाल्यावर मूळ कम्पनीचा येईपर्यन्त सहा महिने बंद ठेवावा लागला होता. प्रसिद्ध ब्रँडच्या असेसरीज डुप्लिकेट देखील भरपूर मिळतात उदा. डाटा कन चार्जिंग केबल, अडाप्टर्स , साडे तीन इंची जॅक वगैरे...

एक डिस्क्लेमर लुमिया वापरकर्त्यांकरता - तुमचा हॉटमेल/विंडोज/मायक्रोसॉफ्ट आयडी अन पासवर्ड कुठेतरी चांगल्या ठिकणी, प्रेफरेबली डायरीत/वहीत, जिथे तो लगेचच सापडू शकेल अश्या ठिकाणी नोंदवून ठेवा. बहुतेक वेळेला आपण हे आयडीज वापरत नाही (शक्यतो सगळे जीमेल यूजर्स; मोस्ट ऑफ द टाईम्स) अन ज्यावेळेला फोन फॉरमॅट करून री-अ‍ॅक्टीवेट करायची गरज पडते नेमकं त्यावेळेला हे हॉटमेल/विंडोज/मायक्रोसॉफ्ट आयडी अन त्याचा पासवर्ड सापडत नाही अन गोची होते Wink

युरेकाचा आत्तापर्यंत अनुभव उत्तम. आवाज कमी होता तो काही सेटींग केल्यावर बरा झाला आहे. जर फोन रुट केला तर उत्तम बनवता येईल. मुलगा अधुनमधुन गेम खेळत आहे पण फार गरं होत नाहीये फोन. लॉलीपॉप आले की मग करेन मी रुट.

नेमकं त्यावेळेला हे हॉटमेल/विंडोज/मायक्रोसॉफ्ट आयडी अन त्याचा पासवर्ड सापडत नाही अन गोची होते डोळा मारा >>> अगदी अगदी.

जरा अवांतर आहे.

हे फ्लिपकार्ट वाले दहा तारीख सांगून पाच तारखेलाच डिलीव्हरी देऊ म्हणून मेसेज पाठवतात. मेसेज सहा तारखेला मिळतो. दुपारी मेसेज येतो की पैसे न मिळाल्याने आता सहा तारखेला डिलीव्हरी मिळेल. आपण सकाळीच घर सोडलेलं असल्याने घरी पैसे ठेवलेले नसतात. मग पुन्हा मेसेज की आजही पैसे मिळाले नाहीत. मागे मायक्रोमॅक्स ए ११४ च्या वेळी तर मी आत्ता घरी पोहोचलो आहे , पण घरी कुणीच नाही असा फोन आलेला. मग फ्लिपकार्ट मधे फोन करून तुम्हाला फोन करून यायला काय होतं विचारलं तर म्हणाला पुन्हा येतील ते. पण आलेच नाहीत. मग फोन नंबर घेतला. तर म्हणाला आपण मधे कुठं तरी भेटू. त्याला म्हणालो चुलीत घाल तुझा फोन. मग निमूट आला.

Lumia 630-
१) "ओपरा मिनि" बिटा सर्व फाइल सेव करू देत होता परंतु १एप्रल चे नवे अपडेट आले त्यातून ही सोय उडवली आणि डब्बा झालाय.
२)"touch browser" सेविंगला फार वेळ घेतो खास नाही.
३)"offline browser" याच नावाचा browser फार छान आहे,ट्राइअल फ्रि आहे,५ साइट सेव केल्यावर रु ५५ ला विकत घ्या असा मेसेज येतो,नाही घेतला तरी browser चालूच राहतो.फास्ट आहे.
४)"{A} Route Tracker" app (jog bike,ski,drive) free आणि अफलातून आहे.डेटा नको ,offline चालते,altitude,distance,time,pause,stop,save in phone or OneDrive,replay route आहे.आपल्या फिल्डवर्क ,ट्रैकिंगसाठी आणि FREE !!
५)"UC BROWSER" कामाचा नाही.
६)"WEB TO PDF"नीट समजला नाही.
७)the Hindu ,Outlook यांचे app घेतले पण डब्बा आहेत.
८)Times of India चे बुकमार्क च चांगले चालतात.

डाउनसाइड
D1)magnetic sensor नाही.
D2).WAV file,.AVI playहोत नाही.
D3)Nokia express browser लोडेड आहे परंतु माइक्रोसोफ्ट ने बंद केले आहे बहुतेक ।

"Cycle Tracks GPS" हे app सुद्धा ओफलाइन चालते ,ट्रेकला वापरून पाहायचे आहे.
लुमिआ ६३०च्या वरचा फोन७३० अप्रतिम ५मेपि फ्रंट +८मेपि मेन कॅम्रा कार्लजाइसचा आहे ,ओनलाइन साडे अकरा हजार.

">>योकु ।६।April, 2015 - 11:03

बिल्ट-इन इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये ऑफलाईन वेबपेज स्टोअर करता येतात... स्मित>>

विंडोज ८.१मध्ये तो पर्याय दिसत नाही,save as option windows 7,7.8 मध्ये होता आता share page केले की फक्त लिंक साठवली जाते.

