दिमापूर रेप केस - खरं काय ?

Submitted by बाळू पॅराजंपे on 10 March, 2015 - 07:26

दिमापूरमधे लोकांनी एका बलात्कारी आरोपीला कोठडीतून खेचून ठार मारलं अशा बातम्या होत्या. त्या आरोपीचं तहे सूचित करत होतं की तो कोणत्या समाजाचा आहे. त्यातच मिडीयाने तो बांग्लादेशी असल्याचा निवाडा सुद्धा केला. लोकांनी पण मीडीया ट्रायल वर विश्वास ठेवला. या घटनेतून कुणाचा काय फायदा झाला हे अलाहिदा. पण आता या घटनेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्हं उभी राहीली आहेत.

हा मॉब उस्फूर्त नसून तो एक नियोजनबद्ध कट होता असं दिसून येत आहे. आरोपीला पोलीस कोठडीतून नाही तर सेंट्रल जेल मधून बाहेर काढण्यात आलं आहे. सेंट्रल जेलमधून बाहेर काढणं इतकं सोपं असतं का ? त्यातच आरोपी नेमका कोणत्या तुरुंगात बंद आहे हे जमावाला माहीत असल्याप्रमाणे ते आत शिरले होते. याची चौकशी सुरू झाली आहे. काही अधिकारी सस्पेन्ड झाले आहेत.

हा आरोपी बांग्ळादेशी नसून भारतीय आहे. त्याचे तीन भाऊ आर्मी मधे आहेत. आजोबा फौजमधे होते. वडील फौजेतून रिटायर्ड झाले आहेत. फौजेमधे बांग्लादेशी नागरीकाला ते ही पिढ्यानपिढ्या घेत असतील का ?

या मुलीने सुद्धा बलात्कार झालाच नव्हता . घरच्यांना पैसे मिळाले आणि दबावामुळे तक्रार दिली असं सांगितलं आहे.

http://www.ndtv.com/india-news/nagaland-lynching-curfew-lifted-in-dimapu...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://bluegape.com/activism/saurabh-jain/innocent-man-killed-by-angry-c...

http://www.firstpost.com/india/shocker-in-dimapur-lynching-gogoi-claims-...

http://zeenews.india.com/news/north-east/dimapur-lynching-nagaland-cm-bl...

मुझफ्फरपुर मधे काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने दंगल घडवण्यात आली होती. पाकिस्तानमधल्या हैद्राबादेतले फोटो वापरून दंगे घडवून आणले गेले.

पुण्यात पण एका निरपराध तरुणाला मुस्लीम वेषभूषेमुळे जीव गमवावा लागला.

हिमायत बेग हा निर्दोष असल्याचे पुरावे आशीष खेतान यांनी सादर केले आहेत.

अशा अनेक घटना घडत आहेत.

http://www.ndtv.com/india-news/nagaland-lynching-police-may-be-complicit...

प्रत्येक वेळी कट रचणारेच जास्त बोंबाबोंब करत आहेत हे लक्षात येत चालले आहे. देश एका भीषण परिस्थितीतून चाललेला आहे. या लोकांचा काहीतरी वेगळा बंदोबस्त व्हायला पाहीजे.

नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यासारख्या नेत्यांची हत्या होतेय. करकरेंसारख्या कर्तव्यनिष्ठ अधिका-याची हत्या होतेय. ते प्रकरण सरळ नसावं हे पानसरे सरांच्या हत्येमुळं वाटू लागलेलं आहे. सत्य कसं बाहेर येणार ?

//

बाळू, सत्य बाहेर येईलच, किंवा सध्या समजलेय तेवढेच सत्य आहे.. या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवण्याजोगी परिस्थिती नाही.

त्याचे कुटुंबीय आर्मी मधे आहेत हे कुणी धडधडीत कस्म काय सांगेल ? आर्मी खुलासा करू शकते.
जर त्याचे कुटुंबीय आर्मीत असतील तर तो बांग्लादेशी आहे अशा अफवा कशा पसरल्या ?

