पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.
असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.
ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.
व्यक्तिरेखांचे खर्याखुर्या
व्यक्तिरेखांचे खर्याखुर्या माणसांसारखे चित्रण.
८०% लोकांचा उत्तम अभिनय. अभिनयात कॅरेक्टर कन्सिस्टन्सी आणि ग्राफ फार करेक्टपणे नेणे. (आपल्याकडच्या मालिकांमधे हे प्रमाण ५% सुद्धा मिळेल की नाही याची शंका आहे!)
कथा वा विषय तोच तोच असला तरी संयत हाताळणी.
काही अप्रतिम लिहिलेले सीन्स.
कॅमेरा वर्क - देसी सिरीयलींच्या चकचकाटाची सवय असल्याने या कधी कधी अंधार्या वाटू शकतात क्वचित. पण फ्रेम्स फार मस्त लावलेल्या असतात.
कालच त्या पिया रे मधला एक सीन पाह्यला. रात्री प्रचंड पावसात हिरो, हिरोईनच्या खिडकीत येतो. ती घाईघाईत त्याचे म्हणणे ऐकून, आता तू जा कुणीतरी येईल म्हणून त्याला ऑलमोस्ट हाकलते. लास्ट फ्रेममधे ती खिडकीत आहे. खिडकीच्या गजांच्या आड आहे. तिच्या चेहर्यावर प्रकाश आहे. ती त्याच्या जाण्याकडे पहातेय. कुणीतरी येईल च्या धास्तीपासून हळूहळू एक्स्प्रेशन बदलत खुदकन हसता हसता ती खिडकी सरकवत बंद करते.
सरकवून बंद केलेले खिडकीचे पॅनेल लाकडी आणि मधे मधे ब्राऊन काच असे आहे, त्याच्यामागे गज आहेत आणि त्याच्यामागे ती...
क्षणभर तिथे कॅमेरा स्थिरावतो आणि मग ती आत जाण्यासाठी उठू लागते तिथे शॉट संपतो.
आता रोमान्स यात नाही तर कशात आहे?
वर नमुद केलेल्या इतर मालिका
वर नमुद केलेल्या इतर मालिका माहित नाहीत पण 'जिंदगी गुलझार है' मला फार आवडली. बुनियादची आठवण आली.
नवीन देशी हिंदी/मराठी मालिका आता बघवत नाहीत.
जिज्ञासा/मयेकर/नीरजा +१
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Y_Sz5z_o7EI
रोमँटिक सीन तरल बिरल नसेल पण खुसखुशीत आहे
मयेकर .. खूप सुंदर परीक्षण
मयेकर .. खूप सुंदर परीक्षण लिहील आहेत तुम्ही...
रोमान्स मिसिंग वाटला असेल तर पुन्हा एकदा चष्मा पुसून फवादचा अभिनय पाहायला हवा.>> + 10000
उगाच ओव्हरअॅक्टिंग न करता तुमच्या आमच्यासारखीच सामान्य माणसं वाटतात, हेच सनम सईद, फवाद खान आणि इतर अभिनेत्यांचे यश आहे असं मला वाटत. फवादचे डोळे आणि चेहरा खूपच बोलका आहे.. पण आपल्याकडे 'खूबसूरत'मध्ये त्याला अक्षरश: वाया घालवलं आहे.. सोनमपुढे त्याला काही स्कोपच दिलेला नाही ( काय करणार ? घरचाच चित्रपट ना तिच्या.. सो यत्र तत्र सर्वत्र तीच दिसली पाहिजे.. त्यामुळे फवाद आणि त्याच्या वडिलांच काम करणारा अभिनेता ( आत्ता नाव आठवत नाहीये) हे असूनसुद्धा नसल्यासारखे वाटले चित्रपटात..) i hope फवादला यापुढे आपल्याकडे जास्तीत जास्त चांगले चित्रपट आणि रोल मिळावेत
खऱ्या आयुष्यात माणसं अशीच
खऱ्या आयुष्यात माणसं अशीच complicated आणि उलटसुलट वागत असतात आणि ते तसंच दाखवल्यासारखं वाटलं.>>>>>>>१०० % अनुमोदन.
