Submitted by poojadiwan on 8 August, 2009 - 09:12
दूध नक्को आई मला
हवा खूप चहा
फुला फुलांच्या कपबशीतुन
पाजव तूच मला
तूप्-साखर नक्को मला
हवी थोडी चटणी
लोणच्याच्या फोडीत पण दे
माझी माझी वाटणी
मोठ्ठी सायकल नक्को मला
स्कूटीच दे घेउन
पाय पुरत नसले तरी
ऐटीत जाइन बसुन
सारखी शाळा नक्को आई
मधून मारू बुट्टी
माझ्याशी खेळ नाहितर
करिन बघ कट्टी
रात्री बाबा नक्को आई
मिशी त्यांची टोचते
तुझ्या कुशित कश्शी मला
छान झोप लागते
गुलमोहर:
शेअर करा
आई ग्ग्ग्ग्ग ! मस्तच. कविता
आई ग्ग्ग्ग्ग ! मस्तच. कविता वाचता वाचता मला माझं पिल्लूच डोळ्यांसमोर येत होतं.
(No subject)
छान!
छान!
छान !!!
छान !!!
छान. शीर्षक जास्त आवडले.
छान. शीर्षक जास्त आवडले.
छान छान कवीता.
छान छान कवीता.
मस्त!
मस्त!
सुंदर.
सुंदर.
मस्त बालगीत
मस्त बालगीत
सुरेख. खूप छान.
सुरेख. खूप छान.
(No subject)
(No subject)
गोड गोड!
गोड गोड!