Submitted by लीलावती on 28 February, 2015 - 00:19
आजच्या चतुरंग मध्ये प्रा रोहिणी गोडबोले ह्यांनी एक लेख लिहिला आहे.
लेखाची लिंक : http://www.loksatta.com/chaturang-news/women-scientist-need-of-time-1076...
त्या WiS ( Women in Science ) तर्फे आयोजित केलेल्या सेमिनार / चर्चा सत्रान्माध्येही ही आकडेवारी , मते नेहेमीच मांडत असतात . मलाही भेटल्या की सतत उत्तेजन देतात .
रोहिणीताई indian academy of sciences च्या WiS उपक्रमाच्या अध्यक्ष आहेत.
त्यांच्या काळापेक्षा आता परिस्थिती बरीच सुधारते आहे परंतु बऱ्याच समस्या तश्याच आहेत . . .
हा लेख सगळ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यावर चांगली चर्चा व्हावी म्हणून हा धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेशवा, फारच बेसिक पण चांगली
पेशवा, फारच बेसिक पण चांगली पोस्ट. आवडली.
पेशवा, फारच बेसिक पण चांगली
पेशवा, फारच बेसिक पण चांगली पोस्ट. आवडली.
पेशवा, पोस्ट आवडली.
पेशवा, पोस्ट आवडली.
पेशवे, मस्त पोस्ट. एका पुरूष
पेशवे, मस्त पोस्ट. एका पुरूष संशोधकाकडून ही बाजू मांडली गेली हे विशेष!
पेशवे, सुरेख पोस्ट. ही
पेशवे, सुरेख पोस्ट. ही टाईमफ्रेम आधीपासूनच मनावर पक्की कोरली गेल्यामुळे इतरांना उलगडून सांगावी लागते हे विसरायलाच होते
राखी - माझ्या क्षेत्रातील २४ X ७ बद्दल - काय होतं ना, की नोकरीचे तास हे तिथल्या जबाबदार्या/शिकवणं/तिथले प्रकल्प यात जातात. याव्यतिरिक्त तुमचे स्वतःचे संशोधन, वाचन, व्यावसायिक लिखाण, शिकवण्याची तयारी (कारण दरवर्षी नव्याने विषयात पडणारी भर आणि तुमची वाढणारी मॅच्युरिटी) हे सगळं तुम्ही घरी असताना केलं जातं. त्याशिवाय घरच्या जबाबदार्या, कामं असतातच (इथे मी लिंगनिरपेक्ष बोलते आहे - पण सहसा बाईच्या वाट्याला कामाचं तुलनेने जड पारडं येतंच). त्यामुळे तुम्ही कितीही वेळ दिलात तरी अपुरा ठरतो संशोधनाला असा अनुभव आहे. स्वत:चे इंटरेस्ट, थोडासा टीपी, असं सगळेच करतात - तीही गरज असते. (मी नाही का माबो करत? ). पण मिळालेला, शक्य असेल तो सगळा मोकळा वेळ हा पेंडिंग व्यावसायिक कामे पूर्ण करण्यात व स्वतःचे बौद्धिक स्किल्स वाढवण्यात घातला जातो. तो कितीही असला तरी मग अपुराच ठरतो. कामाचा ट्रॅक म्हणते मी तो या गोष्टींच्या मनन- चिंतनाविषयी असतो. प्लॅनिंग, काळज्या अशाचा नसतो. त्यामुळे हा ट्रॅक पूर्णपणे ऑफ करता येत नाही. इतर गोष्टी पूर्ण रस घेऊन केल्या तरी. कारण तुमची ती पॅशनही असते आणि त्यामुळे त्याचा तसा मानसिक स्ट्रेस येत नाही किंवा नको हे आता असंही होत नाही. पण हे सगळं अतिशय दमवणारे असते. फक्त इतर गोष्टींच्या/अॅक्टिव्हिटीजमधून होणार्या दमणुकीपेक्षा मला ही दमणूक हवीशी असते (मला बहुदा नीट लिहिता येत नाहीये). म्हणजे स्ट्रेसबस्टर म्हणून मित्रमैत्रिणी-नातेवाईक असा अड्डा जरूर मारेन पण एखाद्या लग्नात (किंवा तत्सम सोशलायझेशनमधे किंवा साग्रसंगीत स्वैपाकामधे किम्वा नव्याने काही व्यवसायाव्यतिरिक्त स्किल्स शिकण्यात) कमीत कमी आवश्यकतेपेक्षा कणभरही जास्त वेळ घालवण्यापेक्षा घरी येऊन शांतपणे दोनचार तास माझ्या कामाविषयी मनन-वाचन-लेखन करेन, एनी डे!! मला तो कामाचा ट्रॅक थांबवायची इच्छाही नाही. आयुष्यातील सर्वात प्रॉडक्टिव्ह, क्रीएटिव्ह, आनंददायक असा तो भाग आहे. बाकी सगळं सगळं दुय्यम....
