दक्षिण आफ्रिकेचे अश्रू

Submitted by बेफ़िकीर on 24 March, 2015 - 06:08

दक्षिण आफ्रिकेचे अश्रू पाहून रडू आले. खरे तर उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात क्रिकेट जिंकले असे म्हणावे लागेल. पाऊस पडला तरीही सामना खेळला गेला. भरभरून क्रिकेटचा आनंद लुटला गेला. पारडे प्रत्येक चेंडूला वरखाली होत राहिले. शेवटच्या चेंडूपर्यंत निकाल काय लागेल ह्या उत्सुकतेने रोमांच आले. आफ्रिकेने दबावाखाली येऊन दोन महत्वाचे झेल सोडले आणि एक धावबादची संधीही! ह्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त जवळपास सगळेच क्रिकेटरसिक मन गुंतवून बसलेले होते.

न्यूझीलंडच्या प्रेक्षकांना इतका जल्लोष करताना पाहण्याची संधी आजवर आलेली नव्हती. ह्या सामन्याने ती संधीही मिळवून दिली. त्याशिवाय ए बी डी आणि त्याच्या सहकार्‍यांनी , काही अपवाद वगळता, दिलेली झुंज रोमांचकारी ठरली. सगळे प्रेक्षक, धावपट्टी, वातावरण सगळेच परकीय असतानाही अशी झुंज देणे म्हणजे क्रिकेटवरील खरे प्रेम व भक्ती म्हणावी लागेल.

म्हणूनच मॉर्केल, एबीडी आणि स्टेनचे थबकून उभे राहणे, डोळे भरून येणे, मॉर्केलच्या गालांवरून त्याचे अश्रू वाहणे, कोणीतरी कोणाचेतरी सांत्वन करणे हे सगळे पाहून आपलेही डोळे भरून आले नाहीत तर नवल म्हणावे लागेल.

दुसर्‍या उपांत्य सामन्यात आपला देश जिंकेल किंवा जिंकावाच हे तर आपल्याला वाटत असणारच, पण ते सगळे क्षणभर बाजूला ठेवून असे म्हणावेसे वाटते की क्रिकेटचा सेमीफायनल / फायनलचा सामना व्हावा तर आज झाला तसा व्हावा.

दक्षिण आफ्रिका, तुम्ही आजवर जिंकला नसाल, प्रत्येक महत्वाच्या सामन्यात घातकी खेळून थट्टेचा विषयही ठरला असाल, स्वदेशात जाताना कदाचित तुमची मान ताठ नसेल, पण वुई ऑल क्रिकेट लव्हर्स नो दॅट यू आर वन ऑफ द ग्रेटेस्ट टीम्स अ‍ॅन्ड वुई लव्ह यू!

-'एक क्रिकेटरसिक'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरय!!!

खरय ........ पहिल्यांदाच सेमी फायनल पर्यंत द. आ. पोहचली होती आणि खेळ हि तितकाच अप्रतिम केला होता त्यांनी पण शेवटच्या दबावामुळे त्यांनी हा सामना गमावला आणि किविज नि अंतिम फेरी गाठली .

दुसर्‍या उपांत्य सामन्यात आपला देश जिंकेल किंवा जिंकावाच हे तर आपल्याला वाटत असणारच, पण ते सगळे क्षणभर बाजूला ठेवून असे म्हणावेसे वाटते की क्रिकेटचा सेमीफायनल / फायनलचा सामना व्हावा तर आज झाला तसा व्हावा. >> +१

चोकर्स ?
काही मूर्ख माणसं ज्यांना खेळ म्हणजे काय ते कळत नाही ते आज द. आफ्रिकेला चोकर्स म्हणणार !

इतके वर्ष इंग्लंड क्रिकेट खेळत आहे पण अजून एकही मोठा एकदिवसीय कप जिंकले नाहीत त्याना कुणी चोकर्स म्हणत नाही.

न्युझीलंड अतापर्यंत हारतच आले पण तेही चोकर्स नाहीत.
फक्त आफ्रिकाच का ?

आजची मॅच ज्या पद्धातीने खेळली गेली ती पहाता आज क्रिकेट या खेळाचा विजय झाला. पहिल्यांदा या स्पर्धेत "जान" आली

जबरदस्त सामना
नशीबाने शेवटची ओव्हर बघायला मिळाली पण स्कोअर पाहत होतोच.

दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळ केला.
छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्यांनी फरक पडला आजही.
पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर्णधाराची खेळी. इतके कठीण लक्ष्य असताना त्याच्या धुवांधार खेळीने अपेक्षित धावगती कधीही अवास्तव होऊ दिली नाही.

हा खरतर अंतीम सामना हवा होता. न्यूझिलंड जिंकल्याचा जितका आनंद झाला तितकेच दू:ख्ख दक्षिण अफ्रिका हरल्याचे झाले.

ऐन सेमीस मध्ये दोन रनाऊट्स आणि एक कॅच टाकणे हा अपराधच ठरला.... !!!

बॅद लक टू आफ्रिका बट हॅप्पी फॉर किवीज....

न्यूझीलँडर्स ने आल्या आल्याच इतका आक्रमक पवित्रा घेतला.. कि यावेळी हाच देश सेमी फायनल्स मधे येईलसं वाटलं होतं.. पण साऊथ आफ्रिका ही तितक्याच तोडीची वाटत होती..
खैर, आत्तापर्यन्त दोन्ही देशांपैकी एकही सेमीज मधे नव्हता आला.. त्यामुळे विजयी देश , अभिनंदनास पात्रच आहे. Happy सो मी टू हॅपी फॉर न्यूझीलँड..

एक मात्र आहे दोन्ही देशांमधील सामना अतिशय खिळवून ठेवणारा होता.

चोकर्स ?
काही मूर्ख माणसं ज्यांना खेळ म्हणजे काय ते कळत नाही ते आज द. आफ्रिकेला चोकर्स म्हणणार !

इतके वर्ष इंग्लंड क्रिकेट खेळत आहे पण अजून एकही मोठा एकदिवसीय कप जिंकले नाहीत त्याना कुणी चोकर्स म्हणत नाही.

न्युझीलंड अतापर्यंत हारतच आले पण तेही चोकर्स नाहीत.
फक्त आफ्रिकाच का ?

>>
शाहिर , माझ्या मते चोकर्स म्हणजे जिंकत आलेला सामना दबावाखाली येऊन हरणारे . अफ्रिकेच तस होत म्हणून त्याना नाव पडलय .
आणि त्या अर्थाने अफ्रिका चोक्ड टू डे ऑल्सो .
शेवटच्या ७ चेंडूत त्यानी एलियट ला बाद करायच्या ३ संधी सोडल्या ( १ कॅच अन २ किपर रन ऑट) अन तो त्यांचा शेवटचा फलंदाज होता .

चोकर असण्यात तितकस वाईट ही नाही . Happy

आत्तापर्यन्त दोन्ही देशांपैकी एकही सेमीज मधे नव्हता आला.

>>> दक्षिण अफ्रिका ९९ च्या कपमध्ये सेमीज मध्येच हरली होती वर्षू ताई. Happy ९२ साली सुद्धा बहूदा पण नक्की आठवत नाही.

इतके वर्ष इंग्लंड क्रिकेट खेळत आहे पण अजून एकही मोठा एकदिवसीय कप जिंकले नाहीत त्याना कुणी चोकर्स म्हणत नाही.

न्युझीलंड अतापर्यंत हारतच आले पण तेही चोकर्स नाहीत.>>>>>

अहो चोकर्स म्हणतात कारण कागदावर फार भारी दिसणारा संघ महत्वाच्या क्षणी मार खातो. अपेक्षाभंग होतो म्हणुन चोकर्स म्हणतात.
इंग्लंड कडुन कधीच अपेक्षा नसतात, ते जिंकले तरच आश्चर्य वाटेल.
इतकी वर्ष न्युझीलंड चा संघ पण असाच असायचा.

द. आफ्रिकेचं नशीब पण थोडं वाईट आहे. मागे पाऊस पडल्यामुळे एका चेंडूत २४ की २५ धावा करण्याचं अशक्य लक्ष्य ठेवलं गेलं. याही वेळेला पावसामुळे धावा कमी झाल्या. पण त्यांनी संधी घालवल्या हेही खरं आहे.

