पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.
असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.
ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.
वर्षुतै.. लिहा लवकर देशात
वर्षुतै.. लिहा लवकर
देशात आल्यापासुन तुनळी शोध नि पाकी मालिका बंद झालयं माझं .. इथे जे लिहताय तितकचं बघतेय... चॅनेल वर नविन मालिका कधी येतेय यावर लक्ष ठेवेन आता..
जिज्ञासा.. धन्यवाद.. अॅड केली वरची मालिका लिस्ट मधे
१ ) बेहद. २ ) जब हम मिले
१ ) बेहद.
२ ) जब हम मिले
३) एक मामूली सी लडकी
४) जरा सी औरत
५) साया
६ ) सौतन मेरी सहेली
७)बर्न्स रोड की नीलोफर
८) रिआया
९) घर और घटा
१०) शाली
११) कालक (Kaalak)- अ मस्ट वॉच
या सगळ्या माझ्या फेव लिस्ट मधे आहेत..
हॅपी वॉचिंग चनस
धन्यवाद.. बर्न्स रोड की
धन्यवाद..
बर्न्स रोड की नीलोफर >> मिपावर एक जुना लेख होता.. गेल्या आठवड्यात वाचला मी
ओ वॉव.. मि पा से बिल्कुल
ओ वॉव.. मि पा से बिल्कुल अजनबी हूँ ..
आता बघते काय आहे मिस्ळ पाव ..
वर्षू नील, बेहद बघितली आहे
वर्षू नील, बेहद बघितली आहे आणि बेहद आवडली आहे! आता बाकीच्याही नक्की बघेन!
चनस, ही (सदके तुम्हारे) नक्की आवडेल तुला. I just realized that it is romantic to the core! And if you are hopelessly romantic (like me) you'll love it!
तलखिया ( या वर अर्धचंद्र कसा
तलखिया ( या वर अर्धचंद्र कसा द्यावा बरे) जरूर पहा.God of small things वरून प्रेरणा घेतली आहे.सादरीकरण झकास.यू ट्यूब वर एवढ्या टेलिफिल्म/मालिका पाहत आहे की डोकं भंजाळले आहे. कितने गिर्हे बाकी है पहा.
Waqt ne kiya kya hansi
Waqt ne kiya kya hansi sitam..Starts today on zindagi...fawad in a different look....nextvweek a new serial featuring the actress who played kashaf
जिज्ञासा.. आय अॅम
जिज्ञासा.. आय अॅम
तलखियाँ, God of small things
तलखियाँ,
God of small things वरून प्रेरणा घेतली आहे>>> त्यावरच बेस्ड आहे.
सादरीकरण झकास>>> पुस्तक प्रमाण मानल तर, सादरीकरण खूपच dramatic झालय
(वैयक्तिक मत)
Waqt ne kiya kya hansi sitam
Waqt ne kiya kya hansi sitam ही खास झी जिंदगी साठी बनवली आहे का? युट्युबवर नाहिये ह्या नावाची सिरियल.
<< Waqt ne kiya kya hansi
<< Waqt ne kiya kya hansi sitam ही खास झी जिंदगी साठी बनवली आहे का? युट्युबवर नाहिये ह्या नावाची सिरियल.
>>
बर्याच पाकिस्तानी मालिका नाव बदलुन झी जिंदगी वर दाखवित आहेत.
पेरू,दास्तान नावाची मालिका
पेरू,दास्तान नावाची मालिका 'वक्त....' नावाने दाखवत आहेत.
हम टीव्ही वर २०१० मध्ये ही
हम टीव्ही वर २०१० मध्ये ही दास्तान (वक्त ने किया क्या हसीं सितम) या नावाने प्रसारित झाली आहे.
रझिया बट्ट यांच्या 'बानो' कादंबरीवर आधारित आहे.
नावं का बदल्तायत आप्ल्याकडे
नावं का बदल्तायत आप्ल्याकडे सिरीयल्स दाखव्ताना ?
