मायबोलीवरचे लेखन सुरक्षित करता येईल का?

Submitted by बेफ़िकीर on 7 May, 2013 - 23:22

नमस्कार.

मायबोलीवर आपण जे लेखन करतो ते प्रताधिकार कायद्याखाली येऊ शकत नसावे असा माझा अंदाज आहे. त्यामुळे, ते लेखन कोणी जसेच्या तसे पूर्वपरवानगीशिवाय इतरत्र प्रकाशित केले (मूळ लेखकाचा नामोल्लेख करून अथवा न करून ) तर त्यावर मूळ लेखक किंवा मायबोलीकडून विरोध व्हावा / होईल अशी शक्यता ते लेखन इतरत्र प्रकाशित करणार्‍याच्या मनात येईल असे वाटत नाही.

मी पहिल्या वाक्यात वर्तवलेला अंदाजच चुकीचा असला, म्हणजे प्रताधिकार कायदा लागू होत असला तर प्रश्नच निराळा!

पण तो अंदाज जर बरोबर असला, तर ते मान्य करूनही मनात एक धोक्याची घंटा वाजत आहे की आंतरजालावर आपण केलेले लेखन कोण, कधी, कसे व कुठे प्रकाशित करत असेल व त्याचे काय परिणाम होत असतील, होऊ शकतील.

मायबोली प्रशासनाकडून अशी अपेक्षा व्यक्त करता येईल का की सदस्यांच्या लेखनाचे इतरत्र पुनर्प्रकाशन (त्याच सदस्यांशिवाय इतरांनी) केल्याचे समजल्यास मायबोली त्यावर काही विरोध दर्शवणारी भूमिका घेईल.

(हे अ‍ॅडमीन महोदयांना विपूतून विचारू शकलो असतो, पण सर्वांना आपले मत देता यावे म्हणून जाहीर लिहीत आहे. असे लिहिणे गैर असल्यास अथवा या विषयावर पूर्ण चर्चा आधी कोठे झालेली असल्यास हा धागा अ‍ॅडमीन महोदयांनी कृपया रद्द करावा).

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा लेखन/कलाकृती तयार झाली मग ती कवी/लेखक/चित्रकार यांच्या खाजगी संग्रहात हस्तलिहीत असो, छापील स्वरूपात असो किंवा ब्लॉग/वेबसाईट असो , त्या कलाकृतीला प्रताधिकार कायद्याचे संरक्षण आहे. त्यासाठी वेगळे कागदपत्र किंवा नियम पाळण्याची आवश्यकता नाही. जर मूळ लेखकाची/कलाकाराची परवानगी न घेता ती प्रकाशीत केली गेली तर तो गुन्हा आहे. फक्त लेखकाचे नाव तिथे दिल्यामुळे तुम्ही त्या गुन्ह्यातून मुक्त होऊ शकत नाही.

प्रश्न येतो तो या कायद्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणार्‍या व्यक्तींच्या मागे लागण्याचा कारण त्यांच्या मागे जाण्यात लागणारा वेळ आणि पैसा याची सांगड घालणे अवघड आहे. मायबोलीवरच्या लेखकांची संख्या पाहता असे संरक्षण मायबोलीकडून देणे व्यावहारीक दृष्ट्या अशक्य आहे. अशी व्यक्ती मायबोलीकर असेल, तर या कारणासाठी, मायबोलीवरून त्या व्यक्तीला तडीपार करणे शक्य आहे.

याचा गैरफायदा घेणारे मधून मधून दिसत असतातच. काही जण आधी कॉपी करून नंतर परवानगी मागतात कारण बहुतेक लेखक परवानगी देतीलच असा त्यांचा आडाखा असतो. अशा व्यक्तींसाठी काही खालील उपाय यापूर्वी उपयोगी ठरले आहेत.

१) लेखकाला मायबोलीबाहेर प्रसिद्ध करायचे नसेल तर तसे स्पष्ट शब्दात सांगून लेख दुसर्‍या ठिकाणाहून काढून टाकायला सांगणे
२) जर लेखन सार्वजनिक वेबसाईट्वर असेल तर तिथे तुम्ही/तुमच्या वाचकांनी प्रतिसादात हा लेख/कविता परवानगी शिवाय चोरला आहे असे जाहीरपणे लिहणे. हा लेख आधी कुठे प्रकाशित झाला आहे याचा पुरावा लिहतांना मायबोलीवरच्या लेखनाची लिंक द्यावी.
३) जर ती वेबसाईट दुसरी व्यक्ती/संस्था चालवत असेल तर हा गुन्हा त्यांच्या लक्षात आणून देऊन लेख काढून टाकायची विनंती करणे.
४) जर ती वेबसाईट जाहिरातीद्वारे पैसे मिळवत असेल तर जाहिरात नेट्वर्कला त्या पानावर प्रताधिकार कायद्याचा भंग केला आहे याची जाणीव देणे. पुन्हा मायबोलीवरच्या मूळ लेखाची लिंक पुरावा म्हणून देता येईल. गुगलने पुष्कळ वेळा कारवाई करून लेखकाच्या प्रताधिकाराला संरक्षण दिले आहे. पैसे मिळणे बंद झाले की टाळकी ठिकाणावर येतात.
५) तरीही बदल होत नसेल मायबोली, फेसबुक यासारख्या ठिकाणी अमुक साईट इतरांचे लेख चोरते असा जाहीर उल्लेख करणे. कुठल्याही भविष्यामधे टिकून राहण्याची काळजी करणार्‍या संस्थेला अशी वाईट प्रसिद्धी नको असते.

