तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).
फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) - तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता.
प्रमाणः दोन माणसांकरता
तांदूळ - एक वाटी
दूध - दोन ते अडीच वाट्या (गरम करून, साईसकट)
दही - २-३ टेबलस्पून
तांदूळ धुऊन काहीसा मऊ भात करून घ्यावा. तो होत असतानाच दुसर्या भांड्यात तेल घालून गरम झाल्यावर मोहरी-जिरे (हिंग नको), सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. भात गरम असतानाच फोडणीत घालावा. चवीप्रमाणे मीठ घालून कालवून घ्यावा. त्यात दूध कोमट करून घालावे. साय असेल तर ती सुध्दा घालावी. पुन्हा कालवून झाकून ठेवावे. ५-७ मिनिटांत सगळे दूध भातात शोषले जाते. गार झाल्यावर आयत्यावेळी जेवढे हवे तेवढे दही घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट कालवून वाढावा.
- आवडत असेल तर तळणीच्या मिरच्या वेगळ्या तळून कुस्करून घालाव्यात.
- ऑफिसमध्ये किंवा सहलीला वगैरे घेऊन जाताना थोडेच दही घालून करावा. म्हणजे आंबट होत नाही.
सायो राजेशाही थाटवाल्या
सायो
राजेशाही थाटवाल्या मित्राला सांगतेच आता.....
बायदवे, हॉटेलात जनरली कांदा, काकडी, टोमॅटोचे जे मिक्स रायते देतात ना, तसे जरा सरसरीत रायते करून त्यात एकदा भात कालवून बघा. तीही टेस्ट मस्त लागते.
अरे किती दिवसात खाल्ला नाहिये
अरे किती दिवसात खाल्ला नाहिये दहीभात.. धन्स मामी... आज करतेच...
हैदराबादला ४ दिवस राहिले होते
हैदराबादला ४ दिवस राहिले होते तेव्हा, काकडी वगैरे घातलेला दहिभात (दहिबुत्ती) काकतिया समोरच्या कामतमधे रोज जाऊन खायची मी.
आजच हा प्रकार केला.भात थोडा
आजच हा प्रकार केला.भात थोडा आसट झाल्याने थोडी गडबड झाली. पण चव मस्त जमली. ब्येष्ट आहे पदार्थ !
मी केला, खाल्ला आणि खिलवला.
मी केला, खाल्ला आणि खिलवला. पाककृती दात्री सुखी भव. तसे इतर टिप्स देणार्याही.
मी किसलेले आले, आणि अमानी सांगितल्याप्रमाणे दाणे, उडदाची डाळ फोडाणीला घातली.
पुढच्या वेळी काकडी बघू.
इंदूरला भेळ मिळायची कानातून धूर काढणारी तिच्यात डाळिंबाचे दाणे असायचे. तो मला डाळिंबाचा अपमान वाटायचा. पण दहिभातात घालायचा मोह होतोय. डोळ्यांना तरी छानच वाटेल.
दही-भातात ओला नारळ घालून मस्त
दही-भातात ओला नारळ घालून मस्त चव येते.
डीजे, आलं घालण्याचं माहिती नव्हतं. आता घालून बघेन.
सागर, आजच हा प्रकार केला.भात
सागर,
आजच हा प्रकार केला.भात थोडा आसट झाल्याने थोडी गडबड झाली. पण चव मस्त जमली. ब्येष्ट आहे पदार्थ !
>>>>> थोडा मऊसर भात केल्याने दहि-बुत्ती अधिकच वठते. आंबेमोहोर तांदुळाची केली तर खूपच छान होते.
मी माझ्या कृतीमध्ये सुध्दा हा मुद्दा घालते. धन्स सागर.
आसट म्हणजे काय?
आसट म्हणजे काय?
आसट म्हणजे गुरगुट्या, पाणी
आसट म्हणजे गुरगुट्या, पाणी जास्त झालेला.
मामी, कृतीमध्ये प्रमाण पण
मामी, कृतीमध्ये प्रमाण पण टाका. सगळ्याच काही तुमच्यासारख्या सुगृहिणी व सुगरणी नसतात. काही माझ्यासारखे हौशे कुक पण असतात, आणि मला डाव्या हाताला कुकरी बुक किंवा टिपणवही लागते.
धन्यवाद.
धन्यवाद.
भरत मयेकर, दही-भाताकरता
भरत मयेकर, दही-भाताकरता प्रमाण विचारणारे तुम्हीच पहिले निघालात. बरं टाकते हं.....
>>गार झाल्यावर आयत्यावेळी
>>गार झाल्यावर आयत्यावेळी जेवढे हवे तेवढे दही घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट कालवून वाढावा.
कमीत कमी किती आधी करून ठेवायचा?
सहसा जेवायच्या अर्धा/ एक तास आधी स्वयंपाकाला सुरुवात असा प्रकार असल्याने विचारते आहे.
.
.
मी दहिबुतीची रेसिपी
मी दहिबुतीची रेसिपी विचारल्यावर स्वाती ने (माझी लाज काढून) मला इथे पाठवलं
आता मी दहिबुत्ती करणारच. मला भात फार आवडत नाही पण हा प्रकार फार लोकप्रिय आहे त्यामुळे भात्यात हा बाण असलेला बरा!
रेसिपीबद्दल धन्यावाद!
काही जण मेयॉनीज घालतात आणि
काही जण मेयॉनीज घालतात आणि वरून ढब्बू मिरची अगदी बारीक चिरून. छान स्वाद येतो. लाल सुक्या मिरच्यांऐवजी मसाला भरलेल्या फोडणीच्या वापरल्या तर सोने पे सुहागा!
एका ठिकाणी अशा भातावर तुपात घोळवलेले खजूर दिले होते. अ मे झिं ग लागले!