जिज्ञासा, मयेकर, नीधप ला
जिज्ञासा, मयेकर, नीधप ला अनुमोदन.
काही काही सीन्स मध्ये काही घडतच नाही, हे मला अतिशय आवडलं. सतत काहीतरी उत्कंठावर्धक घडावे"च" अशी अपेक्षा कशाला? अनेकदा काही घडत नाही, संवाद नाहीत, लाउड पार्श्वसंगीत नाही पण तरी अभिनयातून बरंच काही कळतं.
तलखियाँ पण फार छान आहे. "गॉड ऑफ स्मॉल थिंग्स" वाचलं तेव्हा मला आवडलं नव्हतं, पण त्यावर आधारित ही मालिका खुपच छान.
वॉर्निंग- ही जिंगुहै पेक्षाही संथ आणि डार्क आहे.
बेहद टेलिफिल्म अतिशयच आवडली.
मला संथ किंवा आर्ट फिल्म टाईप
मला संथ किंवा आर्ट फिल्म टाईप बघायला आवडतं खरं तर. रोजच्या घरातल्या प्रसंगांवर बेतलेल्या प्रतिमा कुलकर्णींच्या प्रपंच किंवा केदार शिंदेंची टिपरे वगैरे मालिकाही अतिशय आवडत्या आहेत.
पाकिस्तानी मालिका जी एक बघितली ती बोअर वाटली यामागे मयेकर म्हणतात तसं झारुनचं male chauvinist असणं मला खटकलं हे मेन कारण असावं असं वाटतं.
दुसरं म्हणजे या संपूर्ण सीरीयल-मेकिंग प्रोसेसमध्येही या टीमवर कसलं तरी दडपण असावं - तिथे कोणालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाहीये असं वाटतं आणि ती घुसमट, डार्कनेस मालिका बघतानाही जाणवतो. अंजलीने सांगितलं की मौलवी 'मालिकेतील लग्नाचा सीन' आणि प्रत्यक्ष लग्न यांतील फरकही समजून घेऊ शकत नाहीत आणि म्हणून तोही विचार मालिका बनवताना करायला लागतो. असे अनेक बारीकसारीक विचार करावे लागत असतील.
एकंदरित- 'बापरे! नशिब आपण तिकडे राहत नाही..' असं वाटून गेलं.
जिज्ञासा आणि भरत मयेकर
जिज्ञासा आणि भरत मयेकर यांच्या प्रतीसादाला अनुमोदन,
खुप सुंदर लिहिले आहे .'जिंदगी गुलजार है' सिरीयल बद्दल कुणीच कसं जास्त लिहिलं नाही .असं वाटत होतं .इतकं छान लिहिलय की सिरीयल सगळी डोळ्यांसमोर तरळुन गेली.
सिरीयलीतल्या सगळ्या व्यक्तीरेखा आपल्या रीतीने योग्यच वाटतात.कशफ ची आई व तीच्या मधे जरी काही गोष्टी पटत नसल्या तरी तीच आई सुरवातीला आपल्या मुलींसाठी कष्ट करुन वागुन वाढवत असते. आणि शेवटच्या भागांमधे तीला तीच्या नवर्याकडुन मिळणारं महत्व जे तीला अनपे़क्षीत असतं आणि ते सर्व फक्त तीच्या मुलींमुळे शक्य झालं याचा तीला सार्थ अभिमानही वाटतो.हा आईचा एक विजय या कथेत दाखवलाय.त्यातुन आईची भुमिका पटते.
