शेणखत आणि शेती
Submitted by नितीनचंद्र on 19 March, 2015 - 23:44
आज सकाळी साम चॅनलवर सेंद्रीय खतावर शेतीकरुन यावल - जळगाव येथे आश्रमशाळा चालवुन ग्रामीण आणि वनवासी लोकांना रोजगार निर्माण करणारे श्री प्रभाकर मांडे यांची मुलाखत पहात होतो.
"शेणखत आणि सेंद्रिय खताने माझी गव्हाची लोंबी पहायला लांबुन लोक येतात. माझ्या जमिनीचा पोत केवळ सेंदिय खताने सुधारला आहे. गोबर गॅस मधुन निघणार्या स्लरी वापरुन पडीक जमीन मी सुपीक बनवली आहे.
माझ्या पिकांवर कधीच रोग पडत नाही कारण मी सेंद्रिय खते वापरतो " उदगार त्यांचे आहेत.
अश्या एक ना दोन, अनेक उपक्रम साधुन हे गृहस्थ शेती करत आहेत.
यात त्यांच्या पत्नीची त्यांना साथ आहे.
शब्दखुणा: