Submitted by आतिवास on 11 March, 2015 - 09:04
मीटिंग संपली.
बाया लगबगीने घराकडे परतल्या.
“माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला.
मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती.
गेले .
चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय. लिवशील?”
तेवढी मदत मी नक्कीच करू शकते.
तिने एक ‘कार्ड’ आणलं.
ती सांगत गेली तसंतसं मी लिहिलं.
नव-याला होतं पत्र.
त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं.
“पत्ता?” मी विचारलं.
“नाय ठावं”, रखमामावशी म्हणाली.
मी चमकून तिच्याकडे पाहिलं.
“कुठलं गाव?” “त्याचं एखादं पत्र?”
मी विचारलं.
मावशी गप्पच.
“मावशे, पत्र पोचणार कसं?” मी म्हटलं.
तिने डोळे पुसले.
तिची लहानगी पोर बाजूला खेळत होती.
ती म्हणाली, “गावात कुणालाबी नाय ठावं आबाचा पत्त्या”.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
(No subject)
(No subject)
आई ग.....
आई ग.....
धन्यवाद काउ, पियू, धनुकली आणि
धन्यवाद काउ, पियू, धनुकली आणि गंध.
(No subject)
जबरदस्त लिहिले आहे
जबरदस्त लिहिले आहे
सॉलिड
सॉलिड
जबरदस्त लिहिले आहे > +१
जबरदस्त लिहिले आहे > +१
शंभर शब्दात बसलेला जबरी
शंभर शब्दात बसलेला जबरी धक्का..
खरेच! जबरदस्त!
खरेच! जबरदस्त!
(No subject)
(No subject)