कशफ आणि झारुनचे डायरी लिहितानाचे संवाद खुपच सुरेख आहेत.दोघांचेही आपआपले अडचणी व प्रश्न असतात. जे दोघांमधेही स्वतःच्या आयुश्याबाबद कॉम्लेक्स आणत असतात. कशफ ला ज्याप्रमाणे गरीबी व वडिलांविषयी नाराजी ,नकारत्मक अॅप्रोच असतो त्याप्रमाणे झारुनलाही आपल्या आईबद्दल नकारात्मक भाव नसले तरी तीने वेळ दिल्याची खंत असते श्रीमंती असली तरी.ज्यामुळे त्याची एकंदरीत chauvinist पर्सनालिटी बनलेली वाटते .जी सिरीयलीत योग्य वाटते.आणि कशफलाही सुरवातीपासुनचा जो दिसण्याचा व गरीबीचा कॉम्लेक्स असतो तोही योग्य वाटतो.त्यामुळे सुरवातीलाच्या भांडणातील 'चुडैल अव्वल' पासुन जो मतभेद असतो तो शेवटपर्यंत राहतो.आणि त्यामुळेच झारुनला नंतर नोकरी करत असताना जरी कशफ च्या प्रेमात असला ,तरी कशफ ला त्याच्या स्वभावाची आणि एकंदरीत त्याची खात्री पटत नसते ,सुरवातीला मग चहाच्या सांडण्यावरुन झालेल्या प्रसंगातुन ती जरी होकार देत असली तरी शेवट्पर्यंत दोघांमधे काही गैरसमज ,मतभेद राहतातच. जे शेवटी दुर होतात.
झारुनचा अभिनय मस्तच आहे अगदि कशफ च्या घरी पहिल्यांदा सोडायला येतानाचा किंवा शेवटच्या भागात मला घेऊन जा म्हटल्यावर ऐन रात्रीच येऊन हजर होणे.हे सीन खुप छान वाटतात.
<<खऱ्या आयुष्यात माणसं अशीच complicated आणि उलटसुलट वागत असतात आणि ते तसंच दाखवल्यासारखं वाटलं.<<रोमान्स मिसिंग वाटला असेल तर पुन्हा एकदा चष्मा पुसून फवादचा अभिनय पाहायला हवा.>> +१००००००००
नी ,भरत आणी जिज्ञासा +१०,०००
नी ,भरत आणी जिज्ञासा +१०,०००
इतक्या सुंदर रीतीने तुम्ही सर्वांनी परिक्षण केलंय.. व्वा..
मयेकर, उत्तम लिहिलंय..
मयेकर, उत्तम लिहिलंय..
मयेकर, मस्त लिहिलंय. दुर्रे
मयेकर, मस्त लिहिलंय.
दुर्रे शहवार आताच पाहिली.मस्त आहे. सनम बलोच आणि तिचे वडिल यांचे संवाद आणि अभिनय लाजवाब.
'शिकंज' कोणी पाहतंय का? काय
'शिकंज' कोणी पाहतंय का? काय प्रॉब्लेम आहे नक्की दोन्ही बहिणींमधे?
आज रंग है संपली?
आज रंग है संपली?
शिकंज - थोरली - झेब सर्व
शिकंज -
थोरली - झेब सर्व नातेवाईकांची लाडकी. तिला सगळ्यांकडून भेटवस्तू मिळतात. तिने नाकारलेल्या वस्तू धाकटी - नताशाला मिळतात असे तिला वाटते. याउलट धाकटी आपल्याकडून सर्व वस्तू हिसकावून घ्यायची पण वस्तू मिळाल्यावर तिचा त्यातला रस संपायचा असे झेबला वाटते.
आता नताशाचा नवर्या (बिलाल) बाबतही असाच घोळ झालाय. मोठीने नाकारला म्हणून आपल्याला मिळाला असे तिला वाटतेय.
ओह, thanks चेतन.
ओह, thanks चेतन.
लग्नासारख्या मह्त्वाच्या निर्णयात ती सांगू शकत नाही, हा मुलगा नको म्हणून? तिचे expressions कधी बदलतच नाहीत. राग आला तरी तेच, वाईट् वाटलं तरी तेच.
ती झेबा पण लबाड आहेच.
पण आवडते ती अभिनेत्री मला, 'मात' पासून.
वेलकम! << लग्नासारख्या
वेलकम!