यात भारतात साधारणपणे काय होतं - की पुरुषाने असा हक्काचा वेळ काढणं सोपं असतं पण घरातल्या बाईवर/गृहिणीवर तिच्या वेळेवर स्गळ्यांचाच हक्क असतो. मग घरकाम, स्वैपाक (आउटसोर्स केला तरी देखरेख करणे), नातेसंबंध, मुलांचे संगोपन घर टापटिपीचे ठेवणे, इतर व्यवस्थापन याचा बहुतेक भार पारंपरिकरीत्या स्त्रियांनी उचलणे अपेक्षित असते. सोशल कंडिशनिंग असते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा असा वेळ काढणे अवघड होते. त्यासाठी अतिशय काटेकोर आणि रोखठोक वागून कामाच्या जबाबदार्या वाटून द्याव्या लागतात. इतर गृहकृत्यदक्ष संसारांच्या (जे सर्वसामान्यपणे बाईने चालवणे अपेक्षित असतात) तुलनेत घर देखणं टापटीप सुरळीत चालणारं असेलच असं नाही हे स्वीकारायला लागतं. तरीही तुमचा कामाचा टक्का जास्तच असणार हा कडू घोटही गिळून ठेवलेला बरा असतो - वेळप्रसंगी कामाला येतोच येतो.
आणि या उप्पर बहुतेकवेळा घरच्यांचं, का.नां चं अप्रेजल हे बहुतांशी निगेटिव्ह असणारे - तुमच्या व्यावसायिक अचीव्हमेन्ट्सपेक्षा घरसंसाराच्या त्यांच्या मोजपट्टीतल्या अचीव्हमेन्ट्सच (जिथे तुम्ही उणे पडता) कायम मोजल्या, चर्चिल्या, दाखवल्या जाणारेत - हे लक्षात घेऊनच पुढे जायचं असतं. भरीतभर म्हणून तुम्ही घसघशीत एकगठ्ठा पैसेही कमवत नस्ता. अर्थातच कितीही गेंड्याची कातडी पांघरली तरी सतत असे ताण सहन करणं भारतासारख्या भोचक लोकांच्या देशात असह्य होऊ शकतं हेही खरंच. या स्गळ्याचा एकत्रित परिणाम कामावर, त्याच्या दर्जावर होतो. आणि इथे मी वर्षातून दीडदोन महिने फील्डवर्क करणे हे चर्चेलाच घेतले नाहीये...
हा स्वानुभव नाही (तशीही माझी कातडी गेंड्यापेक्षाही जाड आहे म्हणा), पण इतर मैत्रिणींच्या बाबतीत जवळून बघितले आहे.
जया, चांगली पोस्ट.
जया, चांगली पोस्ट.
वरदा, >> ही टाईमफ्रेम
वरदा,
>> ही टाईमफ्रेम आधीपासूनच मनावर पक्की कोरली गेल्यामुळे इतरांना उलगडून सांगावी लागते हे विसरायलाच होते
हे बरोबर बोललात. अगदी संशोधिकेसारखं!
