माझ्या आठवणीप्रमाणे साधारणत: १९९० च्या दशकात ज्यावेळी . टी.व्ही.घराघरात पोहोचला नव्हता. टी.व्ही. म्हणजे फक्त “दूरदर्शन” असे साधे समीकरण होते. आख्या चाळीत किंवा वाड्यात एखाद्याकडेच टी.व्ही.असायचा व त्यावरील लोकप्रिय कार्यक्रम / मालिका पाहायला अख्या वाड्यातील किंवा चाळीतील इतर बिर्हााडातील नुसती बाळगोपाळच नव्हेत तर सर्वच वडीलधारी स्त्री-पुरुष मंडळीसुद्धा कामधाम विसरून टी.व्ही.समोर बासलेली असत.
त्या काळात दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी ९ ते १० एक तास रामानंद सागर ह्यांची “रामायण’” व नंतर महाभारत अशा पौराणिक मालिका लागायच्या . त्या वेळात पुण्यातील रस्ते अक्षरश: ओस पडलेले असत. प्रत्येक जण आपापल्या कामांचे नियोजन या मालिकांची वेळ लक्षात ठेऊनच करत. आठवड्यातून एकदा संध्याकाळी ७ वाजता “गजरा” हा लोकप्रिय कार्यक्रम होत असे तर रात्री ९ वाजता “हमलोग” ही हिन्दी मालिका लागायची.हिचे सुत्रसंचालन लोकप्रिय हिन्दी अभिनेते स्वर्गीय अशोककुमार उर्फ दादामुनी करत असत. त्यानंतर आल्या “नुक्कड” व “सर्कस” ह्या हिन्दी मालिका. (सर्कसमध्ये शाहरुख खान हा आजचा आघाडीचा सेलिब्रिटी नायक त्यावेळी एकदमच होतकरू नावनायक होता) त्याचबरोबर छायागीत हा कृष्ण-धवल रंगातील चित्रपट गीतांचा कार्यक्रमही लोकप्रिय होता. “सुरभी “, “ज्ञानदीप “ व “आरोग्य संपदा “ सारखे दर्जेदार,माहिपूर्ण व अभिरुचीपूर्ण कार्यक्रम होत अस्त जे विसरू म्हटले तरी विसरणे अशक्य आहे.
काळ बदलत गेला प्रसार माध्यमात क्रांती झाली. कृष्ण-धवलची जागा रंगीत टी.व्ही.ने घेतली.तसेच टी.व्ही.च्या भरमसाठ किमती उतरून तो सामान्य माणसाच्या आवाक्यात आला. तंत्रद्यनातही सुधारणा होऊन प्रथम एल.सी.डी. मग प्लाझा व नंतर एल.ई.डी. असे एकापेक्षा स्मार्ट टी. व्ही.आले. मोठा खूप जागा व्यापणारा टी.व्ही.जाऊन त्याची जागा ३” जाडीच्या एखाद्या फोटो फ्रेम सारख्या टी.व्ही.ने घेतली. टी.व्ही.वर दूरदर्शन बरोबरच इतर अनेक चॅनेल्स आले. आता घरोघरीच नव्हेतर झोपडपट्यातही टी.व्ही.दिसू लागला. पावसाळ्यातील कुत्र्याचा शेपटींप्रमाणे टी.व्ही.वर वाहिन्यांचे जणू पेवच फुटले. शेकड्यांनी वाहिन्या आल्या. अनेक भाषातून त्यांचे प्रसारण दिवस-रात्र २४ तास सुरू झाले.प्रेक्षकही ( यात लाहान मुलांपासून ते ९० वर्षांच्या वृद्धांपर्यन्त सर्व थरातील प्रेक्षक) या भुलभुलैयात टी.व्ही.च्या (यालाच इडियट बॉक्स असेही म्हणतात) एव्हढे आहारी गेलेत (अॅाडीक्ट) झालेत की त्यांना दिवसभर एक क्षण भरही टी.व्ही समोरून उठायला नको असते. जेवण-खाण सर्व टी.व्ही समोरच घेतात.