<< लग्नासारख्या मह्त्वाच्या निर्णयात ती सांगू शकत नाही, हा मुलगा नको म्हणून? >>
तुम्ही कुठला भाग चुकविलाय का? नाहीतर हा प्रश्न पडला नसता. थोरली आधी असे भासविते की, तो मुलगा (बिलाल) फार चांगला हुशार आहे. तेव्हा ती त्याच्यासोबत लग्न करायचं ठरवित असते. पण ती त्याच्याशी फोनवर बोलताना नताशा नावाने बोलते. तिच्या फोनवर बोलण्याने प्रभावित झालेला तो नताशासोबतच लग्न करायचे असा हट्ट धरतो. झेब वयस्कर आहे अस म्हणत तिला नाकारतो. मग हा मुलगा अपरिपक्व आहे असे म्हणत आणि अनायसे त्याला नताशासोबतच लग्न करायचे आहे तर झेब त्याच्यासोबत नताशाचे लग्न लावून देण्यासोबत घरच्यांना सुचविते.
जेव्हा झेबकरिता बिलालचे स्थळ आलेले असते तेव्हा नताशाला मत्सर होत असतो, आता तिला त्याने नाकारले आणि तो आपल्याला मिळतोय याचा तिला आनंद होतो; पण मग तिला कळते की तो स्वतःची नोकरी / व्यवसाय
करीत नसून मोठ्या भावाच्या उद्योगात त्याचा सहाय्यक आहे. यावर तिला असे वाटते की या स्थळातल्या कमतरतेमुळेच मोठीने हे स्थळ आपल्या गळ्यात मारले. अर्थात तोवर उशीर झालेला असतो. लग्नाला फक्त दोन दिवस उरलेले असतात. त्यामुळे ती नकार देऊ शकत नाही.
थोरली खट्याळ आहे आणि धाकटी नाठाळ आहे. त्यांच्या पूर्वीपासून चालत आलेल्या भांडणात दोघीही चूकीच्या आहेत असे निदान पहिले आठ भाग पाहून तरी वाटते.
फवाद खानची नवीन मालिका कधी
फवाद खानची नवीन मालिका कधी सुरु होतेय? त्यात ती नुरपुर की राणी मधली मुलगी आहे.. नाव कोणत्यातरी गाण्यावरुन आहे..
वक्त ने किया क्या हँसी सितम.
वक्त ने किया क्या हँसी सितम. बहुतेक २३ मार्चपासून.
ओक्के..
ओक्के..
शिकंज नाही हो, शिकन.
शिकंज नाही हो, शिकन.
नी, आज रंग है संपली नाही
नी, आज रंग है संपली नाही अजून. मस्त आहे ती सिरिअल.
मी पहिले दोनच भाग बघितले आणि
मी पहिले दोनच भाग बघितले आणि मग टिव्हीची ट्यूबच फुस्स झालीये. आता अजून काही दिवस घ्यायचाच नाही टिव्ही असा निर्णय माझा मीच घेऊन टाकलाय. (काम होतायत म्हणून )
thanks चेतन. पहिल्या २ एपि
thanks चेतन. पहिल्या २ एपि नंतर मी एक्दम कालचा एपी पाहिला. त्यामुळे काहीच कळत नव्ह्तं.
मेहरीन जब्बारची एक नवीन
मेहरीन जब्बारची एक नवीन सिरीयल सुरु झाली आहे. (अर्थात पाकिस्तानी टीव्हीवर! पण gossip news is की ती लवकरच झी जिंदगी साठी एक सिरीयल करणार आहे.) ह्या सिरीयलचं नाव आहे मेरा नाम युसुफ है. आधी हिचं नाव झुलेखा बिना युसुफ असं होतं पण मग ते बदललं! का? माहिती नाही! मला आधीचं नाव जास्ती आवडलं होतं! असो!
ही एक love story आहे. In fact, Zulaikha/zulekha and Yusuf are a famous couple in Islam like Heer-Ranjha! There are different versions of this story. This serial appears to be a modern day take on the old fable. आत्तापर्यंत २ भाग झाले आहेत आणि दर शुक्रवारी नवीन भाग येतो. खूप भारी चालू आहे असं नाही पण मला मूळ कथा माहिती नाही म्हणून उत्सुकता आहे. सगळे कलाकार एकदम उत्तम. बाकी गोष्टी नेहमीप्रमाणे. ही पहिल्या भागाची लिंक:
https://www.dailymotion.com/video/x2iuinl_mera-naam-yousuf-hai-episode-1...