जिज्ञासा यांच्या संशोधनक्षेत्राच्या पुनर्रचनेविषयी तुमचं (आणि सगळ्याचंच) मत वाचायला आवडेल.
संशोधिकेने संसार करावा का? केल्यास कशा प्रकारचा जोडीदार निवडावा? त्याच क्षेत्रातला निवडावा का? का वेगळ्या क्षेत्रातला पण संशोधकच बघावा (अडचणींची जाणीव असेल म्हणून)? का वयाच्या विसाव्या वर्षीच पुढील पंधरा वर्षांचा बेत आखून ठेवण्यास सांगावं?
आ.न.,
-गा.पै.
संशोधिकेने संसार करावा का?
संशोधिकेने संसार करावा का? <<
हा प्रश्न पुरूषाला कोणी विचारत नाहीत. इथे प्रॉब्लेम आहे.
प्रचंड डिमांडिंग करीअर असलेल्या पुरूषाने संसार करावा का? असा प्रश्न का पडत नाही?
>>>संशोधिकेने संसार करावा का?
>>>संशोधिकेने संसार करावा का? केल्यास कशा प्रकारचा जोडीदार निवडावा? त्याच क्षेत्रातला निवडावा का? का वेगळ्या क्षेत्रातला पण संशोधकच बघावा (अडचणींची जाणीव असेल म्हणून)? का वयाच्या विसाव्या वर्षीच पुढील पंधरा वर्षांचा बेत आखून ठेवण्यास सांगावं?<<<
संशोधिकेने काय करावे हे कोणी ठरवू नये, असे काहीतरी नाही का करता येणार?
पेशवा, चांगल्या माहितीपर
पेशवा, चांगल्या माहितीपर पोस्टीसाठी धन्यवाद.
संशोधिकेने हे करावे का, कसे करावे की करू नये त्यापेक्षा 'तिने संशोधन करावे तेच तिचे काम आहे' एवढं म्हटलं तरी पुरे आहे.
पेशवा मस्त पोस्ट समाजाने अशा
पेशवा मस्त पोस्ट
समाजाने अशा ग्रूहकर्तव्यदक्ष स्त्रियांचा एक पूल बनवून ठेवलेलाच आहे. पण स्त्रीला मात्र असा कोणताही पूल उपलब्ध नाही. स्त्रीकडे जाऊन राहणारा नवरा समाज मान्यच करत नाही.... म्हणजे स्त्रीचा चॉइस प्रचंड लिमिटेड होतो... इथे पहिली खीळ बसते...
त्यामुळे ३३-३९ ह्या वयात जेव्हा पुरुष संशोधक आपल्या करिअर मध्ये जोमाने फाउंडेशन उभारत असतात स्त्रिया आपल्या आयुष्यातले मोठे डिसीजन घेत असतात... नोकरी तिला हवी तिथे का नवऱ्याच्या टिंबकटुला? मूल हवे का नको?... एक की दोन ? ह्या मध्ये मेंटल स्पेस जातेच व जर निर्णय घेतले तर त्याचे शारीरिक, आर्थिक व करिअर कॉस्ट्स मल्टिपल्स मध्ये द्याव्या लागतात...
हे दोन की पॉइंट्स आहेत.
वरदा, . अर्थातच कितीही गेंड्याची कातडी पांघरली तरी सतत असे ताण सहन करणं भारतासारख्या भोचक लोकांच्या देशात असह्य होऊ शकतं हेही खरंच. >> +१
संशोधिकेने संसार करावा का? <<
हा प्रश्न पुरूषाला कोणी विचारत नाहीत. इथे प्रॉब्लेम आहे.
प्रचंड डिमांडिंग करीअर असलेल्या पुरूषाने संसार करावा का? असा प्रश्न का पडत नाही? >> +१
पहिल्यापासून चर्चा वाचली..
