आज सकाळी साम चॅनलवर सेंद्रीय खतावर शेतीकरुन यावल - जळगाव येथे आश्रमशाळा चालवुन ग्रामीण आणि वनवासी लोकांना रोजगार निर्माण करणारे श्री प्रभाकर मांडे यांची मुलाखत पहात होतो.
"शेणखत आणि सेंद्रिय खताने माझी गव्हाची लोंबी पहायला लांबुन लोक येतात. माझ्या जमिनीचा पोत केवळ सेंदिय खताने सुधारला आहे. गोबर गॅस मधुन निघणार्या स्लरी वापरुन पडीक जमीन मी सुपीक बनवली आहे.
माझ्या पिकांवर कधीच रोग पडत नाही कारण मी सेंद्रिय खते वापरतो " उदगार त्यांचे आहेत.
अश्या एक ना दोन, अनेक उपक्रम साधुन हे गृहस्थ शेती करत आहेत.
यात त्यांच्या पत्नीची त्यांना साथ आहे.
त्यांच्या नुसार फक्त एक दुभती गाय हे अल्प शेतीधारकांना वरदान ठरुन शेणखताने १-२ एकर शेतीला पुरक खत मिळुन शेती किफायती होते.
जास्त जनावरे असतील तर गोबर गॅस सयंत्र वापरता येते आणि इंधनाचे पैसे वाचुन शेती साठी आणखी खत निर्माण करता येते.
यांना महाराष्ट्र शासनाचा धनश्री पुरस्कार प्राप्त आहे.
यांच्या विस्त्रुत मुलाखतीसाठी जळगाव मधले कोणी मायबोलीवरील मान्यवर प्रयत्न करतील का?
छान सकारात्मक घटना व
छान सकारात्मक घटना व वस्तुस्थिती सांगितली आहे. धन्यवाद.
दुभती गाय हा शब्द का वापरला
दुभती गाय हा शब्द का वापरला आहे ?
भाकड गायीचाही उपयोग होइल का ?
जाऊन मुला-खत घेऊन या आणि
जाऊन मुला-खत घेऊन या आणि पुण्यात चालू करण्याकरीता हार्दिक शुभेच्छा
बैलाचे शेण चालेल का?? जर्सी
बैलाचे शेण चालेल का?? जर्सी गायीच्या पोटी जन्मलेल्या 'गोवंशाचे' पण चालेल का??
नि३जी, शेणखत आणि शेती या
नि३जी, शेणखत आणि शेती या संदर्भात माहीती मिळेल असं वाटलेलं धाग्याचं शिर्षक वाचुन.
माझ्या भावानेही सेंद्रीय खताचा प्रयोग करून पाहीलाय गुलछडीची फुलशेती करताना. अगदी, रासायनिक कीटकनाशकांऐवजी तो शेण+गायींचे (फक्त देशी) मुत्र यांच मिश्रण करून वापरायचा. त्याच्याकडे स्वत:ची अशी ८-९ जनावरे असताना देशी गायींच्या मुत्रासाठी कॅन घेऊन फिराव लागायचं अन विकत घ्याव लागायचं.
पण रिजल्ट उत्तम होते यात शंका नाही.
आज पर्यंत हे मला माहित
आज पर्यंत हे मला माहित नव्हते.
http://www.svyambanegopal.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4...
आज पर्यंत हे मला माहीत
आज पर्यंत हे मला माहीत नव्हते.
http://www.dialogueindia.in/magazine/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8...
सुप्रिम कोर्टाचा निर्णय प्रत
सुप्रिम कोर्टाचा निर्णय प्रत :
ह्या केस वरुनच गोहत्या प्रतिबंध कायदा आलाय !
https://archive.org/stream/SC_judgement_on_cow_slaughtering_2005_india/S...
कर्नाटकातला एक शेतकर्याने
कर्नाटकातला एक शेतकर्याने गायी ( देशी) पाळल्या आहेत.शेतात गवत लावून कोणतेही रसायन न वापरता गवत वाढवून त्या गायींना खायला घालतो.त्यांचे दुधाचे तुप,गोमुत्र,शेणाच्या राखेचे दंतमंजन विकतो.
काही वर्षांपर्वी खानदेशरत्न कार्यक्रमात तिकडच्या लोकांच्या डॅाक्युमेंट्री सह्याद्रीवर दाखवत.काही जणांकडे शंभरेक गायी आहेत.