पण दर्जाचे काय ? वाहिन्याची संख्या जसजशी चढत्या क्रमाने बेसुमार वाढत गेली तासतसा दर्जा मात्र उतरत्या भाजणीसारखा घसरतच चालला आहे. आता मालिका फक्त टीआरपी साठीच दाखवल्या जातात. विविध वाहिन्यांच्या ह्या टीआरपी युद्धात प्रेक्षकांची आवड लक्षात घेण्याची कुणालाच जरूरही वाटत नसते. काय दाखवायचे ते, ते ठरवतात व ते जे दाखवतील ते प्रेक्षकांनी निमूटपणे पहायचे असते. त्यांनी प्रेक्षकांना दुसरा कुठलाही पर्यायच ठेवलेला नसतो. प्रत्येक मालिकेत सासू-सुनांची कारस्थाने,भांडणे,नवर्यांेचे इतर अनेक स्त्रियांबरोबरचे संबंध सर्रास दाखवले जाऊ लागले , मालिकेतील स्त्री पात्रे घरातही ऊंची वस्त्रे व दागदागिने घालून ,नटून-थटून वावरू लागल्या. ओढून-ताणून दोन-दोन वर्षे मालिका चालू तेल्या जाऊ लागल्या. (यालाच डेली सोप असे नांव आहे) कुत्राच्या शेपटाप्रमाणे मालिकांचे जणू पेवच फुटले. उदाहरणार्थ “चार दिवस सासूचे” ही ई.टी.व्ही वरची चार वर्षे प्रेक्षकाच्या माथी मारलेली अत्यंत रटाळ मालिका किंवा झी.टीव्ही.वर अद्यापही चालूच ठेवण्यात आलेली “तू तिथे मी” ही अतिशर टूक्कार मालिका. केवळ या चनेल्सच्या व्यवस्थापनाला ती चालू ठेवावीशी वाटते म्हणून ती चालू असते. अनेक सुजाण व सुज्ञ लोकांना याचा इतका उबग येऊ लागला की त्यांनी टी.व्ही. बघणेच सोडून दिले. वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठवली जाऊ लागली. पण वाहिन्याची मालक मंडळी मात्र डोळ्यावरची झापड उघडण्यास तयार नव्हती. जणू काही त्यांच्या संवेदना बोथट झाल्या होत्या.
पण गेल्या वर्षापासून हे चित्र हळू-हळू बदलत असल्याचे दिसू लागले असून त्यामध्ये आशादायक बादल होत असल्याचे दिसू लागले आहे. मला आठवते त्याप्रमाणे या बदलाची सुरुवात झी टी.व्ही.वर दाखविण्यात आलेल्या “वादळवाट” व “गंगाधर टिपरे” ह्या मालिकांपासून झाली. (मात्र वादळवाट ही मालिका प्रेशकाच्या मनाशी एकरूप झाली असतांनाच व उत्सुकता शिगेला पोहोचायच्या आताच अगदी अचानकच कोणतेही कारण न देता एकाएकी बंद केली गेली. बहुधा त्यांचे “झी” च्या व्यवस्थापणाशी पटले नसावे.) त्यानंतर झी टी.व्ही ने “ प्रपंच “,” संध्या-छाया “ ,”असंभव”, “ उंच माझा झोका “, “ एका लग्नाची दुसरी गोष्ट “ , “ रेशीमगाठी “, “ एका लग्नाची तिसरी गोष्ट “, “जावई विकत घेणे आहे “ अशा एकाहून एक सरस,दर्जेदार व सर्व कुटुंबाने एकत्र बसून अवश्य बघाव्यात अशा मालिका दाखवायला सुरुवात केली आहे.ई. टी. व्ही वरसुद्धा “सोनियाचा उंबरा”,”अग्निहोत्र”,”मन माझे तुझा झाले” अशा सुंदर कौटुंबिक मालिका आणल्या आहेत. या मालिकात हेवेदावे,भांडणे सुडाचे राजकारण न दाखवता कुटुंबातील एकोपा,नातेसंबंध दृढ कसे राहतील व होतील याबद्दल सकारात्मक विचार दाखवण्यात आले आहेत.उंच माझा झोका ही मालिका ऐतिहासिक असूनही प्रेक्षकांना ती एव्हढी आवडली की प्रेक्षक यमु , रमा व महादेव ह्यांचेशी एकरूप होऊन गेले. तीच गोष्ट राधा-घना ,कुहू,आज्जी यांची झाली होती. या मालिका अजून संपूच नयेत असेच सर्व प्रेक्षकांना वाटत होते. मालिका संपल्याची त्यांना चुटपुट लागून राहीली हेच त्या मालिकांचे यश होय. हे यश
अशा सकारात्मक,वैचारिक,भावनिक व कौटुंबिक मालिकांचा सुरू झालेला हा सिलसिला यापुढेही असाच चालू राहावा व थकून भागून घरी आल्यावर टी.व्ही वर काहीतरी चांगले पाहायला मिळेल अशी इच्छा व्यक्त करून आता इथेच थांबतो.