पहिल्यापासून चर्चा वाचली.. माझ्या ओळखीतल्या आणि नात्यातल्या स्त्री संशोधिकांनी काही वेगळे निर्णय घेतले, आणि त्यांची काही मते वेगळीही आहेत. इथे लिहिली तर अस्थानी ठरू नयेत.
१) हे क्षेत्र वेगळे आहे. ( हा मुद्दा वर सगळ्यांनी मांडलाच आहे ) याच्या मागण्या आणि गरजा वेगळ्या आहेत. पण या सगळ्याची या क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी आपल्याला आणि आपल्या घरच्यांना ( यात आईवडील आणि पुढे सासरचे ) कल्पना असतेच. बाकिंच्यांना समजावत का बसा ? त्यात शक्ती वाया घालवण्याचे काही कारणच नाही
खुपदा संशोधनाच्या विषयाबाबतच समाज अनभिज्ञ असतो..
२) बेभरवश्याचे क्षेत्र असल्याने ( म्हणजे प्रयोग यशस्वी होईलच, एखाद्या ठिकाणी जाऊन काम होईलच याची खात्री नाही ) त्यामूळे यात कुणी पैसा ओतेल, हि अपेक्षा ठेवू नये. ती सोय आपणच करावी करावी पण जर संधी मिळाली तर आपल्या संशोधनाचा व्यावसायिक उपयोग करून घ्यायला अजिबात कचरू नये. पैसे नसणे हे पाप नाही तसेच पैसे कमावणेही नाही. पेटंट घेऊन, लिखाण करून, आपणच व्यावसायिक स्तरावर उत्पादन करून किंवा एखाद्या व्यवसायाला आपले संशोधन विकून अवश्य कमाई करावी.
३) लग्न, मूल यात उतरायचे तर त्याच्याही वेगळ्या मागण्या असतातच. त्यातून आपल्याला मिळणारे सुख आणि मोजावी लागणारी किंमत ( पैश्यातच नव्हे तर वेळेच्या, गमावलेल्या संधीच्या रुपातली ) याचा हिशेब आपल्या आपणच करावा. यात समाजाच्या, नातेवाईकांच्या दबावाला बळी पडू नये. निर्णय आपला असला कि जबाबदारीही आपलीच असते. आणि त्यासाठी काही चाकोरीबाहेरचे निर्णय घ्यावे लागले तरी डगमगू नये.
वरच्या पद्धतीने निर्णय घेतलेल्या काही स्त्रिया माझ्या नातलग आहेत. त्यांना कधीही त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप झाल्याचे दिसले नाही. आपल्या मर्जीने काम केले आणि जगल्याही.
>> संशोधिकेने संसार करावा
>> संशोधिकेने संसार करावा का?
संसार म्हणजे नक्की व्याख्येची कल्पना नाही. तरी संशोधिकेने तिला हवे असल्यास मुलांना जन्म द्यावा, आणि हे तिच्या संशोधनाच्या आड येऊ नये ही अपेक्षा आहे.
माझ्या मते, संशोधक/ संशोधिका यांनी आपली सपोर्ट सिस्टिम तयार करून ठेवायला हवी. उदा बाळ सांभाळायला जवळची माणसे. यांना ५/ १० वर्षे आधीपासून कल्पना देऊन ठेवायला हवी. सिस्टिममध्ये भरपूर बॅकप लक्षात घ्यायला हवा. आणि हे सगळे पस्तिशीत नाही तर पंचविशीत ठरवून ठेवायला हवे. संशोधक व्हायचे असे ठरवल्यावर संशोधन सोडून इतर आयुष्याचे पुढच्या १० वर्षांचे प्लॅनिंग करायला हवे.
नीधप, >> प्रचंड डिमांडिंग
नीधप,
>> प्रचंड डिमांडिंग करीअर असलेल्या पुरूषाने संसार करावा का? असा प्रश्न का पडत नाही?
