८-१० कोवळी कार्ली
२ चमचे दही
एक मध्यम बटाटा उकडून
एक टेबलस्पून बडीशेप कोरडी भाजून पूड
एक - दीड टेबलस्पून धणे जिरे पूड
हळद चिमूटभर
तिखट एक टी स्पून
आवडत असल्यास मेथी + मोहरी+ कलोजी + जिरे कोरडे भाजून त्याची पूड १ टेबलस्पून
मीठ चवी प्रमाणे , + कार्ल्याला लावून ठेवायला
तेल २-३ टेबलस्पून
कार्ली उभी चिरुन आतून गर काढून घ्यावा. बाहेरुन पण थोडे सोलून घ्यावे.
कार्ल्याला आतून बाहेरुन मीठ चोळून थोडा वेळ ( १५-२० मिनिटे पुरे ) ठेवावे. मग स्वच्छ धूऊन, घट्ट पिळून घ्यावे.
एका मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमधे ठेवून १-१ मिनिट असे मायक्रोवेवह मधून ३-४ मिनिटे वाफवून घ्यावे
एका कढल्यात मंद आचेवर १ टेबलस्पून तेल गरम करावे. अगदी धूर येईपर्यंत गरम करु नये. तेल तापले की त्यात हळद सोडून सर्व मसाले एका पाठोपाठ घालून १-२ मिनिटे परतून घ्यावे. गॅस बंद करुन हळद घालावी.
मसाले, मीठ दही, उकडलेला बटाटा हे सर्व नीट एकत्र करुन कार्ल्यामधे भरावे.
पसरट पॅनमधे २ टेबलस्पून तेल गरम करुन त्यात कारली ठेवावीत. मंद आचेवर सर्व बाजूंनी खरपूस भाजावीत.
या मसाल्यात पाहिजे तर अनारदाणा भाजून त्याची पूड, पाहिजे असल्यास थोडा गरम मसाला, दही आवडत नसल्यास आमचूर वा लिंबाचा रस असे व्हेरिएशन करू शकता
आजी म्हणायची पांढरी कोवळी व
आजी म्हणायची पांढरी कोवळी व कमी कडू असतात >> हो मी पण ऐकलंय असं. पण इथे काही हा ऑप्शन मिळत नाही. पदरी पडलेल्याला पवित्र म्हणावं लागतं
आजी बरोब्बर म्हणायची, आशूडी.
आजी बरोब्बर म्हणायची, आशूडी. पण पांढरी कारली श्रावणातच मिळतात. (मुंबईत तरी)
आशूडी, इथे मला पांढरी कार्ली
आशूडी, इथे मला पांढरी कार्ली अगदी क्वचितच मिळतात. मी हिरवी कार्लीच घेतली होती.
रमड, काऊ, फोटो मस्त आलेत
छान !!!!!!! तोपासु.
छान !!!!!!! तोपासु.
धन्यवाद सर्वांना. म्हणजे
धन्यवाद सर्वांना. म्हणजे दुर्मिळत्वाच्या गुणामुळे पांढरी कारली पटकन उचलावी तर.
पांढरी कारलीही नेहमी मिळतात
पांढरी कारलीही नेहमी मिळतात
रेस्पी आवडली. फोटो फार
रेस्पी आवडली. फोटो फार तोंपासो आहेत.
पा.कृ, फोटो दोन्ही
पा.कृ, फोटो दोन्ही मस्तच.
कारल्याचे किती प्रकार यादीत आहेत.
मस्त रेसिपी मेधा thanks! आज
मस्त रेसिपी मेधा thanks!
आज करून पाहिली. प्रचंड आवडली. सारण थोडं जास्त झालेलं माझ्या कडून, तर लगेहाथ त्याचा पराठा केला. तो ही मस्त झालेला.
मस्त रेसीपी
मस्त रेसीपी
अगदी मस्त झाली होती,एकच नंबर
अगदी मस्त झाली होती,एकच नंबर
मी अगदी बारीक चिरलेला कांदा आणि तांदळाचे पीठ पण add केले त्यात,
कार्ली ऑटाफे. करून बघणेत येईल
कार्ली ऑटाफे. करून बघणेत येईल. तोंपासु पाकृ वाटतेय ~~+१२३४५
सगळे फोटो पण भारीच आहेत.
Pages