१.
अमुकरावांच्या संसारात फार रहावे लागते दक्ष
आमच्या मियांचे असते भलत्याच ‘बीबी’वर लक्ष
२.
लग्नाच्या पंगतीतच अमुकरावाना दिला चेकमेट
नाव घेताना म्हटलं, खरं घेऊ.. का डुप्लिकेट ?
३.
संसाराच्या ‘काहीच्या काही कविते’चं
तेव्हा मला कळलं गमक
बाहेर ‘मुक्तछंद’ चालू झाले ह्यांचे
जेव्हा घरी जुळेना यमक !
४.
अमुकरावाना झालीये भूतबाधा
त्यातून कधी बरे होतील काय ?
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?
५.
अमुकरावाना झालं अजीर्ण
केला जरी मी साधाच बेत
कितीही वाढलं तरी म्हणायचे
छान आहे, ‘अजून येवू देत’ !
६.
ह्यानी प्रपोज करताना म्हटलं
कधी गं जुळतील आपुल्या तारा
म्हटल आत्ताच तर पोस्ट केलंत,
थोड्या वेळाने रिफ्रेश मारा !
७.
दर भेटीत द्यायचे वचन लग्नाचं
एक दिवस म्हटलं: आता बास !
आपला ‘गुलमोहर’ होणार आहे
का नुसताच ‘जनरल टाईमपास’
८.
बैठकीनंतरच्या भेटीत वाटलं
ह्यांच्या एक कानाखाली देऊ का ?
म्हणाले फायनल करण्याआधी,
जरा तुझा 'प्रिव्ह्यू' घेऊ का ?
९.
साधं मत विचारलं तरी
सांगायला वेळ काय घेतात..
आधी शर्टाला बरं म्हटलं असलं
तरच साडीवर अभिप्राय देतात
१०.
’व्ही ऍंड सी’ झालाय ह्यांचा छंद
अगदी लहान गोष्टीही ताणतात
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात
११.
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले
***
योण्णा.. सहीच..:)
जोरदार आहेत.. उखाणे..:)
प्रत्येक उखाणा एकसे बढकर एक
त्यामुळे... अजून येउ देत..:)
हहपुवा
राफा, :)))))))))))))))))))))))))))
थँक गॉड...आज जरा मायबोलीवर येऊन बरं वाटतय... अजुन येऊ द्या :))))))))
-प्रिन्सेस...
मायबोली इश्टाईल...सहिच!!
मायबोली इश्टाईल...सहिच!!
सिक्सर
योण्णा,
बरेच दिवस मायबोलीवरून गायब होतास. आज बर्याच दिवसांनी उगवलास. आणि आल्या आल्याच सिक्सर ठोकलीस.
मस्तच जमले आहेत उखाणे. अजून येऊ देत ..............
--
अरूण
जोरदार!!
राफा........ एकदम जोरदार जमलेत बरं!!
नि थोडेफार 'त्याने' घेण्यासाठि पण बनवा!!
जबरदस्त!
चढत्या क्रमाने रंगत गेलेत बर्का उखाणे.
).
आणि किती दिवसांनी राफा इष्टाईल लाफा (लाफचे अनेकवचन हां तसल्या लाफा नाहीत)
इतकी गॅप अज्जिबात चोलबे नाय. अजून तर येऊ द्याच पण जरा लौकर लौकर येऊ द्या पुढचे (वाढप
जबरी!!!!
एकसे बढकर एक! 'मायबोली स्पिरिट' प्रत्येक उखाण्यात उतरलंय अगदी! मस्त! :))))))))
जोरदार एंट्री
अरेच्या, नविन गुलमोहर शोधता शोधता राफांनी एकदम यशस्वी एंट्री घेतली की गुलमोहरात........ एक से एक आहेत उखाणे.
राफा, स्वातीची मागणी पूर्ण करा हो. :))
भन्नाट
भन्नाट आहेत उखाणे...
लै भारी
सहीच.....
ये हुई ना बात!!!
जियो योण्णा जियो...
हसुन हसुन झाली आमची
भन्नाट अशी दशा हाय
आभार मानायला योण्णा तुमचे
नविन बीबी काढु काय?:):):)
सहीच
एकदम सहीच हो राफा.. जोरदार आहेत सगळेच...
अमुकरावांचे सोडा इथे
सारेच दुसर्याशी भांडतात
दिवे घ्या म्हणत म्हणत
शालजोडीतले हाणतात
'दिवे घ्या' वर एकही नव्हता म्हणून हा बळंच...
येऊ देत अजून थांबवू नका
उखाण्यांच्या गाडीला
शर्टाला तुम्ही दिला नाहीत तरी
दिलाय बरका अभिप्राय साडीला
visit http://milindchhatre.blogspot.com
जबरी!!!!
राहुल एकदम जबरेश्वर प्रसन्न की!!!!!!!!!
एक से बढ कर एक!!
ह ह पु वा
राफा, तुम्ही म्हणजे टू मच् आहात हा..
काय उखाणे आहेत.. एक सो एक जबरी.
भांडताना हवेत बघून म्हणतात
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?
हा मला सर्वात जास्त आवडलेला.
क्लास........!
राहूल... खल्लास..... एकसे एक धमाल आहेत उखाणे!
प्रसाद...
साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगायचं!
www.sadha-sopa.com
रिफ्रेश मारा ! lol
सगळेच जबरी
lol
उखाणे जोरदार आहेत.
पण मागच्या वर्षी प्रत्येक महिन्यात एक अशी गुलमोहर साधना केली होतीत.
ह्यावेळी बस एवढुसच?????????????????????
काहितरी कोटीबाज लेखन निदान डाकोरनाथाच्या कृपेने एखादा भीमा भोइर चा भाउ तरी यवुदेतच
सहिच. फारच
सहिच. फारच विनोदी आहे. मस्तच!!!
मस्तच
अरे राहुल.. भरपूर हसलो... येत जा की मधुन मधुन...
'परदेसाई' विनय देसाई
मस्त!!
मस्तच लिहिलेय!! LOL!!
मस्तच!!!
मस्तच!!!
लै धमाल
लै धमाल राफा :))
तुफान विनोदी
LOL :))))
भन्नाट
भाजी करपली म्हणून भांडतानाही
मधे ‘आर एस एस’ आणतात
मीलनराती घेतला हातात हात
आणि अमुकराव जरासे अडले
पुढे काय? ते विचारायला त्यानी
दोन नवीन बीबी उघडले
भन्नाट लिहीलय.
सही आहे
सही आहे राहूल...
LOL !!!
राफा एकदम धमाल लिहिल आहे
भन्नाट
जबरी आहेत हे उखाणे! सगळेच आवडले.
भलतीच 'बीबी'
ही कोटी नंतर कळाली
:D
मॉडरेटर इथे लक्ष देतील काय ?
राहुला, ह.ह.पु.वा! सगळेच उखाणे फक्कड जमलेत.
मिल्या
वाईट रे
वाईट रे भाऊ .... LOL
Pages