पुरूष आणि बायका वेगवेगळ्या कारणांसाठी लग्न करतात म्हणून. पुरुषांच्या तुलनेने बायकांना एकतर पर्याय बरेच कमी असतात, शिवाय जे असतात ते खूपदा ताठर (=इनफ्लेक्झिबल) असतात.
आ.न.,
-गा.पै.
मृदुला, >> आणि हे सगळे
मृदुला,
>> आणि हे सगळे पस्तिशीत नाही तर पंचविशीत ठरवून ठेवायला हवे. संशोधक व्हायचे असे ठरवल्यावर संशोधन
>> सोडून इतर आयुष्याचे पुढच्या १० वर्षांचे प्लॅनिंग करायला हवे.
अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. सहज विचारतोय, तुम्ही केव्हा ठरवलंत की संशोधनात पडायचं म्हणून? आधीपासून की नंतर? आधीपासून ठरवलेल्यांना (विशेषत: बायकांना) बराच फायदा होतो.
आ.न.,
-गा.पै.
खूप माहिती मिळतेय इथून पण
खूप माहिती मिळतेय इथून पण अजून बरंच शिकायचं आहे. मलाही पुढे इतिहासात संशोधन करायचे आहे, आवड आहे आणि इच्छाही.
टाइम फ्रेमवाली पोस्ट पेशवा | 6 March, 2015 - 10:30 +१
सहज विचारतोय, तुम्ही केव्हा ठरवलंत की संशोधनात पडायचं म्हणून?
मला सगळ्यांकडून या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.
गामा, मी आधीपासूनच ठरवले होते
गामा, मी आधीपासूनच ठरवले होते संशोधनात न पडायचे. माझा पहिला प्रतिसाद वाचला नाहीत असं दिसतंय.
>> वेगवेगळ्या कारणांसाठी
>> वेगवेगळ्या कारणांसाठी लग्न
ही महत्त्वाची समस्या. खरेतर दोन्ही पार्ट्यांनी जवळपास सारख्याच कारणांनी लग्न करायला हवे.
(स्वतःबाबतीत हे सुदैवाने खरे आहे. मी व अर्धांगाच्या अपेक्षा एकमेकांकडून बर्यापैकी सारख्याच आहेत.)
पुरूष आणि बायका वेगवेगळ्या
पुरूष आणि बायका वेगवेगळ्या कारणांसाठी लग्न करतात म्हणून. <<
कसे?
>>> पुरुषांच्या तुलनेने बायकांना एकतर पर्याय बरेच कमी असतात, शिवाय जे असतात ते खूपदा ताठर (=इनफ्लेक्झिबल) असतात. <<<
सगळ्या रामायणानंतर रामाची सीता कोण चाललंय तुमचं..
ते पर्याय कमी असणे, ते पर्याय इन्फ्लेक्झिबल नसणे हीच अन्याय्य व्यवस्था आहे आणि ती बदलली गेली पाहिजे हाच तर मुद्दा आहे.
सहज विचारतोय, तुम्ही केव्हा
सहज विचारतोय, तुम्ही केव्हा ठरवलंत की संशोधनात पडायचं म्हणून?
मला सगळ्यांकडून या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. स्मित >>> मलाही हवंय !
पेशवा, चांगली पोस्ट!
पेशवा, चांगली पोस्ट!
एक शंका मला पामरालाही
एक शंका मला पामरालाही विचारायची आहे प्रामाणिकपणे! हे कदाचित आधी कोंबडी की आधी अंडे असे विचारल्यासारखे वाटेलही!
संशोधन क्षेत्राची आवड निर्माण झाल्यामुळे अथक परिश्रम घेऊन माणूस त्या क्षेत्राकडे जातो की त्या क्षेत्रात जाण्यास आवश्यक इतकी प्रतिभा अंगी असल्यामुळे असा निर्णय घेतला जातो?