करकरेंसारख्या कर्तव्यनिष्ठ अधिका-याची हत्या होतेय.
>>

समजल नाही. त्यांना पाकिस्तानी दहशतवादयांनी गोळ्या घातल्या असच वाचलंय, तेच जाधवांनी सांगितलय. शिवाय कामटेयांनी केलेल्या गोळीबारात अजमल कसाब जखमी झाला होता. अन नंतर जिवंत हाती लागल्यावर त्यांनी सुद्धा जबानी दिली, जी कोर्टात ग्राह्य धरली गेली.

लोकांना शेंड्या लावायचे धंदे आहेत अशा अफवा म्हणजे.

‘हू किल्ड करकरे’ या आपल्या पुस्तकात माजी पोलिस महानिरिक्षक एस एन मुश्रीफ़ यांनी करकरे यांची हत्या हिंदुत्ववादी संघटना व ब्राह्मणवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भारतीय गुप्तचर खात्यांनी घडवून आणली, असा सिद्धांत मांडला आहे. यातील पहिला भाग असा, की त्यासाठी त्यांनी कुठला तपास केलेला नाही अथवा एकूण घटनाक्रमाचा आपल्या पोलिसी कारकिर्दीच्या अनुभवाच्या आधारे शोधही घेतलेला नाही. त्यांनी एकूण वृत्तपत्रिय बातम्यांचा क्रम तपासला आणि त्यावर त्यांचा एक सिद्धांत तयार झाला. मग त्या सिद्धांताला आवश्यक अशा बातम्या शोधल्या आणि त्यावर आधारीत पुस्तकाची रचना केलेली आहे.

एका कथेत शेरलॉक होम्सचे पात्र म्हणते, “It is a capital mistake to theorize before one has data. Insensibly one begins to twist facts to suit theories, instead of theories to suit facts.”
― Arthur Conan Doyle, Sherlock Holmes

तसंच मुश्रिफ यांनी केलेले आहे.

या हत्येचा कोणी साक्षीदार नसावा, अशी त्यांची समजूत असेल तर गोष्ट वेगळी. अन्यथा त्यांनी निदान अरूण जाधव नामक प्रथमदर्शी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराशी सल्लामसलत तरी केली असती. कारण ज्या गाडीमध्ये करकरे यांच्यासह अशोक कामथे व साळसकर अशा दोन ज्येष्ठ पोलिस अधिकार्यांची एकाच वेळी हत्या झाली, त्याचा आयविटनेस त्यांना मिळाला असता. कारण ज्या वहाना्वर गोळ्या झाडल्या गेल्या आणि या अधिकार्यांची हत्या झाली, त्या प्रसंगाचा खटल्यातला महत्वाचा साक्षीदार म्हणून अरूण जाधव याची साक्ष झालेली आहे. कोर्टानेही मृत्यूच्या जबड्यातून बचावलेल्या त्या पोलिस शिपायाचा प्रत्येक शब्द आंधळेपणाने ग्राह्य धरलेला नाही. अरूण जाधवच्या साक्षीला जिथे खुद्द कसाबने आक्षेप घेतला, तिथे त्याची साक्ष तपासण्या्ची चिकित्सक वृत्तीही कोर्टाने दाखवलेली आहे. म्हणजेच कोर्टातही हल्लेखोर व साक्षीदार यांना कुठलेही झुकते माप देण्यात आलेले नाही. यात जाधवची साक्ष वा प्रत्यक्ष अनुभवच मुश्रीफ़ यांचे संपुर्ण पुस्तक खोटे पाडतो. तितकेच नाही तर कुरकर्मा कसाबची साक्षही मुश्रीफ़ना खोटे पाडते.