आशादायक टी.व्ही.मालिका
Submitted by pltambe@yahoo.co.in on 30 March, 2014 - 13:09
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जय मल्हार ही मालिका आशादायक
जय मल्हार ही मालिका आशादायक आहे. पूर्वीच्या काळी जीम, टॅब्लेट पीसीज किती कॉमन होतं हे कळतं. तसंच कालच्या एपिसोडमधे तर दाखवलं की सोसाट्याच्या वा-याने आभाळातले ढग सुसाट पळत असतात. पण झाडाचं पान सुद्धा हलत नसतं. आता इतक्या वर्षात बरेच बदल झालेत.
द्विरुक्तीमुळे संपादीत.
द्विरुक्तीमुळे संपादीत.
पण जय मल्हार मधील सारी पात्र
पण जय मल्हार मधील सारी पात्र इतकी formal का बोलतात?
जय मल्हार मालिका मला व माझ्या
जय मल्हार मालिका मला व माझ्या मुलीना आवडते. त्यांना आवडते कारण माय्थ्लोजिकल म्हणून आणि मला यासाठी कि, मी त्या 'म्हाल्से' सारखी दिसते अश्या माझ्या मुली म्हनतात म्हनुन.
" हा मल्हार राजा होता ना, मग
" हा मल्हार राजा होता ना, मग त्याला दुसरी प्रजेची दरबाराची काही कामं नव्हती काय? सारखं आपलं म्हाळसा नाहीतर बानू.
देव काय असे असतात काय? आणि काय तर परमभक्तीचं फळ म्हणून ह्याने आधी म्हाळसेशी लग्न केलं आता बानूला देणार भक्तीचं फळ. सगळ्या बायकाच ब-या याच्या भक्त. पुरूषांना नाय कधी प्रसन्न होताना दाखवला तो."
.............इति आमच्या सासूबाई.
हे रोज असेच चालू असते थोड्याफार फरकाने.
बायकोशी एकनिष्ठ राहून दुसरीला
बायकोशी एकनिष्ठ राहून दुसरीला तिच्या भक्तीचं फळ देणं हे सामान्य मानवाचं काम नाहीच. इथेच दैवी घटनांचा वास येऊ लागतो.
" हा मल्हार राजा होता ना, मग
" हा मल्हार राजा होता ना, मग त्याला दुसरी प्रजेची दरबाराची काही कामं नव्हती काय? सारखं आपलं म्हाळसा नाहीतर बानू.