आवड निर्माण झालेली असल्यास ती स्त्रीला आणि पुरुषांना सम प्रमाणात होणार आणि मग स्त्रीला समाजातील दुय्यमपणाचा प्रॉब्लेम भेडसावणार. प्रतिभा अंगी असल्यामुळे तसा निर्णय घेतला जात असेल तर स्त्रीला पूर्णपणे ज्ञात असणार की ती सर्व सामाजिक व कौटुंबिक अपेक्षांना बेदखल करून त्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. ( Or she should do so)
============
एक दुर्दैवी भाग - 'स्त्री शास्त्रज्ञच' काळाची गरज का ह्या प्रश्नाचे उत्तर डॉ. गोडबोलेंच्या लेखात व येथील चर्चेत मिळाले नाही असे वाटत आहे. चु भु द्या घ्या
संशोधनात पडायचं की नाही हे
संशोधनात पडायचं की नाही हे दरवेळेस आधिपासून ठरविता येइलच असे नाही. मी मास्टर्स केल्यावर तीन वर्षे इंडस्ट्रीमध्ये काम केलं मग दोन वर्षे संशोधन सहाय्यक म्हणून काम केलं. ६-६ महिने देश बदलले म्हणून घरी होते. संशोधन सहाय्यकाचे काम करताना मजा आली म्हणून २८ व्या वर्षी पी.एच.डी चालु केली. बर्याच वेळा करियर चेंज म्हणून लोकं पी.एच.डी करतात.
मी तर अगदी ४० व्या वर्षी पी.एच.डी चालू केलेले लोक (स्त्री आणि पुरुष दोघेही) पहिलेत. सुरुवातीपासून संशोधनात पडायचं की नाही हे ठरलेले असेल तर फायदा नक्कीच होतो पण प्रत्येक जण तसेच करेल असे नाही. उशिरा पी.एच.डी चालू केली असेल तर स्त्रियांच्या बाबतीत पुढचा त्रास अटळ आहे!!
संशोधन क्षेत्राची आवड निर्माण झाल्यामुळे अथक परिश्रम घेऊन माणूस त्या क्षेत्राकडे जातो की त्या क्षेत्रात जाण्यास आवश्यक इतकी प्रतिभा अंगी असल्यामुळे असा निर्णय घेतला जातो? >>>> दोन्ही शक्यता आहेत.
'स्त्री शास्त्रज्ञच' काळाची गरज का ह्या प्रश्नाचे उत्तर डॉ. गोडबोलेंच्या लेखात व येथील चर्चेत मिळाले नाही असे वाटत आहे. >> खरेतर शास्त्रज्ञ निर्माण करणे ही काळाची गरज आहे (स्त्री असो वा पुरुष). ह्या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांना पुढे यायची संधी मिळावयास हवी कारण जर स्त्रिया संशोधनाकडे वळनार नसतील तर आपोआपच शास्त्रज्ञांची संख्या कमी होइल.
मी ठरवलं होतं की आयुष्यात
मी ठरवलं होतं की आयुष्यात काही बेसिक अचिव्ह झालं की ब्रेक घेऊन डॉक्टरेटचा विचार करायचा. पण एक म्हणजे बेसिकसुद्धा अचिव्ह झालेलं नाही आणि दोन म्हणजे डॉक्टरेटसाठी लागणार्या बुद्धी, सातत्य व चिकाटीचा अभाव.. थोडक्यात औकाद नाही आणि तीन म्हणजे मला जो विषय खुणावतोय तो दोन तीन शाखांचे (फांद्या या अर्थी हा प्लीज!) मिश्रण असल्याने मला मार्गदर्शन कोण करणार हाच झोल आहे. आणि चार म्हणजे सतत प्रवास आणि डॉक्युमेंटेशन नुसते नोटस स्वरूपात उपयोगाचे नाही त्यामुळे प्रचंड खर्चिक काम आहे तो पैसा येणार कुठून? आणि पाच म्हणजे... जौद्या झालं...
असो अवांतर.. हा बाफ स्त्री शास्त्रज्ञांसाठी होता. नुसत्या संशोधकांसाठी नाही हे अचानक आत्ता पेटले मला.
