आशादायक टी.व्ही.मालिका

Submitted by pltambe@yahoo.co.in on 30 March, 2014 - 13:09

माझ्या आठवणीप्रमाणे साधारणत: १९९० च्या दशकात ज्यावेळी . टी.व्ही.घराघरात पोहोचला नव्हता. टी.व्ही. म्हणजे फक्त “दूरदर्शन” असे साधे समीकरण होते. आख्या चाळीत किंवा वाड्यात एखाद्याकडेच टी.व्ही.असायचा व त्यावरील लोकप्रिय कार्यक्रम / मालिका पाहायला अख्या वाड्यातील किंवा चाळीतील इतर बिर्हााडातील नुसती बाळगोपाळच नव्हेत तर सर्वच वडीलधारी स्त्री-पुरुष मंडळीसुद्धा कामधाम विसरून टी.व्ही.समोर बासलेली असत.
त्या काळात दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी ९ ते १० एक तास रामानंद सागर ह्यांची “रामायण’” व नंतर महाभारत अशा पौराणिक मालिका लागायच्या . त्या वेळात पुण्यातील रस्ते अक्षरश: ओस पडलेले असत. प्रत्येक जण आपापल्या कामांचे नियोजन या मालिकांची वेळ लक्षात ठेऊनच करत. आठवड्यातून एकदा संध्याकाळी ७ वाजता “गजरा” हा लोकप्रिय कार्यक्रम होत असे तर रात्री ९ वाजता “हमलोग” ही हिन्दी मालिका लागायची.हिचे सुत्रसंचालन लोकप्रिय हिन्दी अभिनेते स्वर्गीय अशोककुमार उर्फ दादामुनी करत असत. त्यानंतर आल्या “नुक्कड” व “सर्कस” ह्या हिन्दी मालिका. (सर्कसमध्ये शाहरुख खान हा आजचा आघाडीचा सेलिब्रिटी नायक त्यावेळी एकदमच होतकरू नावनायक होता) त्याचबरोबर छायागीत हा कृष्ण-धवल रंगातील चित्रपट गीतांचा कार्यक्रमही लोकप्रिय होता. “सुरभी “, “ज्ञानदीप “ व “आरोग्य संपदा “ सारखे दर्जेदार,माहिपूर्ण व अभिरुचीपूर्ण कार्यक्रम होत अस्त जे विसरू म्हटले तरी विसरणे अशक्य आहे.
काळ बदलत गेला प्रसार माध्यमात क्रांती झाली. कृष्ण-धवलची जागा रंगीत टी.व्ही.ने घेतली.तसेच टी.व्ही.च्या भरमसाठ किमती उतरून तो सामान्य माणसाच्या आवाक्यात आला. तंत्रद्यनातही सुधारणा होऊन प्रथम एल.सी.डी. मग प्लाझा व नंतर एल.ई.डी. असे एकापेक्षा स्मार्ट टी. व्ही.आले. मोठा खूप जागा व्यापणारा टी.व्ही.जाऊन त्याची जागा ३” जाडीच्या एखाद्या फोटो फ्रेम सारख्या टी.व्ही.ने घेतली. टी.व्ही.वर दूरदर्शन बरोबरच इतर अनेक चॅनेल्स आले. आता घरोघरीच नव्हेतर झोपडपट्यातही टी.व्ही.दिसू लागला. पावसाळ्यातील कुत्र्याचा शेपटींप्रमाणे टी.व्ही.वर वाहिन्यांचे जणू पेवच फुटले. शेकड्यांनी वाहिन्या आल्या. अनेक भाषातून त्यांचे प्रसारण दिवस-रात्र २४ तास सुरू झाले.प्रेक्षकही ( यात लाहान मुलांपासून ते ९० वर्षांच्या वृद्धांपर्यन्त सर्व थरातील प्रेक्षक) या भुलभुलैयात टी.व्ही.च्या (यालाच इडियट बॉक्स असेही म्हणतात) एव्हढे आहारी गेलेत (अॅाडीक्ट) झालेत की त्यांना दिवसभर एक क्षण भरही टी.व्ही समोरून उठायला नको असते. जेवण-खाण सर्व टी.व्ही समोरच घेतात.
पण दर्जाचे काय ? वाहिन्याची संख्या जसजशी चढत्या क्रमाने बेसुमार वाढत गेली तासतसा दर्जा मात्र उतरत्या भाजणीसारखा घसरतच चालला आहे. आता मालिका फक्त टीआरपी साठीच दाखवल्या जातात. विविध वाहिन्यांच्या ह्या टीआरपी युद्धात प्रेक्षकांची आवड लक्षात घेण्याची कुणालाच जरूरही वाटत नसते. काय दाखवायचे ते, ते ठरवतात व ते जे दाखवतील ते प्रेक्षकांनी निमूटपणे पहायचे असते. त्यांनी प्रेक्षकांना दुसरा कुठलाही पर्यायच ठेवलेला नसतो. प्रत्येक मालिकेत सासू-सुनांची कारस्थाने,भांडणे,नवर्यांेचे इतर अनेक स्त्रियांबरोबरचे संबंध सर्रास दाखवले जाऊ लागले , मालिकेतील स्त्री पात्रे घरातही ऊंची वस्त्रे व दागदागिने घालून ,नटून-थटून वावरू लागल्या. ओढून-ताणून दोन-दोन वर्षे मालिका चालू तेल्या जाऊ लागल्या. (यालाच डेली सोप असे नांव आहे) कुत्राच्या शेपटाप्रमाणे मालिकांचे जणू पेवच फुटले. उदाहरणार्थ “चार दिवस सासूचे” ही ई.