अरुण जाधव हा साळसकर यांना कायमस्वरूपी सहकारी होता. कुठल्याही कारवाईत जाधव त्यांच्यासोबत असायचा आणि २६/११ च्या रात्रीही तो त्यांच्याच सोबत होता. जेव्हा शिवाजी टर्मिनस येथून हे तिघे अधिकारी कामा इस्पितळाकडे रवाना झाले, तेव्हाही जाधव त्यांच्याच गाडीत म्हणजे टोयोटा क्वालिसमध्ये होता. त्यावरच जिहादी हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्याबद्दल साक्ष देताना जाधव याने कसाबवरच गोळ्या झाडल्याचा आरोप केला होता. पण कसाबने त्याचा साफ़ इन्कार करून आपला अन्य सहकारी इस्माईल खान याने क्वालीसवर गोळ्या झाडल्याचे कोर्टात सांगितलेले आहे. म्हणजेच जाधवपेक्षा कसाबची साक्ष मोलाची ठरते. त्याने आपण वा आपला सहकारी यांनी क्वालिसवर गोळ्या झाडल्याच नाही, असा अजिबात दावा केलेला नाही. आपण क्वालिसवर गोळ्या झाडल्या नाहीत, कारण आपण तेव्हा जखमी होतो व मरगळलो होतो. आपल्या जोडीदार इस्माईलने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, हा कसाबचा कोर्टातला दावा आहे. म्हणजे जाधव आणि कसाब दोघेही करकरे बसलेल्या गाडीवर इस्माईल वा कसाब यांनी गोळ्या झाडल्याचा दावा करतात. पण मुश्रीफ़ यांना मात्र ते दोन्ही दावे मान्य नाहीत. त्यांच्या मते करकरे यांच्यावर पाकिस्तानातून आलेल्या अतिरेक्यांनी गोळ्या झाडलेल्याच नाहीत. करकरे यांना भलत्याच दुसर्या हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार मारलेले आहे. आणि ते हल्लेखोर अर्थातच मुश्रीफ़ यांच्यानुसार भारतीय गुप्तचर खात्याचेच होते. मग वाचकांनी कोणावर विश्वास ठेवायचा? घटनास्थळी तेव्हा हजर असलेल्या अरूण जाधव आणि अजमल कसाववर, की मुश्रीफ़ यांच्या कल्पनाविलासावर? आणि कशासाठी विश्वास ठेवायचा? तर मुश्रीफ़ यांचे बालपण राजर्षी शाहु महाराजांच्या कोल्हापुर जवळच्या कागलमध्ये गेले म्हणून? एकूणच पुस्तकात गुन्हेतपास व त्याची सुसंगत मांडणी करण्यापेक्षा मुश्रीफ़ शाहू महाराजांच्या मागे लपतात कशाला?

यातील अरूण जाधव याची कहाणी हृदयद्रावक आहे. आधी त्याला कसाब वा इस्माईलने झाडलेल्या गोळ्यांनी जखमी व्हावे लागले, सोबतचे इतर लोक ठार झालेले असताना, जाधवच्या अंगात धुगधुगी होती. मात्र त्याने आपल्या सहकार्यांच्या मृतदेहाच्या सहवासात मेल्याचे नाटक रंगवले. मग करकरे, कामथे अ साळसकर यांचे मृतदेह ओढून बाहेर फ़ेकल्यावर क्वालिसचा ताबा त्या दोघा जिहादींनी घेतला आणि मागच्या भागातल्या मृतदेहांसह चौपाटीच्या दिशेने प्रयाण केले. तेव्हाही त्यापैकी कोणाच्या तरी मोबाईलचा आवाज आला, म्हणून कसाबने गाडीतच मागे गोळ्या झाडल्या होत्या. पुढे त्या गाडीचा टायर फ़ुटला म्हणून त्या अतिरेक्यांनी वाटेत दिसलेली एक स्कोडा गाडी अडवून क्वालिस सोडून दिली. तेव्हा जाधवने कंट्रोल रुमला आपल्या मोबाईलवर कुठे जखमी पडलोय, त्याची खबर दिली. इथे अन्य पोलिस पोहोचले तेव्हा त्यांनीही बंदुका रोखलेल्या होता. त्यांनी नुसत्या शंकेसाठी गोळ्या झाडण्याचे भय होते. अशा स्थितीत जाधव जीवंतपणी पोलिसांच्या हाती लागला. या सगळ्या घटनाक्रमात मुश्रीफ़ कुठे होते? घटनास्थळापासून धेकडो मैल दुर कोल्हापूर वा पुण्यात बसले होते आणि जाधव घटनाक्रमापासून अवघा दिडदोन फ़ुटावर होता. त्याचा अनुभव जाणुन घ्यावा, असेही या अनुभवी व सामाजिक बांधिलकी मानणार्या अधिकार्याला वाटू नये? त्यापेक्षा आपले तर्कट लढवून नसत्या शंकांच्या वावड्या उडवण्याचा खेळ मुश्रीफ़ यांनी करण्याला सामाजिक कार्य म्हणायचे की काय? सामान्य पत्रकार लेखकांची गोष्टच वेगळी असते. त्यांना अशा प्राणघातक घटनांचे गांभिर्य कळत नसते. परंतू पोलिस खात्यात दिर्घकाळ काम केलेल्या व्यक्तीला यातली गुंतागुंत व क्लिष्टता समजू नये? सामान्य पत्रकारापेक्षाही पोरकट अशा शंका काढून त्यांनी भारतीय गुप्तचर खाते व मुंबई गुन्हे अन्वेषण विभागावर इतके बेछूट बेताल आरोप करावेत?