दोन्ही शक्यता आहेत.<<<
दोन्ही शक्यता आहेत.<<< धन्यवाद
(हेच बहुधा कोंबडी-अंडे)
>>>उशिरा पी.एच.डी चालू केली असेल तर स्त्रियांच्या बाबतीत पुढचा त्रास अटळ आहे!!<<<
(ह्याचा अर्थ असा होऊ शकेल का की स्त्रीने क्षेत्र लवकर निवडावे व करिअर लवकर मार्गावर आणून ते सेकंडरी ठरेल हेही मान्य करावे?)
पण पेशवांनी तर बहुतेक आयुष्यातील योग्य वेळी पी एच डी सुरू करण्याचेही गणित दाखवले आहे ना?
>> 'स्त्री शास्त्रज्ञच'
>> 'स्त्री शास्त्रज्ञच' काळाची गरज का
बेफ़िकीर हा प्रश्न चुकीचा आहे असे मला वाटते.
हे म्हणजे गोरे आडनावाच्या मनुष्यानेच कोळशाची वखार काढू नये का असे विचारण्यासारखे आहे.
स्त्रीला शास्त्रज्ञ व्हावेसे वाटले आणि तिची तशी पात्रता असेल तर तिला अडचणी येऊ नयेत हा मुद्दा आहे.
एक मनुष्य केवळ अमुक जातीचा, रंगाचा, लिंगाचा आहे म्हणून त्याला अमके काम करण्यात अडचणी याव्यात हे अपेक्षित आहे का?
>>>स्त्रीला शास्त्रज्ञ
>>>स्त्रीला शास्त्रज्ञ व्हावेसे वाटले आणि तिची तशी पात्रता असेल तर तिला अडचणी येऊ नयेत हा मुद्दा आहे. <<<
हा मुद्दा नाही आहे मृदुला
डॉ. रोहिणी गोडबोलेंच्या लेखाचे शीर्षक आणि संपूर्ण लेख 'स्त्री शास्त्रज्ञ - काळाची गरज' ह्यावर बेतलेला आहे.
तेव्हा, इथे जी चर्चा चालू आहे ती सदस्यांना ज्या विषयाबाबत आपुलकी वाटत आहे त्यावरती असली तरी लीलावतींनी जो लेख ट्रिगर लेख म्हणून दिलेला आहे तो वेगळाच आहे व त्यावर चर्चा झालेली नसावी असे म्हणायचे आहे
मृदुला, याच प्रश्नांपासून तर
मृदुला, याच प्रश्नांपासून तर सगळा वाद सुरू झाला.
तू दिलेले उत्तर हे पटण्यासारखे आणि बेसिक आहे पण स्त्रियांचे शास्त्रज्ञांच्यातले प्रमाण इतके कमी हे घातक आहे. ते वाढलेच पाहिजे. ते समाजासाठी गरजेचे आहे वगैरे विधानांचे लॉजिक शोधून मिळत नव्हते.
ह्याचा अर्थ असा होऊ शकेल का
ह्याचा अर्थ असा होऊ शकेल का की स्त्रीने क्षेत्र लवकर निवडावे व करिअर लवकर मार्गावर आणून ते सेकंडरी ठरेल हेही मान्य करावे? >>> मान्य करावे असे नाहीच पण इतरांपेक्षा किंचित जास्त संघर्ष करण्याची तयारी हवी.
स्त्रीने क्षेत्र लवकर निवडावे >> लवकर निवडावे असे म्हणून होत नाही. मी २२ व्या वर्षी मास्टर्स झाले पण पी.एच.डी चालू करेपर्यंत मधे ६ वर्षे गेली. लगेच चालू केली असती तर आत्तापर्यंत फॅकल्टी झाले असते.
नीधप, लेटेस्ट प्रतिसाद <<< +१
नीधप, लेटेस्ट प्रतिसाद <<< +१
Pages