टी.व्ही वरची चार वर्षे प्रेक्षकाच्या माथी मारलेली अत्यंत रटाळ मालिका किंवा झी.टीव्ही.वर अद्यापही चालूच ठेवण्यात आलेली “तू तिथे मी” ही अतिशर टूक्कार मालिका. केवळ या चनेल्सच्या व्यवस्थापनाला ती चालू ठेवावीशी वाटते म्हणून ती चालू असते. अनेक सुजाण व सुज्ञ लोकांना याचा इतका उबग येऊ लागला की त्यांनी टी.व्ही. बघणेच सोडून दिले. वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठवली जाऊ लागली. पण वाहिन्याची मालक मंडळी मात्र डोळ्यावरची झापड उघडण्यास तयार नव्हती. जणू काही त्यांच्या संवेदना बोथट झाल्या होत्या.
पण गेल्या वर्षापासून हे चित्र हळू-हळू बदलत असल्याचे दिसू लागले असून त्यामध्ये आशादायक बादल होत असल्याचे दिसू लागले आहे. मला आठवते त्याप्रमाणे या बदलाची सुरुवात झी टी.व्ही.वर दाखविण्यात आलेल्या “वादळवाट” व “गंगाधर टिपरे” ह्या मालिकांपासून झाली. (मात्र वादळवाट ही मालिका प्रेशकाच्या मनाशी एकरूप झाली असतांनाच व उत्सुकता शिगेला पोहोचायच्या आताच अगदी अचानकच कोणतेही कारण न देता एकाएकी बंद केली गेली. बहुधा त्यांचे “झी” च्या व्यवस्थापणाशी पटले नसावे.) त्यानंतर झी टी.व्ही ने “ प्रपंच “,” संध्या-छाया “ ,”असंभव”, “ उंच माझा झोका “, “ एका लग्नाची दुसरी गोष्ट “ , “ रेशीमगाठी “, “ एका लग्नाची तिसरी गोष्ट “, “जावई विकत घेणे आहे “ अशा एकाहून एक सरस,दर्जेदार व सर्व कुटुंबाने एकत्र बसून अवश्य बघाव्यात अशा मालिका दाखवायला सुरुवात केली आहे.ई. टी. व्ही वरसुद्धा “सोनियाचा उंबरा”,”अग्निहोत्र”,”मन माझे तुझा झाले” अशा सुंदर कौटुंबिक मालिका आणल्या आहेत. या मालिकात हेवेदावे,भांडणे सुडाचे राजकारण न दाखवता कुटुंबातील एकोपा,नातेसंबंध दृढ कसे राहतील व होतील याबद्दल सकारात्मक विचार दाखवण्यात आले आहेत.उंच माझा झोका ही मालिका ऐतिहासिक असूनही प्रेक्षकांना ती एव्हढी आवडली की प्रेक्षक यमु , रमा व महादेव ह्यांचेशी एकरूप होऊन गेले. तीच गोष्ट राधा-घना ,कुहू,आज्जी यांची झाली होती. या मालिका अजून संपूच नयेत असेच सर्व प्रेक्षकांना वाटत होते. मालिका संपल्याची त्यांना चुटपुट लागून राहीली हेच त्या मालिकांचे यश होय. हे यश
अशा सकारात्मक,वैचारिक,भावनिक व कौटुंबिक मालिकांचा सुरू झालेला हा सिलसिला यापुढेही असाच चालू राहावा व थकून भागून घरी आल्यावर टी.व्ही वर काहीतरी चांगले पाहायला मिळेल अशी इच्छा व्यक्त करून आता इथेच थांबतो.
Isha.jpgOm.jpgshree.jpgAditya.jpg1480593_10152682645339307_1756232690_n.jpgJnhavi.jpgAaiAjji & umaakant.jpg1559590_10152685478084307_827734710_n.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी पोगो वगैरे जबरदस्ती पहावे लागते ते वेगळे.<<<<<+१००० स ह म त
त्या कार्टून च्यानेल ने अक्षरश: वात आणला आहे तो ओगी नाही बघितला तर जेवण नाही होत आमच्याकडे तो झू का उ आणि त्या नोबिता डोरेमोन चा आवाज ऐकून जाग येते. पण हे आता कंट्रोल मध्ये आहे आणि त्यावर उतार म्हणून 'सब' टीवी.

Pages