पुस्तक प्रमाण मानल तर,
पुस्तक प्रमाण मानल तर, सादरीकरण खूपच dramatic झालय>>>>>>>> पुस्तक वाचून बरीच वर्षे झाली असल्यामुळे फारसं आठवत नव्हतं. पण तलखियाँ, सिरियल अतिशय आवडली.त्यातील लहान मुलांसह सगळ्यांचेच अभिनय इतके सहजसुंदर आहेत की मानलं त्यांना.
ओह! दास्तान चं नाव वक्त ने
ओह! दास्तान चं नाव वक्त ने किया..इतकं लांबलचक का केलं?
दास्तान छान नाव आहे आणि सुंदर मालिका आहे! भारत - पाकिस्तान फाळणीसारखा गंभीर विषय काळजीपूर्वक हाताळला आहे. फक्त मी ती पूर्ण बघू शकले नाही. मधेच सोडून दिली! फाळणी वगैरे म्हटलं की मला जरा बघवत नाही! टची विषय एकदम! कधीतरी एक extra heart घेऊन बसेन आणि बघेन!
तल्खीयाँ देखिल एकदा बसून binge watch करणार आहे. सुरुवात पाहीली तेव्हा आवडली होती! सनम सईद उत्तम अभिनेत्री आहे!
सनम सईदची नविन मालिका 'रंजिश'
सनम सईदची नविन मालिका 'रंजिश' सुरु होतेय २७ मार्चपासुन रात्री १० वा.
वक्त ने .. आणि सदके तुम्हारे बघायला सुरु केलयं
'वक्त ने किया.. ' कोण पहातंय?
'वक्त ने किया.. ' कोण पहातंय? काय चालू आहे?
मी पाहतोय. पाकिस्तान
मी पाहतोय. पाकिस्तान निर्मिती आणि त्याकरिता झटणार्या मुस्लिम लीगच्या एका कार्यकर्त्याची प्रेमकथा आहे.
दास्तान , यूट्यूबवर पाहिली
दास्तान , यूट्यूबवर पाहिली होती.सनम बलोच हिचा अतिशय सुंदर अभिनय आहे.फाळणीच्या दुर्दशा दोन्ही बाजूने
भीषण तर्हेने अनुभवल्या.ह्या मालिकेतील कुटुंबापुरतं म्हणायचे तर त्यांचा व्ह्यू बरोबर आहे.याबाबत थोडीशी एकांगी मालिका आहे.शेवट मात्र as expected.एकंदरीत मालिका चांगलीच आहे.
अरे इथे का शांतता? ''वक्त
अरे इथे का शांतता? ''वक्त ने..'' मधे झाली का फाळणी?
झाली.
झाली.
काल रात्री जिंदगी वर `इज्जत'
काल रात्री जिंदगी वर `इज्जत' नावाची एक सिरीयल पाहिली (देखी जहा बुराई- जाके वहा टकराई टाईप नायिका असलेली) ; त्यात घरातल्या हॉलमधे गणपतीची एक फ्रेम पाहिली चक्क !!
झी-जिंदगी वरचं 'कितनी गिर्हे
झी-जिंदगी वरचं 'कितनी गिर्हे अब बाकी हे' संपलं का ? हल्ली लागत नाही ते
त्यात घरातल्या हॉलमधे गणपतीची एक फ्रेम पाहिली चक्क>>>
पाक मध्ये अनेक कुटुंबे जबरदस्तीने धर्मांतर घडवलेली आहेत
पाक मध्ये अनेक कुटुंबे
पाक मध्ये अनेक कुटुंबे जबरदस्तीने धर्मांतर घडवलेली आहेत > पण तो काही लाईव शो नाहीये, मालिका आहे. धर्मांतराचा संबंध नाहीये वाटत काहीच.
मेरे हमदम मेरे दोस्त ,यू
मेरे हमदम मेरे दोस्त ,यू ट्यूबवर पहात आहे.चांगली वाटतेय.
बऱ्याच मालिका पाहून झाल्या
बऱ्याच मालिका पाहून झाल्या गेल्या काही दिवसांत. सदके तुम्हारे बद्दल तर लिहिले आहेच. त्यातलं सामिया मुमताझचं काम पाहून तिच्या दोन मालिका पाहिल्या - मेरी जात जर्रा-ए-बेनिशान आणि हाल-ए-दिल.