देव काय असे असतात काय? आणि काय तर परमभक्तीचं फळ म्हणून ह्याने आधी म्हाळसेशी लग्न केलं आता बानूला देणार भक्तीचं फळ. सगळ्या बायकाच ब-या याच्या भक्त. पुरूषांना नाय कधी प्रसन्न होताना दाखवला तो." >>>>> agree
जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा
मल्हाराची कारकिर्द एवढीच नाही
मल्हाराची कारकिर्द एवढीच नाही
मल्हारी मार्तंड बानू आणि म्हाळसा पुर्ता मर्यादीत नाही पण आता कोठार्यांनी तेवढंच दखवायचं ठरवलंय तर काय करणार
एका मुलाखातीत म्हणाला होता मणीचा वध मोठा दाखवणार म्हणे
कोठार्यांनी तेवढंच दखवायचं
कोठार्यांनी तेवढंच दखवायचं ठरवलंय तर काय करणार >>
कोठार्यांनी फक्त पात्र पौराणिक निवडलियत बाकी कथानकाची मांडणी करताना ती सद्ध्याच्या सिरयलींपेक्षा जराही वेगळी नाही असेच मलातरी वाटते. एक हिरो, दोन हिराॅईन यांच्याभोवतीच कथा फिरते. आणि व्हिलन दाखवायलाच हवा म्हणून तो कुंभक हात चोळत बसलेला दाखवतात. मधेच फोडणीला एखादे युद्ध.
आणि त्या राक्षसांपैकी कुंभक
आणि त्या राक्षसांपैकी कुंभक आणि शुक्राचार्य सोडून कोणाला अभिनयातला 'अ' पण माहित आहे का याची शंका वाटते. काहिही करत असतात.
सहमत!
सहमत!
झी ज़िंदगी सारखी दर्जेदार
झी ज़िंदगी सारखी दर्जेदार मालिका प्रसारित करणारी उपग्रह वाहिनी असताना इतर कार्यक्रम बघून मनस्ताप करून घ्यावाच कशाला?
मी डीश टीव्हीचं कणेक्षण बंद
मी डीश टीव्हीचं कणेक्षण बंद करून दोन महीने झाले..
झी ज़िंदगी सारखी दर्जेदार
झी ज़िंदगी सारखी दर्जेदार मालिका प्रसारित करणारी उपग्रह वाहिनी असताना इतर कार्यक्रम बघून मनस्ताप करून घ्यावाच कशाला?>>
घरातील ज्येष्ठ नागरिक याच सिरियली बघतात. आणि त्यांना तुम्ही नका पाहू मला दुसरीच सिरियल पाहायचीय असे नाही सांगता येत. वर कडी म्हणजे त्यांना ऐकू कमी येत असल्याने या सिरियली आपल्याला पहायच्या नसल्या तरी ऐकाव्या तरी लागतातच.
घरातील ज्येष्ठ नागरिक याच
घरातील ज्येष्ठ नागरिक याच सिरियली बघतात. आणि त्यांना तुम्ही नका पाहू मला दुसरीच सिरियल पाहायचीय असे नाही सांगता येत. वर कडी म्हणजे त्यांना ऐकू कमी येत असल्याने या सिरियली आपल्याला पहायच्या नसल्या तरी ऐकाव्या तरी लागतातच. >>> +१११११
बायकोशी एकनिष्ठ राहून दुसरीला
बायकोशी एकनिष्ठ राहून दुसरीला तिच्या भक्तीचं फळ देणं हे सामान्य मानवाचं काम नाहीच. इथेच दैवी घटनांचा वास येऊ लागतो.<<<<<<<
याला साजेसा एक जोक पेश है ::::::::::: हुशार बायको नेहमी नवर्याचे इतके पैसे खर्च करते कि त्याला दुसर्या बाईचे लाड पुरवणे कठीण होवून बसते.
आता हा जोक वरील कथेला कसा साजेसा आहे ते : बानू आणि मल्हार रावांचे लग्न झाले कि ते जेजुरी गडावर येणार पण म्हाळसा मल्हार रावन अट घालणार कि बानू गडाच्या पायथ्याशीच राहील.
यावर आधारीत तो अलका कुबल
यावर आधारीत तो अलका कुबल यांचा चित्रपट आहे ना. त्यात त्यांनी म्हाळसाचं काम केलंय.
