ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत. परंतु नेमकी माझी बारावीची पूर्व परीक्षा चालू होती दुसरया दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी माझा अर्थशास्त्राचा पेपर होता. अभ्यास पूर्ण झाला असल्यामुळे तास मला काही टेन्शन नव्हत. परंतु स्कोरिंग साठी अभ्यासाची माझी धडपड चालू होती. पण ज्यावेळी मला समजले कि आज प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संतूर वादक आदरणीय पंडित शिवकुमार शर्माजी येणार आहेत तेंव्हा परीक्षेचा कसलाही विचार न करता मी त्या कार्यक्रमाला जाण्याचे ठरविले कारण संतूर हे माझ खूप आवडते वाद्य आहे आणि पंडित शिवकुमार शर्माजी हि माझी संगीत क्षेत्रातील आवडती व्यक्ती आहे. आणि त्यांचा कार्यक्रम एवडा जवळ आणि मी जाणार नाही अस तर होऊ शकत नाही. त्यामुळे मी आवर्जून त्या कार्यक्रमासाठी गेले.
कार्यक्रम साधारणता ६ वाजेपर्यंत चालू झाला सुरुवातीला काही मान्यवरांचे कार्यक्रम झाले. परंतु त्यावेळी पंडित शिवकुमार शर्माजी आलेले नव्हते. अचानक एकदम गोधळ झाला कि मकरंद अनासपुरे आले म्हणून सौरभभैय्या, मोनिकाताई, व मी पळत गर्दीच्या ठिकाणी गेलो व खूप आटापिटा करून मकरंद अनासपुरे सरांचा ऑटोग्राफ घेतला आणि आनंदाने जागेवर येऊन बसले. काही वेळ कार्यक्रम पहिला आणि थोड्याच वेळात पंडित शिवकुमार शर्माजी आले म्हणून एकाच गोंधळ उडाला. आणि ते एकता क्षणी मी सर्व काही विसरून त्यांना भेटण्यासाठी धावत त्यांच्या गाडीजवळ पोहचले. गर्दीतून वाट काढत मी त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांच्या पाया पडले तसे ते माझ्याकडे बघून प्रसन्न हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज होते अगदी सिरीयल मध्ये देवी देवतांच्या चेहऱ्यावर असते तसेच. क्षणभर मी त्यांच्याकडे पाहताच राहिले. मी माझ्याजवळचा कागद आणि पेन ऑटोग्राफ साठी त्यांच्यासमोर धरला आणि ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी गोष्ट घडली.
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले कि “ बेटा आप कभी भी किसीसे ऑटोग्राफ मत मांगना बल्की आप इतनी बडी हो जावो कि सारी दुनिया आपसे ऑटोग्राफ मांगे ”. तो क्षण माझ्या आयुष्यातल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता. जो कि मी कधीही विसरणार नाही. त्यानंतर खूप कलाकारांशी जवळून बोलन झाल परंतु मी कधीही कोणाला ऑटोग्राफ मागितला नाही. आज हि गोष्ट सर्वांशी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे.
एक अविस्मरणीय क्षण
Submitted by CutePari on 24 March, 2015 - 08:02
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
खूप छान लिहिलेय!
खूप छान लिहिलेय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहिलेय. पंडीत शिवकुमार
छान लिहिलेय.
पंडीत शिवकुमार शर्मांची माझ्यकडे पण अशीच एक सुंदर आठवण आहे. एक धागा किश्शांचा मध्ये बहुतेक मी लिहिली आहे.
छान अनुभव.. त्यांना मी
छान अनुभव.. त्यांना मी सिद्धीविनायकाच्या देवळात बघितले होते. तूम्ही म्हणता तसे तेज त्यांच्या चेहर्यावर आहेच.
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान अनुभव .. अगदी असाच एक
छान अनुभव ..
अगदी असाच एक अनुभव मलासुद्धा आलेला आहे. उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बाबतीत.
किती स्पुर्तीदायी आणि तेजस्वी असतात हे लोकं.. !!
छान !!
छान !!
छानंय
छानंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आहा.. छान अनुभव आहे आपला..
आहा.. छान अनुभव आहे आपला..
मस्त आहे अनुभव...
मस्त आहे अनुभव...