चिमण Proud

बेफ़िकीर यानी क्रिकेटरसिक या नावाने आज इथे दिलेला लेख वाचताना मॉर्केल, एबी डिलिव्हर्स, स्टेन, तो विकेटकीपर यांच्या डोळ्यातून वाहाणारे अश्रू क्षणाक्षणाला समोर येत होते. ४३ + ४३ षटके, २८७ + २९९ धावा, त्यात शेवटच्या दोन चेंडूवर पाच धावा हे लक्ष्य....कालपर्यंण्त नावही माहीत नसलेला ग्रांट इलिअट याने अक्षरशः दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातील घास त्या घणाघाती षटकाराच्या साहाय्याने खेचून आणल्यावर सुमारे पन्नास हजार ऑकलंडवासियांनी वेड लागेल असा केलेला जल्लोष, ती आसमंत दिपवून टाकणारी आतषबाजी, वय वर्षे दहा ते नव्वदीतील ज्येष्ठ नागरिक भान हरपून नाचत आहे.....व्वा ! कुणी कितीही कसेही क्रिकेटला नावे ठेवून घेऊ देत, पण आजचा हा सामना तुम्हा आम्हा भारतीयांना सोन्याचा सामना वाटला तर खुद्द त्या जेत्या आणि पराजितांना काय भावना देवून गेला असेल याचीच कल्पना करत राहिलो आम्ही.....खरंच ते सातआठ तास म्हणजे देहभान हरपून जाणे म्हणजे काय त्याचेच सुंदर असे उदाहरण.... दक्षिण आफ्रिकेचे आसूही आपले आणि न्यूझिलंडचे आनंदाश्रूही आपलेच म्हणायचे.

बेफिकीर एका ठिकाणी म्हणतात..."...वुई ऑल क्रिकेट लव्हर्स नो दॅट यू आर वन ऑफ द ग्रेटेस्ट टीम्स अ‍ॅन्ड वुई लव्ह यू! ...." ~ यातील वुई लव्ह यू....स्पिक्स अ लॉट अ‍ॅन्ड परफेक्ट.

खरे आहे.

But that's really the difference between good team and champion team unfortunately!

SA had lost to ind, pak in the league and beat ire, uae etc.. their real big game was SL which they won convincingly... but overall they didn't deliver when it mattered!

Better luck Next Time South Africa!

NZ has emerged as Champion team.. It will be truly fitting to meet another Champion in the final Happy

छान लिहिलेय. मला हि मॅच बघता आली नाही, पण ते क्षण डोळ्यासमोर उभे राहिले.

अगदी रहावत नाही म्हणून लिहितोय. भारतीय लोक जेवढे क्रिकेटवर प्रेम करतात तेवढे या दोन्ही देशातले ( जनरल पब्लिक म्हणतोय ) करत नाहीत. सध्या माझ्यासोबत ६ साऊथ अफ्रिकन काम करताहेत, त्यांच्यापैकि कुणालाही अशी मॅच चालू आहे याची कल्पनाही नव्हती. मागे ऐन मोसमात मी ऑकलंडला होतो तिथेही तोच प्रकार.

<<<<<भारतीय लोक जेवढे ............. ऑकलंडला होतो तिथेही तोच प्रकार.>>>>
कामे करतात बिचारे. त्यांच्या देशाचे उत्पादन खूप जास्त आहे, भारता ऐवजी लोकसंख्या नाही म्हणून दिसत नाही. पण भारतात काम गेले की अनेक वर्षे वाट पहावी लागते, म्हणून भारतीयांना परदेशी नेतात नि त्यांच्यावर लक्ष ठेवतात, तेंव्हा कामे होतात पटापटा. Happy

भारतीय लोक जेवढे क्रिकेटवर प्रेम करतात तेवढे या दोन्ही देशातले ( जनरल पब्लिक म्हणतोय ) करत नाहीत. >> उपखंडाव्यतिरिक्त कुठल्याही देशात आपल्यासारखे क्रिकेट फॉलोअर्स नाहीत Happy

याच लोकांना रग्बीबद्दल विचारा दिनेश Happy

खरे आहे बेफि, आज त्यांचे चेहरे बघून खूप वाईट वाटले. या इमेजेस अनेक वर्षे डोक्यात राहतील.

Pages