प्रवासात वाचण्यासाठी पेपरस वगैरे साठवले की नंतर नेटवर्क नसले तरी वाचत बसता येते हाओफलाइन कंटेंट चा उद्देश आहे.

मायक्रोमेक्स A190 कसा आहे. प्लीज लवकर सांगा. पहिला फोन खराब झालाय त्यामुळे सद्ध्या फोन नाहीये. चांगला कॅमेरा असलेला हवाय

दक्षिणा, सगळेच पीस खराब निघत नाहीत. आसुस ही तैवानीज कंपनी आहे आणि यांचे प्रॉडक्ट्स खरच चांगले असतात. तसं सॅम्संग्/एलजीचे फोन्स सुद्धा खराब निघु शकतात, अगदी हायर एंडचे देखिल

हायला मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टिम्स किती तरी दिसतायत.
किटकॅट, लॉलिपॉप, जेलीबीन, फ्रोयो, जिंजरब्रेड, आईस्क्रिम सॅंडविच Uhoh

कुठली ऑपरेटींग सिस्टिम बेस्ट आहे? Uhoh

लॉलिपॉप लेटेस्ट आहे. सध्या चालणारी किटकॅट. बाकी सर्व जुन्या आहेत

आसुस झेनफोन ५ चांगलं मॉडेल आहे. नेट वर त्याचा फीडबॅक देखिल चांगला दिलाय.

माझा पहिला फोन पॅनॅसॉनिक GD92 होता. तेव्हा मस्त चालला होता. P55 किंमतीच्या मानाने रॅम कमी वाटतेय.

किटकॅट , लॅालिपॅाप वगैरे अपडेट आले असले तरी खरी सिस्टम जेलीबिनचीच आहे. फोन अमुक एक सिस्टमसाठी बनवलेला असतो.तीन वर्षांनी सरळ नवीन ओएसचा फोन घेणे उत्तम.फोन अपग्रेड करणे म्हणजे पॅसेंजर गाडीतली खिडकीची मिळालेली जागा सोडून दोन प्लॅटफॅामपलिकडची इक्सप्रेस धावत जाऊन पकडणे आणि जेनरलच्या डब्यातून लटकत प्रवास करणे.

अरे पण असुस झेनफोन २ अजुन लाँच व्हायचाय ना. त्याची साधारण किंमत किती असेल?
मी ऐकलंय की एप्रिल १५ नंतर तो लाँच होणार आहे म्हणून. Uhoh

दक्षिणाताई.. असुस झक्कास हाय. http://www.sherv.net/cm/emoticons/yes/ok-sign-smiley-emoticon.gif माझा दादा वापरतोय गेला महिनाभर. जबराट स्पीड ,ट्चस्क्रीन पण येक नंबर हाय. आणि लाइट्वेट पण.

धन्यवाद अतृप्त, झेनफोन ६ चे २-३ सेलर पाहिले फ्लिपकार्ट वर. एक १५९०० ला विकतोय, एक १६९००
कोणाकडून घ्यावा ? सर्वात जास्त किमतिला विकणारा फास्ट डिलिव्हरी करतोय.

आता झेनफोन ६ घ्यावा की नविन येतोय झेन्फोन २ त्यासाठी थांबावं ते कळत नाही.,
कंपनी १५ हजार रिएम्बर्स करणार आहे त्यामुळे जास्तीचे पैसे घालावे की नाही असाही प्रश्न आहे.
कारण मी ग्रॅण्ड घेतला २१ हजार ला. आणी पश्चातापाच्या अग्नित होरपळतेय अजूनही. उगिच इतके पैसे घातले. कॅमेरा, व्हॉट्सप, गाणि फोन मेसेज सोडल्यास मी काहिहि वापरत नाही. Sad त्यामुळे फोनवारी जास्त पैसे घालवायचे नाहीत असं ठरवलं आहे.

दक्षिणा....दुकानात चौकशी करुन बघ .... मी सागर आर्केडमधल्या एका दुकानातुन १५ हजाराला घेतला ..... ते पण ३ महीन्यांपुर्वी..... आता अजुन कमीत मिळेल तुला

१५०००/- ही काही कमी किंमत नाही स्मार्टफोन करता. त्यात नंतरचे प्रॉब्लेस आलेत की जाम वैतागायला होतं. आफ्टरसेल्स सर्वीस ची बोंब असेल त आपली दैनंदिन कामं, नोकरीच्या वेळा वगैरे सांभाळत सर्वीससेंटरच्या वार्‍या नाहीच जमत.
वर पुन्हा वॉट्सॅप, फेबु, गेम्स खेळता येत नाहीत काही दिवस/ महीने हे आहेच. असल्या फोन्स मध्ये रॅम कमी असणे, बॅटरीचे प्रॉब्लेस, काहींत तर प्लेस्टोरच नसतं!; फोन सिस्टिम अप्डेट्स न मिळणे हे ही आहेतच की...

पुन्हा एकदा, मी तरी याच मताचा की व्यवस्थित ब्रँड पाहूनच फोन घ्यावेत. बरेच पर्याय आहेत १५ हजार पर्यंत. Happy

Pages