Submitted by मनी on 18 March, 2015 - 12:37
टर्की देशात जाण्याबद्दल माहीती हवी होती. मी नोव्हेंबरमधे जायचं असा विचार करतेय. ४ दिवसांत काय काय बघता येईल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोंबड्या.. हुश्श !!
कोंबड्या..
हुश्श !!
मी कधी टर्कीत गेलो नाही पण
मी कधी टर्कीत गेलो नाही पण जे काही तिथले मित्र आहेत त्यांच्या अनुभवावरून सांगतो. ४ दिवसांकरता इस्तंबूल आणि परिसर फिरणे भरपूर होईल. त्याबरोबरच किनार्यावरचे इझमिर सारखे एखादे शहर पण बघणे होईल. टर्कीची राजधानी अंकारा देशाच्या मध्यभागात आहे. तिथे तुम्हाला एका डोंगररांगांत वसलेले राजधानीचे शहर पहायला मिळेल.
सध्या जाताना जरा सावधगिरी बाळगा कारण जे युद्ध चालू आहे त्याच्या झळा टर्कीला बसत आहेत.
बाकी ट्रीप अॅड्व्हायझर आहेच मदतीला
शक्यतोवर टाळा काही दिवस.
शक्यतोवर टाळा काही दिवस. आयसिस मुळे आणि सिरीया बाजुलाच असल्याने थोडे तणावाचे वातावरण आहे तेव्हढे सांभाळा
धन्यवाद धनि. आता अजून ६-७
धन्यवाद धनि.
आता अजून ६-७ महीने आहेत जाय्ला पण मोस्टली इस्तांबूलजवळच फिरायचा प्लॅन आहे. ग्रीसही जवळच आहे ना इस्तांबूलपासून...
टर्किश एअरलाईन्सने कुणी भारतात गेलंय कां?
मी दोन वर्षांपूर्वी टर्किश
मी दोन वर्षांपूर्वी टर्किश एअरलाईनने प्रथम दोन आठवडे टर्कीत आणि मग पुढे मुंबईला गेलो होतो. अनुभव चांगला होता.
काही मुद्दे:
- एच१ व्हॅलिड असेल, तर एअरपोर्टवर ऑन-अरायव्हल व्हिसा मिळतो.
- खुद्द इस्तंबूलमध्येच किमान २-३ दिवस लागतील.
- तिथून ट्रॉय किंवा इझ्मिरला एका दिवसाची टूर घेता येईल. (ट्रॉय अधिक जवळ आणि अधिक प्रसिद्ध असले, तरी इझ्मिर अधिक प्रेक्षणीय आहे. अर्थात, हे वैयक्तिक मत.)
- एअरपोर्टवर मोजकंच चलन बदलून घ्या. टॅक्सीच्या भाड्याइतपत आणि जरा अधिक. तिथे कर आणि सरचार्जेस अधिक आहेत. इस्तंबूलच्या मुख्य भागात अनेक ठिकाणी डॉलर्स --> लिरा हे विनाशुल्क + अधिक फायदेशीर दराने बदलून मिळतं.
टर्किला भारतीय पासपोर्टवर पण
टर्किला भारतीय पासपोर्टवर पण विसा ऑन अरायव्हल मिळतो. माझ्या माहितीत एक कुटुंब आय थिंक दोनेक वर्षांपुर्वी जाऊन आलेत. सध्याच्या युद्धपार्श्वभूमीवर टर्की किती सेफ आहे जायला याची माहिती प्लीज काढा आणि मगच जीव धोक्यात घाला.
मीना प्रभुंचे "तुर्कनामा" हे
मीना प्रभुंचे "तुर्कनामा" हे पुस्तक बघून घ्या.
वेका, आता त्यांनी ऑन अरायवल
वेका, आता त्यांनी ऑन अरायवल विझा बंद केलाय तो पर्याय २०१४ पर्यंत्च होता.
एका कलिगची बहीण राहते इस्तांबूलला, ती सांगत होती की इस्तांबूलपासून सिरिया बरंच लांब आहे म्हणून या भागात युध्दाचं फार काही जाणवत नाहीये.
नंदन, मलाही तिथून पुढे मुंबईला जायचंय पण टर्किश एअरलाईनने कुणी प्रवास केल्याचं ऐकिवात नव्हतं.
दिनेशदा, "तुर्कनामा" वाचून घेईन नक्की...
नाईलाजास्तव घ्याव्या
नाईलाजास्तव घ्याव्या लागलेल्या टर्किश एअरलाईन्स ने २०१४ च्या डिसेंबर मध्ये भारतात जातांना ईस्तंबुल ला माझा हॉल्ट होता. तीन तास जातांना आणि सहा तास येतांना. काय माहिती पाहिजे आहे?
) डीसी वरुन ऊडालेल्या फ्लाईटला.
असुरक्षित वगैरे वाटले नाही, खूप देशी होते (साडे सत्त्यान्नव टक्के तरी
ईस्तंबुल एअरपोर्ट खूप बोअरिंग आणि छोटे आहे आणि बर्यापैकी गर्दी असते. बकलावा मस्त मिळतात. भारताला जाणारी कनेक्टिंग फ्लाईट एअरपोर्ट जवळच्या एका शेतात ऊभी केली होती आणि बस ने तिथे सोडवले.