बेफिकीर,

धाग्यासाठी धन्यवाद!

अजय,

उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आभार.

मागे एकदा एका गृहस्थाने माझी एक गझल फेसबूकवर कुठल्याश्या फोरमवर अगदी नामोल्लेख न करताही पोस्ट केली होती जे विशाल कुलकर्णींनी माझ्या लक्षात आणून दिले होते, शिवाय विशालने तसे तिथेही लिहीले होते. मी स्वतः त्या व्यक्तीला इ-मेल करून विरोध दर्शविला होता आणि भविष्यात असे न करण्याविषयी समज दिली होती. त्या व्यक्तीने माफी मागून पुन्हा असे न करण्याचे मान्य केले होते आणि आजतागायत पाळलेले आहे.

धाग्यासाठी धन्यवाद बेफिकीर अन महत्वाच्या माहितीसाठी अजयजी, चिनूक्स..

आंतरजालावर लेखन करताना समोर येणारा सर्वात त्रासदायक विषय.

अजय,

>>> अशी व्यक्ती मायबोलीकर असेल, तर या कारणासाठी, मायबोलीवरून त्या व्यक्तीला तडीपार करणे शक्य आहे.<<<

तुमचे हे विधान स्पार्टाकस ह्यांच्यासंदर्भातील हा धागा वाचून त्यांना लागू होऊ शकेल का?

एक तर त्यांनी माबोबाह्य लेखन कॉपॅ पेस्ट केल्याचे तपशील कवठीचाफांनी तेथे दिले होते जे प्रशासनाने प्रताधिकाराच्या कारणाने रद्द केले. शिवाय स्पार्टाकस ह्यांनी माझ्या एका कथानकाचा काही भाग खटकण्याइतक्या मात्रेत संदर्भ व तपशीलात बदल करून वापरल्याचे माझ्याशिवाय बाकीच्या काही मायबोलीकरांचे म्हणणे आहे. माझे तसे म्हणणे नाही कारण मी त्यांच्या त्या कथानकाचे दोनच भाग निव्वळ उडत उडत वाचलेले आहेत.

आपल्या उत्तराची नम्र अपेक्षा व्यक्त करतो. Happy

-'बेफिकीर'!

ज्या कारणावरून हा धागा मी उघडला होता तो माझ्या 'गझल-परिचय' ह्या लेखाचा मला न विचारता इतरत्र थेट वापर करणे व नंतर मला ते सांगणे हा प्रकारही मायबोलीकरानेच केलेला होता. पण निदान त्यांनी तसे (नंतर का होईनात) स्वतःहून सांगितले म्हणून मी त्यावेळी अश्या स्वरुपाची विनंती करणे योग्य समजले नाही.

हो ते त्यांना नक्की लागू शकते. आणि ते गंभीरपणे घेतले जात आहे. म्हणुनच तो धागा व्यवस्थित सुरु आहे ज्यामुळे इतरांनाही त्याबद्दलची पारदर्शकता दिसू शकेल.

(मायबोलीचे धोरण आणि त्याबद्दलचे राबवण्याचे काम वेबमास्तर/अ‍ॅडमीन टीम करतात, अजय नाही Happy )

इथे केलेल्या खुलाश्याबद्दल धन्यवाद वेमा.
त्या धाग्यावरही हे प्रकरण गंभीरपणे घेतले जात असल्याची पोस्ट अ‍ॅडमिन टीमकडून अपेक्षित होती.

>>>(मायबोलीचे धोरण आणि त्याबद्दलचे राबवण्याचे काम वेबमास्तर/अ‍ॅडमीन टीम करतात, अजय नाही स्मित <<<

Happy

मनापासून क्षमस्व! केवळ ह्या धाग्यावरील मूळ प्रतिसाद अजय ह्या नावाने होता म्हणून ती गुस्ताखी झाली.

Happy

कृपया लोभ असू द्यावात.

इकॉनॉमिक टाइम्सच्या संकेतस्थळावरून बातमीला मजकूर कॉपी पेस्ट केला तर Do not copy this site's content! असं आलं.

@भरत,
ब्राउजरमध्ये जावास्क्रिप्ट
डिसेबल केल्यास तुम्हाला कॉपी पेस्ट करता येईल.

तिथे 'शेअर' चं चिन्हं असतं ते वापरून लिंक दिली की काम झालं. आपण तो लेख कशाबद्दल आहे हे दोन ओळीत सांगितलं की वाचक तिथे जायचं का नाही ठरवतो.

ही माहिती इथे सांगण्याचा उद्देश मायबोलीवरही असं काही करता आलं तर इथून होणार्‍या वा ङ्मयचौर्याला काही प्रमाणात तरी आळा बसेल.
अन्य एका वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरून मजकूर कॉपी पेस्ट केला तर साधारण दीड ओळ मजकूर कॉपी होऊन पुढे त्या पानाची लिंक पेस्ट होते.

SRD -मला बातमीतल्या दोन महत्त्वाच्या ओळी तेवढ्या शेअर करायच्या होत्या.

जो मजकूर तुम्हाला डोळयांनी वाचता येतो, तो कॉपी करण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणे हे बालिश प्रोग्रमरचे लक्षण आहे. मजकूर कॉपी करणे कुणीच थांबवू शकत नाही.

थांबवु शकत नाही पण कॉपी करणे अगदीच सोपे या पासून थोडे किचकट करता येईल.
सगळ्यांनाच तांत्रिक क्लृप्त्या माहीत नसतील, निदान तेवढ्यां पासुन किंवा माहीत असतील तरी ही वेबसाइट कॉपी होऊ नये म्हणून उपाय करते आहे, तेव्हा कॉपी केले हे लक्षात आले तर आवाज उठवेल अशी त्यातील काहींना भीती वाटून प्रमाण कमी होईल का?

सहमत. घराला कुलूप असूनही चोर चोरी करू शकतात म्हणून काय कुलूप लावू नये की काय? निदान चोरांना सहज आमंत्रण मिळेल अशी व्यवस्था तरी नको.

स्क्रीनशॉटही अलाऊड नसतो बरेच ठिकाणी. ते ही करता येईल.

अर्थात आपण फक्त ईथल्या लेखकांच्या नजरेतून फायदे बघत आहोत. संकेतस्थळाच्या संदर्भात काय फायदेतोटे आहेत हे बघून अंतिम निर्णय येथील प्रशासकांचाच राहील.

भरत, आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचे आहे.

१) एका फोनवर हवा तेवढा मजकूर दिसू लागेल असं स्क्रीनवर आणून दुसऱ्या फोनातील कॅम्राने त्याचा फोटो घ्यायचा. मग इमेज-टु- टेक्स्ट ॲप'ने मजकूर डिजिटल स्वरूपात मिळवता येतो. इंग्रजीसाठी बरीच कार्यक्षम ॲप्स आहेत. मराठी वाचणारी एक दोनच आहेत. (vFlat, Android app, गूगल लेन्स वगैरे).
२) तर अशी 'कॉपी होऊ नये' यासाठी मायबोलीवर युक्ती करणे हा उद्देश असला तरीही लोक येनकेन प्रकारे कॉपी करून स्वतःच्या नावे टाकतीलच. कारण शाबासक्या/स्तुती/श्रेय मिळवायची हौस दांडगी. किंवा कमी श्रमात उत्तरे मिळवणे.
३) chtgpt robotसध्या गाजतो आहे. इतका की विद्यार्थ्यांनी तो वापरून दिलेला अभ्यास सोडवण्यासाठी त्याचा उपयोग सुरू केला आहे. अर्थात एक दोन विद्यापिठांत हे प्रकरण बाद ठरवण्यात आलं आहे.

Chatgpt हे एक उपयुक्त अवजार (tool) आहे. त्याचा वापर तुम्ही कसा कराल, त्याच्यावर त्याची उपयुक्तता अवलंबून आहे. सुरी ही भाजी कापायला वापरता येते किंवा एखाद्याचा खून करायला. यात त्या अवजाराला दोष देण्यात अर्थ नाही.

केवळ घोकंपट्टी करून उत्तरे पाहिजे असणाऱ्या परीक्षेत chatgpt उपयोगी ठरेल. म्हणून परीक्षा घेण्याची पद्धत बदलावी लागेल. जसे open book परीक्षा असते, तसेच काहीसे.

Chatgpt अस्सल एवढ्याच चांगल्या कविता लिहिते ... एकदम spontaneous overflow of powerful feelings वगैरे.....आता याला काय म्हणावे...!

लेखन चोरीला जाऊ नये या उद्देशाने काढलेल्या धाग्यावर लेखन चोरायच्या युक्त्या सांगितल्या जात आहेत. छान!

Pages