करकरे व अन्य जखमींना विनाविलंब तिथून हलवण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न झाला. पण मृत घोषित झाल्यावर जी शवचिकित्सा झाली, त्यात त्यांच्या देहातून काढण्यात आलेल्या जीवघेण्या गोळ्या गहाळ झाल्या. हा हलगर्जीपणा नक्कीच निषेधार्ह आहे. पण तेवढ्या सुताचा आधार घेऊन स्वर्गात जाण्याचा प्रयत्न हा शहाणपणा असतो काय? गोळ्या सापडत नाहीत, म्हणूनच त्य झाडणारा पाकिस्तानी जिहादी नव्हे तर भारतीय गुप्तचर असावा आणि त्याला वाचवण्यासाठीच गोळ्या गहाळ करण्यापर्यंत बारकाईने कारस्थान रचलेले होते. त्यानुसार करकरे यांचा बळी घेतला गेला, असा दावा करणे कितपत शहाणपणाचे मानावे? कुठल्याही कारस्थानात बारकाईने नियोजन केलेले असते. पण त्यातला प्रत्येक माणुस त्यासाठी आधीपासून पढवलेला व शिकवलेला असतो. इथे घटनाक्रमच उलगडत गेलेला आहे. त्यात करकरे यांना मारायचे म्हणून इतका मोठा हल्ला होऊ देण्यात आला आणि त्याचा आडोसा घेऊन करकरे यांचा काटा काढण्यात आला, असा मुश्रीफ़ यांचा सिद्धांत आहे. ज्यांना कारस्थान म्हणजे काय ह्याची समज आहे, त्यांना इतके कळू शकते, की कितीही महत्वाच्या एका व्यक्तीला मारण्यासाठी शेकडो लोकांचे हकनाक बळी पडतील, असे कारस्थान शिजवले जात नसते. कडेकोट सुरक्षेत असलेल्या इंदिरा गांधींची हत्या करताना आणखी किती लोकांचा बळी घ्यावा लागला होता? राजीव गांधी यांची हत्या भर गर्दीत झाली, तरी कमीत कमी लोकांचा बळी पडेल, असे कारस्थान उरकले गेले. पण मुश्रीफ़ यांची बुद्धी इतकी अचाट आहे, की करकरे यांचा बळी घेण्यासाठी दिडदोनशे लोकांना ठार मारण्याचे व त्याच्याही दुप्पट लोकांना जखमी करण्याचे हे कारस्थान होते, असा त्यांनी शोध लावला आहे, म्हणूनच त्याला उंदिर पोखरून डोंगर काढण्याची किमया म्हणावे लागेल.