जिज्ञासा, जिंदगी वर पण
जिज्ञासा,
जिंदगी वर पण दाखणार आहेत का ही सिरियल?
चैत्राली, नाही बहुतेक! कारण
चैत्राली, नाही बहुतेक! कारण हम टीव्ही वर येत नाहीए ही सिरीयल. जिंदगीच्या सगळ्या मालिका HUM channel वरच्या आहेत.
मेहरीन फक्त जिंदगी चॅनलसाठी म्हणून एक मालिका बनवणार आहे असं तिच्या फेसबूक पेज वर कळलं होतं.
http://desirantsnraves.com/ S
http://desirantsnraves.com/
Stumbled upon this awesome website/blog for Pakistani TV dramas! Absolutely loved reading these eloquent reviews about each and every drama..very vivid yet subtle and filled with lots of love! मला एकदम अशोक मामांची आठवण झाली..कोणे एके काळी जेव्हा होसूमी चांगली चालली होती तेव्हा त्यांचे अपडेट्स वाचायला अशीच मजा यायची!
हे चॅनेल आहे का नाही माहीत
हे चॅनेल आहे का नाही माहीत नाही पण टाटा स्कायचे एनिवेअर टीव्ही म्हणून अॅप आहे व एक हॉटस्टार म्हणून आहे त्यावर बर्याच मालिका कुठे ही बघता येतात. स्मार्ट फोन किंवा टॅब वर. टीव्ही सेटची गरज नाही.
माहिरा खानचे हमसफरमधले काम
माहिरा खानचे हमसफरमधले काम आवडले होते म्हणून तिची सध्या सुरु असलेली सदके तुम्हारे (sadqay tumhare) ही मालिका बघायला घेतली. युट्यूबवर सगळे भाग आहेत. अजून मालिका संपलेली नाही! शेवटचे २/३ भाग व्हायचे आहेत पण मला राहवत नाहीये म्हणून लिहित्येय!
खलील उल रेहमान ह्या लेखकाची ही मालिका ही त्याच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारीत आहे असं त्याने सांगितलं आहे. मालिकेची कथा बघता जर ही खरी गोष्ट असेल तर तर सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भूत असते ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल!
ही आहे एक प्रेमकथा - शानो आणि खलीलची! बऱ्यापैकी cliche story line असलेली..म्हणजे गावगुंडांकडून धो धो मार खाऊन सुद्धा त्यांना धोपटून काढणारा हिरो आणि घरात आई वडिलांच्या नजरकैदेत अडकलेली हिरोईन असलेली. पण ह्या कथेत व्हिलन आहे ती मुलीची सख्खी आई! तिला तिची स्वतःची एक स्टोरी आहे जिच्यामुळे ह्या प्रेमी जीवांची कधीच गाठ पडणार नाही!
मला जाणवलेले ह्या मालिकेचे काही winning points
1. Excellent cinematography: गोष्ट घडते ७० च्या दशकात आणि एका खेड्यात! हे चित्रीकरण इतकं अस्सल आणि सुंदर आहे की त्यासाठी DoP ला १०० पैकी १००० मार्क! मालिका पहा किंवा पाहू नका ह्या मालिकेचा OST (Original Sound track) कसा शूट केला आहे ते जरूर बघा! OST देखिल खूप Amazing आहे..राहत फतेह अली खान ह्यांच्या मखमली आवाजात (https://youtu.be/HZmXZHOWiII?t=32m34s ). अस्सल खेड्यातली घरं, मशीद, तिथलं निवांत जीवन, शेतं, घराचं अंगण, विहीर, अंगणातली झाडे आणि अतिशय सुरेख घरांचे interior (stained glass च्या खिडक्या, झरोके). It's a visual treat!
