भरली कार्ली

Submitted by मेधा on 13 March, 2015 - 18:00
Fried karli
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

८-१० कोवळी कार्ली
२ चमचे दही
एक मध्यम बटाटा उकडून
एक टेबलस्पून बडीशेप कोरडी भाजून पूड
एक - दीड टेबलस्पून धणे जिरे पूड
हळद चिमूटभर
तिखट एक टी स्पून
आवडत असल्यास मेथी + मोहरी+ कलोजी + जिरे कोरडे भाजून त्याची पूड १ टेबलस्पून
मीठ चवी प्रमाणे , + कार्ल्याला लावून ठेवायला
तेल २-३ टेबलस्पून

क्रमवार पाककृती: 

कार्ली उभी चिरुन आतून गर काढून घ्यावा. बाहेरुन पण थोडे सोलून घ्यावे.
कार्ल्याला आतून बाहेरुन मीठ चोळून थोडा वेळ ( १५-२० मिनिटे पुरे ) ठेवावे. मग स्वच्छ धूऊन, घट्ट पिळून घ्यावे.
एका मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमधे ठेवून १-१ मिनिट असे मायक्रोवेवह मधून ३-४ मिनिटे वाफवून घ्यावे

एका कढल्यात मंद आचेवर १ टेबलस्पून तेल गरम करावे. अगदी धूर येईपर्यंत गरम करु नये. तेल तापले की त्यात हळद सोडून सर्व मसाले एका पाठोपाठ घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे. गॅस बंद करुन हळद घालावी.

मसाले, मीठ दही, उकडलेला बटाटा हे सर्व नीट एकत्र करुन कार्ल्यामधे भरावे.
पसरट पॅनमधे २ टेबलस्पून तेल गरम करुन त्यात कारली ठेवावीत. मंद आचेवर सर्व बाजूंनी खरपूस भाजावीत.

वाढणी/प्रमाण: 
आवडी प्रमाणे व कार्ल्याच्या आकारा प्रमाणे,
अधिक टिपा: 

या मसाल्यात पाहिजे तर अनारदाणा भाजून त्याची पूड, पाहिजे असल्यास थोडा गरम मसाला, दही आवडत नसल्यास आमचूर वा लिंबाचा रस असे व्हेरिएशन करू शकता

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक - घरी आई नेहमी करत असे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी!! Happy

मी बटाट्याऐवजी दाणे/तिळाचं कूट आणि दह्याऐवजी आमचूर अशी व्हर्जन करते.
आता अशीही करून बघेन.

मस्त फोटो. (खरंच माशाचे काप वाटले) Happy

इतकी पिक्कुली कारली इकडे क्वचित मिळतात. मिळाली की हीच रेसिपी ट्राय करणेत येईल.

Pages