मी क्रेडिट घेऊ इच्छीत नाही. हे इथे सापडले आणि पटले म्हणून डकवले.

आसाममध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका आहेत. ह्याहून अधिक सांगणे न लगे.
>>

नागा लोक पण सांप्रदायिक झालेत काय?

मनमौजी +१,
उत्तम विश्लेषण.

प्रश्न हा पडतो की अशा काही लोकांमुळे खरे गुन्हेगार मोकळेच सुटतात. तिकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून गुंतागुंत होते ती वेगळीच. दिग्गीराजांनी असा संशय व्यक्त केल्यावर लगेचच पाकिस्तानी लोकांनी त्याचा आधार घेत भारतीय बाजू लंगडी पाडण्याचा प्रयत्न केला होता.

आपल नशीब चांगल की कसाब जिवंत हाती लागला अन्यथा दिग्गीराजांनी अन तशाच काही लोकांनी काय काय सांगून उत्पात घडवला असता कोणास ठाऊक.

मनमौजी, वरील पोस्टबद्दल, व तो मजकूर जसाच्यातसा "इथे डकविल्याबद्दल" धन्यवाद Happy

असत्य पुन्हा पुन्हा रेटून बोलत राहिले तर ते सत्यासारखे भासायला लागते या उक्तिनुसार मुश्रीफ व अन्य जिथे तिथे हिंदुत्ववादी व उच्चवर्णीयांवर निरर्गल खोटे आरोप करतात व त्यांचे लेखन/पुस्तके कानोकानी हस्तेपरहस्ते सामान्यलोकांपर्यंत जाउन त्यांनाही तसेच भासू लागते. छापिल ते ते सत्य तसेच नेटवरील जेजे ते सत्य असे मानण्याची सामान्यांची वृत्ती असतेच, शिवाय खरेखोटे करून स्वतःचे मत बनविण्याइतका वेळ/कुवत व गरज त्यांना नसते. नेमक्या या गोष्टीचा फायदा घेतला जातो.

आता अगदी याच धाग्याचे उदाहरण जरी घेतले, तरी बघा, विषय दिमापूरच्या केसचा, पण जाता जाता गूघाण फुसकली सोडल्याप्रमाणे करकरेंच्या मृत्यूबद्दल शंकात्मक वाक्य टाकून वाचकाच्या मनात संशय रुजवायचा प्रयत्न केलाच आहे! यालाच म्हणतात गोबेल्स निती!

हिमायत बेग हा निर्दोष असल्याचे पुरावे आशीष खेतान यांनी सादर केले आहेत.
>>

कुठे? कोर्टात का? मग ते कोर्टांनी ग्राह्य का धरले नाही?

करकरेंच्या हत्येबाबत शंका उपस्थित होऊच नयेत. मुश्रीफ यांनी उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे पुस्तक लिहिले असावे.

डो. दाभोळकर, कॉ. पानसरे यांच्या हत्येचा शोध मात्र लागायलाच हवा. कालच श्रमिक मुक्ती दलाच्या डॉ. भरत पाटणकरांना धमकी मिळाल्याचे वृत्त टिव्हीवर बघण्यात आले. तरुण भारत मधेही ही बातमी आलेली आहे.

हा आरोपी बांग्ळादेशी नसून भारतीय आहे.

बहुधा प्रस्तुत धागाकर्त्याला त्या बलात्कार्‍याचे बर्थ सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड मिळाले असावे. Wink

वेट अ मिनीट.........................मागच्याच वर्षी आधार कार्ड धारक सहा बांग्लादेशी बेकायदेशीर रहिवाशी मुंबईत पकडले होते पोलीसांनी त्याची आठवण झाली. Light 1

मनमौजी, आरोपी भारतीय आहे हे ndtvच्याच बातमीत म्हटले आहे. तो बांगलादेशीच आहे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणताय??

मनमौजी +१,
(जागता पहाराचे) उत्तम विश्लेषण.