2. कथेतली पात्र आणि अभिनय: माहिरा खान छान काम करते हे हमसफर मधे पाहिलं आहेच पण इथे देखिल तिने इतकं समजून उमजून काम केलं आहे की तिला ह्यासाठी award मिळाले पाहिजे! शानो दुसरी कोणी असूच शकत नाही! अदनान मलिक नावाच्या एका नवीन कलाकाराने खलीलची भूमिका केली आहे. I am stealing this line from another ST review I read because I can't put it better myself. Adnan has played Khaleel with lot of panache and you can't help but start liking this "a bit नकचढा" hero! ह्या शिवाय कथेतली इतर पात्र देखिल आपापल्या भूमिकेत फिट बसतात विशेषतः शानो ची सखी सहेली हुमैरा आणि शानोचे वडील अमीन साब ह्यांनी सुरेख काम केलं आहे.
पण ही संपूर्ण कथा जिने आपल्या अभिनयाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे ती म्हणजे शानो ची आई रशीदा! सामिया मुमताझ! शानो आणि खलील चे लग्न होऊ नये म्हणून हरतऱ्हेने प्रयत्न करणारी ती एकटी असते. तिने ज्या प्रकारे काम केलं आहे त्यातून तुम्हाला तिचा भयंकर राग येतो आणि तिची बाजू पाहीली की थोडी कीव ही. पण नाही रागच जास्ती येतो Hats off to Samiya Mumtaz!! She is the best! मी कुठेतरी वाचलं की जेष्ठ अभिनेत्री झोहरा सेहगल ह्यांची ती नात आहे! No wonder she is such a talented actor, it's in her genes!
3. अप्रतिम संवाद: ह्या सिरीयलची सुरुवातच भारी आहे! कॉलेजच्या एका वर्गात बसून सगळ्या विद्यार्थिनी मोकळ्या तासाला शेरांच्या भेंडया खेळत आहेत! काय भारी! I was sold on that scene! खलील उर रेहमान is famous for writing beautiful scripts. शानो आणि खलील मधले संवाद तर सुरेख आहेतच पण सगळ्यात सुरेख संवाद आई आणि मुली मधले म्हणजे शानो आणि रशीदा मधले आहेत! माहिरा खान आणि सामिया मुमताझ यांनी त्या संवादांना पुरेपूर न्याय दिला आहे.
अर्थात जसे winning points लिहिले आहेत तसे काही turn offs पण लिहिले पाहिजेत. सिरीयल बऱ्यापैकी संथ आहे. लव्ह स्टोरी तशी नवीन नसल्याने आता पुढे चला असं वाटतं! काही वेळा तर चक्क शाखाचा एखादा सिनेमा पाहात आहोत की काय असं वाटतं इतके अ आणि अ प्रसंग आहेत! अजून एक म्हणजे background story मधली पात्र आणि आत्ताची पात्र ह्याची संगती लावून घ्यावी लागते नाहीतर नक्की कोण कोणाशी कसे वागले असा प्रश्न पडतो! मावशी, काका, भाचा, भाची असे सगळ्या नात्यांचा नक्की अर्थ लावून घेऊन पहावी लागते नाहीतर फार गोंधळ होतो! अर्थात विनिंग पॉईंटस् जास्ती आहेत म्हणून सिरीयल बघावी अशी झाली आहे! मालिका अजून संपलेली नाही. दोन/तीन एपिसोड्स उरल्याने एका भयंकर interesting point वर येऊन थांबली आहे!
स्टोरी सरळधोपट वाटली तरी ती तितकी साधी नाही असं हळूहळू कळत जातं! प्रत्येक पात्र आपल्यापुढे जसं जसं उलगडत जातं तसं आपण विचार करू लागतो की नियती काय काय खेळ खेळत असते! आणि प्रेम माणसाला चांगल्या आणि वाईट दोन्ही दिशांना कुठवर ओढून नेऊ शकतं! In that way the story is very powerfully unfolded and as you see the nuances of it you don't think of it as a cliche love story anymore!
हे थँक्स जिज्ञासा , आजच
हे थँक्स जिज्ञासा , आजच शोधते यू ट्यूब वर सदके..
आजकाल मी यू ट्यूब वर पाकी टेलीफिल्म्स पाहण्याचा धडाका लावलाय.. मस्त एक सवा तासात फिल्लम संपते..
इतक्या पाहिल्या कि नावं अगडम बगडम् झालीत डोक्यात..
इथे लिहीन सावकाशी ने रेकमेंडेड वन्स..
Pages