एअरपोर्टच्या आतमध्ये प्रेक्षणीय स्थळे भरपूर होती त्यामुळे टाईम तसा बराच गेला म्हणायचा.
हायझेनबर्ग, अगदी हेच माहीती
हायझेनबर्ग, अगदी हेच माहीती करुन घ्यायचं होतं की किती सुरक्षित-असुरक्षित आहे.
इस्तंबुलला फिरायचा प्लॅन आहे पण फोरम्सवर वाचल्याप्रमाणे तेही बर्यापैकी सुरक्षित आहे.
सगळ्यांना धन्यवाद.
मनी, मी गेलेय एकदा टर्किश एयर
मनी, मी गेलेय एकदा टर्किश एयर नी भारतात. चांगली आहे. non veg जेवण जास्ती चांगलं असतं असं ऐकून आहे. विमानात खास राकी नावाची दारू देतात (You should try if you drink apparently it is very famous). इस्तांबुल एअरपोर्ट छोटासा आहे. The only inconvenience I found is the schedule of outbound flight from Mumbai. It leaves around 6:30 in the morning. त्यामुळे जर तुम्ही दुसऱ्या गावाहून येत असाल तर तुम्हाला सोडायला येणाऱ्यांची गैरसोय होऊ शकते. आदल्या दिवशी येऊन मुंबईत मुक्काम करणे सोईचे पडते. बाकी तिकीटाची किंमत जरा स्वस्त असते (होती) बाकी एअरलाईन्स पेक्षा
इस्तंबूल बर्यापैकी सुरक्षित
इस्तंबूल बर्यापैकी सुरक्षित आहे.. तसा टेररीझमचा धोका सध्या कुठल्याही देशात आहेच..
टर्किशनी माझ्या काही कलीग्जनी प्रवास केलेला आहे.. विशेष काही प्रॉब्लेम नाही आला कोणाला (खूप ग्रेट आहे असं नाही पण अगदीच वाइटही नाही )
इथे भारतात त्या टर्किश
इथे भारतात त्या टर्किश एअर्लाइनचे फार प्रमोशन चालू असते.
इस्तंबूल मध्ये फार बघायला आहे पण आया सोफिया मॉस्क, सुलतान अहमेत मॉस्क ओल्ड फॅश्न्ड बझार , टोपकापी पॅलेस, बॉ स्फोरस सामुद्र धुनी मध्ये क्रूज व डिनर, आणि वेळ असेल तर कपाडोचिआ का कपाडोकिआ हा नैसर्गिक चमत्कार आहे तो नक्की बघा.
http://www.sightseeingtouristanbul.com/ इथे माहिती मिळेल व टूर बुकिन्ग करता येइल.
मेमरी कार्ड ए क्स्ट्रा नक्की न्या. मजा करा.
Taken 2 आठवला.. टर्कीश फूड
Taken 2 आठवला..
टर्कीश फूड यम्मी!
इस्तम्बुल खरेच
इस्तम्बुल खरेच बघण्यासारखे!
पॅलेस वेळ काढून जरूर बघा !
अन्कारात एक छोटे म्युझियम आहे. अतातुर्क केमाल पाशा ह्याचे स्मारक पण बघण्यासारखे.
अन्काराजवळ म्यौलाना नावाचे एक ठिकाण आहे तेथे 'सूफी' सम्प्रादयाचे स्थान वेळ असल्यास करण्यास उत्तम.
निसर्गाच्या सान्निध्यात राहावयाचे असल्यास इझ्मिर उत्तम.
इतर ठिकाणी भाषेची अडचण जाणवते.
-यक्ष
टर्किश एअरलाईन्सने कुणी
टर्किश एअरलाईन्सने कुणी भारतात गेलंय कां>> काहीवर्शा पूर्वी .
ईस्तंबुल एअरपोर्ट खूप बोअरिंग आणि छोटे आहे आणि बर्यापैकी गर्दी असते. बकलावा मस्त मिळतात. भारताला जाणारी कनेक्टिंग फ्लाईट एअरपोर्ट जवळच्या एका शेतात ऊभी केली होती आणि बस ने तिथे सोडवले.>>
सेम सेम . आम्हाला वाटलं आता बसनेच भारतात घेउन जातोय का? किती वेळ लागला .
खूप ग्रेट आहे असं नाही पण अगदीच वाइटही नाही >> + १००० .
आमचाही जाताना ६ तास , येताना ५ तास हॉल्ट होता
. एअरपोर्ट वर थोड्यावेळ फिरलो पण नंतर कंटाळलो .
The only inconvenience I found is the schedule of outbound flight from Mumbai. It leaves around 6:30 in the morning. >>> + १००००००००
आमचही अस खूप पहाटेच फ्लाईट होतं बहुतेक सकाळी ४ ३० वगैरे .
आम्ही मुंबईचे म्हणून जमलं.