भारत सरकार २६/११ दहशतवादी हल्ला हा पाक पुरस्कृत जिहादि हल्ला आहे असे म्हणत असतान सरकार, पोलिस , सैन्य यांचे मनोबल खच्ची करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला म्हणून अश्या लोकांवर (जे फालतू सनसनाटी पसरवू पाहतात त्यांच्यावर) खटले दाखल करायला हवेत. अश्या प्रकारचे हास्यासपद दावे (भारतानेच हा हल्ला स्वतावर करवून आणला इथ पासून ते कसाब हा भारतीय हिंदू होता वगैरे वगैरे ) पाकि टीव्हीवर या आधी झाले आहेत. आपल्याकडची काही मंडळी असली पुस्तके लिहून पाकि विदुषकान्च्या डाव्यांना बळ देत असतात.

People are supposed to believe NDTV now?
<<
Of course, bhau torsekar is less reliable than NDTV. but that doesn't mean anything. does it?

हाय मनमौजी! कंठ फुटला म्हणायचा एकदाचा!

दिमापूरला जी प्रतिक्रिया उमटली तिला मोठी पार्श्वभूमी आहे. त्या घटनेतून एकंदरीत नागा लोकांच्या घुसमटीचा राजकारण्यांनी व्यवस्थित उपयोग करून भावना भडकवून पोळी भाजण्याचा प्रयत्न दिसतोय.

उत्तरपूर्वेत बांगलादेशीय प्रदेशातील नागरीकांच स्थलांतर जवळपास स्वातंत्र्याच्या आधीपासून सुरु आहे. त्याशिवाय चहाच्या लागवडीसाठी ब्रिटिशांनी बिहारी आणि बंगाली मजूर नेले. काही काळानी, मूळ रहिवासी आणि स्थलांतरित ह्यांच्यात संघर्ष व्हायला लागले. बोडो त्यांच्या स्वातंत्र्यासाठी १९३० पासून लढा देत आहेत. सो, तिथल्या लोकांच्या हिशोबानी बांगलादेशी आणि बंगाली किंवा बिहारी भारतीय हे घुसखोरच आहेत.

मूळ आदीवासींमध्ये आपल्यावर अन्याय होतोय ही जी जाणीव आहे ती तीव्र होत गेली आणि मतांच्या आकर्षणापोटी राजकारणी लोकांनी घुसखोरांना नागरिक बनून सगळे फायदे पोचवण्यात मदत केली. त्यामुळे अजूनच गुंतागुंत निर्माण होत गेली.

उत्तरपूर्वेतील लोकांना आपण मुख्य भारतीय प्रवाहात आणायला अयशस्वी ठरलोय. त्यात बांगलादेशी स्थलांतरित किंवा घुसखोरांच लांगुलाचन करून अविश्वास निर्माण झालाय. आणि कायद्यातून आरोपी सहज सुटेल अशी भावना करून देण्यात राजकारणी लोक यशस्वी ठरले आणि त्यात आरोपीचा बळी गेला.

झाले ते वाईट झाले. परंतु ह्या घटनेस दाभोलकर किंवा पानसरे ह्यांच्याशी जोडणे आणि करकरेंच्या हत्येबाबत संशयास्पद भूमिका घेणे हि एक Grand conspiracy Theory वाटते.

ह्या घटनेस दाभोलकर किंवा पानसरे ह्यांच्याशी जोडणे >>> रीअ‍ॅक्शन!! आपल्याला पटत नाही नां त्याचं वर्तेन्/विचार, मग मारुनच टाकायचं ही मानसिकता.

NDTV? Really?? People are supposed to believe NDTV now? > इंडीया टिव्ही सारखे लांगुलचालन करणारी चॅनल बघणारी भक्त कुठे खरे दाखवणारे एनडीटिव्ही बघतील.? Rofl

एक थंड डोक्यानी केलेला खून आणि जमावाची प्रतिक्रिया ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे आपल्याला नसेल वाटत तर मग जाउद्यात.

Pages