मुळात सेंद्रिय खते म्हणजे काय
मुळात सेंद्रिय खते म्हणजे काय हे स्पष्ट व्हायला हवे, कंपोस्ट , बायोमास कंपोस्ट , वर्मी कंपोस्ट आहे का बायो फ़र्टिलाइज़र म्हणजे रायझोबियम का अज़ोटोबैक्टर की ब्लू ग्रीन अलगी वगैरे आहे त्यात हे स्पष्ट व्हायला हवे, मला फूल शेतीचा अनुभव नाही पण कापुस शेतीचा पुरेपूर आहे अन कुठल्याही नकदी पिकाच्या बाबतीत ही शेणख़त सिस्टम कुचकामी आहे असा अनुभव आहे माझा (२ दशके) मुळात कपाशी पिक जमिनीतले नत्र फार वेगाने खाते त्याचे फिक्सेशन व्हायला किमान नत्र खते तरी द्यावी लागतात किंवा नत्रखते अन डाळ वर्गीय पिके (लेग्युम) लावावी लागतात,
त्यापाई नेमकी सिस्टम काय आहे ते पहिले कळले पाहिजे
नाना, माझ्या मते सेंद्रीय
नाना,
माझ्या मते सेंद्रीय म्हणजे कोणत्याही कारखान्यात तयार न होता निसर्गाच्या मदतीने तयार होणारे खत असावे. मी शेतकरी नाही. त्यामुळे हे बरोबर असेल असे नाही.
कपाशी नत्र खात असेल तर आलटुन पालटुन डाळ वर्गीय पिक घेणे परवडत नाही का ? हल्ली डाळी सुध्दा नगदी भाव देत असतील.
मला नेमके माहित नाही पण रासायनिक खताचा मारा केल्याने नापीक जमिन होण्यापेक्षा तुमची पध्दत नक्कीच असावी.
त्याला एक इलाज असतो तो म्हणजे
त्याला एक इलाज असतो तो म्हणजे मिश्र पिक पद्धत ह्यात ३ ओळी कपाशी अन एक ओळ डाळ (तुरच) अश्या पद्धतीने पेरली जाते पण हा इलाज नाइट्रोजन डेफिसिट वाला आहे म्हणजे डाळवर्गीय पिक जितका नाइट्रोजन फिक्स करते त्याच्यापेक्षा १०% वरच कापुस नाइट्रोजन खातो ढोबळमानाने १०%नाइट्रोजन तूट प्रति पेरा अश्यावेळी रासायनिक खतांस पर्याय नसतो
मुळात रासायनिक खते म्हणले की लोकांस जमिनीची धुप तिचे क्षारीकरण किंवा नापिक होणे हे दिसते पण मुळात ह्याला रासायनिक खता पेक्षा ते वापरायची चुकीची पद्धत असते जबाबदार, धानाच्या शेतात वरती उल्लेख केलेली बायो केमिकल फ़र्टिलाइज़र कामी यावीत (ह्याचा मला अनुभव नाही) पण गहु अन कापुस शेतीमधे मुठीमुठीने यूरिया फेकला जातो त्यापेक्षा नेमके जितके प्रमाण हवे आहे तितके स्प्रिंकलर सिस्टम मधे घातल्यास चहुकड़े योग्यप्रमाणात ख़त पसरले जावु शकते कपाशी च्या बाबतीत ड्रिप किंवा ठिबक सिंचन वापरता येईल असेच, fertilizers in excess are bad indeed but they aren't always monsterous provided their delivery method and dosage is properly and scientifically monitored and implemented
तुम्ही शेणखत म्हणजे काय
तुम्ही शेणखत म्हणजे काय वापरले ते समजले तर कुठे चुक होत होती हे समजेल !
शेतीत वेगवेगळी पिके आलटुन पालटुन घ्यावी अस आम्हाला शाळेत शिकवल्याच स्मरतय ! म्हणजे हे काही नविन ज्ञान नाही.
आताच्या शेत जमिनीत गांडुळ पुरते नामशेष झालेले आहेत आणी ते परत येणे हे गरजेच आहे.
काँपोस्ट खत देशी गाईच्या शेणाने बनवलेल त्या बरोबर जिवामृत वापरल्याने शेतकर्यांना बराच फायदा झालेला
आहे.
कर्नाटकात ऑरगॅनीक शेतीचे प्रयोग करत आहेत. त्यावरुन मिळालेल्या अनुभवावरुन सांगु शकतो की ऑरगॅनिक शेतीसाठी आवश्यक असलेली रसायने नसलेली वर्जीन जमिन बनवण्यासाठी ३ वर्षे काँपोस्ट खत वापरणे गरजेच आहे. देशभरात गाईच्या शेणखतावरुन बरेच प्रयोग व जन जागृती सुरु आहे. पण त्या बरोबरच रासायनीक खत व किटनाशक यांची मोठी लॉबी असे प्रयोग यशस्वी होऊ देणार नाहीत आणि असे काही लोक आहेत त्यांना देशी गाईच्या विषयी चांगले रुचत नाही.
fertilizers in excess are bad
fertilizers in excess are bad indeed but they aren't always monsterous provided their delivery method and dosage is properly and scientifically monitored and implemented हे पटल !
शेणखत वापरल्याने जमिनीत पाण्याची धारण क्षमता ५० % वाढल्याच दिसुन आलेल आहे. म्हणजे जर ठिबक सिंचन पद्धती वापरली व त्याद्वारे जरुरी क्षार पिका पर्यंत पोहोचवता आले तर शेतीत जास्तीच रसायन रहाणार नाही.