मी ह्या रेसिपीवर बरंच लिहिलं
मी ह्या रेसिपीवर बरंच लिहिलं आहे हे मला आत्ताच लक्षात आलं
मिनोतीने लिहिलंय की त्यांच्याकडे फोडणी न घालता कच्चा लसूण ठेचून घालतात. असा लसूण दुधाबरोबर चालतो?
सायो - मि सुद्धा कच्चा लसुणच
सायो - मि सुद्धा कच्चा लसुणच घालते....मस्त लागते.आणी हो, दुधाबरोबर चालतो. लसुण घालुन केलेल्या दाणयाचा चटणि सोबत हा भात खाणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभवच....
मामी दुवा सार्वजनिक करणार का,
मामी
दुवा सार्वजनिक करणार का, मला मायबोलीवर नसलेल्या लोकांना याचा दुवा पाठवायचा आहे.
ही माझी अत्यंत आवडती कृती आहे.
रूनी, धागा सार्वजनिक केला
रूनी, धागा सार्वजनिक केला आहे. सार्वजनिक नाहीये हे माहितच नव्हतं. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
ही माझी अत्यंत आवडती कृती आहे. >>>
स्पेशल आभार.
अजून एक पद्धत भात शिजवतानाच
अजून एक पद्धत
भात शिजवतानाच मीठ आणु तुप (१ चमचा) घालायचे. भात मऊ शिजवायचा. शिजलेला भात गार झाल्यावर त्यात दुध्+दही/ ताक्+दुध घालायचं कालवून घ्यायचं आणि फोडणी करताना नारळाच्या तेल गरम करुन त्यात लाल सुक्या मिरचीचे तुकडे, जीरं, कढीपत्ता, उडीद डाळ घालायची. ही फोडणी भातावर ओतायची. नारळ तेलाची चव आवडत असेल त्यांना ही पद्धत नक्की आवडेल.
(मेधा, मंजुडी, लली, अश्वी - आठवतेय का तुम्हाला चव ह्याची? आवडलेली का?)
दहीभुत्ती फार आवडते अशातला
दहीभुत्ती फार आवडते अशातला भाग नाही पण शूम्पी म्हटली तसा ठेवते भात्यात बाण. चमचमीत जेवणाबरोबर पार्टीत करायला बरा पडतो. पोळ्या करायचा कंटाळा आला तर आमच्याकडे अधूनमधून वरण-भात / सुकी भाजी किंवा दहीभात- चमचमीत भाजी/ वडे असा काहीतरी प्रकार होतो. त्यावेळी नुसताच दही-दूध-साय भात कालवून आवडतो.
हा भात इंटरेस्टिंग करण्यासाठी फोडणीतच काजूतुकडा ब्राऊन रंगावर परतून भातात घालते. काजू-उडीदडाळ-कढीपत्ता पाहिजेच. बाकीचे असेल नसेल त्याप्रमाणे
किती व्हर्सटाईल आहे हा
किती व्हर्सटाईल आहे हा प्रकार.
मी पण दही बुत्ती फॅन
मी पण दही बुत्ती फॅन कल्बमध्ये.

रोज दही भाताशिवाय आमच जेवण पूर्ण होत नाही. उन्हाळ्यात दहीभातावर फोडणी घालून ते भांड फ्रिजमध्ये ठेवतो. व जेवताना काढायच.
फोडणी साजूक तुपाचीच हवी.
राई, जिर, कढीपत्ता, लाल मिरचीचे तुकडे, काजूचे तुकडे, उडीद डाळ, चणा डाळ, हिंग फोडणीत हवेतच.
ही फोडणीतील कुरकुरीत लाल मिरची कुस्ककरुन भातात मिक्स करायची मस्त चव येते. .
नुसतं नाव वाचलं तरी गाआआआर
नुसतं नाव वाचलं तरी गाआआआर वाटतं
बंगलोरातल्या शेजार्यांकडून
बंगलोरातल्या शेजार्यांकडून दहीभातातल्या भाताला शेवया रीप्लेसमेंट घालून नवा पदार्थ मिळाला. अप्रतिम लागला.
बँबिनोच्या शेवयीउपम्याला वापरतो त्या शेवया उकडून, निथळून ताकात भिजवून ठेवायच्या. खायला देण्याआधी त्यात दही-मीठ मिसळायचं. साजुक तुपाच्या फोडणीत जिरं, हिरव्या मिर्च्यांचे तुकडे, काजू, गोडलिंबाची पानं घालून ही फोडणी दही-शेवयांमध्ये मिसळायची. यात फळं आवडणार्यांनी द्राक्षाचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे घालून खायचं.
आजच केला होता. मस्त यम्मी
आजच केला होता. मस्त यम्मी लागतो
छान प्रकार. सांडगी मिरची
छान प्रकार.
सांडगी मिरची जास्त आवडते मला यात. साजूक तुपाची फोडणी करते.
आज पोह्याचा केला हा प्रकार, दुध-ताक घालून. थोडी काकडीपण घातली. तूप-मोहरी-जिरं-हिंग-सुक्या लाल मिरच्या-उडीद डाळ घातलं फोडणीत. सांडगी मिरच्या नव्हत्या. मस्त लागलं हे पण. काजू विसरले.
माझा आवडता पदार्थ
माझा आवडता पदार्थ
एका गटगला मैत्रेयीने केलेली
एका गटगला मैत्रेयीने केलेली दही बुत्ती(?) किंवा दहीभातही व्यवस्थित लक्षात राहिलाय. तिने खारी बुंदी आणि सांडग्या (वाळवलेल्या) मिरच्या घातल्या होत्या. तिखट वडापाव खाल्यावर तिचा भात मस्त लागला होता.
Pages