मेरी जात तशी बरीच conventional आणि predictable गोष्ट आहे पण दोन काळातली गोष्ट समांतर दाखवल्याने खूप कंटाळवाणी होत नाही. बरीच melodramatic आहे पण सगळ्यांचे अभिनय उत्कृष्ट! समीना पीरझादा आणि फैझल कुरेशी विशेष उल्लेखनीय!
हाल-ए-दिल मध्ये बऱ्याच प्रेमकथांची खिचडी आहे. छान आहे! काही अपेक्षित, काही अनपेक्षित वळणे घेत कथा पुढे जाते. मला शेवट खूप आवडला! ही मालिका आपल्याकडे बनली असती तर असा शेवट झाला नसता असं वाटलं. We always have very stereotypical ends.
ह्या तीनही मालिकांमध्ये (सदके, मेरी जात आणि हाल ए दिल) सामिया मुमताझ तिच्या रोल मध्ये फिट बसली आहे. हे तीनही रोल्स इतके वेगवेगळे आहेत (उत्तर धृव -दक्षिण धृव) की तिच्या अभिनय क्षमतेचं फार कौतुक वाटलं! she absorbs the color of the character like water! I respect her a lot more now!
बाकी दोन पाहिलेल्या मालिका म्हणजे दोराहा आणि दाम. दोन्ही मेहरीन जब्बारच्या आहेत. का कोण जाणे मला दोराहा आजीबात आवडली नाही! फार टिपिकल आणि बोअर वाटली. दाम चांगली आहे. पण ह्या दोन्हीचे युट्युब व्हिडिओ इतक्या वाईट प्रतीचे आहेत की बघताना त्रास होतो!
मला जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे ह्या मालिकांमध्ये कलाकारांच्या लुक्सवर घेतलेली मेहनत! मेरी जात आणि हाल ए दिल दोन्ही मध्ये फैझल कुरेशीची भूमिका इतकी वेगळी आहे की मला काही एपिसोड्स तो ओळखूच आला नाही! सदके मध्ये रेहान शेख यांना पाहिलं आणि त्यांना प्रत्यक्ष पाहिलं तर ओळखू येणार नाहीत इतका वेगळा गेटअप आहे. ह्या detailing चं कौतुक आहे!
सदके तुम्हारे छान होती. एन्ड
सदके तुम्हारे छान होती. एन्ड काही पटला नाही. पण 'सत्य घटनेवर' आधारित आहेत म्हणतात.
मी 'डायजेस्ट राईटर' पाहुन संपवली. कथा बरी होती पण त्या रडक्या बॅकग्राउंड म्युझिकचा वैताग आला. कथेत नेहमीचे मुलगा मुलगी भेद, सासुने सुनेचा छळ गोष्टी होत्याच.
दयार ए दिल पाहायला सुरुवात केली पण तिचीही सुरुवात टिपिकलच होती. बघु आता पुढे काही वेगळे होतेय का.
मेरा नाम युसुफ पण चांगली वाटतेय. लव्ह स्टोरी आहे. सध्या तरी चांगली चाललिये.
पेरू, सगळ्याशी सहमत! हो,
पेरू, सगळ्याशी सहमत! हो, खलील साब म्हणतात की एकुणेक गोष्ट खरी आहे!सदके चा सदमा अजून गेलाय असं वाटत नाहीये मला आता महिना होईल मालिका संपून पण आजही जर दोन मिनिट डोळे मिटून सदकेची गोष्ट आठवली तर डोळे पाण्याने भरून येतात. मी इतक्या सिरीयसली बघत नव्हते ही सिरीयल (असं मला वाटत होतं)! पण तरी असं का होतंय हे मला माहिती नाही आणि सदके नंतर काहीच आवडत नाहीये खूप जास्त! त्यातल्या त्यात मला मेरा नाम युसुफ आवडत्येय Mehreen and KRQ combo!
सदके च टायटल साँग खुप छान
सदके च टायटल साँग खुप छान होते खुप म्हणुन असे होत असेल हिरोइन पण मस्तच होती. हिरो अजिब्बात आवडला नाही. डायलोग्ज्स पण मस्त रोमँटीक होते.
Pages