कसला भंगार आहे तो चित्रपट आणि त्यातला मल्हार.. नो हँडसम.. नो सिक्स पॅक्स.
अय्या पाहिला कि हो मी ......
अय्या पाहिला कि हो मी ...... रोज रोज च्या कटकटीला कंटाळून (जय मल्हार मालिकेला) शेवटी त्या दिवशी च्यानेल सर्फिंग मध्ये अचानक मला तो खजिना (अलका कुबलचा चित्रपट )सापडला आणि पाहिला कि. तो घार्या डोळ्याचा मल्हार अगदि रितिकला लाजवेल असा आणि आपले ते कुलदीप पवार हेगडे प्रधान (फारच मिश्किल दाखवले होते बा झेपले नाहीत) आन बानू बाय तर ती आपली 'तेजा' सुपर्ब स्टारकास्ट (टाळ्या वाजवणारी बाहुली) म्हाल्सेचे रुप तर काय वर्णावे. आणि इकडे मालिकेत काय ती धीर गंभीर पात्रे काय च्या काय !!!!
छान होता तो चित्रपट मी आवडीने पाहिला.
अवांतर : माझ्या मुलीना नाही दाखवला नाही तर मला दिलेली कॉम्प्लिमेंट मागे घेतली असती त्यांनी.
किवा मम्मा म्हातारपणी म्हाळसा अशी दिसणार वैगरे काहीतरि.
माझ्या मुलीना नाही दाखवला
माझ्या मुलीना नाही दाखवला नाही तर मला दिलेली कॉम्प्लिमेंट मागे घेतली असती त्यांनी.>>
मलाही म्हाळसा खुपच आवडते. त्यामुळेच तिला दु:ख देणार्या त्या मल्हारचा प्रचंड राग येतो.
(No subject)
बानूचे पिताश्री म्हणजे आपले
बानूचे पिताश्री म्हणजे आपले नथुराम गोडसे ना ? बापल्येक दोघंही ग्रामीण बाज चांगला सांभाळतात.
बानूची मैत्रीण अद्याप ग्रामीण बोली बोलताना स्टायपेंड वर असल्यासारखी वाटते (जसे स्वतः खंडेराय सदाशिवराव पेठेंची बोली बोलताना स्टायपेंड वर असल्यासारखे वाटतात).
ते शरद पोंक्षे नाहीत.
ते शरद पोंक्षे नाहीत.
नवीन सोन्याचा ग्रह बनवत होते,
नवीन सोन्याचा ग्रह बनवत होते, काय झाले काय माहित.
बानूचे पिताश्री म्हणजे आपले
बानूचे पिताश्री म्हणजे आपले नथुराम गोडसे ना ?
>>
नाही
ते शरद पोंक्षे <<< तिकडे
ते शरद पोंक्षे <<< तिकडे कन्यादान करत आहेत. मग इकडे बानुबाय च कन्यादान परवडणार नाही त्यांना
आता म्हाळसेला तिच्या मुळ
आता म्हाळसेला तिच्या मुळ रुपाची आठवण करुन देणार आहेत. म्हणजे मल्हार बानूशी लग्न करायला मोकळा
आता म्हाळसेला तिच्या मुळ
आता म्हाळसेला तिच्या मुळ रुपाची आठवण करुन देणार आहेत. म्हणजे मल्हार बानूशी लग्न करायला मोकळा
>>
हुश्श!
अलका कुबालच्या सिनेमात असे
अलका कुबालच्या सिनेमात असे काही दाखविले न्हव्ते. लग्न करून देव बानुबायला लगेच घेवून निघतात.
अलका कुबालच्या सिनेमात असे
अलका कुबालच्या सिनेमात असे काही दाखविले न्हव्ते. लग्न करून देव बानुबायला लगेच घेवून निघतात.>>
या सिरियल मधला देव कोठा-यांच्या मनात येईल तसे वागतो.
या सिरियल मधला देव
या सिरियल मधला देव कोठा-यांच्या मनात येईल तसे वागतो.
Pages